11th Admission 2020 Important News

Mumbai 11th Admission 2020-2021

अकरावीचेही ऑनलाईन वर्ग सुरू होणार

11th Class Registration from November 2nd, 2020 and Hours Class schedule will be available soon, The online classes for the students of Science, Commerce and Arts will be conducted through Marathi and English medium. For this, students are required to register. The branch in which the student wishes to be admitted. He wants to register for that branch and the students will get the online education schedule and required details on their e-mail ID and mobile number. The link https://covid19.scertmaha.ac.in/eleventh is available for registration.

अकरावीची 2 नोव्हेंबरपासून नोंदणी तर तासिकांचे वेळापत्रक लवकरच, मराठा आरक्षणामुळे राज्यातील अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल? यावर प्रश्‍नचिन्ह असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाचे ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 नोव्हेंबरपासून अकरावी ऑनलाईन शिक्षणाच्या नोंदणीस सुरुवात होणार असून, तासिकांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

मॅटचे काम ऑनलाईन करण्यासाठी याचिका; उच्च न्यायालयाचे खुलासा करण्याचे निर्देश

शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या प्रवेश फेरीचे प्रवेश झाल्यानंतर मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली; परंतु अकरावीचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. अखेर शिक्षण विभागाने अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

Registration Started Now इच्छुक शाखेसाठी नोंदणी –

अकरावी विज्ञान, वाणिज्य, कला शाखेच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग मराठी व इंग्रजी माध्यमातून भरणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे. विद्यार्थी ज्या शाखेत प्रवेश घेण्यास इच्छुक आहे. त्या शाखेसाठी त्याने नावनोंदणी करायची असून, ऑनलाईन शिक्षणाचे वेळापत्रक व आवश्‍यक तपशील विद्यार्थ्यांना त्यांच्या ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांकावर मिळणार आहे. नावनोंदणीसाठी https://covid19.scertmaha.ac.in/eleventh ही लिंक उपलब्ध आहे.

सौर्स: सकाळ


अकरावी प्रवेश लांबणीवर? विद्यार्थ्यांची आणखी चार आठवडे रखडपट्टी

11th Admission 2020 – After the Supreme Court adjourned the Maratha Reservation Act on September 9, directing that Maratha reservation should not be implemented in education admissions for the academic year 2020-21, the state government also postponed Class XI admissions. The state government has announced that it will seek an explanation from the apex court in two days. But even after a month and a half, the hearing held on Tuesday (27 Oct. 2020) has left the students in despair. There are fears that the admission of students will be suspended for another four weeks due to the sluggish role of the state government.

सर्वोच्च न्यायालयाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण प्रवेशात मराठा आरक्षण लागू करू नये, असे निर्देश देऊन मराठा आरक्षण कायद्याला ९ सप्टेंबर रोजी स्थगिती दिल्यानंतर, राज्य सरकारने इयत्ता अकरावीचे प्रवेशही स्थगित केले. यानंतर दोन दिवसांत सर्वोच्च न्यायालयात दाद मागून प्रवेशाबाबत स्पष्टीकरण मागणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. मात्र तब्बल दीड महिन्यांनी मंगळवारी (27 Oct. 2020) झालेल्या सुनावणीतही विद्यार्थ्यांच्या हाती निराशाच आली आहे. राज्य सरकारच्या सुस्त भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश आणखी चार आठवडे लटकण्याची भीती व्यक्त होत आहे.

मराठा आरक्षणाबाबत सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारने आरक्षणाच्या समर्थनार्थ आपली भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे अकरावी प्रवेश, एमपीएससी परीक्षा इतकेच नव्हे, तर इंजिनीअरिंग, डिप्लोमा प्रवेश प्रक्रियाही खोळंबल्या आहेत. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी चार आठवड्यांनी ठेवल्याने त्यांच्या पदरी पुन्हा निराशाच आली. त्यामुळे आता आणखी किती काळ प्रतीक्षा करायची, असा प्रश्न विद्यार्थी व पालक विचारत आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने लॉकडाउनच्या कालावधीत ऑनलाइन शिक्षणावर भर दिला. मात्र दुसरीकडे अकरावी प्रवेशाबाबत सरकार उदासीन असल्याचे दिसून येत आहे. यंदा लॉकडाउनमुळे दहावीचा निकाल उशिरा जाहीर झाला. यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीचे प्रवेश पूर्ण झाल्यावर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने अकरावी प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबाबत कोणताही विचार शिक्षण विभागाने केलेला नाही. त्यामुळे एकीकडे पहिलीच्या वर्गातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत असताना, अकरावीचे विद्यार्थी मात्र अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवेश घेतल्यानंतर त्यांना अकरावीच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. या परीक्षेनंतर बारावीची परीक्षा, तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारीही करावी लागणार आहे. मात्र सध्या आम्ही सर्व दिशाहीन झाल्याची भावना विद्यार्थी व पालक व्यक्त करत आहेत.

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेद्वारे पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये आत्तापर्यंत ७८ हजार ६१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यात एसईबीसी आरक्षणानुसार राज्यभरात अद्याप चार हजार १९९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. आता लाखो विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडलेले आहेत. याचबरोबर पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम राहणार आहेत की नाही, याबाबतही पालकांच्या मानात शंका आहेत. यामुळे सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाऊन तातडीने सर्वांच्या हिताचा निर्णय येईल अशा प्रकारे दाद मागावी आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही पालक व विद्यार्थी करत आहेत.
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक सुनावणीवेळी महाविकास आघाडी सरकारच्या विभागांमधील समन्वयाचा अभाव दिसला. आरक्षणप्रश्नी अन्य राज्यांच्या प्रलंबित याचिकांप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाकडून यापूर्वी कुठेही स्थगिती आलेली नाही. महाराष्ट्राच्या बाबतीत राज्य सरकारच्या समन्वयाच्या अभावानेच स्थगिती आदेश आला. गायकवाड आयोगाचा अहवाल प्रभावीपणे दाखवला असता, तरी कदाचित स्थगिती आली नसती.

सौर्स : मटा


11वी प्रवेश प्रक्रिये बाबत पुढील वेळापत्रक शासन आदेश प्राप्त झाल्यानंतरच

11th Admission Important Update: Declaration of Allotment list for Round-2 was scheduled to display on 10th September 2020, as a part of Std.11th Centralised Online Admission process 2020-21.rest admission process is postponed till further notice. Further time table for 11th Online Admission process will be declared after the Government Approval.

इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2020-21 अंतर्गत नियमित प्रवेश फेरी-2 ची गुणवत्ता/निवड यादी (Allotment) दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर केली जाणार होती. तथापि माननीय सर्वोच्च न्यायालय SEBC आरक्षण संदर्भातील आदेशाचे अनुषंगाने यापुढील इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेची सदर कार्यवाही पुढे ढकलण्यात येत आहे. 11वी प्रवेश प्रक्रिये बाबत पुढील कार्यवाहीचे वेळापत्रक शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल.


अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

FYJC Online Admission 2020: The first merit list of the 11th online admission process was released on Sunday, August 30, 2020. However, due to the Corona situation, there is a delay in securing admission in the colleges allotted in this list. As a result, the deadline for confirmation of admission has been extended. Students are now given time till 5 pm on September 4, 2020 to secure admission in Regular Round 1. Apart from this, the education department has also announced the schedule of regular round-2.Check Below details..

अकरावी प्रवेश:  दुसरी प्रवेश यादी १० सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

करोनामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा उशिरा सुरू झाली. प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ३० ऑगस्ट रोजी जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेसाठी  मुदत देण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच रात्री ११ वाजता शिक्षणसंस्थांना त्यांच्या रिक्त जागा जाहीर कराव्या लागतील. यानंतर शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर (तारीख ५ सप्टेंबर) १२ वाजून ५ मिनिटांपासून विद्यार्थ्यांना भाग-२मधील पसंतीक्रम बदलता येणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ऑनलाइन नोंदणी केलेली नाही, असे विद्यार्थी भाग १ आणि भाग २ भरू शकतील. यासाठी ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. याशिवाय या कालावधीत कॉलेजांना व्यवस्थापन तसेच अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशासाठी अर्ज मागविता येतील. यानंतर १० सप्टेंबर रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

शिक्षण संचालनालयाने दुसऱ्या गुणवत्ता यादीचे वेळापत्रक अकरावी प्रवेशाच्या वेबसाइटवर जाहीर केले आहे. अकरावीसाठी मुंबई विभागात एकूण 3 लाख 20 हजार 840 जागा उपलब्ध आहेत. पहिली गुणवत्ता यादी तसेच अल्पसंख्याक, व्यवस्थापन आणि इनहाऊस कोटा मिळून आतापर्यंत एकूण 72 हजार 559 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर अद्याप 2 लाख 48 हजार 281 जागा रिक्त आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडायचे आहे अशा विद्यार्थ्यांनी withdraw of application या सुविधेचा वापर करावा असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी रविवारी ३० ऑगस्ट २०२० रोजी जाहीर झाली. मात्र करोना स्थितीमुळे या यादीत अलॉट झालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करण्यास विलंब होत आहे. परिणामी प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना नियमित फेरी १ मधील प्रवेश निश्चित करण्यासाठी ४ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. याशिवाय नियमित फेरी – २ चे वेळापत्रकही शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.

नियमित फेरी – २ चे वेळापत्रक

१) ४ सप्टेंबर २०२० – (रात्री १० वाजता) नियमित प्रवेश फेरी २ साठी रिक्त पदे दर्शवणे
२) ५ सप्टेंबर २०२० ते ७ सप्टेंबर २०२० – नियमित फेरी – २ साठी विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम (भाग -२) भरणे सुरू
३) ८ सप्टेंबर २०२० ते ९ सप्टेंबर २०२० – डेटा प्रोसेसिंगसाठी राखीव वेळ
४) १० सप्टेंबर २०२० रोजी १० वाजता – नियमित प्रवेश फेरी – २ ची गुणवत्ता यादी जाहीर करणे
५) १० सप्टेंबर २०२० सकाळी ११ ते १२ सप्टेंबर २०२० सायंकाळी ५ वाजेपर्यंत – दुसऱ्या यादीतील प्रवेश निश्चित करणे
६) १२ सप्टेंबर २०२० रात्री १० वाजता – प्रवेशाची नियमित फेरी – ३ साठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे

सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे –दरम्यान, पहिल्या यादीत कला शाखेतील १२ हजार ५०२, वाणिज्य शाखेतील ६६ हजार १४० आणि विज्ञान शाखेतील ३७ हजार ९७६ आणि एमसीव्हीसीच्या ९०२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

शाखानिहाय मिळालेले प्रवेश

शाखा — एकूण जागा — मिळालेले प्रवेश

विज्ञान — ६६,७९१ –३७,९७६

वाणिज्य — १,०५,१६० — ६६,१४०

एमसीव्हीसी –३,८९३ –९०२

अकरावी ऑनलाइन प्रवेशांच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


11th Admission 2020 Merit List

अकरावीची पहिली मिरीट लिस्‍ट जाहीर

पहिल्‍या फेरीसाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील सर्व शाखा मिळून २० हजार ६१६ जागा उपलब्‍ध होत्‍या. या जागांकरीता १२ हजार १३१ उमेदवारांची निवड त्‍यांनी नोंदविलेल्‍या पर्यायांनुसार केलेली आहे. विद्यार्थ्यांनी अर्जाच्‍या भाग दोनमध्ये शाखा व महाविद्यालय पसंतीचे दहा पर्याय नोंदविलेले होते. विद्यार्थ्यांना मिळालेले गुण व महाविद्यालयांतील कट-ऑफ यांच्‍या आधारावर महाविद्यालयाचे पर्याय उपलब्‍ध करून दिले आहे. पहिल्‍या प्राधान्‍य क्रमाचे महाविद्यालय मिळालेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असून, अन्‍यथा पुढील प्रक्रियेत अशा विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार नाही. तसेच प्रवेश रद्द करणार्या विद्यार्थ्यांनादेखील पुढील फेर्यांच्‍या प्रक्रियेत सहभागी होता येणार नसल्‍याचे शिक्षण विभागाने स्‍पष्ट केले आहे.

कट-ऑफ

विज्ञान शाखेचा कट-ऑफ ९५.४ टक्‍के राहिला. वाणिज्‍य शाखेचा कट-ऑफ ९३.८ टक्‍के तर कला शाखेचा कट-ऑफ ८९.४ टक्‍के राहिला. यादीत १२ हजार १३१ विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्‍यांना नमूद महाविद्यालयात ऑनलाइन स्‍वरूपात प्रवेश निश्‍चितीसाठी गुरूवार (ता.३) पर्यंतची मुदत आहे.

यापूर्वी सामान्‍यतः कॉलेजरोडवरील आरवायके महाविद्यालयाचा कट-ऑफ सर्वात अधिक राहायचा. यंदा मात्र हा विक्रम मोडला असून उन्नती महाविद्यालय आणि मातोश्री महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा कट-ऑफ ९५.४ टक्‍के राहिला. आरवायके महाविद्यालयात खुल्या प्रवर्गाचा कट-ऑफ ९५.२ टक्‍के आहे. तर वाणिज्‍य शाखेत बीवायके महाविद्यालयाचा कट-ऑफ ९३.८ टक्‍के, मो. स. गोसावी महाविद्यालय ९१.६ टक्‍के, केटीएचएम महाविद्यालय ९०.८ टक्‍के कट-ऑफ राहिला. कला शाखेत एचपीटी महाविद्यालय ८९.४ टक्‍के, एमएमआरके महिला महाविद्यालय ८४.४ तर केटीएचएम महाविद्यालय ८०.४ टक्‍के

शाखानिहाय झालेल्‍या निवडीचा तपशील असा 

शाखा उपलब्‍ध जागा निवड विद्यार्थी संख्या
विज्ञान- १०,३२० ५५०४
वाणिज्‍य -८६८० ४२५८
कला -४९१० २१८६
एमएसव्‍हीसी -१०४३ १८३
एकूण-२५०७० १२१३१

प्राधान्‍यक्रम निहाय निवड झालेले विद्यार्थी 

प्रथम प्राधान्‍य—————-७ हजार ३८८
द्वितीय प्राधान्‍य—————१ हजार ६९८
तिसरा प्राधान्‍य—————१ हजार ०६९
चौथा प्राधान्‍य—————७०१
पाचवा प्राधान्‍य————–४७१”


अकरावी प्रवेशाची पहिली नियमित गुणवत्ता यादी ‘या’ दिवशी होणार प्रसिद्ध

Mission 11th Admission 2020: The important stage of registration in the 11th online admission process has been completed and the students will now have to wait till next Sunday (30th) for the quality list of the first regular admission round. As per the schedule given by the education department, the merit list for regular admission round one admission will be published next Sunday (30th). Read More details below:

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयांतील कनिष्ठ महाविद्यालयातील १ लाख ६ हजार ९७२ जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज केलेल्या ७२ हजार ८२० विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शिक्षण विभागातर्फे प्रसिध्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना सर्वसाधारण गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवण्यासाठी कालावधी ही देण्यात आला होता. दरम्यान, प्रवेश प्रक्रियेत जवळपास सहा हजार १९० विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहे. तर, ६३ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश रद्द केले आहेत.

तात्पुरता यादीवर आक्षेप 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या दोन हजार ११७ विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदविले आहेत. यामध्ये ग्रीव्हीयन्स पाच प्रकारात वर्गीकरण करण्यात आले असून, त्याअंतर्गत तांत्रिक एक हजार १०१, गुणवत्ता यादी १२८, अतिरिक्त गुण ३६ ,प्रशासकीय ३९ आणि इतर ८१३ असे आक्षेप आहेत. त्यातील १ हजार ६१३ आक्षेपांना उत्तर देण्यात आले आहे. तर, अद्यापही ५०४ आक्षेप उत्तराविना पेंडीग आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये हे आक्षेपांना देखील उत्तर देण्यात येणार आहे.

पहिल्या प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी येत्या रविवार

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून विद्यार्थ्यांना आता नियमित पहिल्या प्रवेश फेरीच्या गुणवत्ता यादीची येत्या रविवार पर्यंत (ता.३०) प्रतिक्षा करावी लागणार आहे.

शिक्षण विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार येत्या रविवारी (ता.३०) नियमित प्रवेश फेरी एक अंतर्गत प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यात विद्यार्थ्याला त्याच्या लॉग इनमध्ये प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय दर्शविले जाईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत मोबाईल संदेश पाठविण्यात येणार आहे. तसेच पहिल्या नियमित फेरीचे कट आॅफ संकेतस्थळावर प्रसिध्द केले होणार असून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी त्यांच्या लॉगइनमध्ये पाठवली जाईल..


11th Admission 2020

अकरावी प्रवेशाचा विचार करीत असाल तर तुमच्या साठी महत्वाची बातमी

11th Admission 2020 Updates : Due to the Corona Virus Effect all educational institute and examine board cancelled their examination or at least postponed it. 10th Exam 2020 is still not completed. Parents worry about whether their child will get admission to a college like mind after 10th class. This year, a tenth paper is still due to Corona. The state board has yet to announce a decision on whether to take the exam. Read the more details below:

शिक्षण विभागाचा अपडेट – दहावीचा शेवटचा पेपर कधी?

दहावी निकालानंतर मनासारख्या महाविद्यालयात आपल्या पाल्याला प्रवेश मिळेल का, याची चिंता पालकांना असते. यंदा कोरोनामुळे दहावीचा एक पेपर अद्याप शिल्लक आहे. परीक्षा होणार की नाही यासंदर्भात राज्य मंडळाने अजून निर्णय जाहीर केलेला नाही. दरवर्षी एप्रिल महिन्यात अकरावीच्या प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. नवीन महाविद्यालय, त्यांची जागा, नोंदणी अशी कामे या काळात केली जातात. यंदा मात्र ही कामे सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. दरवर्षी सप्टेंबरपर्यंत अकरावीचे प्रवेश पूर्ण करावे लागतात. साधारणत: एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष अर्जाचा पहिला टप्पा भरण्यास सुरुवात होते. यंदा ही प्रक्रिया पुढे ढकलली जाईल आणि त्याचा थेट परिणाम प्रवेशावर होण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी नोयडाच्या “नायसा’या कंपनीकडे गेल्या तीन वर्षांपासून आहे. मागील वर्ष या कंपनीचे शेवटचे वर्ष होते. यंदा नव्याने निविदा काढून नवी कंपनी सरकारकडून नेमण्यात येणार होती. गेल्या तीन वर्षांत नायसाबाबत अनेक तांत्रिक तक्रारी होत्या, त्यामुळे प्रवेशात अनेकदा गोंधळही उडाला होता. अशात नवीन कंपनी निवडण्यासाठी आणखी विलंब झाल्यास त्याचा फटका प्रवेश प्रक्रियेला बसणार आहे

कोरोनाचा फटका यंदा बहुतांश परीक्षांना बसला आहे. आगामी सर्व शैक्षणिक सत्रांवर याचा परिणाम होणार आहे. दरवर्षी उन्हाळ्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेची तयारी सुरू होते. यंदा दहावीचीच परीक्षा अर्धवट, शाळा बंद, यामुळे अकरावी प्रवेशाचे नियोजन कोलमडण्याची शक्‍यता आहे.

सौर्स : सकाळ

Leave a Comment