Ahmednagar Job Fair for 125 Posts

Ahmednagar Rojgar Melava 2020

Ahmednagar Job Fair 2020 : Pandit Dindayal Updhyay Job Fair  for Ahmednagar district is schedule for recruitment to the EPP Trainee, JR Assistant posts. There are total 125 vacancies available for these posts. Interested applicants to the Ahmednagar Rojgar Melava 2020 can register from the given link. The Online Interview of Suitable Candidate shall be Taken Through Video Call only by Skype, Whatsapp. The Date of Interview via WhatsApp/Skype is 11th to 16th June 2020. For more details of the applications & applications address is as follows:

अहमदनगर मध्ये मिळणार रोजगाराची संधी

करोना आणि लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूरांनी आता त्यांच्या त्यांच्या गावाची वाट धरली आहे. औद्योगिक क्षेत्राला भेडसावणारी मजूर, कामगारांची कमतरता लक्षात घेता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ११ व १६ जून दरम्यान ऑनलाईन पध्दतीने तरूणांना यात सहभागी होता येणार आहे. यात सहभागी उमेदवारांच्या मुलाखती सोशल मिडीयाव्दारे घेण्यात येणार आहे. मुलाखती याईपीपी प्रशिक्षणार्थी, जेआर सहाय्यक या पदांसाठी घेण्यात येईल.

या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनीऑनलाईन अर्ज करावे.

एकूण पद संख्या

  • जेआर सहाय्यक – ११० पदे
  • ईपीपी प्रशिक्षणार्थी – १५ पदे

रोजगार देणा-या नामांकित कंपन्यांची नावे

  • लार्सन व टूब्रो लिमिटेड ए-M एमआयडीसी अहमदनगर
  • व्यंकटेश मल्टीस्टेट सीओ ओपी क्रेडीट सोसायटी

येथे करा नोंदणी- Register Here

उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अ‍ॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा.

अर्ज  करण्यासाठी खाली दिलेली लिंक बघावी-Online Application Link

AHMEDNAGAR JOB FAIR ONLINE LINK 2020


Ahmednagar Job Fair for 190 Posts

नगरला उद्या रोजगार मेळावा

Ahmednagar Job Fair 2020 : Recruitment will be held for 190 posts in 11 companies through this Job Fair. Ahmednagar Job Fair will be held on 13th February 2020 at 10.00 am at Raosaheb Patwardhan Smarak Samiti Sabhagruh. Candidates read the complete details carefully and reach their before the time with all relevant documents.

 

११ कंपन्यांतील १९० पदांसाठी होणार भरती

जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या पुढाकाराने पंडित दीनदयाळ उपाध्‍याय रोजगार व उद्योजकता मेळावा गुरुवारी (१३ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता सावेडीच्या रावसाहेब पटवर्धन स्‍मारक समिती सभागृहात होणार आहे. ११ विविध कंपन्या त्यांच्याकडील रिक्त १९० वर जागांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती या मेळाव्यात घेणार असून, यातून नोकरीसाठी अंतिम निवड केली जाणार आहे.

या मेळाव्‍यात नगर एमआयडीसी व जिल्ह्यातील विविध ठिकाणच्‍या नामांकित कंपन्‍यांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याद्वारे मेळाव्‍यास येणाऱ्या उमेदवारांच्‍या मुलाखती घेऊन त्यांच्याकडील रिक्तपदासाठी आवश्यक असलेल्यांची निवड करणार आहेत. नगरमधील साई इंजिनीअरिंग, सिद्धी सीएनसी, श्रीलक्ष्‍मी मल्टिस्‍टेट को-ऑप, कायझन इंजिनीअर्स, श्रीसंत नागेबाबा मल्टिस्‍टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी, मयूर इंडस्ट्रीज, साईदीप अॅलॉईड एक्‍स्‍टुजन, श्रीव्‍यंकटेश मल्टिस्‍टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी तसेच आदित्‍य सोलार (श्रीरामपूर), लीना ऑटोमोटिव्‍ह इंडिया (संगमनेर) व सॅफरॉन हॉलिस्‍टिक हेल्‍थकेअर (सुपा) अशा विविध कंपन्‍यांमध्‍ये १९० पदांची भरती करण्‍यात येणार आहे. दहावी, बारावी, पदवीधर तसेच आयटीआय-फिटर, वेल्‍डर, टेलर, पेंटर व टर्नर असे तांत्रिक ज्ञान असलेल्या उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात (मध्‍यवर्ती प्रशासकीय इमारत, सावेडी, नगर. दूरध्‍वनी क्रमांक-०२४१-२४२५५६६) संपर्क साधण्याचे आवाहन सहायक संचालक वि. जा. मुकणे यांनी केले आहे.

ऑनलाइन अर्ज Online Apply Details for Ahmednagar Job Fair

रोजगार मेळाव्यास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन नावनोंदणी व अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी https://rojgar.mahaswayam.in या संकेतस्‍थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरील Job Seeker हा पर्याय निवडून आपला नोंदणी आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने Sign in केल्‍यानंतर होम पेज दिसेल. या पेजवर ‘पंडित दीनदयाळ उपाध्‍याय रोजगार मेळावा-अहमदनगर’ हा पर्याय निवडावा. Ahmednagar जिल्‍हा निवडल्‍यानंतर गुरुवार १३ फेब्रुवारीला होणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्‍याय रोजगार मेळावासाठी उपस्थिती नोंदवण्यात यावी व I agree हा पर्याय निवडून आपल्‍या पात्रतेनुसार विविध कंपन्‍याच्‍या रिक्‍त पदाची निवड करून Apply बटनावर क्लिक करावे व आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

म. टा. प्रतिनिधी, नगर
1 thought on “Ahmednagar Job Fair for 125 Posts”

Leave a Comment

MahaGov अधिकृत अँप डाऊन!