50 Thousand New Job Opportunity

50 Thousand New Job Opportunity

50 हजार जणांना ‘नोकऱ्या’ मिळणार, त्याची ‘लिस्ट’ जाहीर करणार, गडकरींची घोषणा

Job Opportunity 2020 : Union Road Transport and Micro, Small and Medium Industries Minister Nitin Gadkari promised to provide employment to 50,000 people of Vidarbha including Nagpur. Otherwise, Gadkari claimed that he would declare the list. Gadkari mentions that he will provide employment in many of his speeches. Today, once again, he announced at a press conference that 50,000 people will be employed. Read the complete details carefully..

Job Opportunity 2020

केंद्रीय रस्ते वाहतूक व सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरसह विदर्भातील 50 हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. एवढेच नाहीतर याची लिस्टच आपण जाहीर करू असा दावा गडकरी यांनी केला आहे. गडकरी यांनी आपल्या अनेक भाषणात ते रोजगार देणार असल्याचा उल्लेख करत असतात. आज पुन्हा एकदा त्यांनी 50 हजार लोकांना रोजगार मिळेल असे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
नागपूरमध्ये खासदार औद्योगिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याची माहिती देण्यासाठी आज रमदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉइंट येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नितीन गडकरी यांनी नागपूर आणि विदर्भातील 50 हजार लोकांना रोजगार देणार असल्याचे आश्वासन दिले.
स्मॉल इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याचे सांगत क्लस्टरच्या माध्यमातून नागपूर व विदर्भातील लोकांना कसा रोजगार उपलब्ध करुन दिला जाईल, याची माहिती नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच त्यांनी पुन्हा एकदा मी 50 हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले.
मी 50 हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे म्हणालो होतो. याची आठवण करून देताना तो रोजगार उपलब्ध होणारच. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. एकट्या मिहानमध्येच 33 हजार लोकांना रोजगार मिळालेला आहे. कुणाकुणाला रोजगार मिळाला याची एक लिस्टच आपण जाहीर करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सौर्स : पोलिसनामा
1 thought on “50 Thousand New Job Opportunity”

Leave a Comment