Ahmednagar Job Fair for 190 Posts

Ahmednagar Job Fair for 190 Posts

नगरला उद्या रोजगार मेळावा

Ahmednagar Job Fair 2020 : Recruitment will be held for 190 posts in 11 companies through this Job Fair. Ahmednagar Job Fair will be held on 13th February 2020 at 10.00 am at Raosaheb Patwardhan Smarak Samiti Sabhagruh. Candidates read the complete details carefully and reach their before the time with all relevant documents.

११ कंपन्यांतील १९० पदांसाठी होणार भरती

जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या पुढाकाराने पंडित दीनदयाळ उपाध्‍याय रोजगार व उद्योजकता मेळावा गुरुवारी (१३ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता सावेडीच्या रावसाहेब पटवर्धन स्‍मारक समिती सभागृहात होणार आहे. ११ विविध कंपन्या त्यांच्याकडील रिक्त १९० वर जागांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती या मेळाव्यात घेणार असून, यातून नोकरीसाठी अंतिम निवड केली जाणार आहे.

या मेळाव्‍यात नगर एमआयडीसी व जिल्ह्यातील विविध ठिकाणच्‍या नामांकित कंपन्‍यांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याद्वारे मेळाव्‍यास येणाऱ्या उमेदवारांच्‍या मुलाखती घेऊन त्यांच्याकडील रिक्तपदासाठी आवश्यक असलेल्यांची निवड करणार आहेत. नगरमधील साई इंजिनीअरिंग, सिद्धी सीएनसी, श्रीलक्ष्‍मी मल्टिस्‍टेट को-ऑप, कायझन इंजिनीअर्स, श्रीसंत नागेबाबा मल्टिस्‍टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी, मयूर इंडस्ट्रीज, साईदीप अॅलॉईड एक्‍स्‍टुजन, श्रीव्‍यंकटेश मल्टिस्‍टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी तसेच आदित्‍य सोलार (श्रीरामपूर), लीना ऑटोमोटिव्‍ह इंडिया (संगमनेर) व सॅफरॉन हॉलिस्‍टिक हेल्‍थकेअर (सुपा) अशा विविध कंपन्‍यांमध्‍ये १९० पदांची भरती करण्‍यात येणार आहे. दहावी, बारावी, पदवीधर तसेच आयटीआय-फिटर, वेल्‍डर, टेलर, पेंटर व टर्नर असे तांत्रिक ज्ञान असलेल्या उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात (मध्‍यवर्ती प्रशासकीय इमारत, सावेडी, नगर. दूरध्‍वनी क्रमांक-०२४१-२४२५५६६) संपर्क साधण्याचे आवाहन सहायक संचालक वि. जा. मुकणे यांनी केले आहे.

ऑनलाइन अर्ज Online Apply Details for Ahmednagar Job Fair

रोजगार मेळाव्यास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन नावनोंदणी व अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी https://rojgar.mahaswayam.in या संकेतस्‍थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरील Job Seeker हा पर्याय निवडून आपला नोंदणी आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने Sign in केल्‍यानंतर होम पेज दिसेल. या पेजवर ‘पंडित दीनदयाळ उपाध्‍याय रोजगार मेळावा-अहमदनगर’ हा पर्याय निवडावा. Ahmednagar जिल्‍हा निवडल्‍यानंतर गुरुवार १३ फेब्रुवारीला होणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्‍याय रोजगार मेळावासाठी उपस्थिती नोंदवण्यात यावी व I agree हा पर्याय निवडून आपल्‍या पात्रतेनुसार विविध कंपन्‍याच्‍या रिक्‍त पदाची निवड करून Apply बटनावर क्लिक करावे व आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

म. टा. प्रतिनिधी, नगर
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *