Arogya Vibhag Aurangabad Bharti 2021

Arogya Vibhag Aurangabad Bharti 2021

औरंगाबाद आरोग्य विभागातील रखडलेल्या भरतीला लवकरच सुरुवात!!

The recruitment of 18 cadres for 365 posts of Zilla Parishad Health Department was advertised on March 1, 2019 but the recruitment which was stalled due to increasing incidence of Corona epidemic has now started. The government has approved the advertisement of Mega Recruitment-2019 to fill the posts in five categories related to the Health Department. Therefore, the process for filling 329 posts in Aurangabad district will be implemented soon.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाची 365 पदांसाठी 18 संवर्गाच्या भरती ची जाहिरात एक मार्च 2019 रोजी काढण्यात आली होती पण कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भावामुळे रखडलेल्या भरतीला आता सुरुवात झाली आहे. शासनाने मेगा भरती-२०१९ च्या जाहिरातीतील आरोग्य विभागाशी Health Department संबंधित पाच संवर्गातील पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील Aurangabad ३२९ पदे भरण्यासाठी लवकरच प्रक्रिया राबविली जाणार आहे.

जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरणास मान्यता

पाच संवर्गातील पदे 100% भरण्याला मंजुरी मिळाल्याने आता 265 पदांची जाहिरात 29 जून रोजी प्रसिद्ध होणार आहे अशी माहिती जिल्हा व आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी शनिवारी दिली. आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेविका आदी पाच संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील आरोग्य विभागातील १८९ आरोग्य सेविका, १३० आरोग्य सेवक, ८ औषध निर्माता, २ प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशी एकूण ३२९ पदे भरण्यात येतील.

सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षण रद्द ठरविल्याने एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना खुल्या किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेता येईल. त्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी १ ते २१ जुलै २०२१ पर्यंत डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.महाआरडीडीझेडपी.इन या संकेतस्थळावर लॉगिन करून विकल्प द्यायचा आहे. एकदा दिलेल्या विकल्पात बदल करता येणार नाही. तसेच ईडब्ल्यूएसचा विकल्प देणाऱ्यांना परीक्षेपूर्वी सक्षम अधिकाऱ्याचे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र जिल्हा निवड समितीकडे सादर करणे बंधनकारक केलेले आहे.

ग्रामविकास विभागाकडून भरती – Gramvikas Bharti 

सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे म्हणाले आता ही भरती ग्रामविकास विभागामार्फत होणार आहे एसीबीसी ची पदे खुली करण्यात आली असून त्यांना अधिक दुर्बल घटक किंवा खुल्या प्रवर्गाचा (ईडबल्यूएस)उमेदवारांना निवडून लेखी परीक्षा देता येणार आहे.


आरोग्य विभागातील ८५०० जागेच्या मेगा भरतीला उद्या पासून सुरुवात…

17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत. त्यामुळे 2 टप्प्यात ही नोकर भरती होणार आहे. 56 संवर्गात ही नोकर भरती होणार असून या सर्व पदासाठी परीक्षा प्रक्रिया होणार आहे. साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत परिक्षा आणि त्यांनतर 2 ते 3 दिवसात निकाल लागणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. उद्या (18 जानेवारी) नोकर भरतीची जाहिरात निघेल. 15 फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं काम पूर्ण होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. पूर्ण माहिती येथे पहा ..

महापालिकेच्या आरोग्य विभागातील भरतीवर प्रश्नचिन्ह

Arogya Vibhag Aurangabad Recruitment 2021 : NHM Aurangabad was published the recruitment advertisement for various posts. More than 150 applications were received for this post. As per the latest news The Municipal Health Department has started the process of recruiting contractual posts under the National Health Mission of the Central Government. On the second day of recruitment, the process for nurse position was underway on Tuesday. The list of those who passed qualifying in the recruitment test was listed, but there was confusion among the candidates as there was no name on the list. This created a question mark on the recruitment process.

Arogya Vibhag Aurangabad Recruitment 2021

महापालिकेच्या आरोग्य विभागाने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. भरतीच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी नर्स पदासाठी प्रक्रिया सुरू होती. भरतीसाठीच्या परीक्षेत गुणानुक्रमे उत्तीर्ण झालेल्यांची यादी लावण्यात आली होती, पण या यादीत नाव नसल्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

महापालिका आरोग्य विभागानेही विविध पद भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली होती. सोमवारी काही पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. मंगळवारी नर्स पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. खुल्या प्रवर्गातील चार जागांसाठी १५० पेक्षा अधिक अर्ज आले. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील दोन जागांसाठी ११५ अर्ज आले. सकाळी १० ते १२ यावेळेत अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानंतर अर्ज तपासून गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम सुरू झाले. गुणवत्ता यादीत सर्वाधिक गुण असलेल्या प्रथम पाच उमेदवारांची निवड करण्यात आली. उर्वरित उमेदवारांची नावे यादीत आली नाहीत. एका पदासाठी पाच उमेदवार असा निकष ठरविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत ही सर्व प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे उमेदवारांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा रात्री ताबा सुटला. त्यांनी औरंगपुरा येथील पालिकेच्या डेटा सेंटरवर चांगलाच गोंधळ घातला.

सौर्स : मटा
Leave a Comment