11th Admission 2021 Important News

Maharashtra FYJC Admission 2021

FYJC Admission 2021: ऑनलाइन प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना एक संधी

The FCFS Admission 2021 round of the 11th Central Online Admission Process is currently underway. who have not yet been admitted under the 11th  Central Online Admission Process. There is an another opportunity for these students who have not been admitted. FCFS admission 2021 round has been extended till October 21. The 11th online admission process for Mumbai Mahanagar as well as Pune, Pimpri Chinchwad, Nashik, Amravati, Nagpur Municipal Corporation divisions is currently underway. According to the earlier schedule, the last date for the admission round was October 18. However, considering the interest of the students, the FCFS admission round has been extended by 3 days by the school education department.

Maharashtra FYJC Admission 2021: अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची FCFS प्रवेश फेरी सध्या सुरु आहे. अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. FCFS प्रवेश फेरीला २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. प्रवेश न मिळालेल्या या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक संधी चालून आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

कोणताही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहू नये शिक्षण विभागातर्फे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. याअंतर्गत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) तत्त्वावर सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला २१ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शालेय शिक्षणविभागातर्फे मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या पाच शिक्षण विभागांना यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगपालिका विभागांना अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील FCFS प्रवेश फेरी सध्या सुरु आहे. याआधीच्या वेळापत्रकानुसार १८ ऑक्टोबर ही या प्रवेश फेरीची शेवटची तारीख होती. पण शालेय शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन या FCFS प्रवेश फेरीला ३ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.


Maharashtra FYJC Admission 2021 Third Merit Lists

११वी ऑनलाईन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर

Third Merit lists declared by 11th Admission 2021 fon Mumbai, Pune, Pimpri-Chinchwad, Nashik, Amravati and Nagpur Municipal Corporation areas. The Merit lists of 11th online admission is announce today by state board. Read the more details given below:

FYJC Third Merit List : मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रात आज, सोमवारी १३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यासोबतच इनहाऊस, मॅनेजमेंट कोटा, आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशाचीही तिसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत संबधित कॉलेजात जाऊन प्रवेश घेता येणार असल्याची माहिती शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली. तिसऱ्या गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांना जागा मिळतील. त्यांना आपल्या लॉगइनवर कॉलेजांची माहिती आणि कट ऑफही पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच यासाठीचे एसएमएस विद्यार्थ्याला पाठवले जाणार आहेत. या गुणवत्ता यादीत जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत संबंधित कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश घेणे बंधनकारक आहे.


Maharashtra FYJC Admission 2021 Second Merit

The second merit list in the 11th admission process was released on Saturday, September 4. Students can view this list by visiting the official website of Eleventh Admission. They will also receive an SMS alert about their entry.

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील दुसरी गुणवत्ता यादी शनिवारी ४ सप्टेंबर रोजी जाहीर झाली. विद्यार्थी अकरावी प्रवेशांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ही यादी पाहून शकता. शिवाय त्यांना त्यांच्या प्रवेशाबाबतच्या माहितीचा अलर्टही एसएमएसद्वारे मिळणार आहे. मुंबई विभागात एकूण ६०,०३७ विद्यार्थ्यांना दुसऱ्या यादीत प्रवेश अलॉट झाले आहेत.

 • मुंबई विभागाची शाखानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे -शाखा — एकूण जागा (कोटा वगळून) — एकूण अर्ज — अलॉट झालेले प्रवेश
 • कला — १७,६०५ — ९,८९१ — ५,१२५
 • वाणिज्य – ७७,२५९ — ८०,७५८ — ३७,१८६
 • विज्ञान — ४२,१८८ — ४२,४६७ — १७,३३३
 • एमसीव्हीसी — २,७४२ — ६०७ — ३९३
 • एकूण विद्यार्थी — १,३९,७९४ — १,३३,७२३ — ६०,०३७

अकरावी प्रवेशांच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा…


Mumbai 11th Admission 2021 First Merit List

अकरावी प्रवेशांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

Maharashtra FYJC Admission 2021 : The first quality list of 11th online admissions was released on Friday, August 27, 2021 at around 10 am. Two lakh 37 thousand 383 students had registered for the eleventh admission for three lakh 20 thousand 710 seats in Mumbai division. Of these, only two lakh two thousand 58 students were filled with college choice options.

अकरावी ऑनलाइन प्रवेशांची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवार २७ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जाहीर झाली. अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागातील तब्बल तीन लाख २० हजार ७१० जागांसाठी दोन लाख ३७ हजार ३८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील अवघ्या दोन लाख दोन हजार ५८ विद्यार्थ्यांनी कॉलेज पसंतीचे पर्याय भरलेले होते.

तुम्हाला पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज अलॉट झाले आहे का ते पुढील पद्धतीने पाहता येईल –

– सर्वात आधी अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे संकेतस्थळ https://mumbai.11thadmission.org.in/ वर जा.

How to Download Merit List

 • सर्वात आधी अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे संकेतस्थळ https://mumbai.11thadmission.org.in/ वर जा.
 • आपला आयडी पासवर्ड देऊन लॉग इन करा.
 • लॉग इन केल्यावर स्क्रीनवर तुमचे डिटेल्स येतील.
 • डॅश बोर्डवर ‘चेक अलॉटमेंट स्टेटस’ पर्यायावर क्लिक करा.
 • कॉलेज अलॉट झालं असेल तर त्याचं नाव येथे दिसेल.

Official Website of 11th online admission

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया संकेतस्थळ – Official Website

अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी आज होणार जाहीर

FYJC Admission 2021: कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष प्रवेशासाठी कट ऑफची पहिली यादी (FYJC Admission 2021) २७ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. पहिल्या फेरीसाठी ३.७५ लाखांहून अधिक अर्ज आले होते. त्यापैकी सुमारे ३.०६ लाख अर्ज स्वीकारले गेले आहेत. FYJC गुणवत्ता यादी या फेरीत जाहीर केली जाईल तसेच नवीन अर्ज स्वीकारले जातील. सोबतच पुढे आणखी तीन फेऱ्या देखील होणार आहेत.

शालेय शिक्षणमंत्र्यांच्या ट्विटनुसार, ‘प्रवेश फेरीसाठी अलॉटमेंट यादी आणि कट ऑफ यादी २७ ऑगस्टला जाहीर केली जाणार आहे. यानंतर आणखी तीन फेऱ्या होतील. या फेऱ्यांमध्येही नवीन नोंदणी स्वीकारली जाईल. ही फेरी MMR आणि पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक येथील महामंडळाच्या भागातील अकरावी प्रवेशासाठी आहे. MMR हे मुंबई महानगर क्षेत्र आहे.


Class 11th admission process is being implemented through central online admission system. The list of potential qualifiers for the first round will be announced on Monday.

अकरावी प्रवेशाची संभाव्य गुणवत्ता यादी आज जाहीर होणार

केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धतीद्वारे इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यातील पहिल्या प्रवेश फेरीतील संभाव्य गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राधान्यक्रम नोंदवण्याबाबत अर्जाचा भाग-2 भरण्याची प्रक्रियाच पूर्ण केली नसल्याचे आढळून आलेले आहे.

अकरावी प्रवेशासाठीची “सीईटी’ रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर तत्काळ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पहिल्या नियमित प्रवेश फेरीच्या वेळापत्रकानुसार अंमलबजावणीही सुरू झालेली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील एकूण 310 कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी नोंदणी केली असून, प्रवेशाच्या 1 लाख 10 हजार 765 जागा उपलब्ध करून दिल्या आहेत.


Online 11th Admission 2021 process has been started now. Candidates see the complete details and steps of online registration below on this paragraph. Here we are giving step by step information on how to fill Part 1 and Part 2 of the application by the students. Complete time table of 11th Online Admission 2021 are given here. Read the details carefully given here.

11th Admission -अकरावी प्रवेश अर्ज कसा भरायचा…

FYJC Online Admission 2021 Part one – How to fill the first part of the application?

 1. To fill up the application – go to the website and first click on the name of the urban area in which you want to enter the college.
 2. After this student registration should be done.
 3. Log in using the ID and password created.
 4. Part 1 form will open, fill it.
 5. Read the questions given while filling Part 1 and fill in the information asked.
 6. Fill in the name, address, email, marks, category, from which quota you want to enter.
 7. After completing the form, if there are students in a particular category, they will have to upload that certificate Admission fee is to be paid online.
 8. After that you want to lock your application.
 9. Children should note that once the form is completed, it should be read and locked. If not locked it will not be submitted.
 10. Check the status of your form on the dashboard. (Status will appear as verified or nonverified.)
 11. Those who have filled out an application from a specific category will need to have their application verified at their school or at the nearest guidance center.
 12. State board schools verify the applications of students in their particular category through the school login. Students in certain categories of other boards are required to verify their application through the Guidance Center.

For 11th Online Admission Process Part 2 of the application – How to fill the option form?

 1. The name of the college you want to get admission in is to be filled in this form.
 2. Students can name a minimum of 1 and a maximum of 10 colleges.
 3. Before filling the college preference list, look at the previous year’s cut-off of colleges and guess whether you can get admission in that college according to your marks.

Online Apply Here

11th Online Admission 2021 Time Table

 • Part One Filling: 14th to 22nd August
 • Part one and two filling: 17th to 22nd August
 • Admission Quality List: 27th August
 • Admission: 27th to 30th August
 • Second round of admission: 31st August to 4th September
 • Third round of admission: 5th to 11th September
 • Fourth round of admissions: September 12 to 17

अकरावीसाठीची CET रद्द, प्रवेश दहावीच्या गुणांवर

The results were declared on the basis of internal evaluation after the cancellation of the Class X examination. After that, the CET exam was to be taken for the eleventh admission. But now the Mumbai High Court has ordered that admission should be taken only on the basis of 10th marks. The CET for the eleventh admission has been quashed by the High Court

दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र आता दहावीच्या गुणांच्या आधारेच प्रवेश घेण्यात यावेत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अकरावी प्रवेशासाठीची सीईटी उच्च न्यायालयाने रद्द करण्यात आली आहे.

दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत सीईटी परीक्षा घेण्यात येणार होती. या सीईटीसाठी प्रवेश अर्जही लाखो विद्यार्थ्यांनी दाखल केले होते. मात्र अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांवरच करा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


The 11th online admissions will be available online from August 16 in cities across the state, including Pune. The process was to start from Monday, August 9. However, due to technical difficulties, the process has been postponed for seven days.

अकरावी प्रवेशांसाठी नोंदणी प्रक्रिया १६ ऑगस्टपासून

 • पुण्यासह राज्यातील शहरांत केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या अकरावी प्रवेशांची नोंदणी १६ ऑगस्टपासून करता येणार आहे. आजपासून (सोमवार, ९ ऑगस्ट) ही प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया सात दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.
 • राज्याच्या महानगरांतील अकरावीचा प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणार असून, यासाठी १६ ऑगस्टपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात होत आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या प्रवेशासाठी ही ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डी.जी. जगताप यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
 • विद्यार्थी आणि पालिकांमधील संभ्रम, तसेच प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जागृतीचा अभाव असल्यामुळे प्रवेश प्रक्रिया राबविण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणून नोंदणी व अर्ज भरण्याची सुविधाच मुदतवाढ करत १६ ऑगस्टपासून सूरू करण्यात येत असल्याचे जगताप यांनी कळविले आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव व्हावा म्हणून मॉक डेमोची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा शुक्रवार (ता.१३) पर्यंत उपलब्ध असेल. त्यानंतर सर्व माहिती नष्ट होईल आणि १६ तारखेनंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश अर्ज भरण्यात येईल.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक :

(फक्त संबंधित महापालिका क्षेत्रांसाठी)

कार्यवाहीचे टप्पे – कालावधी , कोण करणार

 • १) अ) संकेतस्थळावर विद्यार्थ्याने ऑनलाइन नोंदणी करणे. लॉगईन आयडी व पासवर्ड तयार करणे. ब) अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक आणि शुल्क भरणे क) अर्जातील माहिती शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रातून प्रमाणित करणे, शाळा निवडणे आणि अर्ज व्हेरिफाईड झाल्याची खात्री करणे ः १६ ऑगस्टपासून (हे विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने करावे)
 • २) विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील माहिती भाग-१ ऑनलाइन तपासून प्रमाणित करणे : १७ ऑगस्टपासून (माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शक केंद्रांनी करावे)

महत्त्वाचे काय?

 • – सराव म्हणून संकेतस्थळावर १३ तारखेच्या आत डेमो अर्ज भराल
 • – यात अडचण आल्यास आपल्या शाळेशी संपर्क साधा
 • – १३ तारखेनंतर हे अर्ज नष्ट होतील
 • – पालकांच्या मदतीने प्रत्यक्ष अर्ज १६ तारखेपासून भरावे
 • अर्ज दाखल करण्यासाठीचे संकेतस्थळ –

https://11thadmission.org.in/


The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will again provide the facility for online application for CET for Class XI from 3 pm on Monday (26). Online https://cet. 11thadmission.org.in . Filling facility is being provided from the website 11thadmission.org.in. This facility will be available till the end of 2nd August.

अकरावी सीईटीच्या नोंदणीसाठी नवी वेबसाइट तयार करण्यात आली आहे. ही वेबसाइट आज सोमवारपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. जुन्या वेबसाइटहून सीईटीसाठी साधारण एक लाख ४६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.


Common Entrance Exam (CET)  will be conducted for the first time in the state for Class XI admission and the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has published the schedule in this regard. Accordingly, students will be able to apply for the CET online from 20th July to 26th July 2021. . The CET will be held on August 21 from 11 am to 1 pm.

अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सीईटीची वेबसाईट लुडकली आहे. दहावी निकालाच्या दिवशी बोर्डाच्या वेबसाईटवर झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर विद्यार्थ्यांना संध्याकाळपर्यंत ऑनलाइन निकाल पाहता आला नव्हता. बोर्डाच्या वेबसाईटवरील सर्व्हर बिघाडाची समस्या अकरावी सीईटीचा ऑनलाइन प्रवेश अर्ज भरतेवेळीही निर्माण झाली आहे. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना सीईटीचा अर्ज भरता आलेला नाही.

दहावी निकालाच्या वेबसाईटप्रमाणे अकरावी सीईटीच्या वेबसाईटसाठीही राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आऊटसोर्सिंग केले आहे. वेबसाईटचे काम पाहणाऱया खासगी कंपनीच्या सर्व्हरवर लोड आल्याने पहिल्याच दिवशी सीईटीच्या वेबसाईटनेही मान टाकली आहे. या बिघाडाबाबत बोर्डाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अनेक विद्यार्थी वारंवार अर्ज भरण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र वेबसाईटवरील ‘ऑप्लिकेशन एरर’ या मेसेजमुळे त्यांना प्रवेश अर्ज भरताच आलेला नाही.

सीईटी देणाऱया विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन

अकरावी प्रवेशासाठी सीईटी देणाऱया विद्यार्थ्यांना सीईटीचा ऑनलाइन अर्ज भरताना काही अडचणी असल्यास तसेच परीक्षेसंदर्भात काही शंका असल्यास त्या सोडविण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागनिहाय हेल्पलाइन सुरू केली आहे. मुंबई विभागीय मंडळातील विद्यार्थी मुंबई विभागीय शिक्षण सचिव राजेंद्र अहिरे, सहाय्यक सचिव नीलम ढोके, वरिष्ठ अधिक्षक एस. एस. फाटक यांच्याशी अनुक्रमे 9423933435, 9869086061, 9869433816 या क्रमांकावर किंवा [email protected] या वेबसाईटवर संपर्क साधू शकतात.

विभागीय मंडळ – संपर्क क्रमांक

१) पुणे – ९६८९१९२८९९ / ८८८८३३९५३०

२) नागपूर – ९४०३६१४१४२ / ९८९०५१४८३९

३) मुंबई – ९४२३९३३४३५, / ९८६९०८६०६१

४) औरंगाबाद – ९९२२९००८२५ / ९४२३४६९७१२

५) अमरावती – ९९६०९०९३४७ / ९४२३६२१६४७

६) कोल्हापुर – ७५८८६३६३०१ / ८००७५९७०७१

७) नाशिक – ८८८८३३९४२३ / ८३२९००४८९९

८) लातुर – ९४२१६९४२८२ / ९४२१७६५६८३

९) कोकण – ८८०६५१२२८८/ ८८३०३८४०४४

FYJC Admission 2021: अकरावी प्रवेशांची ‘सीईटी’ ऑगस्टमध्ये; ऑनलाईन अर्ज करा

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील विद्यार्थी ज्याची वाट पाहत होते त्या ११ वीच्या सीईटी परीक्षेची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरात ही परीक्षा २१ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २० जुलै सकाळी ११.३० वाजल्यापासून ते २६ जुलै पर्यंत अर्ज भरता येणार आहे. हा अर्ज ऑनलाइन माध्यमातून भरायचा आहे

राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यासोबतच सीबीएसई आयसीएसई या आंतरराष्ट्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांनाही राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी ही द्यावी लागणार आहे. मात्र ही परीक्षा पूर्णपणे ऐच्छिक आहे. 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असून ती 8 माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये सेमीइंग्रजी या माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी आवेदनपत्र निश्चित केलेल्या इंग्रजी व इतर माध्यमांचा विचार करून प्रश्नपत्रिका त्यांना उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.

या विषयावर आधारित असेल परीक्षा

अकरावीची सीईटी ही दहावीच्या इंग्रजी, गणित व सामाजिक शास्त्रे (इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्र) या चार विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.100 गुणाच्या एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये चार विषयांसाठी प्रत्येकी 25 गुण दिले जाणार आहेत.

 • विषय . गुण
 • इंग्रजी – 25,
 • गणित (भाग 1 व भाग 2)- 25
 • विज्ञान आणि तंत्रज्ञान(भाग 1 व भाग 2)- 25
 • सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) 25
 • एकूण -. 100

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीतील नियमित विद्यार्थ्यांना सीईटीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र सन 2021 पूर्वी जे विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाले होते, अथवा प्रविष्ट झाले होते अशा विद्यार्थ्यांना सोबतच सीबीएसई आयसीएसई आणि इतर सर्व आंतरराष्ट्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी 178 रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे, हे शुल्क डेबिट क्रेडिट अथवा नेट बँकिंगच्या माध्यमातून भरण्याचा पर्याय मंडळाकडून देण्यात आला आहे.

ऑनलाईन अर्ज करा 


FYJC CET Admission 2021 – The President of State Secondary Board Mr. Dinkar Patil said that the CET for the first time this year will be held till 21st August 2021. The Online Application process for the CET will be started on 19th July 2021, for which a separate portal will be set up, the board said. A link to the portal will be made available on the board’s official website, and students will be able to decide whether to take the CET. Read the complete details here.

अकरावी प्रवेशांसाठी यंदा प्रथमच घेण्यात येणारी सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) २१ ऑगस्टपर्यंत घेणार असल्याचे सूतोवाच राज्य माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी केले. सीईटीसाठी अर्ज प्रक्रिया १९ जुलैला सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. या पोर्टलची लिंक मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येणार असून, सीईटी द्यायची की नाही, हे विद्यार्थ्यांना ठरवता येणार आहे.

अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षा; अर्ज प्रक्रिया १९ जुलैपासून सुरू होणार

 • राज्यातील सुमारे १६.५ लाख विद्यार्थ्यांचे दहावीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशांचे वेध लागले आहेत.
 • त्याची प्रक्रिया राज्य माध्यमिक मंडळाकडून सुरू करण्यात आली असून, १९ जुलैपासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या वेबसाइटवरून सीईटीसाठी अर्ज करता येणार आहे.
 • याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून, वेबसाइटवर सीईटी पोर्टलची लिंक देण्यात येणार आहे.
 • या लिंकवर विद्यार्थ्यांनी बैठकक्रमांक दाखल केल्यानंतर सीईटी द्यायची आहे की नाही, असे दोन पर्याय विचारले जातील.
 • विद्यार्थ्यांनी दोन्हीपैकी एक पर्याय निवडून नोंदणी करायची आहे.
 • सीईटी देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा पर्याय निवडल्यानंतर त्यांचा परीक्षा अर्ज मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने दाखल होईल.
 • प्रवेश परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याने त्याची केंद्रे लवकरच जाहीर करण्यात येतील, असेही मंडळाने स्पष्ट केले.
 • सीईटी परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारलेली असून, गणित, विज्ञान, इंग्रजी आणि समाजशास्त्र या चार विषयांमधील एकूण १०० प्रश्न विचारले जाणार आहेत.
 • यासाठी अभ्यासक्रमातील काही भाग काढून स्वतंत्र अभ्यासक्रम दिला जाणार असून, तोही लवकरच जाहीर केला जाणार आहे.
 • यामुळे विद्यार्थ्यांचा ताण हलका होणार असून, मंडळाने दिलेल्या अभ्यासक्रमाचाच सीईटीसाठी विचार केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार, नेमकी कशी? जाणून घ्या प्रक्रिया…

FYJC Class 11th Admission 2021 – Latest news received regarding the 10th Class Exam Results is that the state school education department has decided to cancel the 10th Class exam and pass the students, then how exactly will the students marks valuation? Such a question was raised by the students and parents. Finally, today, the state’s school education minister Varsha Gaikwad announced the 10th Marks Calculation formula. He also announced that there will be an Alternative Shared Examination (CET) for Class 11 Admission.

इयत्ता १० वीची परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं घेतला असला तरी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन नेमकं कसं करणार? असा सवाल विद्यार्थी आणि पालकांसमोर उपस्थित झाला होता. अखेर आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १० वीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्यूला जाहीर केला. यासोबतच इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी वैकल्पिक सामायिक परीक्षा (सीईटी) होणार असल्याचंही जाहीर केलं.

 • इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी सीईटी द्यावी लागणार आहे.
 • विविध परीक्षा मंडळांनी या वर्षीच्या इयत्ता १० वी निकालासाठी शाळा स्तरावर होणारे अंतर्ग मूल्यमापन विचारात घेतल्याने इयत्ता ११ वी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षे घेण्यात येणार आहे.
 • CET परीक्षेत १० वीच्या अभ्यासक्रमाच्या आधारेच घेण्यात येणार आहे.
 • परीक्षा १०० गुणांची असणार असून त्यासाठी बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत व ओएमआर पद्धतीनं दोन तासांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
 • इयत्ता ११ वी प्रवेश परीक्षा राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा (CET) दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील (CET) गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.
 • सामाईक परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक परीक्षा दिली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उद्यापर्यंत मुदतवाढ

11th Admission 2021 extension will be till 16th February. Students will be able to apply for the 11th admission till 10 am on Tuesday, February 16, while the allotted students will be able to confirm their admission till 6 pm.  Students who have not been able to participate in the Eleventh Admission Process due to some unavoidable reasons have been given an extension for confirmation of admission. The FCFS has been given a second extension in the 11th online admission process, the director of education said. TStudents who want to cancel their previous admission will have till February 15. Director of Education Dattatraya Jagtap has clarified that this is the last chance for the students entering the 11th standard.

मुंबई : ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेता आला नाही आहे, त्यांना प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एफसीएफएसच्या दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती शिक्षण संचालक यांनी दिली आहे. ही मुदतवाढ १६ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. मंगळावरी १६ फेब्रुवारी सकाळची १० पर्यंत विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी अर्ज करू शकणार आहेत, तर अलॉटमेंट मिळालेले विद्यार्थी सायंकाळी सहापर्यंत आपले प्रवेश निश्चिती करू शकणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आपापले आधीचे प्रवेश रद्द करायचे आहेत त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत वेळ असणार आहे. अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी असल्याचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई विभागातून अकरावी प्रवेशासाठी ८२ हजार २३९ जागा उपलब्ध आहेत. एफसीएफएसच्या दुसऱ्या फेरीत ४ हजार ९३८ जागा अलॉट करण्यात आल्या होत्या, त्यापैकी ४ हजार ५३५ जागांवर प्रवेश झाले आहेत. अद्याप ७७ हजार ७०४ जागा उपलब्ध आहेत. आता पुन्हा १६ तारखेपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थी पालकांना दिलासा मिळाला आहे.
शिक्षण संचलनालयाच्या माहितीवरून राज्यात सहा विभागांतील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १ लाख ८० हजारहून अधिक जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रिक्त जागांचे प्रमाण काहीसे कमी झाले असल्याने कोणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी हा अतिरिक्त एफसीएफएस फेरीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत संपणारी प्रवेश प्रक्रिया यंदा फेब्रुवारीत सुरू होऊनही संपलेली नाही. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण करून त्यांचा अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अकरावीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, विशेष फेरीच्या निवड यादीला दिली स्थगिती!

11th Admission Special Round Postponed : The selection list for the special round of admissions was expected to be announced at 11 a.m. Thursday. However, as the list was not released in time, there was confusion among the students waiting for admission. The Directorate of Secondary and Higher Secondary Education, which is implementing the admission process, updated the information on the website in the afternoon that the selection list for the special round has been postponed. The facility of choosing EWS class or open category has been made available to the students of SEBC under the Eleventh Admission Process on the Admission Portal and its revised schedule has been announced on the website. The Directorate of Education has also announced that further proceedings for the 11th admission 2021 should be done as per the revised schedule and the remaining students can also fill up the application in this extended time.राज्य सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) लाभ देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार मराठा आरक्षण लागू असणाऱ्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्ग किंवा खुला प्रवर्ग निवडण्यासाठी इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाच्या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली असून त्याचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीअंतर्गत गुरुवारी जाहीर होणाऱ्या निवड यादीला (कॉलेज ऍलॉटमेंट) स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे दिली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार आता विशेष फेरीची निवड यादी (कॉलेज ऍलॉटमेंट) येत्या सोमवारी (ता.28) जाहीर केली जाणार आहे. प्रवेशातंर्गत विशेष फेरीची निवड यादी गुरुवारी सकाळी अकरा वाजता जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र नियोजित वेळेत ही यादी जाहीर न झाल्याने प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने विशेष फेरीतील निवड यादीला स्थगिती दिल्याची माहिती दुपारी संकेतस्थळावर अपडेट केली.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतंर्गत एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस वर्ग किंवा खुला प्रवर्ग निवडण्याची सुविधा प्रवेशाच्या पोर्टलवर उपलब्ध करून दिली असून त्याचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. अकरावीच्या प्रवेशाची पुढील कार्यवाही सुधारित वेळापत्रकानुसार करावी आणि या वाढीव वेळेत बाकी असलेल्या विद्यार्थ्यांनाही अर्ज भरता येतील, असेही शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे.

11th Admission Time Table 2020 इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक :

 • 24 ते 26 डिसेंबर :- ईएसबीसी विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस किंवा खुला प्रवर्ग निवडणे. – अंडरटेकिंग अपलोड करणे अर्जाचा भाग एक भरून लॉक करणे व व्हेरीफाय करून घेणे. (बदल करावयाचा नसल्यास अर्ज भाग एक अनलॉक करू नये.) – या कालावधीत इतर विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भाग-एक भरता येईल, त्यामध्ये बदल करता येईल. – यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करता येईल व विशेष फेरीसाठी लगेच अर्ज सादर करता येईल.
 • 27 डिसेंबर :- प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे (भाग-दोन भरणे) व लॉक करणे. – यापूर्वी ऑप्शन फॉर्म भरला असल्यास त्यामध्ये बदल करता येतील.
 • 28 डिसेंबर (सायंकाळी पाच वाजता) :-  प्रवेश फेरी अंतर्गत प्रवेशासाठी निवड/गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे. – प्रवेश फेरीचे कट-ऑफ संकेतस्थळावर दर्शविणे.
 • 29 ते 31 डिसेंबर (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) :- विद्यार्थ्यांनी मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास प्रोसिड फॉर ऍडमिशन करणे. – विद्यार्थ्यांने मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित करणे. – महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑनलाइन निश्‍चित करणे, घेतलेला प्रवेश रद्द करणे तसेच प्रवेश नाकारता येणे. – सर्व तीनही कोटांतर्गत प्रवेश सुरू राहतील. व्यवस्थापन कोट्यासह इनहाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यांतर्गत जागा येथून पुढे भरता येतील, तसेच त्यांचे प्रत्यार्पण करता येईल.
 • 31 डिसेंबर (सायंकाळी आठ वाजेपर्यंत) : झालेले प्रवेश संकेतस्थळावर नोंदविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांसाठी अतिरिक्त वेळ.
 • 01 जानेवारी 2021 :- प्रवेशाची विशेष फेरी पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांचा तपशील जाहीर करणे. यामध्ये राखीव कोट्यांतून प्रत्यार्पित केलेल्या सर्व रिक्त जागांचाही समावेश असेल.

Instruction for Students and Parents विद्यार्थी आणि पालकांसाठी सूचना :

 • – विद्यार्थ्यांस घेतलेला प्रवेश रद्द करायचा असल्यास तशी विनंती संबंधित कनिष्ठ महाविद्यालयास करावी आणि आपला प्रवेश रद्द करून घ्यावा.
 • – प्रवेश रद्द करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी शांतपणे विचार करावा, कारण प्रवेश प्रक्रियेच्या नियोजित फेऱ्यांपैकी ही अखेरची प्रवेश फेरी आहे.
 • – या विशेष फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने ऑनलाइन संमती देणे बंधनकारक आहे. तरी आपला पसंतीक्रम ऑप्शन फॉर्म भाग दोन वेळेत लॉक केला असल्याची खात्री करावी.
 • – यापूर्वी अर्ज भरणे राहून गेलेल्या विद्यार्थ्यांनाही या वाढीव वेळेत आपला अर्ज सादर करता येईल.
 • – द्विलक्षी विषयांच्या प्रवेशाची कार्यपद्धती लवकरच जाहीर करण्यात येईल.
 • – प्रवेशाचे अधिकृत संकेतस्थळ : https://11thadmission.org.in

अकरावी ऑनलाइन प्रवेशांची विशेष फेरी ‘अशी’ होणार

Mumbai 11th Admission Special round – Even after passing three rounds of the 11th admission process, more than 75,000 students from Mumbai division are still without admission. A special round will be organized from today to give admission to these students. A special round will now be organized for the students who did not get admission even after the third round. Prior to this round, quota vacancies have been categorized in the online process. It is hoped that this will provide more space for this round. This entry round will run till December 27. Sources said that another round will be organized for the students who have not been admitted even after this.

 1. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पार पडल्यानंतरही मुंबई विभागातील सुमारे ७५ हजारहून अधिक विद्यार्थी अद्याप प्रवेशाविना आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी आजपासून विशेष फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे.
 2. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादीसाठी एकूण १,१६,०८० विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते, त्यापैकी ४५,४०२ विद्यार्थ्यांना कॉलजचे वाटप करण्यात आले आहे. म्हणजे अर्ज केलेल्या सुमारे ७० हजार ६७८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही.
 3. तिसऱ्या फेरीनंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता विशेष फेरीचे आयोजन केले जाणार आहे. या फेरीआधी कोट्यातील रिक्त जागा ऑनलाइन प्रक्रियेत वर्ग करण्यात आल्या आहेत.
 4. यामुळे या फेरीला जास्त जागा उपलब्ध होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ही प्रवेश फेरी २७ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
 5. यानंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एका फेरीचे आयोजन केले जाईल असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

11th Admission 2020-2021 Time Table – असे आहे वेळापत्रक

 • २० डिसेंबर – रिक्त जागांची स्थिती जाहीर करणे
 • २० ते २२ डिसेंबर – कॉलेजांचा पसंतीक्रम भरणे.
 • २३ डिसेंबर – तांत्रिक प्रक्रियेचा दिवस
 • २४ डिसेंबर – सकाळी ११ वाजता गुणवत्ता यादी जाहीर.
 • २४ ते २६ डिसेंबर – विद्यार्थ्यांनी प्रेवश निश्चित करणे.
 • २६ डिसेंबर – कॉलेजांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे
 • २७ डिसेंबर – प्रवेश फेरीनंतर रिक्त जागांची यादी.

अकरावी प्रवेश प्रक्रियेला पुन्हा सुरुवात: एस.ई.बी.सी स्थगितीमुळे कट ऑफ वाढला

11th Admission applications were received from the Social and Educational Backward Classes (SEBC) in the 11th Central Admission Process. As the Supreme Court adjourned the SEBC category, 12 per cent of the seats were included in the open category. As a result, the cut-off list in the open category has increased by 2.5 to 3 per cent over last year. Students who have any grievances regarding their admission should lodge a complaint online at www.dydekop.org. Complaints will not be accepted in any other way.

अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गातून (एस.ई.बी.सी) अकरावीसाठी अर्ज घेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने एस.ई.बी.सी प्रवर्गाला स्थगिती दिल्याने यामधील 12 टक्के जागांचा समावेश खुल्या प्रवर्गात करण्यात आला. यामुळे खुल्या प्रवर्गातील कट ऑफ लिस्ट गेल्या वर्षीच्या तुलनेत अडीच ते तीन टक्‍यांनी वाढली.

कोरोना आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश यामुळे रेंगाळलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेला पुन्हा सुरुवात झाली. समितीने आज अंतिम यादी ऑनलाईन जाहीर केली. विद्यार्थी आणि पालकांना एस.एम.एस पाठवून त्यांना कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे याची माहिती कळवण्यात आली. या वर्षी अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडे 14680 जागांसाठी 12691 अर्ज आले होते. यामधील 9588 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला. तर 2,736 विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळाला नाही. या सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळणार असून एकही विद्यार्थी प्रवेशावीना राहाणार नाही. असे चौगुले यांनी सांगितले.

प्रवेश समितीकडे कला शाखेसाठी 1,736 अर्ज आले होते. त्या सर्वांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला. वाणिज्य (मराठी माध्यम) शाखेसाठी 2317 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्या सर्वांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला. वाणिज्य (इंग्रजी माध्यम) शाखेमध्ये 1146 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला मात्र अर्ज केलेल्यांपैकी 644 विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही. विज्ञान शाखेसाठी 6822 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील 4532 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. 2092 विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही. अर्ज केलेल्या 12691 विद्यार्थ्यां पैकी 9588 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून 2736 विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित झाला आहे त्यांनी मंगळवार (ता.8) पर्यंत 10.00 ते 5.00 यावेळेत आवश्‍यक त्या कागदपत्रांसह महाविद्यालयात प्रवेश घ्यावा.

प्रवेश समितीकडे असलेल्या जागांमध्ये 26 टक्के जागा या खुल्या वर्गासाठी होत्या. यंदा पहिल्यांदात एस.ई.बी.सी प्रवर्गासाठी 12 टक्के जागा ठेवण्यात आल्या होत्या. त्यासाठी 1228 विद्यार्थींनी अर्ज केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एस.ई.बी.सीला स्थगिती दिल्याने यामध्ये असलेल्या 12 टक्के जागांचा समानेश खुल्या प्रवर्गात करण्यात आला. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या वाढली. परिणामी खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ वाढला.

वाणिज्य शाखेकडे ओढा अधिक –विज्ञान आणि कला शाखेपेक्षा वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा असल्याचे कट ऑफ लिस्ट वरून दिसून येते. वाणिज्य (इंग्रजी माध्यम) शाखेचा कट ऑफही विज्ञान शाखेपेक्षा जास्त आला आहे.

ऑनलाईन तक्रार – ज्या विद्यार्थ्यांना आपल्या प्रवेशा संबंधी कोणताही तक्रार असेल त्यांनी www.dydekop.org या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार नोंदवावी. अन्य कोणत्याही प्रकारे तक्रार स्विकारली जाणार नाही.

सौर्स : सकाळ


अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा; मराठा आरक्षणाशिवाय होणार प्रवेश

FYJC Online admission 2020:  The Supreme Court has granted interim stay to the social and educational backwardness (SEBC) reservation in the state. As a result, the 11th admission in the academic year 2020-21 was delayed. The issue has finally been resolved and students in the SEBC category will be admitted from the open category. Read the details carefully given below:

उद्यापासून सुरू होणार अकरावीची दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया

मुंबई – उद्यापासून म्हणजेच २६ नोव्हेंबरपासून अकरावीची दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. खुल्या गटात मराठा आरक्षित जागांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु करू नये अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबविता येणार नाही. एसईबीसीमधून अ‍ॅडमिशन घेता येणार नाही, खुल्या प्रवर्गातून त्याऐवजी प्रवेश घेता येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले आहेत. – Dailyhunt

अकरावीसाठी एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहेत. राज्यात अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली आणि सर्वाच्च न्यायालयाने (Suprem Court) मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात दिली. यामुळे ही प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण होऊ शकली नाही. अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी याबाबतचा निर्णय सरकार घेत नव्हते. यामुळे सर्व स्तरावरून टीका होत होती. यातच मंगळवारी उच्च न्यायालयातही याबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली असता उच्च न्यायालयाने सरकारला बुधवारी आपली भूमिका मांडण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयान राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) आरक्षणास (Maratha Reservation) अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अकरावीचे प्रवेश रखडले होते. अखेर यावर तोडगा काढण्यात आला असून एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे. यानुसार राज्य सरकारने अखेर शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. यानुसार राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये ९ सप्टेंबरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत त्यांचे प्रवेश कायम राहणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ९ सप्टेंबरपूर्वी एसईबीसी प्रवर्गातून प्रवेशाकरीता अर्ज केले असतील त्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहेत. हा निर्णय राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती उठविण्या करीता दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिकेच्या निर्णयाच्या अधीन असेल असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

अकरावीसह अन्य प्रवेशासंबंधीचा शासन आदेश पुढीलप्रमाणे –

एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश


अकरावीचेही ऑनलाईन वर्ग सुरू होणार

11th Class Registration from November 2nd, 2020 and Hours Class schedule will be available soon, The online classes for the students of Science, Commerce and Arts will be conducted through Marathi and English medium. For this, students are required to register. The branch in which the student wishes to be admitted. He wants to register for that branch and the students will get the online education schedule and required details on their e-mail ID and mobile number. The link https://covid19.scertmaha.ac.in/eleventh is available for registration.

अकरावीची 2 नोव्हेंबरपासून नोंदणी तर तासिकांचे वेळापत्रक लवकरच, मराठा आरक्षणामुळे राज्यातील अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल? यावर प्रश्‍नचिन्ह असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाचे ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 नोव्हेंबरपासून अकरावी ऑनलाईन शिक्षणाच्या नोंदणीस सुरुवात होणार असून, तासिकांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

मॅटचे काम ऑनलाईन करण्यासाठी याचिका; उच्च न्यायालयाचे खुलासा करण्याचे निर्देश

शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या प्रवेश फेरीचे प्रवेश झाल्यानंतर मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली; परंतु अकरावीचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. अखेर शिक्षण विभागाने अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

Registration Started Now इच्छुक शाखेसाठी नोंदणी –

अकरावी विज्ञान, वाणिज्य, कला शाखेच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग मराठी व इंग्रजी माध्यमातून भरणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे. विद्यार्थी ज्या शाखेत प्रवेश घेण्यास इच्छुक आहे. त्या शाखेसाठी त्याने नावनोंदणी करायची असून, ऑनलाईन शिक्षणाचे वेळापत्रक व आवश्‍यक तपशील विद्यार्थ्यांना त्यांच्या ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांकावर मिळणार आहे. नावनोंदणीसाठी https://covid19.scertmaha.ac.in/eleventh ही लिंक उपलब्ध आहे.

सौर्स: सकाळ


अकरावी प्रवेश लांबणीवर? विद्यार्थ्यांची आणखी चार आठवडे रखडपट्टी

11th Admission 2020 – After the Supreme Court adjourned the Maratha Reservation Act on September 9, directing that Maratha reservation should not be implemented in education admissions for the academic year 2020-21, the state government also postponed Class XI admissions. The state government has announced that it will seek an explanation from the apex court in two days. But even after a month and a half, the hearing held on Tuesday (27 Oct. 2020) has left the students in despair. There are fears that the admission of students will be suspended for another four weeks due to the sluggish role of the state government.

सर्वोच्च न्यायालयाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण प्रवेशात मराठा आरक्षण लागू करू नये, असे निर्देश देऊन मराठा आरक्षण कायद्याला ९ सप्टेंबर रोजी स्थगिती दिल्यानंतर, राज्य सरकारने इयत्ता अकरावीचे प्रवेशही स्थगित केले. यानंतर दोन दिवसांत सर्वोच्च न्यायालयात दाद मागून प्रवेशाबाबत स्पष्टीकरण मागणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. मात्र तब्बल दीड महिन्यांनी मंगळवारी (27 Oct. 2020) झालेल्या सुनावणीतही विद्यार्थ्यांच्या हाती निराशाच आली आहे. राज्य सरकारच्या सुस्त भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश आणखी चार आठवडे लटकण्याची भीती व्यक्त होत आहे.

मराठा आरक्षणाबाबत सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारने आरक्षणाच्या समर्थनार्थ आपली भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे अकरावी प्रवेश, एमपीएससी परीक्षा इतकेच नव्हे, तर इंजिनीअरिंग, डिप्लोमा प्रवेश प्रक्रियाही खोळंबल्या आहेत. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी चार आठवड्यांनी ठेवल्याने त्यांच्या पदरी पुन्हा निराशाच आली. त्यामुळे आता आणखी किती काळ प्रतीक्षा करायची, असा प्रश्न विद्यार्थी व पालक विचारत आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने लॉकडाउनच्या कालावधीत ऑनलाइन शिक्षणावर भर दिला. मात्र दुसरीकडे अकरावी प्रवेशाबाबत सरकार उदासीन असल्याचे दिसून येत आहे. यंदा लॉकडाउनमुळे दहावीचा निकाल उशिरा जाहीर झाला. यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीचे प्रवेश पूर्ण झाल्यावर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने अकरावी प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबाबत कोणताही विचार शिक्षण विभागाने केलेला नाही. त्यामुळे एकीकडे पहिलीच्या वर्गातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत असताना, अकरावीचे विद्यार्थी मात्र अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवेश घेतल्यानंतर त्यांना अकरावीच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. या परीक्षेनंतर बारावीची परीक्षा, तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारीही करावी लागणार आहे. मात्र सध्या आम्ही सर्व दिशाहीन झाल्याची भावना विद्यार्थी व पालक व्यक्त करत आहेत.

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेद्वारे पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये आत्तापर्यंत ७८ हजार ६१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यात एसईबीसी आरक्षणानुसार राज्यभरात अद्याप चार हजार १९९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. आता लाखो विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडलेले आहेत. याचबरोबर पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम राहणार आहेत की नाही, याबाबतही पालकांच्या मानात शंका आहेत. यामुळे सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाऊन तातडीने सर्वांच्या हिताचा निर्णय येईल अशा प्रकारे दाद मागावी आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही पालक व विद्यार्थी करत आहेत.
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक सुनावणीवेळी महाविकास आघाडी सरकारच्या विभागांमधील समन्वयाचा अभाव दिसला. आरक्षणप्रश्नी अन्य राज्यांच्या प्रलंबित याचिकांप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाकडून यापूर्वी कुठेही स्थगिती आलेली नाही. महाराष्ट्राच्या बाबतीत राज्य सरकारच्या समन्वयाच्या अभावानेच स्थगिती आदेश आला. गायकवाड आयोगाचा अहवाल प्रभावीपणे दाखवला असता, तरी कदाचित स्थगिती आली नसती.

सौर्स : मटा


11वी प्रवेश प्रक्रिये बाबत पुढील वेळापत्रक शासन आदेश प्राप्त झाल्यानंतरच

11th Admission Important Update: Declaration of Allotment list for Round-2 was scheduled to display on 10th September 2020, as a part of Std.11th Centralised Online Admission process 2020-21.rest admission process is postponed till further notice. Further time table for 11th Online Admission process will be declared after the Government Approval.

इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2020-21 अंतर्गत नियमित प्रवेश फेरी-2 ची गुणवत्ता/निवड यादी (Allotment) दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर केली जाणार होती. तथापि माननीय सर्वोच्च न्यायालय SEBC आरक्षण संदर्भातील आदेशाचे अनुषंगाने यापुढील इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेची सदर कार्यवाही पुढे ढकलण्यात येत आहे. 11वी प्रवेश प्रक्रिये बाबत पुढील कार्यवाहीचे वेळापत्रक शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल.


अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

FYJC Online Admission 2020: The first merit list of the 11th online admission process was released on Sunday, August 30, 2020. However, due to the Corona situation, there is a delay in securing admission in the colleges allotted in this list. As a result, the deadline for confirmation of admission has been extended. Students are now given time till 5 pm on September 4, 2020 to secure admission in Regular Round 1. Apart from this, the education department has also announced the schedule of regular round-2.Check Below details..

अकरावी प्रवेश:  दुसरी प्रवेश यादी १० सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

करोनामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा उशिरा सुरू झाली. प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ३० ऑगस्ट रोजी जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेसाठी  मुदत देण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच रात्री ११ वाजता शिक्षणसंस्थांना त्यांच्या रिक्त जागा जाहीर कराव्या लागतील. यानंतर शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर (तारीख ५ सप्टेंबर) १२ वाजून ५ मिनिटांपासून विद्यार्थ्यांना भाग-२मधील पसंतीक्रम बदलता येणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ऑनलाइन नोंदणी केलेली नाही, असे विद्यार्थी भाग १ आणि भाग २ भरू शकतील. यासाठी ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. याशिवाय या कालावधीत कॉलेजांना व्यवस्थापन तसेच अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशासाठी अर्ज मागविता येतील. यानंतर १० सप्टेंबर रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

शिक्षण संचालनालयाने दुसऱ्या गुणवत्ता यादीचे वेळापत्रक अकरावी प्रवेशाच्या वेबसाइटवर जाहीर केले आहे. अकरावीसाठी मुंबई विभागात एकूण 3 लाख 20 हजार 840 जागा उपलब्ध आहेत. पहिली गुणवत्ता यादी तसेच अल्पसंख्याक, व्यवस्थापन आणि इनहाऊस कोटा मिळून आतापर्यंत एकूण 72 हजार 559 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर अद्याप 2 लाख 48 हजार 281 जागा रिक्त आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडायचे आहे अशा विद्यार्थ्यांनी withdraw of application या सुविधेचा वापर करावा असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी रविवारी ३० ऑगस्ट २०२० रोजी जाहीर झाली. मात्र करोना स्थितीमुळे या यादीत अलॉट झालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करण्यास विलंब होत आहे. परिणामी प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना नियमित फेरी १ मधील प्रवेश निश्चित करण्यासाठी ४ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. याशिवाय नियमित फेरी – २ चे वेळापत्रकही शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.

नियमित फेरी – २ चे वेळापत्रक

१) ४ सप्टेंबर २०२० – (रात्री १० वाजता) नियमित प्रवेश फेरी २ साठी रिक्त पदे दर्शवणे
२) ५ सप्टेंबर २०२० ते ७ सप्टेंबर २०२० – नियमित फेरी – २ साठी विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम (भाग -२) भरणे सुरू
३) ८ सप्टेंबर २०२० ते ९ सप्टेंबर २०२० – डेटा प्रोसेसिंगसाठी राखीव वेळ
४) १० सप्टेंबर २०२० रोजी १० वाजता – नियमित प्रवेश फेरी – २ ची गुणवत्ता यादी जाहीर करणे
५) १० सप्टेंबर २०२० सकाळी ११ ते १२ सप्टेंबर २०२० सायंकाळी ५ वाजेपर्यंत – दुसऱ्या यादीतील प्रवेश निश्चित करणे
६) १२ सप्टेंबर २०२० रात्री १० वाजता – प्रवेशाची नियमित फेरी – ३ साठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे

सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे –दरम्यान, पहिल्या यादीत कला शाखेतील १२ हजार ५०२, वाणिज्य शाखेतील ६६ हजार १४० आणि विज्ञान शाखेतील ३७ हजार ९७६ आणि एमसीव्हीसीच्या ९०२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

शाखानिहाय मिळालेले प्रवेश

शाखा — एकूण जागा — मिळालेले प्रवेश

विज्ञान — ६६,७९१ –३७,९७६

वाणिज्य — १,०५,१६० — ६६,१४०

एमसीव्हीसी –३,८९३ –९०२

अकरावी ऑनलाइन प्रवेशांच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


11th Admission 2020 Merit List

अकरावीची पहिली मिरीट लिस्‍ट जाहीर

पहिल्‍या फेरीसाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील सर्व शाखा मिळून २० हजार ६१६ जागा उपलब्‍ध होत्‍या. या जागांकरीता १२ हजार १३१ उमेदवारांची निवड त्‍यांनी नोंदविलेल्‍या पर्यायांनुसार केलेली आहे. विद्यार्थ्यांनी अर्जाच्‍या भाग दोनमध्ये शाखा व महाविद्यालय पसंतीचे दहा पर्याय नोंदविलेले होते. विद्यार्थ्यांना मिळालेले गुण व महाविद्यालयांतील कट-ऑफ यांच्‍या आधारावर महाविद्यालयाचे पर्याय उपलब्‍ध करून दिले आहे. पहिल्‍या प्राधान्‍य क्रमाचे महाविद्यालय मिळालेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असून, अन्‍यथा पुढील प्रक्रियेत अशा विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार नाही. तसेच प्रवेश रद्द करणार्या विद्यार्थ्यांनादेखील पुढील फेर्यांच्‍या प्रक्रियेत सहभागी होता येणार नसल्‍याचे शिक्षण विभागाने स्‍पष्ट केले आहे.

कट-ऑफ

विज्ञान शाखेचा कट-ऑफ ९५.४ टक्‍के राहिला. वाणिज्‍य शाखेचा कट-ऑफ ९३.८ टक्‍के तर कला शाखेचा कट-ऑफ ८९.४ टक्‍के राहिला. यादीत १२ हजार १३१ विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्‍यांना नमूद महाविद्यालयात ऑनलाइन स्‍वरूपात प्रवेश निश्‍चितीसाठी गुरूवार (ता.३) पर्यंतची मुदत आहे.

यापूर्वी सामान्‍यतः कॉलेजरोडवरील आरवायके महाविद्यालयाचा कट-ऑफ सर्वात अधिक राहायचा. यंदा मात्र हा विक्रम मोडला असून उन्नती महाविद्यालय आणि मातोश्री महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा कट-ऑफ ९५.४ टक्‍के राहिला. आरवायके महाविद्यालयात खुल्या प्रवर्गाचा कट-ऑफ ९५.२ टक्‍के आहे. तर वाणिज्‍य शाखेत बीवायके महाविद्यालयाचा कट-ऑफ ९३.८ टक्‍के, मो. स. गोसावी महाविद्यालय ९१.६ टक्‍के, केटीएचएम महाविद्यालय ९०.८ टक्‍के कट-ऑफ राहिला. कला शाखेत एचपीटी महाविद्यालय ८९.४ टक्‍के, एमएमआरके महिला महाविद्यालय ८४.४ तर केटीएचएम महाविद्यालय ८०.४ टक्‍के

शाखानिहाय झालेल्‍या निवडीचा तपशील असा 

शाखा उपलब्‍ध जागा निवड विद्यार्थी संख्या
विज्ञान- १०,३२० ५५०४
वाणिज्‍य -८६८० ४२५८
कला -४९१० २१८६
एमएसव्‍हीसी -१०४३ १८३
एकूण-२५०७० १२१३१

प्राधान्‍यक्रम निहाय निवड झालेले विद्यार्थी 

प्रथम प्राधान्‍य—————-७ हजार ३८८
द्वितीय प्राधान्‍य—————१ हजार ६९८
तिसरा प्राधान्‍य—————१ हजार ०६९
चौथा प्राधान्‍य—————७०१
पाचवा प्राधान्‍य————–४७१”


अकरावी प्रवेशाची पहिली नियमित गुणवत्ता यादी ‘या’ दिवशी होणार प्रसिद्ध

Mission 11th Admission 2020: The important stage of registration in the 11th online admission process has been completed and the students will now have to wait till next Sunday (30th) for the quality list of the first regular admission round. As per the schedule given by the education department, the merit list for regular admission round one admission will be published next Sunday (30th). Read More details below:

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयांतील कनिष्ठ महाविद्यालयातील १ लाख ६ हजार ९७२ जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज केलेल्या ७२ हजार ८२० विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शिक्षण विभागातर्फे प्रसिध्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना सर्वसाधारण गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवण्यासाठी कालावधी ही देण्यात आला होता. दरम्यान, प्रवेश प्रक्रियेत जवळपास सहा हजार १९० विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहे. तर, ६३ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश रद्द केले आहेत.

तात्पुरता यादीवर आक्षेप 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या दोन हजार ११७ विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदविले आहेत. यामध्ये ग्रीव्हीयन्स पाच प्रकारात वर्गीकरण करण्यात आले असून, त्याअंतर्गत तांत्रिक एक हजार १०१, गुणवत्ता यादी १२८, अतिरिक्त गुण ३६ ,प्रशासकीय ३९ आणि इतर ८१३ असे आक्षेप आहेत. त्यातील १ हजार ६१३ आक्षेपांना उत्तर देण्यात आले आहे. तर, अद्यापही ५०४ आक्षेप उत्तराविना पेंडीग आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये हे आक्षेपांना देखील उत्तर देण्यात येणार आहे.

पहिल्या प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी येत्या रविवार

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून विद्यार्थ्यांना आता नियमित पहिल्या प्रवेश फेरीच्या गुणवत्ता यादीची येत्या रविवार पर्यंत (ता.३०) प्रतिक्षा करावी लागणार आहे.

शिक्षण विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार येत्या रविवारी (ता.३०) नियमित प्रवेश फेरी एक अंतर्गत प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यात विद्यार्थ्याला त्याच्या लॉग इनमध्ये प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय दर्शविले जाईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत मोबाईल संदेश पाठविण्यात येणार आहे. तसेच पहिल्या नियमित फेरीचे कट आॅफ संकेतस्थळावर प्रसिध्द केले होणार असून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी त्यांच्या लॉगइनमध्ये पाठवली जाईल..


11th Admission 2020

अकरावी प्रवेशाचा विचार करीत असाल तर तुमच्या साठी महत्वाची बातमी

11th Admission 2020 Updates : Due to the Corona Virus Effect all educational institute and examine board cancelled their examination or at least postponed it. 10th Exam 2020 is still not completed. Parents worry about whether their child will get admission to a college like mind after 10th class. This year, a tenth paper is still due to Corona. The state board has yet to announce a decision on whether to take the exam. Read the more details below:

शिक्षण विभागाचा अपडेट – दहावीचा शेवटचा पेपर कधी?

दहावी निकालानंतर मनासारख्या महाविद्यालयात आपल्या पाल्याला प्रवेश मिळेल का, याची चिंता पालकांना असते. यंदा कोरोनामुळे दहावीचा एक पेपर अद्याप शिल्लक आहे. परीक्षा होणार की नाही यासंदर्भात राज्य मंडळाने अजून निर्णय जाहीर केलेला नाही. दरवर्षी एप्रिल महिन्यात अकरावीच्या प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. नवीन महाविद्यालय, त्यांची जागा, नोंदणी अशी कामे या काळात केली जातात. यंदा मात्र ही कामे सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. दरवर्षी सप्टेंबरपर्यंत अकरावीचे प्रवेश पूर्ण करावे लागतात. साधारणत: एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष अर्जाचा पहिला टप्पा भरण्यास सुरुवात होते. यंदा ही प्रक्रिया पुढे ढकलली जाईल आणि त्याचा थेट परिणाम प्रवेशावर होण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी नोयडाच्या “नायसा’या कंपनीकडे गेल्या तीन वर्षांपासून आहे. मागील वर्ष या कंपनीचे शेवटचे वर्ष होते. यंदा नव्याने निविदा काढून नवी कंपनी सरकारकडून नेमण्यात येणार होती. गेल्या तीन वर्षांत नायसाबाबत अनेक तांत्रिक तक्रारी होत्या, त्यामुळे प्रवेशात अनेकदा गोंधळही उडाला होता. अशात नवीन कंपनी निवडण्यासाठी आणखी विलंब झाल्यास त्याचा फटका प्रवेश प्रक्रियेला बसणार आहे

कोरोनाचा फटका यंदा बहुतांश परीक्षांना बसला आहे. आगामी सर्व शैक्षणिक सत्रांवर याचा परिणाम होणार आहे. दरवर्षी उन्हाळ्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेची तयारी सुरू होते. यंदा दहावीचीच परीक्षा अर्धवट, शाळा बंद, यामुळे अकरावी प्रवेशाचे नियोजन कोलमडण्याची शक्‍यता आहे.

सौर्स : सकाळ

Leave a Comment