Anganwadi Sevika Bharti 2021 – 6500 Posts

Anganwadi Sevika Bharti 2021 – 6500 Posts

साडेसहा हजार अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरणार

महिला व बालकल्याण विभागांतर्गत ३९७ जागांसाठी भरती

Anganwadi Sevika Bharti  process is being carried out for 397 vacancies in 23 Integrated Child Development Services projects in the district under Women and Child Welfare Department. Applications have been invited from aspiring candidates for the vacant posts of 131 Anganwadi Workers, 217 Helpers and Mini Anganwadi Workers. This year, for the first time, the age limit of candidates has been increased by two years.

महिला व बालकल्याण विभागांतर्गत जिल्यातील 23 एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पांमधील रिक्त 397 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यात अंगणवाडी सेविका 131, मदतनिस 217 व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या रिक्त 49 जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यंदा प्रथमच उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवली आहे.

Anganwadi Sevika Bharti Age limit increase

Age limit of candidates has been increased to 32 after two years. The Women and Child Development Department of Zilla Parishad will soon start the recruitment process for the vacant posts of Anganwadi Workers, Mini Workers and Helpers.

अंगणवाडी सेविका भरती वयोमर्यादेत वाढ

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे लवकरच अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून 32 करण्यात आली आहे. याविषयी महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांनी 6 मे 2021 रोजी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांना यासंदर्भात निवेदन दिले होते.

अंगणवाडी सेविका,मिनी सेविका, मदतनीस पदावर भरतीसाठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे अशी आहे. आदिवासी ग्रामीण भागात अनेक विधवा, परितक्ता महिलांचे वयोमान ३० वर्षापेक्षा जास्त असल्याचे आढळून आलेले आहे. नोकरीच्या संधीपासून वंचित राहतात. नाशिक जिल्ह्यातही अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस रिक्तपदाची भरती प्रक्रिया राबविणेबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. ही भरती प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी सरळसेवा नियुक्तीच्या वयोमर्यादामध्ये वाढ करावी, अशी मागणी सभापती अश्विनी आहेर यांनी केली होती. त्यानुसार 23 जून 21 रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांनी वयोमर्यादेत 2 वर्षे वाढ केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना न्याय मिळेल, असे सभापती आहेर यांनी सांगितले.

अहमदनगर सेविका/ मदतनीस भरती 2021

नाशिक अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2021

नागपूर अंगणवाडी भरती २०२१

सांगली अंगणवाडी सेविका भरती २०२१ जाहिरात

अमरावती अंगणवाडी भरती २०२१ जाहिरात

अंगणवाडी मदतनीस पदाची भरती – जाहिरात येथे पहा

आरोग्य विभाग पदभरतीचे उत्तरतालिका व निकाल जाहीर


Anganwadi Sevika Bharti 2021-2022 updates : WCD Maharashtra Anganwadi Vibhag will be invites the application form for various posts, like Anganwadi Worker, Anganwadi Sevika, Anganwadi Supervisor etc., Posts. Eligible and Interested candidates can apply soon from this page. Candidates get the more information about the MH Anganwadi Bharti 2021 below on this page.

  • Name of Organization – Women and Child Development Department, Maharashtra
  • Name of Posts – Anganwadi Supervisor, Anganwadi Helper (Sahayika), Anganwadi Worker (Sevika), Anganwadi Teacher
  • No. of Posts – Various Posts (updated soon)
  • Age Limit – 18 to 38 years.
  • Selection Process: Written Test, Interview & Document Verification.
  • Application Fee: For General & Open Category: Rs. 500/-, For Reserved Category: Rs. 250/-
  • Mode of Registration: Online at www.mahapariksha.gov.in

Applications are invited for the vacant honorarium posts in the Anganwadi Center under the Integrated Child Development Services Scheme, Project Office, Devgad till March 2, 2021. While applying for these posts, the applicant must be from the concerned Gram Panchayat Revenue Village. However, eligible and interested candidates should submit their applications to the Child Development Project Officer, Integrated Child Development Services Project Office, Devgad. An affidavit of small family must be attached with the application. The age limit for these posts is 21 to 30 years. Also documents related to educational qualification, residency certificate, age certificate, experience should be attached with the application. 

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय, देवगड अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेल्या मानधनी पदांसाठी दिनांक 2 मार्च 2021 रोजी पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदांसाठी अर्ज करणाताना अर्जदार हा संबंधित ग्रामपंचायत महसुली गावातील असणे अवश्यक आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालय, देवगड येथे समक्ष सादर करावेत. अर्जा सोबत लहान कुटुंबाबातचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. सदर पदांसाठीची वयोमर्यादा ही 21 ते 30 वर्ष आहे. तसेच शैक्षणिक पात्रता, रहिवासी दाखला, वयाचा दाखला, अनुभव या विषयीची कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.

रिक्त असणारी पदे पुढील प्रमाणे आहेत. ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्र व रिक्त पद यांची माहिती अनुक्रमे दिली आहे. लिंगडाळ – लिंगडाळ – अंगणवाडी सेविका, शिरगाव – बैद्धवाडी – अंगणवाडी सेविका, गढिताम्हाणे – गढिताम्हाणे – अंगणवाडी सेविका, रहाटेश्वर – रहाटेश्वर – अंगणवाडी सेविका. गिर्ये – बांदेवाडी – अंगणवाडी सेविका, किंजवडे – ठाकूरवाडी – अंगणवाडी सेविका, फणसे- फणसे – अंगणवाडी सेविका, पडवणे – पडवणे – अंगणवाडी सेविका, मिठबाव – भंडारवाडा – अंगणवाडी सेविका, गिर्ये – जांभुळवाडी – अंगणवाडी सेविका, मुटाट – बौद्धवाडी – मिनी अंगणवाडी सेविका. या प्रमाणे पदे भरण्यात येणार आहेत.

शासकीय संस्थेत राहल असलेली विधवा व अनाथ मुली यांना भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, देवगड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अरूण चव्हाण बाल विकास प्रकल्प अधिकारी, देवगड यांनी केले आहे.

सोर्स:सिंधुदुर्ग 24 तास


मेगा भरती; आता विविध पदांसाठी एकाच दिवशी होणार परीक्षाता. ३ फेब्रु.चा अपडेट

आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी आरोग्य सेविका पदे भरणार!

आरोग्य विभागातील ८५०० जागेच्या मेगा भरतीला सुरुवात

बाल विकास प्रकल्प नागपूर भरती 2021

Anganwadi Sevika Bharti 2021 : The Anganwadi sevika bharti advt published in daily newspaper to be filled the posts in 4 Anganwadi centers in the Konkan District. These include Kolzar Tembwadi at Kolzar, Wazre Haldicha Gunda at Wazre-Girode, Deulwadi at Ambadgaon, Ganeshwadi at Bodde.

Applications are invited from interested and eligible women candidates from the respective revenue villages for this recruitment. The applications will be accepted by the Child Development Project Officer, Integrated Child Development Services Scheme Project Office, Dodamarg during office hours from 14th January 2021 to 28th January 2021 at 5.30 pm.

For more information call the concerned Gram Panchayat Office as well as Child Development Project Office, Dodamarg. Child Development Project Officer, Integrated Child Development Services Scheme, Project Dodamarg should be contacted on 02363-256506.




जिल्ह्यातील 4 अंगणवाडी केंद्रावर मिनी अंगणवाडी केंद्रातील मानधनी मिनी अंगणवाडी सेविकांची पदे भरावयाची आहेत. त्यामध्ये कोलझर येथील कोलझर टेंबवाडी, वझरे-गिरोडे येथील वझरे हळदीचा गुंडा, अंबडगाव येथील देऊळवाडी, बोडदे येथील गणेशवाडी या अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे.

या भरतीसाठी संबंधित महसूल गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज दिनांक 14 जानेवारी 2021 ते 28 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, दोडामार्ग यांच्या कडे स्वीकारण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी संबंधीत ग्रामपंचायत कार्यालय तसेच बाल विकास प्रकल्प कार्यालय, दोडामार्ग येथे दूरध्वनी क्र. 02363-256506 या क्रमांकावर संपर्क साधावा असे बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प दोडामार्ग हे कळवितात.


Anganwadi workers are paid Rs. 1 lakh after completion of service and Madatnis are paid Rs. 75,000. Anganwadi workers cannot earn a living in old age. Giving them half of their monthly honorarium as a pension will cost them only Rs 10 crore every year. Therefore, a proposal has been submitted to the state government by the Maharashtra State Anganwadi Staff Action Committee that they should start a monthly pension along with the termination benefit. Read the other details carefully given below:

अंगणवाडी सेविकांना पेन्शन सुरू करा; कृती समितीतर्फे राज्य सरकारला प्रस्ताव..

अंगणवाडी सेविकांना सेवासमाप्तीनंतर एक लाख रुपये आणि मदतनिसांना 75 हजार रुपये इतकी रक्‍कम दिली जाते. त्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा वृध्दापकाळामध्ये उदरनिर्वाह होऊ शकत नाही. त्यांना दरमहा मानधनाच्या निम्मी रक्‍कम पेन्शन म्हणून दिल्यास दरवर्षी केवळ दहा कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे त्यांना या सेवासमाप्ती लाभासोबतच दरमहा पेन्शन सुरू करावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे राज्य सरकारला देण्यात आला आहे.

राज्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे दोन लाख इतकी आहे. त्यापैकी अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मिळून सुमारे अडीच हजार कर्मचारी वयाच्या 65 वर्षानंतर सेवानिवृत्त होतात. सध्या अंगणवाडी सेविकांना सुमारे दरमहा आठ हजार पाचशे रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा पाच हजार 750 रुपये आणि मदतनिसांना दरमहा साडेचार हजार मानधन दिले जाते. त्यांना त्यांच्या मानधनाच्या 50 टक्के रक्कम सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन म्हणून देण्यात यावी. सरकारने हा निर्णय घेतल्यास अंगणवाडी सेविकांना दरमहा चार हजार 250 रुपये मिनी सेविकांना दोन हजार 875 रुपये आणि मदतनिसांना सव्वा दोन हजार रुपये पेन्शन मिळेल. त्यानुसार राज्य सरकारवर वार्षिक खर्च सुमारे 9.75 कोटी रुपये खर्च येईल, असे संघटनेने प्रस्तावात नमूद केले आहे.

सध्या सेवानिवृत्ती लाभ योजनेकरीता राज्य सरकारकडून प्रतिमाह अंगणवाडी सेविकांसाठी दोनशे रुपये आणि मिनी सेविका व मदतनिसांसाठी शंभर रुपये योगदान दिले जाते. ही योजना एप्रिल 2014 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. ढोबळ अंदाजानुसार सर्व सेविका आणि मदतनिसांचे मिळून वर्षाचे 36 कोटी रूपये जमा होतात. आजअखेर 216 कोटी रुपये जमा झाले असून, त्यापैकी अंगणवाडी सेविका, मदतनिसांना सेवासमाप्तीचा एकरकमी लाभ देण्यासाठी गेल्या सहा वर्षांमध्ये सुमारे 131 कोटी रुपये खर्च झाला आहे. राज्य सरकारकडे 85 कोटी रुपये शिल्लक असून, पेन्शन सुरू केल्यास दरवर्षी त्यामध्ये 36 कोटी रुपयांची भर पडणार आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाच्या निम्मी रक्‍कम दरमहा पेन्शन दिल्यास दरवर्षी सुमारे दहा कोटी रुपये लागतील. महिला बालविकास खात्याकडील उपलब्ध रकमेमधून दरमहा पेन्शन देणे सहज शक्‍य आहे. या संदर्भात राज्य सरकारने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा.- एम.ए. पाटील, अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती

दरमहा पेन्शन सुरू केल्यास मिळणारी रक्‍कम

  1. अंगणवाडी सेविका : चार हजार 250 रुपये
  2. मिनी अंगणवाडी सेविका : दोन हजार 875 रुपये
  3. मदतनीस : दोन हजार 250 रुपये

सौर्स : सकाळ




Anganwadi Sevika Bharti 2021 Updates is here : The current process of filling up the vacant posts of Anganwadis is causing controversy in the Gramsabha and has led to the fact that the process of appointment of Anganwadi Sevika in many places has stalled. Recruitment of 119 Anganwadi workers, 199 helpers and 28 mini Anganwadi workers in Thane district is stalled. Read the complete details given below:

  1. अंगणवाडी भरतीवरून वाद – अंगणवाड्यांच्या रिक्त पदावर नियुक्ती करण्यासाठी सध्या राबवल्या जात असलेल्या प्रक्रियेमुळे ग्रामसभांमध्ये वादाची स्थिती उद्भवत असून त्यामुळे अनेक ठिकाणच्या अंगणवाडी सेविकांच्या नियुक्तीची प्रक्रिया रखडल्याचे वास्तव समोर आले आहे. ठाणे जिल्ह्यातील ११९ अंगणवाडी सेविका, १९९ मदतनीस आणि २८ मिनी अंगणवाडी सेविकांची भरती रखडली आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती रत्नप्रभा तरमळे यांनी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अॅड. यशोमती ठाकूर आणि नगरविकास मंत्र्यांकडे केली आहे.
  2. ठाण्यातील अंगणवाडी भरती – ठाणे जिल्ह्यामध्ये नऊ प्रकल्पांमध्ये सुमारे १ हजार ५९६ अंगणवाड्या आणि २५८ मिनी अंगणवाड्या अशा एकूण एक हजार ८५४ अंगणवाड्या विविध भागांमध्ये आहेत. या अंगणवाड्यांत ३४०० कर्मचारी कार्यरत असून त्यामध्ये ० ते ६ वयोगटामधील १ लाख १४ हजार लहान बालके आणि मुलांची नोंद करण्यात आली आहे. एकूण ५६ हजार मुले या योजनेचा प्रत्यक्ष फायदा घेत आहेत. तर किशोरवयीन ६० हजार मुलींची नोंद अंगणवाड्यांमध्ये आहे. करोना संकटापासून ते लसीकरणापर्यंत गावागावांमध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या रिक्त झालेल्या पदांच्या भरतीमध्ये सध्या ग्रामसभांमधील वादामुळे भरती प्रक्रिया रखडल्याचा दावा ठाण्यातील महिला व बालकल्याण समिती सभापतींनी केला आहे.
  3. ग्रामसभांमध्ये हाणामाऱ्या – शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील अंगणवाड्यांच्या रिक्त पदावर नियुक्ती करताना १००पैकी किमान ६० गुण असलेल्या उमेदवारांच्या निवडसुचीतून ग्रामसभा ज्या उमेदवाराच्या नियुक्तीस मान्यता देईल, असे उमेदवार सेविका व मदतनीस पदांवर नियुक्त करण्यात यावे, असे नमूद आहे. त्यामुळे ग्रामसभेकडे पाठवल्यानंतर ग्रामसभेमध्ये विशिष्ट व्यक्तीचे, कुटुंबाचे राजकीय वर्चस्व असल्याने अनेक पात्र लाभार्थ्यांवर अन्याय केल्याच्या घटना घडत आहेत. काही ग्रामसभांमध्ये सेविका निवडीवरून हाणामारीच्या तक्रारी येत असल्याने पोलिस बंदोबस्तात ग्रामसभा घेतल्या जात आहेत. ग्रामसभांचा निर्णय होत नसल्याने अंगणवाड्या बंद असून त्यामुळे बालकांचे नुकसान होत आहे.
  4. नियुक्ती प्रक्रियेत सुधारणा – अंगणवाडी सेविका नियुक्ती प्रक्रिया महिला व बालक कल्याण समिती स्तरावरून व्हावी, अशी मागणी समिती सभापती रत्नप्रभा तारमळे यांनी केली आहे. तसेच शासन निर्णयामध्येही सुधारणा करून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रियेदरम्यान जास्तीत जास्त गुण असलेल्या उमेदवारांची निवड करण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याच्या सुधारणेचे पत्र त्यांनी महिला व बालकल्याण मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांना दिले आहे.

Anganwadi Thane Bharti 2021 ठाण्यातील भरती प्रतीक्षा

  • तालुका-अंगणवाडी सेविका-अंगणवाडी मदतनीस-मिनी अंणगवाडी सेविका
  • भिवंडी-२६-४०-८
  • शहापूर-२६-४०-१४
  • मुरबाड-३०-५८-५
  • ठाणे-१२-२४-०
  • अंबरनाथ-१४-१०-०
  • कल्याण-११-२७-१
  • एकूण-११९-१९९-२८

सौर्स : मटा


अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सरकारकडून भाऊबीज भेट

Anganwadi Sevika, helpers and mini Anganwadi Sevika working under Integrated Child Development Services Scheme A government decision has been issued to give Rs. 2,000 as a gift to these honorary employees this year. Read the complete details carefully given below:

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यात ९३ हजार ३४८ अंगणवाडी सेविका, ८८ हजार३५३ अंगणवाडी मदतनीस आणि ११ हजार ३४१ मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी ३८ कोटी ६१ लाख रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे.  कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहोचवणे तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट देण्यात येत असल्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

सौर्स : डेली हंट


मराठा उमेदवारांच्या गुणांकनाचा अंगणवाडी भरतीप्रक्रियेत पेच update on 14th Mar 2020

वैद्यकीय सर्वेक्षणासाठी शिक्षकांची नेमणूक करा update on 23rd April 2020

Women and Child Development Ministers have given orders regarding the recruitment of Anganwadi servants, activists and helpers. The state government has given reservation to the Maratha Samaj. In this recruitment process, a resolution was sought at the Zilla Parishad demanding that the government should remove the marks of the candidates from the Maratha community. The proposal will be sent to the government. Read more details given below:

WCD Recruitment 2021

महिला व बालविकास मंत्र्यांनी अंगणवाडी सेविका, कार्यकर्ती व मदतनिसांच्या भरतीसंदर्भात आदेश दिले आहेत. राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. या भरतीप्रक्रियेत मराठा समाजातील उमेदवारांच्या गुणांकनाबाबत शासनादेश काढावे अशी मागणी करणारा ठराव जिल्हा परिषदेत घेण्यात आला. हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.१३) पार पडली. किशोर पवार यांनी मुद्दा उपस्थित केला, की मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे,
तथापि अंगणवाडी सेविका, कार्यकर्ती व मदतनिसांच्या भरतीप्रक्रियेत या समाजातील उमेदवारांना गुणांकनानुसार कसे गुण दिले जाणार आहेत अशी विचारणा केली. केवळ पॉइंट दोन, तीन गुणांमुळे अनेकांना नोकरीपासून वंचित राहावे लागते असे सांगत या भरती प्रक्रियेविषयी खुलासा करण्याची मागणी केली.
यावर महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले, १३ ऑगस्ट २०१४ च्या शासनादेशानुसार ओबीसी, एससी यांच्याबाबत निर्देश आहेत; मात्र दिव्यांग आणि नवीन प्रवर्गाबाबत कोणतेही निर्देश आलेले नाहीत. महिला व बालविकास आयुक्तांमार्फत सचिवांना कळवले आहे, शासनाकडून याबाबत मार्गदर्शन मागवण्यात आले आहे; मात्र अद्याप काही मार्गदर्शन प्राप्त झालेले नाही.
यावर या भरती प्रक्रियेत मराठा समाजातील उमेदवारांच्या गुणांकनाबाबत शासनाने शासनादेश काढावे अशी मागणी करणारा ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
करोडी ग्रामपंचायतीचे विभाजन करण्यासाठीचा प्रशासकीय ठराव मंजूर करून करोडी व साजापूर अशा दोन ग्रामपंचायती करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य मिशनमधून कोणत्या योजनांसाठी किती निधी प्राप्त झाला, योजनांची अंमलबजावणी किती झाली याविषयीची माहिती येत्या १५ दिवसांत सदस्यांना देण्याचे निर्देश अध्यक्ष मीना शेळके यांनी दिले.

उपकरातून समान निधी द्या

पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, पूल, कोल्हापुरी बंधार्‍यालगतचा भराव वाहून गेलेल्या दुरुस्तीच्या कामांना उपकरात प्राधान्य देण्यात यावे. यापूर्वी विषय समितीने उपकरातील मंजूर केलेल्या कामांना त्या नियोजनात दुरुस्ती करण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यात अद्याप दुरुस्ती झालेली नाही.

मार्चअखेर जवळ येत आहे. यासाठी त्या नियोजनात विषय समितीने दुरुस्त्या कराव्या व सर्व सदस्यांच्या सर्कलमध्ये समान निधीचे वाटप करावे अशी बांधकाम समितीला विनंती करण्याचा यावेळी ठराव घेण्यात आला.

सौर्स : सकाळ





Anganwadi Sevika Recruitment 2021 : The state government has postponed the recruitment of posts in Anganwad since 2017. The state government has postponed the effective implementation of the Integrated Child Development Services Scheme. The state government has approved to fill 50% of the vacant posts of Anganwadi Servant, Assistant and Mini Anganwadi Servant Assistant in the State. The Anganwadi center, which has the maximum number of children, the acute problem of malnutrition in the tribal areas, the hill areas, the Anganwadi centers located in the remote areas of the taluka, will be considered on priority basis.

Anganwadi Sevika Recruitment 2021

राज्यातली अंगणवाडी सेविकांच्या भरतीवर गेल्या पाच वर्षापासून बंदी होती. आता हि बंदी उठवून सहा हजार सेविकांच्या भरतीला परवानगी दिली आहे. यंदा अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करता येणे शक्य नाही. मात्र, पुढच्या वर्षी ती केली जाईल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी हेमंत टकले यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिले. विजय गिरकर, हुस्नबानू खलिफे, आदींनी उप्प्रश्न्स विचारले.

२ वर्षांत सर्व जिल्ह्यांत विशेष केंद्र

राज्यातील मरणासन्न रुग्णांवरील उपचारांसाठी दोन वर्षांत सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष केंद्र उभारण्यात येईल, असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जगन्नाथ पाटील यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिले. सध्या राज्यातल्या १६ जिल्ह्यांमध्ये अशी विशेष केंद्र कार्यरत आहेत. यामधून आतपर्यंत १० हजार २३८ रुग्णांवर उपचार केले गेले, असेही टोपे म्हणाले.

सोर्स : लोकमत

अंगणवाडी सेविकांच्या रिक्त पदांवर होणार भरती

पुणे – अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्‍त पदे भरण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील रिक्‍त 585 पदे भरण्यासाठी तालुकास्तरावर भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा पारगे यांनी दिली.

राज्य सरकारने 2017 पासून अंगणवाड्यांमधील पद भरती करण्यास स्थगिती दिली होती. एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्य सरकारकडून स्थगिती उठवली आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या एकूण रिक्‍त पदांपैकी 50 टक्‍के पदे भरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यांतर्गत जास्तीत जास्त मुलांची संख्या असणारी अंगणवाडी केंद्र, आदिवासी क्षेत्रातील कुपोषणाची तीव्र समस्या असलेली क्षेत्र, डोंगराळ भाग, तालुक्‍याच्या ठिकाणापासून दुर्गम भागात असेलेली अंगणवाडी केंद्रांचा प्राधान्याने विचार करून पदभरती करण्यात येणार आहे.

सौर्स : प्रभात

Anganwadi Sevika Bharti 2020 : As per the latest news there were total 6500 vacant seats are available for Anganwadi Sevika and Madatnis (attendant) posts. This vacant seats will be filled soon. Anganwadi Sevika, Helpers, Mini Anganwadi Servants have vacancies all over the state. The demand for that immediate payment was pending for several years. Focusing on this, Thakur gave the order to the administration at a review meeting of the department. All other important details are given below, candidates read the complete details carefully and keep visit us.

ठाणे : राज्यभरात रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या सहा हजार ५०० रिक्त जागा भरण्यास मंजुरी देतानाच, भाडेतत्वावर सुरू असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या इमारतींच्या भाड्यात ग्रामीण भागासाठी चार हजार रुपये तर शहरभागासाठी सहा हजार रूपये मासिक भाडेवाढ करण्याचा निर्णय महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस राजेश सिंग यांनी शनिवारी दिली.
अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांच्या राज्यभर रिक्त जागा आहेत. त्या त्वरित भरण्याची मागणी काही वर्षांपासून प्रलंबित होती. त्यावर लक्ष केंद्रीत करून या साडेसहा हजार जागा भरण्याचे आदेश ठाकूर यांनी विभागाच्या आढावा बैठकीत प्रशासनास दिले. याशिवाय अंगणवाडी केंद्राच्या तुटपुंज्या भाड्यामध्ये वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस पदे भरण्यावर तीन वर्षांपासून निर्बंध लावण्यात आले होते. आता हे निर्बंधही हटवण्यात आले आहेत. त्यामुळे सेविका व मदतनीसच्या साडेसहा हजार जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मान्यता दिलेल्या परंतु कार्यान्वित न झालेले ९८ अंगणवाडी केंद्र व ७४५ मिनी अंगणवाडी केंद्र आवश्यकतेप्रमाणे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. राज्यभर रिक्त असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या रिक्त ४५ जागा भरण्याचे आदेशही ठाकूर यांनी यावेळी जारी केल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
मासिक भाड्यातही वाढ
राज्यभरात ३७ हजार ५४५ अंगणवाडी केंद्र भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. या इमारतीच्या भाड्यापोटी अत्यल्प रक्कम दिली जाते. आढावा बैठकीत त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ग्रामीण व आदिवासी भागातील केंद्रासाठी याआधी ७५० रूपये मासिक भाडे दिले जात असे. यापुढे त्यासाठी एक हजार रूपये निश्चित केले आहेत. शहरी भागातील केंद्रासाठी ७५० रूपये भाडे होते. ते आता चार हजार रूपये करण्यात आले. महानगरामधील अंगणवाडी केंद्राचे भाडे ७५० रूपयांवरून सहा हजार रूपये करण्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

सौर्स : लोकमत




24 thoughts on “Anganwadi Sevika Bharti 2021 – 6500 Posts”

  1. I like to to this service plz sir, mam send me Anganwadi Bharti form I have completed my 12th sci with mscit including with English , Marathi typing..plz plz mam send a form I request…

    Reply
  2. Plz give me the one chance. I am teaching experience.computer ms cit basic ,tally complete and teaching computer basic

    Reply
  3. मला अंगणवाडी मध्ये मदतनीस चे काम मिळेल का. मी snehadeep Jankalyan Foundation मध्ये काम करीत आहे …

    Reply
  4. नाशिक जिल्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदे नवीन भरती कधी होईल

    Reply
  5. नाशिक जिल्यात किंवा त्रिंबकेश्वर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदे नवीन भरती कधी होईल रिप्लाय
    [email protected]

    Reply

Leave a Comment