Anganwadi Sevika Bharti 2022 Apply here

Anganwadi Sevika Bharti 2022- 6500 Posts

सोलापूर जिल्ह्यात 581 अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या जागा रिक्‍त

Anganwadi Sevika Bharti 2022 in Solapur Disrict for 581 posts. There are as many as 581 vacancies of Anganwadi workers in Solapur district. These posts are vacant for the last 3 years. The vacancies are not yet filled in Anganwadi for Anganwadi Sevika, Anganwadi Helper & Mini Sevka. Due to this, the working Anganwadi workers and helpers have increased their workload. 6 Months ago, an order came from the Commissioner of Women and Child Welfare Department to fill up 50% of the vacant posts. In this order, it was said to give priority to the vacant seats before December 31, 2019. According to this, 581 employee posts are vacant in the district for the last three years, even though 50% of the posts have been filled. If these seats are not filled soon, there is a possibility that the quality of education of Anganwadi children will deteriorate. Read the more details and vacancies details given below:

हिंगोली अंगणवाडी मध्ये १४४ पदे रिक्त

अमरावती अंगणवाडी भरती 2022

  1. जिल्हाभरात अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या तब्बल 581 जागा रिक्त आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ही पदे रिक्त आहेत. रिक्त जागा अद्याप भरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर कामाचा अतिरिक्‍त भार वाढला आहे. अंगणवाडीकडे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया म्हणून पाहिले जाते. बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी शासन त्यांच्या आहारासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करत आहे. फक्त सोलापुरात ही परिस्थिती नसून अशी परिस्थिती संपूर्ण राज्यभरात आहे. अंगणवाडीत काम करणारे कर्मचारी कमी मानधनावर प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचे नेहमीच कौतुक होत असते. असे असतानाही कमी मानधनासाठी कर्मचार्‍यांची नियुक्‍ती राज्य शासनाकडून होत नसल्याने पालकांत शासनाच्या विरोधात रोष बळावत आहे.
  2. रिक्त जागामुळे अंगणवाडीतील बालकांचे भवितव्य अंधारात सापडण्याची चिन्हे आहेत. अनेक नजीकच्या अंगणवाडी सेविकांना रिक्त पदावरील अंगणवाडीचा प्रभारी चार्ज देण्यात आला आहे, मात्र त्याकडे त्यांना पूर्ण वेळ देता येत नसल्याने येथील अनेक बालकेही दुर्लक्षित ठरत आहेत. सहा महिन्यांपूर्वी महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तांकडून रिक्त जागांच्या 50 टक्के जागा भरण्याचा आदेश आला. या आदेशात 31 डिसेंबर 2019 पूर्वी रिक्त झालेल्या जागाना प्राधान्य देण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार 50 टक्के जागा भरुनदेखील गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात आजपर्यंत 581 कर्मचार्‍यांच्या जागा या रिक्त आहेत. येत्या काळात लवकर या जागा न भरल्यास अंगणवाडीतील मुलांच्या शिक्षणाचा दर्जा ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Anganwadi Bharti 2022 Vacancy Details

  1. अक्कलकोट तालुक्यात सेविका 16, मिनी सेविका 3, मदतनीस 55,
  2. बार्शी तालुक्यात सेविका 12, मिनी सेविका 1, मदतनीस 30, वैराग सेविका 8, मदतनीस 20,
  3. करमाळा तालुक्यात सेविका 17, मिनी सेविका 1, मदतनीस 25.
  4. माढा तालुक्यात सेविका 2, मिनी सेविका 1, मदतनीस 22,
  5. कुर्डूवाडी आणि टेंभुर्णी येथे सेविका 6, मदतनीस 11,
  6. माळशिरस तालुक्यात सेविका 18, मिनी सेविका 1, मदतनीस 19,
  7. अकलूज येथे सेविका 17, मदतनीस 31.
  8. मंगळवेढा तालुक्यात सेविका 1, मिनी सेविका 1, मदतनीस 26,
  9. मोहोळ तालुक्यात सेविका 13, मिनी सेविका 5, मदतनीस 29,
  10. उत्तर सोलापूर सेविका 13, मदतनीस 20,
  11. पंढरपूर 1 सेविका 9, मदतनीस 36,
  12. पंढरपूर क्र. 2 येथे सेविका 9, मदतनीस 24,
  13. सांगोला तालुक्यात सेविका 3, मिनी सेविका 1, मदतनीस 10,
  14. कोळा येथे सेविका 11, मिनी सेविका 2, मदतनीस 9,
  15. दक्षिण सोलापूर येथे 9, मदतनीस 34 अशा जागा रिक्त आहेत.

चिपळुणात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Chiplun Anganwadi Bharti 2022 – Chiplun Ekatmik Balvikas Seva Yojana project having the vacant posts for Anganwadi Sevika and Anganwadi Madatnis (Helper). Interested candidates can be apply before the last date on below given address. Candidates read the details carefully and apply soon. Anganwadi Sevika Bharti 2022 latest updates regularly updated on our website (mahagov.info) so keep visit us.

चिपळुण येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प १ व २ मध्ये अंगणवाडी सेविका पदासाठी व मदतनीस पदासाठी रिक्त जागा भरावयाच्या आहेत. यासाठी इच्छुक व आवश्यक अर्हताधारक संबंधित ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील स्थानिक रहीवाशी असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तालुक्यातील अंगणवाडी सेविका पदासाठी रिक्त जागा प्रकल्प १ व २ मध्ये जाहीर झाले असून यासाठी विविध नमुन्यांमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत.

Chiplun Anganwadi Sevika Bharti 2022 Details

  1. प्रकल्प १ मध्ये अंगणवाडीका सेविका पदासाठी धामेली गायकर व निरबाडे लाल या ठिकाणी अंगणवाडी सेविका पद रिक्त आहे. सदर पदासाठी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील स्थानिक उमेदवारांनी अर्ज करावेत.
  2. त्याप्रमाणे प्रकल्प २ मध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी रिक्त जागा भरावयाच्या आहेत. यासाठी गाव मजरेकाशी अंगणवाडी मजरेकाशी व गाव मिरजोळीमध्ये अंगणवाडी कोलेखाजन या ठिकाणी अंगणवाडी सेविका पद भरावयाचे आहेत.
  3. अंगणवाडी सेविका पदासाठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्ष असे राहील.
  4. सदर पदांसाठी यापुर्वी जाहीरातीनुसार अर्ज केले असल्यास पुन्हा अर्ज करणे बंधनकारक आहे.
  5. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी १मध्ये शिवानी शिंदे आणि प्रकल्प २ मध्ये अधिकारी एस.एस. नार्वेकर यांच्याशी संपर्क साधावा.

How to apply for Anganwadi Sevika Bharti 2022

  1. सेविका अर्ज करण्याची तारीख आणि पत्ता – सदरचे अर्ज २२ जून ते ४ जुलैपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी परकार कॉम्पलेक्स दुसरा मजला २१८ येथे सादर करावे.
  2. अंगणवाडी मदतनीस रिक्त जागेसाठी कामथेमधील अंगणवाडी कामथे टेपवाडी येथे मदतनीस पद भरावयाचे आहे.
  3. मदतनीस अर्ज करण्याची तारीख आणि पत्ता – सदर पदासाठी दि. २२ जून ते १ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. सदरचे अर्ज परकार कॉम्पलेक्स गाळा नं. २२६ या कार्यालयामध्ये सादर करावे.

अंगणवाडी सेविका भरती महाराष्ट्र 2022 : Integrated Child Development Services Scheme project is implemented by Women and Child Welfare Department. With the large number of vacancies for Child Development Project Officer, Supervisor, Anganwadi Worker, Helper responsible for this project, how was the overall development of children in the district achieved? Such a question has arisen. Integrated Child Development Nagpur has more than 300 vacancies out of 4628 sanctioned posts. Read the more details given below अंगणवाडी भरती फॉर्म 2022 is given below:

नंदुरबार जिल्हात अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती:

Applications are invited from eligible women candidates for the vacant posts under the Integrated Child Development Services Scheme Projects are Anganwadi Sevika, Anganwadi Mini Sevika and (Helper) Madatanis under Taloda. For the honorary posts of Anganwadi Sevika, Mini Anganwadi Sevika and (Helper) Madatanis, only the residents of that village are required. Applications in the prescribed format and for educational qualifications and other information will be available during office hours. Also, the completed application should be submitted by 31st May 2022 at Child Development Project Officer, Integrated Child Development Services Scheme Project, Taloda, Taloda, Dist. Nandurbar.

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, तळोदा अंतर्गत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी केवळ त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील. तसेच परिपुर्ण भरलेले अर्ज 31 मे 2022 पर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, तळोदा, ता.तळोदा.जि.नंदुरबार येथे सादर करावे.

Nandurbar Anganwadi Vacancy Details रिक्त पदांचा तपशील :

  1. तळवे क्रं-3-1, तळवे क्रं-2-1, जामोनीपाडा-1, सावर-1 येथील 4 अंगणवाडी सेविका रिक्त पदासाठी
  2. तर गोडाटेंबा-1, हांडबा-1, मोड पु-1, बोरीपाडा-1 अशा 4 अंगणवाडी मिनी सेविका रिक्त पदासाठी
  3. तसेच कढेल-1, खर्डी खु-1, मोदलपाडा-1, नळगव्हाण-1, केलवापाणी-1, लाखापूर रे-1 अंगणवाडी केंद्रातील 6 मदतनीस
  4. अशा एकूण 14 रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

अंगणवाडी मानधन 2022 डिटेल्स

अंगणवाडी भरती साठी लागणारी कागदपत्रे


महिला व बाल कल्याण विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राबविण्यात येतो. त्या अंतर्गत आरोग्य, आहार व शिक्षण देण्याचे काम केले जाते. या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची मोठ्या प्रमाणत पदे रिक्त असल्याने जिल्ह्यातील बालकांचा सर्वांगीण विकास साधला कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत अंगणवाडीच्या माध्यमातून सहा वर्षांखालील मुलांचे पोषण व आरोग्य व पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते. बालमृत्यू रोखण्यासाठी लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, पूरक पोषण देण्यात येतात. 

Anganwadi Nagpur Bharti 2022- Vacancy Details

संवर्ग                                               मंजूर पदे           रिक्त पदे

बाल विकास प्रकल्प अधिकारी               13                    12

पर्यवेक्षिका                                             78                   32

अंगणवाडी सेविका                                2161                94

मदतनीस                                             2161              206

मिनी अंगणवाडी सेविका                         206                  6

अंगणवाडी सेविका भरती महाराष्ट्र 2022 Nagpur Anganwadi Sevika Bharti 2022 – As per today’s report, the recruitment process for the vacant posts of Anganwadi Sevika and Anganwadi Helper has been started at Ramtek as per the order of the State Government. But the recruitment process was incomplete as the Gram Sevak was not present to accept the application. Read the more details given below अंगणवाडी भरती फॉर्म 2022 is given below

अंगणवाडी सेविका भरती महाराष्ट्र 2022 Details

Anganwadi Sevika Bharti 2022 Latest news : According to Women and Child Welfare Minister Yashomati Thakur, the salaries of Anganwadi workers and Ashasevikas will be increased soon, and insurance and pension schemes for Anganwadi workers and Ashasevikas are also being planned. So women will be empowered. She said that Mahavikas Aghadi government is working on this. Read the below given details carefully. 

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितल्या प्रमाणे अंगणवाडी सेविका आणि आशासेविका याची पगारवाढ लवकरच होणार आहे, तसेच अंगणवाडी सेविका आणि आशासेविका यांच्या साठी विमायोजना आणि पेन्शन योजना याचेही नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे महिला सबलीकरण होईल. महाविकास आघाडी सरकार यावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Anganwadi Functions

  1. The word Anganwadi means “courtyard shelter” in Indian languages. They were started by the Indian government in 1975 as part of the Integrated Child Development Services program to combat child hunger and malnutrition.
  2. Maharashtra houses 108005 Anganwadi / Mini Anganwadi Centres. With more than 550+ ICDS projects being operational, the work force comprising of over 4000 supervisors and around 2 Lakh Anganwadi Workers / helpers and Mini-Anganwadi Workers drive the entire ICDS machinery starting from grass root level.
  3. Anganwadis are the focal point for implementation of all the health, nutrition and early learning initiatives under ICDS.

Below table provide the details of beneficiaries and service details.

Sr.No Beneficiaries Services
1 Expectant & Nursing Mothers, adolescent girls 11 to 18 years.
  1. Health Check-up
  2. Immunization of expectant mother against tetanus
  3. Referral services
  4. Supplementary Nutrition
  5. Nutrition & Health Education
2 Other Women 15 to 45 years
  1. Nutrition & Health Education
3 Children Below 1 year of age
  1. Supplementary Nutrition
  2. Immunization
  3. Health Check-up
  4. Referral Services
4 Children between 1 & 3 years of age
  1. Supplementary Nutrition
  2. Immunization
  3. Health Check Up
  4. Referral Services
5 Children between 3 & 6 years of age
  1. Supplementary Nutrition
  2. Immunization
  3. Health Check Up
  4. Referral Services
  5. Non-formal pre-school education

अंगणवाडीची कार्ये

  1. भारतीय भाषांमध्ये अंगणवाडी शब्दाचा अर्थ “अंगणामधील निवारा” असा आहे. अंगणवाड्या भारत सरकारने १९७५ साली एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत चालू केल्या आणि त्याचा उद्देश बालकांमधील कुपोषणाशी लढणे हा होता.
  2. महाराष्ट्र राज्यात १०८००५ अंगणवाड्या/ मिनी अंगणवाडी केंद्रे आहेत. राज्यात ५५० पेक्षा जास्त एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प चालू आहेत, ज्यामध्ये ४००० वर पर्यवेक्षक आणि अंदाजे २ लक्ष अंगणवाडी कर्मचारी/ मदतनीस आणि छोट्या अंगणवाडीमधील कर्मचारी कार्यरत आहेत आणि ते संपुर्ण आईसीडीएस प्रकल्प निम्नस्तरापासून चालवत आहेत.
  3. आईसीडीएसअंतर्गत अंगणवाडी हे सर्व आरोग्य, पोषण आणि शिक्षण विषयक योजनांचे मध्यवर्ती केंद्र आहे. खालील तक्त्यामध्ये लाभार्थी आणि उपलब्ध सेवा यांची माहिती दिली आहे
अ.क्र. लाभार्थी उपलब्ध सेवा
गरोदर आणि उपचार चालू असलेल्या माता, किशोरवयीन ११ ते १८ वयोगटातील मुली.
  1. आरोग्य तपासणी
  2. गरोदरमहिलांचे धनुर्वातविरोधी लसीकरण
  3. संदर्भ सेवा
  4. पुरक पोषण आहार
  5. पोषण आणि आरोग्य शिक्षण
अन्य महिला वयोगट १५ ते ४५ वर्षे
  1. पोषण आणि आरोग्य शिक्षण
१ वर्ष वयाखालील बालके
  1. पुरक पोषण आहार
  2. लसीकरण
  3. आरोग्य तपासणी
  4. संदर्भ सेवा
१ ते ३ वयोगटातील बालके
  1. पुरक पोषण आहार
  2. लसीकरण
  3. आरोग्य तपासणी
  4. संदर्भ सेवा
३ ते ६ वयोगटातील बालके
  1. पुरक पोषण आहार
  2. लसीकरण
  3. आरोग्य तपासणी
  4. संदर्भ सेवा
  5. अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण

As per the latest information about the Anganwadi Sevika Bharti 2022 is that candidates who are interested in Anganwadi Sevika and Anganwadi Madatnis Post they have some demand. According to their demand, they should be recognized as Anganwadi workers and Anganwadi helpers as government employees.  Read the more details given below and keep visit us for the further updates.

Anganwadi Sevika Bharti 2022 – अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनिसत्यांच्या मागण्या नुसार त्यांना म्हणजेच अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनिस या पदांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता देणार यावी….

Anganwadi Sevika Bharti 2022 latest update is here, As per the news paper, vacancies for rural supervisors will be filled soon. The green light will soon be given by the Rural Development Department to fill these posts. This will provide better manpower in this department in future. Read More details are given below.

Anganwadi Bharti 2022- शहरी प्रकल्पातील पर्यवेक्षकाची रिक्त पदे भरण्यास शासनाने हिरवा कंदील दर्शविला आहे. ग्रामीण भागातील पदे भरण्यासाठी ग्रामविकास विभागाकडून लवकरच मान्यता मिळेल. यामुळे आगामी काळात या विभागात चांगले मनुष्यबळ उपलब्ध होतील. 

महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव श्रीमती कुंदन यांनी कर्मचारी सभेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, मोबाइल खर्चासाठी चार वर्षांकरिता १० हजार रुपये भत्ता देण्याचा शासनाचा विचार आहे

सखी पेन्शन योजना राबविण्याचा शासनाचा विचार

परुळेकर म्हणाल्या की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सखी पेन्शन योजना राबविण्याचा विचार शासन करत आहे. मानधनात थोडीफार वाढ केली जाईल, व त्यातूनच पेन्शनसाठीचा हप्ता वळता केला जाईल अशी शक्यता आहे. पण हप्ता घेण्यास आमचा विरोध आहे. पेन्शनची पूर्ण जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. निवृत्तीवेळच्या मानधनाच्या निम्मी रक्कम दरमहा निवृत्तीवेतन म्हणून सरकारने द्यावी अशी मागणी आहे.


Anganwadi Sevika Bharti 2022 latest update is here : As per the news punished regarding the Nashik Anganwadi Sevika Bharti – There are in Nashik district has 179 vacancies for Anganwadi workers and 738 vacancies for helpers and 22 vacancies for mini Anganwadi workers are vacant. Total 939 vacancies are vacant in Nashik Anganwadi. Therefore, not getting nutritious food in time is likely to increase the rate of malnutrition. The meeting demanded that the government lift the moratorium on the recruitment process.  There are total 4 thousand 776 Anganwadi centers in the Nashik district. Read More details as given below.

या जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनिसांची 939 पदे रिक्त

कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात महत्वाची भूमिका निभावणार्‍या अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या तब्बल ९३९  जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरण्याची परवानगी द्यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत बुधवारी (दि.१६ ) करण्यात आला.

  • महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची मासिक सभा पार पडली. यावेळी सदस्यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या रिक्त जागांचा मुद्दा उपस्थित झाला.
  • जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या १७९ , मदतनीसांच्या ७३८ तर मिनी अंगणवाडी सेविकांच्या २२  जागा रिक्त आहेत. त्यामुळे पोषण आहार वेळेत मिळत नसल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. शासनाने भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवण्याची मागणी या सभेत करण्यात आली.
  • यावेळी समिती सदस्या कविता धाकराव, रेखा पवार, सुनिता सानप, गितांजली पवार-गोळे, कमल आहेर, गणेश अहिरे, मनिषा पवार, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे उपस्थित होते. दरम्यान, राज्यातील महिला व बालकल्याण विभागाने डिसेंबर २०१९  पर्यंत रिक्त असलेल्या जागांची भरती प्रक्रिया राबवण्यास मंजूरी दिली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने जिल्ह्यातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली.
  • त्यासाठी उमेदवारांच्या वयोमर्यादेत दोन वर्षांची वाढ करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन निवड झालेल्या व्यक्तींना नियुक्तीपत्रही देण्यात आले आहे. त्यानंतर म्हणजेच २०२०  व २०२१  या दोन वर्षात रिक्त झालेल्या अंगणवाडी सेविका, मिनी सेविका आणि मदतनिस यांच्या रिक्त झालेल्या जागांची भरती करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात एकूण ४  हजार ७७६ अंगणवाडी केंद्र आहेत.

Anganwadi Sevika Bharti 2022 updates : Integrated Child Development Services Scheme Project Pimpalner, Tal. Recruitment process will be implemented for the vacant Anganwadi Mini Sevika and Madatnis posts. Under Pimpalner project, 15 posts of Anganwadi helpers and one post of Mini Anganwadi worker are vacant.  Applications will be accepted during office hours on office days from 30th December 2021 to 10th January 2022, Child Development Project Officer Shubhangi Bansode said in a press release.

Vacancy Details :

Details of Mini Anganwadi Sevika Vacancies (Name of Gram Panchayat / Padya, Anganwadi Center, Number of Vacancies each one respectively): Bopkhel, Bhoratipada. Details of vacancies for Assistant: Pimpalner- Nana Chowk, Idgaon Pada-1. Tembha Q. Warsaw- Dalubai Gaothan. Shevage-Shevage- 1. Shevadipada- Shevadipada- 1. Kudashi- Mahuband, Bandharpada. Warsaw – Sitadi. Khargaon- Khargaon, Parsari. Basraval- Basraval. Pratappur- Pratappur- 3. Degaon- Degaon. Shenpur- Shenpur 1. Select- Select 1. Total 15.

Integrated Child Development Services Scheme प्रकल्प पिंपळनेर, ता. साक्री यांच्या अंतर्गत रिक्त अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 30 डिसेंबर 2021 ते 10 जानेवारी 2022 या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील, असे बालविकास प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. याबाबतच्या अटी व शर्थींची माहिती संबंधित ग्रामपंचायत, गाव, पाडे तसेच प्रकल्प कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असेही प्रकल्प अधिकारी श्रीमती बनसोडे यांनी म्हटले आहे.

पिंपळनेर प्रकल्पांतर्गत अंगणवाडी मदतनीसांची 15, तर मिनी अंगणवाडी सेविकेचे एक, अशी एकूण 16 पदे रिक्त आहेत. त्यासाठी ही भरती प्रक्रिया होईल. मिनी अंगणवाडी सेविका रिक्त पदांचा तपशील असा (अनुक्रमे ग्रामपंचायत/पाड्याचे नाव, अंगणवाडी केंद्र, रिक्त पदांची संख्या प्रत्येकी एक) : बोपखेल, भोरटीपाडा. मदतनीस रिक्त पदांचा तपशील असा : पिंपळनेर- नाना चौक, इदगाव पाडा-1. टेंभा प्र. वार्सा- दळूबाई गावठाण. शेवगे-शेवगे- 1. शेवडीपाडा- शेवडीपाडा- 1. कुडाशी- महुबंद, बंधारपाडा. वार्सा- सीताडी. खरगाव- खरगाव, पारसरी. बसरावळ- बसरावळ. प्रतापपूर- प्रतापपूर- 3. देगाव- देगाव. शेणपूर- शेणपूर 1. नवडणे- नवडणे 1. एकूण 15.

Anganwadi Sevika Bharti 2022-2023 updates : WCD Maharashtra Anganwadi Vibhag will be invites the application form for various posts, like Anganwadi Worker, Anganwadi Sevika, Anganwadi Supervisor etc., Posts. Eligible and Interested candidates can apply soon from this page. Candidates get the more information about the MH Anganwadi Bharti 2022 below on this page.

  • Name of Organization – Women and Child Development Department, Maharashtra
  • Name of Posts – Anganwadi Supervisor, Anganwadi Helper (Sahayika), Anganwadi Worker (Sevika), Anganwadi Teacher
  • No. of Posts – Various Posts (updated soon)
  • Age Limit – 18 to 38 years.
  • Selection Process: Written Test, Interview & Document Verification.
  • Application Fee: For General & Open Category: Rs. 500/-, For Reserved Category: Rs. 250/-
  • Mode of Registration: Online at www.mahapariksha.gov.in

Anganwadi Sevika Recruitment 2021 – As per the latest updates Anganwadi Sevika and Anganwadi Helpers bharti process will be started soon in State. The state government has now given permission to fill the vacancies of Anganwadi and helpers in the state. This has paved the way for filling these vacancies after a gap of about three years. However, with the exception of some districts, the government has directed the Zilla Parishad to fill only half of the vacancies in Pune and other districts.

राज्यातील अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांची रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने आता परवानगी दिली आहे. यामुळे सुमारे तीन वर्षांच्या खंडानंतर ही रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता पुण्यासह अन्य जिल्ह्यांतील निम्मीच रिक्त पदे भरण्याचा आदेश सरकारने जिल्हा परिषदांना दिला आहे.

Anganwadi Sevika Bharti 2022 Vacancy Details

  1. या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या १८९ रिक्त जागांपैकी केवळ ९५ जागा भरता येणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील मदतनिसांच्या ५० जागा रिक्त असून, त्यापैकी २५ जागा भरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
  2. सद्यःस्थितीत राज्यात ३ हजार ४३६ पदे रिक्त आहेत. मिनी अंगणवाडीसेविकांची १ हजार ११७ तर मदतनिसांची १ हजार ८३१ पदे रिक्त आहेत.
  3. या रिक्त पदांपैकी नंदूरबार, गडचिरोली, उस्मानाबाद, वाशीम, आणि गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, पालघर व अमरावती या जिल्ह्यांमधील काही तालुक्यांतील सर्व रिक्त पदे भरली जाणार आहेत. या जिल्ह्यांव्यतिरिक्त अन्य सर्व जिल्ह्यांमधील ५० टक्के पदे भरली जाणार आहेत.
  4. पुणे जिल्ह्यात एकूण ४ हजार २४६ अंगणवाड्या आणि ४५२ मिनी अंगणवाड्या आहेत. या दोन्ही अंगणवाड्यांसाठी मिळून अंगणवाडीसेविकांची एकूण ४ हजार ६९८ पदे आहेत. जिल्ह्यातील मदतनिसांची एकूण पदे ही सुमारे चार हजारांच्या आसपास आहेत.

महिला व बालकल्याण विभागांतर्गत ३९७ जागांसाठी भरती

Anganwadi Sevika Bharti  process is being carried out for 397 vacancies in 23 Integrated Child Development Services projects in the district under Women and Child Welfare Department. Applications have been invited from aspiring candidates for the vacant posts of 131 Anganwadi Workers, 217 Helpers and Mini Anganwadi Workers. This year, for the first time, the age limit of candidates has been increased by two years.

महिला व बालकल्याण विभागांतर्गत जिल्यातील 23 एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पांमधील रिक्त 397 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यात अंगणवाडी सेविका 131, मदतनिस 217 व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या रिक्त 49 जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यंदा प्रथमच उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवली आहे.

Anganwadi Sevika Bharti 2022 Age limit increase

Age limit of candidates has been increased to 32 after two years. The Women and Child Development Department of Zilla Parishad will soon start the recruitment process for the vacant posts of Anganwadi Workers, Mini Workers and Helpers.

अंगणवाडी सेविका भरती वयोमर्यादेत वाढ

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे लवकरच अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून 32 करण्यात आली आहे. याविषयी महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांनी 6 मे 2021 रोजी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांना यासंदर्भात निवेदन दिले होते.

अंगणवाडी सेविका,मिनी सेविका, मदतनीस पदावर भरतीसाठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे अशी आहे. आदिवासी ग्रामीण भागात अनेक विधवा, परितक्ता महिलांचे वयोमान ३० वर्षापेक्षा जास्त असल्याचे आढळून आलेले आहे. नोकरीच्या संधीपासून वंचित राहतात. नाशिक जिल्ह्यातही अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस रिक्तपदाची भरती प्रक्रिया राबविणेबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. ही भरती प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी सरळसेवा नियुक्तीच्या वयोमर्यादामध्ये वाढ करावी, अशी मागणी सभापती अश्विनी आहेर यांनी केली होती. त्यानुसार 23 जून 21 रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांनी वयोमर्यादेत 2 वर्षे वाढ केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना न्याय मिळेल, असे सभापती आहेर यांनी सांगितले.


Applications are invited for the vacant honorarium posts in the Anganwadi Center under the Integrated Child Development Services Scheme, Project Office, Devgad till March 2, 2021. While applying for these posts, the applicant must be from the concerned Gram Panchayat Revenue Village. However, eligible and interested candidates should submit their applications to the Child Development Project Officer, Integrated Child Development Services Project Office, Devgad. An affidavit of small family must be attached with the application. The age limit for these posts is 21 to 30 years. Also documents related to educational qualification, residency certificate, age certificate, experience should be attached with the application. 

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय, देवगड अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेल्या मानधनी पदांसाठी दिनांक 2 मार्च 2021 रोजी पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदांसाठी अर्ज करणाताना अर्जदार हा संबंधित ग्रामपंचायत महसुली गावातील असणे अवश्यक आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालय, देवगड येथे समक्ष सादर करावेत. अर्जा सोबत लहान कुटुंबाबातचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. सदर पदांसाठीची वयोमर्यादा ही 21 ते 30 वर्ष आहे. तसेच शैक्षणिक पात्रता, रहिवासी दाखला, वयाचा दाखला, अनुभव या विषयीची कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.

रिक्त असणारी पदे पुढील प्रमाणे आहेत. ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्र व रिक्त पद यांची माहिती अनुक्रमे दिली आहे. लिंगडाळ – लिंगडाळ – अंगणवाडी सेविका, शिरगाव – बैद्धवाडी – अंगणवाडी सेविका, गढिताम्हाणे – गढिताम्हाणे – अंगणवाडी सेविका, रहाटेश्वर – रहाटेश्वर – अंगणवाडी सेविका. गिर्ये – बांदेवाडी – अंगणवाडी सेविका, किंजवडे – ठाकूरवाडी – अंगणवाडी सेविका, फणसे- फणसे – अंगणवाडी सेविका, पडवणे – पडवणे – अंगणवाडी सेविका, मिठबाव – भंडारवाडा – अंगणवाडी सेविका, गिर्ये – जांभुळवाडी – अंगणवाडी सेविका, मुटाट – बौद्धवाडी – मिनी अंगणवाडी सेविका. या प्रमाणे पदे भरण्यात येणार आहेत.

शासकीय संस्थेत राहल असलेली विधवा व अनाथ मुली यांना भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, देवगड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अरूण चव्हाण बाल विकास प्रकल्प अधिकारी, देवगड यांनी केले आहे.

सोर्स:सिंधुदुर्ग 24 तास


Anganwadi Sevika Bharti 2021 : The Anganwadi sevika bharti advt published in daily newspaper to be filled the posts in 4 Anganwadi centers in the Konkan District. These include Kolzar Tembwadi at Kolzar, Wazre Haldicha Gunda at Wazre-Girode, Deulwadi at Ambadgaon, Ganeshwadi at Bodde.

Applications are invited from interested and eligible women candidates from the respective revenue villages for this recruitment. The applications will be accepted by the Child Development Project Officer, Integrated Child Development Services Scheme Project Office, Dodamarg during office hours from 14th January 2021 to 28th January 2021 at 5.30 pm.

For more information call the concerned Gram Panchayat Office as well as Child Development Project Office, Dodamarg. Child Development Project Officer, Integrated Child Development Services Scheme, Project Dodamarg should be contacted on 02363-256506.




जिल्ह्यातील 4 अंगणवाडी केंद्रावर मिनी अंगणवाडी केंद्रातील मानधनी मिनी अंगणवाडी सेविकांची पदे भरावयाची आहेत. त्यामध्ये कोलझर येथील कोलझर टेंबवाडी, वझरे-गिरोडे येथील वझरे हळदीचा गुंडा, अंबडगाव येथील देऊळवाडी, बोडदे येथील गणेशवाडी या अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे.

या भरतीसाठी संबंधित महसूल गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज दिनांक 14 जानेवारी 2021 ते 28 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, दोडामार्ग यांच्या कडे स्वीकारण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी संबंधीत ग्रामपंचायत कार्यालय तसेच बाल विकास प्रकल्प कार्यालय, दोडामार्ग येथे दूरध्वनी क्र. 02363-256506 या क्रमांकावर संपर्क साधावा असे बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प दोडामार्ग हे कळवितात.


Anganwadi workers are paid Rs. 1 lakh after completion of service and Madatnis are paid Rs. 75,000. Anganwadi workers cannot earn a living in old age. Giving them half of their monthly honorarium as a pension will cost them only Rs 10 crore every year. Therefore, a proposal has been submitted to the state government by the Maharashtra State Anganwadi Staff Action Committee that they should start a monthly pension along with the termination benefit. Read the other details carefully given below:

अंगणवाडी सेविकांना पेन्शन सुरू करा; कृती समितीतर्फे राज्य सरकारला प्रस्ताव..

अंगणवाडी सेविकांना सेवासमाप्तीनंतर एक लाख रुपये आणि मदतनिसांना 75 हजार रुपये इतकी रक्‍कम दिली जाते. त्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा वृध्दापकाळामध्ये उदरनिर्वाह होऊ शकत नाही. त्यांना दरमहा मानधनाच्या निम्मी रक्‍कम पेन्शन म्हणून दिल्यास दरवर्षी केवळ दहा कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे त्यांना या सेवासमाप्ती लाभासोबतच दरमहा पेन्शन सुरू करावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे राज्य सरकारला देण्यात आला आहे.

राज्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे दोन लाख इतकी आहे. त्यापैकी अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मिळून सुमारे अडीच हजार कर्मचारी वयाच्या 65 वर्षानंतर सेवानिवृत्त होतात. सध्या अंगणवाडी सेविकांना सुमारे दरमहा आठ हजार पाचशे रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा पाच हजार 750 रुपये आणि मदतनिसांना दरमहा साडेचार हजार मानधन दिले जाते. त्यांना त्यांच्या मानधनाच्या 50 टक्के रक्कम सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन म्हणून देण्यात यावी. सरकारने हा निर्णय घेतल्यास अंगणवाडी सेविकांना दरमहा चार हजार 250 रुपये मिनी सेविकांना दोन हजार 875 रुपये आणि मदतनिसांना सव्वा दोन हजार रुपये पेन्शन मिळेल. त्यानुसार राज्य सरकारवर वार्षिक खर्च सुमारे 9.75 कोटी रुपये खर्च येईल, असे संघटनेने प्रस्तावात नमूद केले आहे.

सध्या सेवानिवृत्ती लाभ योजनेकरीता राज्य सरकारकडून प्रतिमाह अंगणवाडी सेविकांसाठी दोनशे रुपये आणि मिनी सेविका व मदतनिसांसाठी शंभर रुपये योगदान दिले जाते. ही योजना एप्रिल 2014 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. ढोबळ अंदाजानुसार सर्व सेविका आणि मदतनिसांचे मिळून वर्षाचे 36 कोटी रूपये जमा होतात. आजअखेर 216 कोटी रुपये जमा झाले असून, त्यापैकी अंगणवाडी सेविका, मदतनिसांना सेवासमाप्तीचा एकरकमी लाभ देण्यासाठी गेल्या सहा वर्षांमध्ये सुमारे 131 कोटी रुपये खर्च झाला आहे. राज्य सरकारकडे 85 कोटी रुपये शिल्लक असून, पेन्शन सुरू केल्यास दरवर्षी त्यामध्ये 36 कोटी रुपयांची भर पडणार आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाच्या निम्मी रक्‍कम दरमहा पेन्शन दिल्यास दरवर्षी सुमारे दहा कोटी रुपये लागतील. महिला बालविकास खात्याकडील उपलब्ध रकमेमधून दरमहा पेन्शन देणे सहज शक्‍य आहे. या संदर्भात राज्य सरकारने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा.- एम.ए. पाटील, अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती

दरमहा पेन्शन सुरू केल्यास मिळणारी रक्‍कम

  1. अंगणवाडी सेविका : चार हजार 250 रुपये
  2. मिनी अंगणवाडी सेविका : दोन हजार 875 रुपये
  3. मदतनीस : दोन हजार 250 रुपये

सौर्स : सकाळ




Anganwadi Sevika Bharti 2021 Updates is here : The current process of filling up the vacant posts of Anganwadis is causing controversy in the Gramsabha and has led to the fact that the process of appointment of Anganwadi Sevika in many places has stalled. Recruitment of 119 Anganwadi workers, 199 helpers and 28 mini Anganwadi workers in Thane district is stalled. Read the complete details given below:

  1. अंगणवाडी भरतीवरून वाद – अंगणवाड्यांच्या रिक्त पदावर नियुक्ती करण्यासाठी सध्या राबवल्या जात असलेल्या प्रक्रियेमुळे ग्रामसभांमध्ये वादाची स्थिती उद्भवत असून त्यामुळे अनेक ठिकाणच्या अंगणवाडी सेविकांच्या नियुक्तीची प्रक्रिया रखडल्याचे वास्तव समोर आले आहे. ठाणे जिल्ह्यातील ११९ अंगणवाडी सेविका, १९९ मदतनीस आणि २८ मिनी अंगणवाडी सेविकांची भरती रखडली आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती रत्नप्रभा तरमळे यांनी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अॅड. यशोमती ठाकूर आणि नगरविकास मंत्र्यांकडे केली आहे.
  2. ठाण्यातील अंगणवाडी भरती – ठाणे जिल्ह्यामध्ये नऊ प्रकल्पांमध्ये सुमारे १ हजार ५९६ अंगणवाड्या आणि २५८ मिनी अंगणवाड्या अशा एकूण एक हजार ८५४ अंगणवाड्या विविध भागांमध्ये आहेत. या अंगणवाड्यांत ३४०० कर्मचारी कार्यरत असून त्यामध्ये ० ते ६ वयोगटामधील १ लाख १४ हजार लहान बालके आणि मुलांची नोंद करण्यात आली आहे. एकूण ५६ हजार मुले या योजनेचा प्रत्यक्ष फायदा घेत आहेत. तर किशोरवयीन ६० हजार मुलींची नोंद अंगणवाड्यांमध्ये आहे. करोना संकटापासून ते लसीकरणापर्यंत गावागावांमध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या रिक्त झालेल्या पदांच्या भरतीमध्ये सध्या ग्रामसभांमधील वादामुळे भरती प्रक्रिया रखडल्याचा दावा ठाण्यातील महिला व बालकल्याण समिती सभापतींनी केला आहे.
  3. ग्रामसभांमध्ये हाणामाऱ्या – शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील अंगणवाड्यांच्या रिक्त पदावर नियुक्ती करताना १००पैकी किमान ६० गुण असलेल्या उमेदवारांच्या निवडसुचीतून ग्रामसभा ज्या उमेदवाराच्या नियुक्तीस मान्यता देईल, असे उमेदवार सेविका व मदतनीस पदांवर नियुक्त करण्यात यावे, असे नमूद आहे. त्यामुळे ग्रामसभेकडे पाठवल्यानंतर ग्रामसभेमध्ये विशिष्ट व्यक्तीचे, कुटुंबाचे राजकीय वर्चस्व असल्याने अनेक पात्र लाभार्थ्यांवर अन्याय केल्याच्या घटना घडत आहेत. काही ग्रामसभांमध्ये सेविका निवडीवरून हाणामारीच्या तक्रारी येत असल्याने पोलिस बंदोबस्तात ग्रामसभा घेतल्या जात आहेत. ग्रामसभांचा निर्णय होत नसल्याने अंगणवाड्या बंद असून त्यामुळे बालकांचे नुकसान होत आहे.
  4. नियुक्ती प्रक्रियेत सुधारणा – अंगणवाडी सेविका नियुक्ती प्रक्रिया महिला व बालक कल्याण समिती स्तरावरून व्हावी, अशी मागणी समिती सभापती रत्नप्रभा तारमळे यांनी केली आहे. तसेच शासन निर्णयामध्येही सुधारणा करून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रियेदरम्यान जास्तीत जास्त गुण असलेल्या उमेदवारांची निवड करण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याच्या सुधारणेचे पत्र त्यांनी महिला व बालकल्याण मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांना दिले आहे.

Anganwadi Thane Bharti 2021 ठाण्यातील भरती प्रतीक्षा

  • तालुका-अंगणवाडी सेविका-अंगणवाडी मदतनीस-मिनी अंणगवाडी सेविका
  • भिवंडी-२६-४०-८
  • शहापूर-२६-४०-१४
  • मुरबाड-३०-५८-५
  • ठाणे-१२-२४-०
  • अंबरनाथ-१४-१०-०
  • कल्याण-११-२७-१
  • एकूण-११९-१९९-२८

सौर्स : मटा


अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सरकारकडून भाऊबीज भेट

Anganwadi Sevika, helpers and mini Anganwadi Sevika working under Integrated Child Development Services Scheme A government decision has been issued to give Rs. 2,000 as a gift to these honorary employees this year. Read the complete details carefully given below:

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यात ९३ हजार ३४८ अंगणवाडी सेविका, ८८ हजार३५३ अंगणवाडी मदतनीस आणि ११ हजार ३४१ मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी ३८ कोटी ६१ लाख रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे.  कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहोचवणे तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट देण्यात येत असल्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

सौर्स : डेली हंट


मराठा उमेदवारांच्या गुणांकनाचा अंगणवाडी भरतीप्रक्रियेत पेच update on 14th Mar 2020

वैद्यकीय सर्वेक्षणासाठी शिक्षकांची नेमणूक करा update on 23rd April 2020

Women and Child Development Ministers have given orders regarding the recruitment of Anganwadi servants, activists and helpers. The state government has given reservation to the Maratha Samaj. In this recruitment process, a resolution was sought at the Zilla Parishad demanding that the government should remove the marks of the candidates from the Maratha community. The proposal will be sent to the government. Read more details given below:

WCD Recruitment 2021

महिला व बालविकास मंत्र्यांनी अंगणवाडी सेविका, कार्यकर्ती व मदतनिसांच्या भरतीसंदर्भात आदेश दिले आहेत. राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. या भरतीप्रक्रियेत मराठा समाजातील उमेदवारांच्या गुणांकनाबाबत शासनादेश काढावे अशी मागणी करणारा ठराव जिल्हा परिषदेत घेण्यात आला. हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.१३) पार पडली. किशोर पवार यांनी मुद्दा उपस्थित केला, की मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे,
तथापि अंगणवाडी सेविका, कार्यकर्ती व मदतनिसांच्या भरतीप्रक्रियेत या समाजातील उमेदवारांना गुणांकनानुसार कसे गुण दिले जाणार आहेत अशी विचारणा केली. केवळ पॉइंट दोन, तीन गुणांमुळे अनेकांना नोकरीपासून वंचित राहावे लागते असे सांगत या भरती प्रक्रियेविषयी खुलासा करण्याची मागणी केली.
यावर महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले, १३ ऑगस्ट २०१४ च्या शासनादेशानुसार ओबीसी, एससी यांच्याबाबत निर्देश आहेत; मात्र दिव्यांग आणि नवीन प्रवर्गाबाबत कोणतेही निर्देश आलेले नाहीत. महिला व बालविकास आयुक्तांमार्फत सचिवांना कळवले आहे, शासनाकडून याबाबत मार्गदर्शन मागवण्यात आले आहे; मात्र अद्याप काही मार्गदर्शन प्राप्त झालेले नाही.
यावर या भरती प्रक्रियेत मराठा समाजातील उमेदवारांच्या गुणांकनाबाबत शासनाने शासनादेश काढावे अशी मागणी करणारा ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
करोडी ग्रामपंचायतीचे विभाजन करण्यासाठीचा प्रशासकीय ठराव मंजूर करून करोडी व साजापूर अशा दोन ग्रामपंचायती करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य मिशनमधून कोणत्या योजनांसाठी किती निधी प्राप्त झाला, योजनांची अंमलबजावणी किती झाली याविषयीची माहिती येत्या १५ दिवसांत सदस्यांना देण्याचे निर्देश अध्यक्ष मीना शेळके यांनी दिले.

उपकरातून समान निधी द्या

पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, पूल, कोल्हापुरी बंधार्‍यालगतचा भराव वाहून गेलेल्या दुरुस्तीच्या कामांना उपकरात प्राधान्य देण्यात यावे. यापूर्वी विषय समितीने उपकरातील मंजूर केलेल्या कामांना त्या नियोजनात दुरुस्ती करण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यात अद्याप दुरुस्ती झालेली नाही.

मार्चअखेर जवळ येत आहे. यासाठी त्या नियोजनात विषय समितीने दुरुस्त्या कराव्या व सर्व सदस्यांच्या सर्कलमध्ये समान निधीचे वाटप करावे अशी बांधकाम समितीला विनंती करण्याचा यावेळी ठराव घेण्यात आला.

सौर्स : सकाळ





Anganwadi Sevika Recruitment 2021 : The state government has postponed the recruitment of posts in Anganwad since 2017. The state government has postponed the effective implementation of the Integrated Child Development Services Scheme. The state government has approved to fill 50% of the vacant posts of Anganwadi Servant, Assistant and Mini Anganwadi Servant Assistant in the State. The Anganwadi center, which has the maximum number of children, the acute problem of malnutrition in the tribal areas, the hill areas, the Anganwadi centers located in the remote areas of the taluka, will be considered on priority basis.

Anganwadi Sevika Recruitment 2021

राज्यातली अंगणवाडी सेविकांच्या भरतीवर गेल्या पाच वर्षापासून बंदी होती. आता हि बंदी उठवून सहा हजार सेविकांच्या भरतीला परवानगी दिली आहे. यंदा अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करता येणे शक्य नाही. मात्र, पुढच्या वर्षी ती केली जाईल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी हेमंत टकले यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिले. विजय गिरकर, हुस्नबानू खलिफे, आदींनी उप्प्रश्न्स विचारले.

२ वर्षांत सर्व जिल्ह्यांत विशेष केंद्र

राज्यातील मरणासन्न रुग्णांवरील उपचारांसाठी दोन वर्षांत सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष केंद्र उभारण्यात येईल, असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जगन्नाथ पाटील यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिले. सध्या राज्यातल्या १६ जिल्ह्यांमध्ये अशी विशेष केंद्र कार्यरत आहेत. यामधून आतपर्यंत १० हजार २३८ रुग्णांवर उपचार केले गेले, असेही टोपे म्हणाले.

सोर्स : लोकमत

अंगणवाडी सेविकांच्या रिक्त पदांवर होणार भरती

पुणे – अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्‍त पदे भरण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील रिक्‍त 585 पदे भरण्यासाठी तालुकास्तरावर भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा पारगे यांनी दिली.

राज्य सरकारने 2017 पासून अंगणवाड्यांमधील पद भरती करण्यास स्थगिती दिली होती. एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्य सरकारकडून स्थगिती उठवली आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या एकूण रिक्‍त पदांपैकी 50 टक्‍के पदे भरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यांतर्गत जास्तीत जास्त मुलांची संख्या असणारी अंगणवाडी केंद्र, आदिवासी क्षेत्रातील कुपोषणाची तीव्र समस्या असलेली क्षेत्र, डोंगराळ भाग, तालुक्‍याच्या ठिकाणापासून दुर्गम भागात असेलेली अंगणवाडी केंद्रांचा प्राधान्याने विचार करून पदभरती करण्यात येणार आहे.

सौर्स : प्रभात

31 thoughts on “Anganwadi Sevika Bharti 2022 Apply here”

  1. I like to to this service plz sir, mam send me Anganwadi Bharti form I have completed my 12th sci with mscit including with English , Marathi typing..plz plz mam send a form I request…

    Reply
  2. Plz give me the one chance. I am teaching experience.computer ms cit basic ,tally complete and teaching computer basic

    Reply
  3. मला अंगणवाडी मध्ये मदतनीस चे काम मिळेल का. मी snehadeep Jankalyan Foundation मध्ये काम करीत आहे …

    Reply
  4. नाशिक जिल्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदे नवीन भरती कधी होईल

    Reply
  5. नाशिक जिल्यात किंवा त्रिंबकेश्वर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदे नवीन भरती कधी होईल रिप्लाय
    [email protected]

    Reply
  6. नांदुरबार जिल्यात आंगणवाडी सेविका भरती कब आयेगी

    Reply

Leave a Comment