600 Driver Recruitment in PMP

600 Driver Recruitment in PMP

PMPML चालक भरती अंतिम टप्यात

PMPML Bharti 2020-नवीन जाहिरात १३ फेब्रु.२०२० या प्रकाशित 

PMPML Bharti 2020 : Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd Chalak Bhartiprocess is now in Last Phase. There were total 600 vacancies should be filled for Driver in PMPML. As per the latest news there are some drivers who are in contract and are in the process of making them permanent. Also, recruitment of qualified candidates has been finalized and new drivers will be appointed as per available buses. Candidates Read the complete details given below and keep visit us for further updates.

 

सध्या काही चालक कंत्राटी असून त्यांनाही कायमस्वरूपी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून उपलब्ध बसनुसार नवीन चालकांच्या नियुक्‍त्या करण्यात येणार आहे.
– अजय चारठाणकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएल.

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात पुढील दोन महिन्यांत नवीन बस दाखल होणार आहेत. या नवीन बससाठी पीएमपीत 600 चालकांची भरती अंतिम टप्प्यात आल्याची माहिती, पीएमपी प्रशासनाने दिली आहे.

पीएमपीच्या ताफ्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत 100 ते 150 बसची संख्या वाढणार असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात मागील सहा महिन्यांत 120 ई-बस दाखल झाल्या आहेत. त्यापूर्वी, 235 मिडी बस व 400 सीएनजी बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होऊनही पुरेशे चालक नसल्याने काही दिवसांपूर्वी बस उभ्या रहात असल्याचा प्रकार समोर आला.

पीएमपीत ६०० चालकांची भरती

PMP Recruitment 2020 : PMP Pune will be published the Driver recruitment advertisement very soon. As per the latest news their will be 600 posts vacant for Driver in PMP. The process of appointing around 600 drivers for the new bus arriving at the PMP has been finalized. They will be cured by the end of the month after completing the training. Due to this, the number of PMP buses on the route will be increased from 100 to 150 and will provide better facilities to the passengers. Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd Complete details are given below:

PMP Recruitment 2020

पुणे – पीएमपीच्या ताफ्यात दाखल होत असलेल्या नव्या बससाठी सुमारे ६०० चालकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण करून महिनाअखेरीस ते रुजू होतील. त्यामुळे मार्गावर येणाऱ्या पीएमपीच्या बसची संख्या १०० ते १५० ने वाढून प्रवाशांची चांगल्याप्रकारे सोय होणार आहे.

पीएमपीबाबत सद्यःस्थिती

  1. चालक – २८००
  2. मार्गावरील बस – १५५०
  3. आणखी बस वाढणार – १०० ते १५०
  4. चालकांअभावी बंद राहणाऱ्या बस – १००
  5. भरतीमुळे वाढणाऱ्या फेऱ्या – १०००

पीएमपीच्या ताफ्यात सहा महिन्यांत १२० ई-बस दाखल झाल्या. तत्पूर्वी, २३५ मिडी आणि सीएनजीवरील ४०० बस दाखल झाल्या. परंतु, चालकांची पुरेशी संख्या नसल्याने त्यातील शंभरहून अधिक बस रोज आगारांतच ठेवाव्या लागत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पीएमपीने चालकांसाठी अर्ज मागविले होते. त्यानुसार ६९४ चालक पात्र ठरले. त्यांची वजन, उंची आणि शारीरिक चाचणी आदींबाबतची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर किमान ६०० उमेदवार चालक म्हणून नियुक्त होऊ शकतात. त्यांना एक महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर ते पीएमपीच्या सेवेत रुजू होतील. त्यांच्या नियुक्‍त्या पहिल्या टप्प्यात बदली चालक म्हणून असेल, असे प्रशासनाने सांगितले.
राष्ट्रीय निकषांनुसार एका बसमागे सुमारे तीन चालक आवश्‍यक आहेत. उपलब्ध असलेले चालक सकाळ आणि सायंकाळ, अशा दोन शिफ्टमध्ये विभागले आहेत. त्यातही अनेकांच्या रजा, सुट्यांचा आढावा घेतला; तर बस जास्त आणि चालक कमी, असे प्रमाण झाले आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. त्यामुळे चालक नियुक्तीच्या प्रक्रियेस वेग आला आहे. चालक मिळाल्यास किमान एक हजार फेऱ्या वाढतील. त्यामुळे प्रवाशांनाही सुविधा मिळतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
नव्या बस ज्या प्रमाणात उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध होत आहेत, त्या प्रमाणात चालकांच्या नियुक्‍त्या करण्यात येतील. त्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात येत आहे. चालकांअभावी बस बंद राहू नये, यासाठी काळजी घेण्यात येईल.

सौर्स : सकाळ
3 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *