Allahabad High Court Recruitment 2021

Allahabad High Court Recruitment 2021

जिल्हा न्यायाधीश पदासाठी 98 जागा

The Allahabad High Court has invited applications for 98 posts of District Judge (Entry Level). Interested candidates are urged to visit the official website and apply online by February 19, 2021. The Allahabad High Court is inviting applications for the post of District Judge under the Uttar Pradesh Higher Judicial Services. Interested and eligible candidates can apply online by visiting the website for more information.

अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून जिल्हा न्यायाधीश (एंट्री लेव्हल) 98 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन 19 फेब्रुवारी, 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून उत्तर प्रदेश हायर ज्युडिशिअल सर्व्हिसेसच्या अंतर्गत जिल्हा न्यायाधीश या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिक माहितीसाठी वेबसाईटवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करता येऊ शकेल.

  1. 98 जागांसाठी भरती : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, जिल्हा न्यायाधीश या पदासाठी 98 जागा भरल्या जाणार आहेत.
  2. अशी असेल पात्रता : न्यायाधीश या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून LLB ची पदवी असणे गरजेचे आहे. याशिवाय कमीत कमी सात वर्षापर्यंत कोणत्याही कोर्टात वकील म्हणून प्रॅक्टिस केलेली असणे आवश्यक %E�हे.
  3. वयोमर्याद%A : उमेदवाराचे किमान वय 35 वर्ष असावे. तर कमाल वय 45 वर्ष असावे. त्यापेक्षा अधिक असू नये. तर आरक्षित वर्गाच्या उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादेवर नियमानुसार सूट देण्यात आली आहे. या पदासाठी वय हे 1 जानेवारी, 2021 च्या आधारित असेल.
  4. अर्ज शुल्क : या पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना 1250 रुपयांचे अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे. तर SC/ST वर्गासाठी 1000 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

Leave a Comment