Akola Rojgar Melava 2020

Akola Rojgar Melava 2020

३० नोव्हेंबरपर्यंत मिळवा नोकरी, ऑनलाईन मुलाखती घेऊन प्रक्रीया राबविणार

Akola Job Fair 2020 : Nominated private entrepreneurs, companies and their representatives will conduct online recruitment process for various posts at the Akola Job Fair. Eligible male and female candidates for Class X, XII, ITI, Diploma and Degree can apply online and participate in this online job fair in Akola District. Candidates read the complete details given below:

Akola Job Fair 2020 Online Apply

कौशल्‍य विकास व उद्योजकता विभागाच्‍या महास्वयम या संकेतस्‍थळावर नाव नोंदणी केलेल्‍या सुद्धा नोकरीसाठी अर्ज करता येईल. दहावी, बारावी, पदवी, आयटीआय पास, पदवीका व पदवी पुरुष तसेच महिला उमेदवारांनी आपल्‍या सेवायोजन कार्डचा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्‍या लॉगइन मधून ऑनलाईन अप्‍लॉय करू शकतात. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍यात या उद्देशाने जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोलाचे वतीने ऑनलाईन पंडित दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्‍याचे आयेाजन करण्यात आले आहे. २५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हा मेळावा पार पडणार आहे. मेळाव्‍यामध्‍ये नामांकित खाजगी उद्योजक, कंपनी व त्‍यांचे प्रतिनिधी विविध पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबव‍तील. दहावी, बारावी, आय.टी.आय.,पदवीका व पदवीधारक पात्र पुरुष व महिला उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करुन या ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात सहभागी होता येईल.

How to Apply for Akola Rojgar Melava :

ऑनलाईन अप्‍लॉय केलेल्‍या उमेदवारांचे कंपनी, उद्योजक व एच.आर.प्रतिनिधी यांचे कडून ऑनलाईन मुलाखती घेऊन निवड प्रक्रीया राबवितील. सदर ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात जास्‍तीत जास्‍त उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्‍या आधारे ऑनलाईन अप्‍लॉय करुन सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्‍त प्रा.यो. बारस्‍कर यांनी केले आहे.

सौर्स : सकाळ 

Maharashtra Job Fairs 2020-New Update

Leave a Comment