11th Admission 2019 Round

11th Admission 2019 Round

अकरावी प्रवेशासाठी आता आठवी फेरी!

Mumbai 11th Admission 2019 – The eighth round of 11th admission is proposed by the Deputy Director, Mumbai Department of Education. The round will be held to ensure that students who are not yet registered on the 11th Admission Portal, have passed the July examination. 11th admission process starts till October 7. During this period, seven rounds have been completed – three regular, one special and three first priority rounds. Now the Eighth Admission Round is proposed by the Office of the Deputy Director, School Education Department during the ACT examination. Read the complete details given below :

Mumbai 11th Admission 2019

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई – दिवाळीची सुट्टी, परीक्षा हंगाम आणि निवडणुकीची धामधूम तोंडावर असतानाच अकरावी प्रवेशाच्या आठव्या फेरीचा प्रस्ताव मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिला आहे. जुलैच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप अकरावी प्रवेशाच्या पोर्टलवर नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी, या उद्देशाने ही फेरी होणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा गतवर्षीच्या तुलनेत आठ दिवस उशिरा सुरू झाली. १ ऑक्टोबरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू होती. या काळात तीन नियमित, एक विशेष आणि तीन प्रथम प्राधान्य फेरी अशा सात फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आता ऐन परीक्षेच्या काळात आठव्या प्रवेश फेरीचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शालेय शिक्षण विभागाला दिला आहे.

यंदा मोठ्या प्रमाणात जागा रिक्‍त राहिल्याने त्या भरण्यासाठी प्रवेश फेऱ्यांचा घाट घातला जात आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे. निम्मे अभ्यासक्रम पूर्ण झाल्याने पुढील प्रवेश प्रक्रिया राबविण्यास कॉलेजांचा मोठा विरोध आहे. आता प्रवेश दिल्यास या विद्यार्थ्यांचा अभ्यास कोण पूर्ण करणार असा प्रश्नही कॉलेज प्रशासनाकडून उपस्थित होत आहे. अभ्यासक्रम निम्मा पूर्ण झाला आहे. पहिल्या चाचणी परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. आता शिक्षण विभाग पुढील फेऱ्यांचे नियोजन करीत आहे. त्याचबरोबर दिवाळी सुट्टी तोंडावर आहे. निवडणूक हंगाम असल्याने कर्मचारी कॉलेजात नाहीत. त्यामुळे ही फेरी कोणाच्या भल्यासाठी अशी संतप्‍त विचारणा होत आहे. यासंदर्भात प्रभारी शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

१ लाख जागा रिक्त? 11th admission 1lac seats vacant

पूर्ण झालेल्या सात फेऱ्यांत यंदा अकरावी ऑनलाइनमधून किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिले याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केलेली नाही. यंदा मुंबई विभागात तीन लाखांहून अधिक जागा होत्या. त्यापैकी ९० हजार ते एक लाख जागा रिक्‍त राहिल्याची प्राथमिक आकडेवारी आहे. पुरवणी परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संधी देण्यात आली. त्यानंतर अजूनही विद्यार्थी येत असल्याचे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *