11th Admission 2022 Important News

11th Admission 2022

The eleventh admission process has started and the first round has started from 25th July. According to the release of the first merit list, students have to finalize their admission process by August 6. Now the second merit list will be announced on August 12. Students have to complete filling of new application form part 1, part 2 preference sequence between 7th to 9th August. Read more details are given below

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीतील प्रवेशासाठीची मुदत संपली आहे. आता दुसरी गुणवत्ता यादी १२ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. मुंबई विभागात अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ४८ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर, ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळूनही प्रवेश निश्चित न केल्याची माहिती मिळाली आहे. पहिल्या प्रवेश फेरीमध्ये केवळ ६७ हजार ९६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले, तर ७१ हजार ४२१ विद्यार्थ्यांनी वेट अँड वॉचचा निर्णय घेतला आहे.

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत मुंबई विभागातील एकूण १ लाख ३९ हजार ६५१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. त्यातील ८१ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी प्रवेश नाकारले असून, १८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत. याशिवाय ७१ हजार ४२१ विद्यार्थ्यांनी तर निवड होऊनही प्रवेश घेतलेच नसल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. कला शाखेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ५९ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. वाणिज्यच्या ४१ टक्के तर विज्ञान शाखेच्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ५५ टक्के विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित केले आहेत.

 दुसऱ्या फेरीसाठी नियोजन

 • ७ ते ९ ऑगस्ट : नवीन अर्ज भाग १ भरणे, भाग २ पसंतीक्रम भरणे
 • १२ ऑगस्ट : दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे
 • १२ ते १७ ऑगस्ट : पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे

Mumbai 11th Admission 2022 and other Divison Online preference registration for under quota has been given till 27th July. On July 28, the merit list of the students selected under the quota will be prepared as per the rules. After the publication of this list, students who want to take admission through quota have been given a deadline from 28 to 30 July to decide their admission in the respective college. Read the complete time table below on this page.

Mumbai 11th Admission 2022

सुधारणा नोंद – दिनांक 25.07.2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमित फेरी-1 चे वेळापत्रकासोबत पुढील फेऱ्यांसाठी संभाव्य कालावधी देण्यात आलेला आहे. त्यामध्ये नियमित फेरी-3 चे समोर दर्शवण्यात आलेली दिनांक. 35-08-2022 ऐवजी 25-08-2022 अशी वाचावी.

Published On : 25-Jul-2022

Published On : 25-Jul-2022

Published On : 18-Jul-2022

11th admission 2022 time table प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक

 • प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, अर्जाचा भाग दोन भरून लॉक करणे : २७ जुलैपर्यंत
 • तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : २८ जुलै
 • सर्वसाधारण गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती नोंदविणे : २८ ते ३० जुलै
 • पहिल्या नियमित फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर करणे, विद्यार्थी लॉगिनमध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालये दर्शविणे, फेरीचे कट-ऑफ पोर्टलवर दर्शविणे : ३ ऑगस्ट (सकाळी : १० वाजता)
 • मिळालेल्या संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे, प्रवेश नाकारणे : ३ ते ६ ऑगस्ट
 • प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर ऑनलाइन नोंदविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना वेळ : ६ ऑगस्ट
 • दुसऱ्या नियमित फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित करणे : ७ ऑगस्ट

11th admission 2022 round प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक

 • नियमित प्रवेश फेरी दोन : ७ ते १७ ऑगस्ट
 • नियमित प्रवेश फेरी तीन : १८ ते २५ ऑगस्ट
 • विशेष प्रवेश फेरी : २६ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर

Published On : 25-Jul-2022

Mumbai 11th Admission 2022 Rules Change

As per the latest updates regarding the Mumbai 11th Admission 2022 is that the Maharashtra State Education Department has made major changes in the rules of 11th admission process in all over the State. Under this, students who get equal marks in 10th Class will not get equal place in merit list. From now on, the merit of such students will be based on their date of birth. Apart from this, SEBC students who have been deprived of reservation in the admission process till now will also get reservation facility during 11th admission. Read the more details given below:

११ वी प्रवेशाचे मेरिट नियम बदलले; प्रवेश नाकारल्यास एकाच राउंडमध्ये हाेणार नाही नावाचा समावेश

 1. राज्य शिक्षण विभागाने वर्ग ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये माेठे बदल केले आहेत. याअंतर्गत दहाव्या वर्गात समान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना मेरीट यादीमध्ये समान स्थान मिळणार नाही. यापुढे अशा विद्यार्थ्यांची मेरीट जन्मतारखेच्या आधारावर ठरेल. याशिवाय आतापर्यंत प्रवेश प्रक्रियेमध्ये आरक्षणापासून वंचित राहणाऱ्या एसईबीसीच्या विद्यार्थ्यांनाही यापुढे ११ वीच्या प्रवेशादरम्यान आरक्षणाची सुविधा मिळेल.
 2. शिक्षण विभागाने याशिवाय प्रवेशाच्या काेणत्याही टप्प्यात ईनहाउस काेट्याची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एखादा विद्यार्थी पहिल्या किंवा काेणत्याही टप्प्यात प्रथम श्रेणीच्या अभ्यासक्रमात किंवा मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास नकार देईल किंवा प्रवेश रद्द करेल, तरी त्याला केवळ एका राउंडमध्ये सहभागी हाेण्यास मनाई केली जाईल. हे सर्व बदल तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहेत.
 3. यापूर्वी समान गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेरीट यादीत समान स्थान दिले जात हाेते. मात्र यापुढे त्यांची जन्मतारीख बघितली जाईल. विद्यार्थ्याच्या वयाच्या आधारे त्याची रॅंक ठरविली जाईल. जन्मतारीखही सारखी असेल तर पालक व आडनावासह त्याचे पूर्ण नाव पाहिले जाईल. त्या आधारावर त्याचे मेरीट यादीतील स्थान ठरेल. प्रवेश समितीद्वारे यापूर्वी प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रथम श्रेणीचे अभ्यासक्रम किंवा मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास नकार देणाऱ्या किंवा प्रवेशच रद्द करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रक्रियेतील तीन राउंडमध्ये सहभागी हाेण्यास मनाई करीत हाेती. नियमात बदल केल्याने अशा विद्यार्थ्यांना आता एकाच राउंडमधून बाहेर राहावे लागेल.
 4. अकरावी प्रवेशासाठी ११ हजार विद्यार्थ्यांनी केली नाेंदणी – केंद्रीय प्रवेश समितीने ईयत्ता अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११,२२४ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे. राज्य शिक्षण मंडळाचा ईयत्ता १० वीचा निकाल २० जूनला घाेषित हाेण्याची शक्यता आहे. त्यानंतर सीबीएसई, आयसीएसई व इतर बाेर्डाचे निकालाचीही प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश देण्यात येतात. त्यानुसार केंद्रीय समितीने प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थी नाेंदणीचे कार्य सुरू केले आहे. यामध्ये राज्य बाेर्डाच्या १०,६०५ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे. याशिवाय सीबीएसईच्या ५५७, आयसीएसईच्या ३६, आयबीचा १, एनआयओएसचा १, तर इतर बाेर्डाच्या २४ विद्यार्थ्यांची नाेंद झाली आहे. नाेंदणी प्रक्रिया निकालानंतरही सुरू राहणार असून त्यानंतर प्रक्रियेच्या भाग-२ अंतर्गत विद्यार्थ्यांना पसंतीची महाविद्यालय भरायचे आहे.

Online 11th Admission 2022 process

Online 11th Admission 2022 process has been started now. Candidates see the complete details and steps of online registration below on this paragraph. Here we are giving step by step information on how to fill Part 1 and Part 2 of the application by the students. Complete time table of 11th Online Admission 2021 are given here. Read the details carefully given here.

11th Admission -अकरावी प्रवेश अर्ज कसा भरायचा…

FYJC Online Admission 2022 Part one – How to fill the first part of the application?

 1. To fill up the application – go to the website and first click on the name of the urban area in which you want to enter the college.
 2. After this student registration should be done.
 3. Log in using the ID and password created.
 4. Part 1 form will open, fill it.
 5. Read the questions given while filling Part 1 and fill in the information asked.
 6. Fill in the name, address, email, marks, category, from which quota you want to enter.
 7. After completing the form, if there are students in a particular category, they will have to upload that certificate Admission fee is to be paid online.
 8. After that you want to lock your application.
 9. Children should note that once the form is completed, it should be read and locked. If not locked it will not be submitted.
 10. Check the status of your form on the dashboard. (Status will appear as verified or nonverified.)
 11. Those who have filled out an application from a specific category will need to have their application verified at their school or at the nearest guidance center.
 12. State board schools verify the applications of students in their particular category through the school login. Students in certain categories of other boards are required to verify their application through the Guidance Center.

For 11th Online Admission Process Part 2 of the application – How to fill the option form?

 1. The name of the college you want to get admission in is to be filled in this form.
 2. Students can name a minimum of 1 and a maximum of 10 colleges.
 3. Before filling the college preference list, look at the previous year’s cut-off of colleges and guess whether you can get admission in that college according to your marks.

Online Apply Here

11th Online Admission 2022 Time Table

 • Part One Filling: 14th to 22nd August
 • Part one and two filling: 17th to 22nd August
 • Admission Quality List: 27th August
 • Admission: 27th to 30th August
 • Second round of admission: 31st August to 4th September
 • Third round of admission: 5th to 11th September
 • Fourth round of admissions: September 12 to 17

सीईटी देणाऱया विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन

राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यासोबतच सीबीएसई आयसीएसई या आंतरराष्ट्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांनाही राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी ही द्यावी लागणार आहे. मात्र ही परीक्षा पूर्णपणे ऐच्छिक आहे. 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असून ती 8 माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये सेमीइंग्रजी या माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी आवेदनपत्र निश्चित केलेल्या इंग्रजी व इतर माध्यमांचा विचार करून प्रश्नपत्रिका त्यांना उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.

या विषयावर आधारित असेल परीक्षा

अकरावीची सीईटी ही दहावीच्या इंग्रजी, गणित व सामाजिक शास्त्रे (इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्र) या चार विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.100 गुणाच्या एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये चार विषयांसाठी प्रत्येकी 25 गुण दिले जाणार आहेत.

 • विषय . गुण
 • इंग्रजी – 25,
 • गणित (भाग 1 व भाग 2)- 25
 • विज्ञान आणि तंत्रज्ञान(भाग 1 व भाग 2)- 25
 • सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) 25
 • एकूण -. 100

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीतील नियमित विद्यार्थ्यांना सीईटीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र सन 2021 पूर्वी जे विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाले होते, अथवा प्रविष्ट झाले होते अशा विद्यार्थ्यांना सोबतच सीबीएसई आयसीएसई आणि इतर सर्व आंतरराष्ट्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी 178 रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे, हे शुल्क डेबिट क्रेडिट अथवा नेट बँकिंगच्या माध्यमातून भरण्याचा पर्याय मंडळाकडून देण्यात आला आहे.

ऑनलाईन अर्ज करा 

अकरावी प्रवेशासाठी सीईटी देणाऱया विद्यार्थ्यांना सीईटीचा ऑनलाइन अर्ज भरताना काही अडचणी असल्यास तसेच परीक्षेसंदर्भात काही शंका असल्यास त्या सोडविण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागनिहाय हेल्पलाइन सुरू केली आहे. मुंबई विभागीय मंडळातील विद्यार्थी मुंबई विभागीय शिक्षण सचिव राजेंद्र अहिरे, सहाय्यक सचिव नीलम ढोके, वरिष्ठ अधिक्षक एस. एस. फाटक यांच्याशी अनुक्रमे 9423933435, 9869086061, 9869433816 या क्रमांकावर किंवा [email protected] या वेबसाईटवर संपर्क साधू शकतात.

विभागीय मंडळ – संपर्क क्रमांक

 1. १) पुणे – ९६८९१९२८९९ / ८८८८३३९५३०
 2. २) नागपूर – ९४०३६१४१४२ / ९८९०५१४८३९
 3. ३) मुंबई – ९४२३९३३४३५, / ९८६९०८६०६१
 4. ४) औरंगाबाद – ९९२२९००८२५ / ९४२३४६९७१२
 5. ५) अमरावती – ९९६०९०९३४७ / ९४२३६२१६४७
 6. ६) कोल्हापुर – ७५८८६३६३०१ / ८००७५९७०७१
 7. ७) नाशिक – ८८८८३३९४२३ / ८३२९००४८९९
 8. ८) लातुर – ९४२१६९४२८२ / ९४२१७६५६८३
 9. ९) कोकण – ८८०६५१२२८८/ ८८३०३८४०४४

Mumbai 11th Admission 2022

FYJC Admission 2022: ऑनलाइन प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना एक संधी

The FCFS Admission 2022 round of the 11th Central Online Admission Process is currently underway. who have not yet been admitted under the 11th  Central Online Admission Process. There is an another opportunity for these students who have not been admitted. FCFS admission 2022 round has been extended till October. The 11th online admission process for Mumbai Mahanagar as well as Pune, Pimpri Chinchwad, Nashik, Amravati, Nagpur Municipal Corporation divisions is currently underway. According to the earlier schedule, the last date for the admission round was October 18. However, considering the interest of the students, the FCFS admission round has been extended by 3 days by the school education department.

 1. Maharashtra FYJC Admission 2022: अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची FCFS प्रवेश फेरी सध्या सुरु आहे. अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. FCFS प्रवेश फेरीला २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. प्रवेश न मिळालेल्या या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक संधी चालून आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
 2. कोणताही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहू नये शिक्षण विभागातर्फे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. याअंतर्गत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) तत्त्वावर सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला २१ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शालेय शिक्षणविभागातर्फे मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या पाच शिक्षण विभागांना यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत.
 3. मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगपालिका विभागांना अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील FCFS प्रवेश फेरी सध्या सुरु आहे. याआधीच्या वेळापत्रकानुसार १८ ऑक्टोबर ही या प्रवेश फेरीची शेवटची तारीख होती. पण शालेय शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन या FCFS प्रवेश फेरीला ३ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

अकरावी प्रवेशांच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा…

तुम्हाला पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज अलॉट झाले आहे का ते पुढील पद्धतीने पाहता येईल –

– सर्वात आधी अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे संकेतस्थळ https://mumbai.11thadmission.org.in/ वर जा.

How to Download Merit List

 • सर्वात आधी अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे संकेतस्थळ https://mumbai.11thadmission.org.in/ वर जा.
 • आपला आयडी पासवर्ड देऊन लॉग इन करा.
 • लॉग इन केल्यावर स्क्रीनवर तुमचे डिटेल्स येतील.
 • डॅश बोर्डवर ‘चेक अलॉटमेंट स्टेटस’ पर्यायावर क्लिक करा.
 • कॉलेज अलॉट झालं असेल तर त्याचं नाव येथे दिसेल.

Official Website of 11th online admission

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया संकेतस्थळ – Official Website


FYJC CET Admission 2022 – The President of State Secondary Board Mr. Dinkar Patil said that the CET for the first time this year will be held till 21st August 2021. The Online Application process for the CET will be started on 19th July 2021, for which a separate portal will be set up, the board said. A link to the portal will be made available on the board’s official website, and students will be able to decide whether to take the CET. Read the complete details here.

अकरावी प्रवेशांसाठी यंदा प्रथमच घेण्यात येणारी सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) २१ ऑगस्टपर्यंत घेणार असल्याचे सूतोवाच राज्य माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी केले. सीईटीसाठी अर्ज प्रक्रिया १९ जुलैला सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. या पोर्टलची लिंक मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येणार असून, सीईटी द्यायची की नाही, हे विद्यार्थ्यांना ठरवता येणार आहे.

अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षा; अर्ज प्रक्रिया १९ जुलैपासून सुरू होणार

 • राज्यातील सुमारे १६.५ लाख विद्यार्थ्यांचे दहावीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशांचे वेध लागले आहेत.
 • त्याची प्रक्रिया राज्य माध्यमिक मंडळाकडून सुरू करण्यात आली असून, १९ जुलैपासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या वेबसाइटवरून सीईटीसाठी अर्ज करता येणार आहे.
 • याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून, वेबसाइटवर सीईटी पोर्टलची लिंक देण्यात येणार आहे.
 • या लिंकवर विद्यार्थ्यांनी बैठकक्रमांक दाखल केल्यानंतर सीईटी द्यायची आहे की नाही, असे दोन पर्याय विचारले जातील.
 • विद्यार्थ्यांनी दोन्हीपैकी एक पर्याय निवडून नोंदणी करायची आहे.
 • सीईटी देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा पर्याय निवडल्यानंतर त्यांचा परीक्षा अर्ज मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने दाखल होईल.
 • प्रवेश परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याने त्याची केंद्रे लवकरच जाहीर करण्यात येतील, असेही मंडळाने स्पष्ट केले.
 • सीईटी परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारलेली असून, गणित, विज्ञान, इंग्रजी आणि समाजशास्त्र या चार विषयांमधील एकूण १०० प्रश्न विचारले जाणार आहेत.
 • यासाठी अभ्यासक्रमातील काही भाग काढून स्वतंत्र अभ्यासक्रम दिला जाणार असून, तोही लवकरच जाहीर केला जाणार आहे.
 • यामुळे विद्यार्थ्यांचा ताण हलका होणार असून, मंडळाने दिलेल्या अभ्यासक्रमाचाच सीईटीसाठी विचार केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार, नेमकी कशी? जाणून घ्या प्रक्रिया…

Mumbai 11th Admission 2022 – Latest news received regarding the 10th Class Exam Results is that the state school education department has decided to cancel the 10th Class exam and pass the students, then how exactly will the students marks valuation? Such a question was raised by the students and parents. Finally, today, the state’s school education minister Varsha Gaikwad announced the 10th Marks Calculation formula. He also announced that there will be an Alternative Shared Examination (CET) for Class 11 Admission.

इयत्ता १० वीची परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं घेतला असला तरी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन नेमकं कसं करणार? असा सवाल विद्यार्थी आणि पालकांसमोर उपस्थित झाला होता. अखेर आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १० वीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्यूला जाहीर केला. यासोबतच इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी वैकल्पिक सामायिक परीक्षा (सीईटी) होणार असल्याचंही जाहीर केलं.

 • इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी सीईटी द्यावी लागणार आहे.
 • विविध परीक्षा मंडळांनी या वर्षीच्या इयत्ता १० वी निकालासाठी शाळा स्तरावर होणारे अंतर्ग मूल्यमापन विचारात घेतल्याने इयत्ता ११ वी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षे घेण्यात येणार आहे.
 • CET परीक्षेत १० वीच्या अभ्यासक्रमाच्या आधारेच घेण्यात येणार आहे.
 • परीक्षा १०० गुणांची असणार असून त्यासाठी बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत व ओएमआर पद्धतीनं दोन तासांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
 • इयत्ता ११ वी प्रवेश परीक्षा राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा (CET) दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील (CET) गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.
 • सामाईक परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक परीक्षा दिली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

Leave a Comment