Arogya Vibhag Bharti 2021

Arogya Vibhag Bharti 2021

सर्व जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागाशी संबंधित रिक्त पदे भरण्यास मान्यता

ZP Arogya Vibhag Bharti 2021 updates :  Approval has been given to fill the vacancies related to the Health Department in all the Zilla Parishads in the Maharashtra State. A written test will be conducted for these posts. The total recruitment process schedule has also been announced also the selection process will be completed by August 23, 2021. The government order issued by the Rural Development Department in this regard on Monday has given detailed information about the recruitment process.

ZP Arogya Vibhag Bharti 2021 Exam Dates:

ZP Arogya Vibhag Bharti 2021

New GR Released ZP Bharti 2021

 • Mega recruitment was announced in March 2019 to fill the vacancies in the state government service. However, the code of conduct for Lok Sabha and Vidhan Sabha elections came into force soon after, and the Mahapariksha portal was canceled after the transfer of power in the state, so this mega recruitment could not take place till now.
 • The state government, which has been battling Corona Disease for the past few years, had to impose restrictions on recruitment due to financial constraints.  Now, it was allowed to fill health related vacancies.
 • Accordingly, approval has been given to fill the vacancies in the five categories of Health Supervisor, Pharmaceutical, Laboratory Technician, Health Worker and Health Worker in all the Zilla Parishads of the Maharashtra State.
 • A written test will be conducted for these posts. The total recruitment process schedule has also been announced.
 • The selection process will be completed by August 23, 2021.
 • The Supreme Court has repealed the Social and Educational Backward Classes Reservation Act. Therefore, if there are reserved posts for SEBC in the 2019 advertisement, instructions have been given to convert them into non-reserved posts.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागाशी संबंधित रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने सोमवारी या संदर्भात जारी केलेल्या शासन आदेशात भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सेवेतील रिक्त पदे भरण्यासाठी मार्च २०१९ मध्ये मेगा भरतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर लगेचच लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली, तसेच राज्यातील सत्तांतरानंतर महापरीक्षा पोर्टल रद्द करण्यात आले, त्यामुळे अद्यापर्यंत ही मेगाभरती होऊ शकली नाही.

गेल्या वर्षांपासून करोना साथरोगाचा निकराचा सामना कराव्या लागलेल्या राज्य सरकारला आर्थिक अडचणीमुळे नोकरभरतीवर र्निबध घालावे लागले. त्यातून आरोग्याशी संबंधित रिक्त जागा भरण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका या पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. एकूण भरती प्रक्रियेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. २३ ऑगस्टपर्यंत निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग आरक्षण कायदा रद्द केला आहे. त्यामुळे २०१९ च्या जाहिरातीत एसईबीसीसाठी राखीव पदे ठेवली असतील तर ती अराखीव पदांमध्ये रुपांतरीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


A new decision is about to be taken about the mega recruitment of the Arogya Vibhag. While starting the stagnant recruitment process of the arogya vibhag, it has been decided to fill the posts in the SEBC category for the Maratha community either in the open or in the EWS category. As the reservation for Handicap Candidates has been increased from 3% to 4% as per the 2016 Act, the revised advertisement will be issued on 29th or 30th June. People with disabilities can apply online for the newly added posts from 1st July to 21st July 2021. For more information read the following information …

आरोग्य विभागाच्या मेगाभरतीबद्दल नवीन निर्णय घेणार आला आहे… आरोग्य विभागाची रखडलेली भरती प्रक्रिया सुरु करताना मराठा समाजासाठी एसईबीसी प्रवर्गातील पदे हि खुल्या किंवा ईडब्लूएस प्रवर्गातून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यागांसाठीचे आरक्षण २०१६च्या कायदयानुसार ३% वरून ४ % झालेली असल्याने सुधारित जाहिरात हि २९ किंवा ३० जून रोजी काढण्यात येणार आहे. नव्याने समाविष्ट पदांसाठी दिव्यांगांना १ जुलै ते २१ जुलै २०२१ दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येतील .. अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा…

State Health Minister Rajesh Tope had last month announced that 16,000 posts would be filled in the state’s health department immediately. Accordingly, a government order has been issued for the creation of 2,226 posts.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मागच्या महिन्यात राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसारच आता 2 हजार 226 पदांच्या निर्मितीसाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील एकूण 118 आरोग्य संस्थांकरीता 812 नियमित पदे निर्माण करण्यास तसेच 1 हजार 184 कुशल मनुष्यबळ सेवा, 226 अकुशल मनुष्यबळ सेवा अशी एकूण 2 हजार 226 पदे उपलब्ध करुन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या या जाहिरातीत आरोग्य अधिकारी, परिचारिका, आरोग्य सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, स्त्री आणि पुरुष परिचालक, लिपिक, कक्ष सेवक, शिपाई, वाहन चालक, सफाई कामगार आदी पदांसाठी निर्मिती करण्यात आली आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या या आदेशात असं सांगण्यात आलं आहे की, या 2 हजार 226 पदांपैकी काही पदे नियमित, तर काही कंत्राटी पद्धतीने निर्माण करण्यात आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर युनिट यासाठी ही पदे निर्माण केली आहेत. आता केवळ पदनिर्मितीचे आदेश जारी करण्यात आले असून त्याच्या भरतीच्या प्रक्रियेची कोणतीही माहिती देण्यात आली नाही.


आरोग्य विभागात जम्बो भरती, अनुकंपाधारकांना नोकरीची आशा

Arogya Vibhag Bharti 2021 updates : With the health department filling up a jumbo of 16,000 posts, (Annukampa) compassionate job hopes have been revived.  The state government will recruit 16,000 different posts. This includes about 4,000 posts in Class A and B and 12,000 posts in Class III and IV. The health minister has already announced that 50 per cent of the posts related to patient services will be filled and now 100 per cent vacancies will be filled.  The long-awaited waiting list of sympathizers (Annukampa) has increased as many government departments in the state are not recruiting regularly. As a solution to this, by issuing a government decision on September 11, 2019, it has been said that 20% of the total posts in the quota of direct service should be given to these sympathizers (Annukampa). This limit is only 3 years (2019 to 2021) so it is valid till December 21.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस आपले पाळेमुळे घट्ट करत आहे. तिसरी लाट येऊ घातली आहे व त्याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. हा धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागाला रिक्त पदावरील कर्मचाऱ्यांची चणचण भासत आहे, तर दुसरीकडे याच विभागात सेवा देताना मृत कर्मचाऱ्याच्या नातलगांना (अनुकंपाधारक) प्रतीक्षा आहे ती नोकरीची. आरोग्य विभाग 16 हजार पदांची जम्बोभरती करणार असल्याने अनुकंपाधारकांच्या नोकरीची आशा पुन्हा पल्लवित झालेल्या आहेत.

कोरोना आजार ठराविक कालावधीनंतर विविध रूपं साकार करत असून जनसामान्यांमध्ये भीतीचे व नैराश्‍याचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वी शहरात थैमान घालणारा हा आजार आता ग्रामीण भागात साम्राज्य प्रस्थापित करत आहे. गत अनेक वर्षापासून नियमित पदभरती बंद असल्याने रिक्त पदांचा भार वाढलेला आहे. या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासन तब्बल 16 हजार विविध पदांची भरती करणार आहे. यामध्ये अ वर्ग व ब वर्गातील सुमारे चार हजार पदे तर तृतीय व चतुर्थ श्रेणीतील 12 हजार पदांचा समावेश आहे. रुग्ण्सेवेशी निगडित 50 टक्के पदे पदभरती मान्यता यापूर्वीच मान्यता दिली असून आता 100 टक्के रिक्त पदे भरणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. यामध्ये रुग्ण सेवेतील तज्ञ डॉक्‍टरांसमवेत, अधिपरिचारिका, लिपिक, रासायनिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहायक, औषध निर्माण अधिकारी, तंत्रज्ञ, आहारतज्ञ, वार्डन पासून शिपाई पदांचा समावेश आहे.

अनुकंपाधारकांना न्यायाची प्रतीक्षा – राज्यातील अनेक शासकीय विभाग नियमित पदभरती करत नसल्यामुळे अनुकंपाधारकांची दीर्घकाळ प्रलंबित प्रतीक्षा सूचीमध्ये वाढ झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून 11 सप्टेंबर 2019 शासन निर्णय निर्गमित करून ज्या पदांच्या भरतीवर निर्बंध नाही अश्‍या सरळसेवेतील कोट्यातील एकूण जागांच्या 20 टक्‍के जागा या अनुकंपाधारकांना नियुक्ती द्यावी असे म्हटले आहे. ही मर्यादा केवळ 3 वर्ष (2019 ते 2021 ) असल्याने डिसेंबर 21 पर्यंत त्याची मुदत आहे.

राज्यातील आरोग्य विभागात 16 हजार पदांची भरती होणार-अपडेट ०६ मे २०२१

आरोग्य विभागाच्या १०० टक्के पदभरतीला मान्यता ! 100% recruitment of health department approved; Rajesh Tope’s big announcement!  In health department 16,000 posts will be filled in the state immediately. Among the posts to be filled in the health department, 12,000 posts will be in C and D categories. This includes 2,000 medical officer posts. Apart from this, Rajesh Tope has also said that 2,000 technical posts will be filled. Rajesh Tope said that there would be no need for a cabinet for this recruitment in the health department.

अपडेट ०६ मे २०२१- आरोग्य विभागात भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये 12 हजार पदे ही क आणि ड वर्गातील असणार आहेत. तर 2 हजार मेडिकल ऑफिसर पदांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय 2 हजार टेक्निकल पद भरणार असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितले आहे. आरोग्य विभागातील या भरतीसाठी मंत्री मंडळाची आवश्यकता नसेल असे राजेश टोपे म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनाही पद भरण्याचे अधिकार देण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले.

कोरोनाने हाहाकार माजवला असून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. सध्या राज्यात दरदिवशी कोरोनाचे 50 हजारांच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. एका बाजुला वैद्यकीय साधनांचा तुटवडा असताना आरोग्य कर्मचाऱ्यांचीही कमतरता भासत आहे. याच पार्श्वभूमीवर 100% रुग्ण सेवा पद भरण्याची काल मंत्री मंडळाची परवानगी मिळाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी (Rajesh Tope) दिली. यामुळे आता राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती करण्यात येणार आहे. यासाठीचा आदेश लवकरच जारी करण्यात येईल अशी माहिती राजेश रोपेंनी पत्रकार परिषदेत सांगितली.


आरोग्य विभागात तब्बल २०५४४ पदे रिक्त – अपडेट २० एप्रिल २०२१

आरोग्य विभागात दहा हजार पदांची तातडीने भरती होणार – अपडेट १७ एप्रिल २०२१

10127 vacancies will be filled soon in arogya vibhag : As per the latest condition of Corona, there is currently a huge shortage of health workers to overcome corona. The vacancies of health workers have created many problems for the system. Minister of State Abdul Sattar has submitted a proposal to the Finance Department to address these issues. It has demanded immediate filling of 10,127 posts in five cadres of the health department (Arogya Vibhag).

कोरोना चा वाढत संसर्ग लक्षात घेता, कोरोना वर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता सध्या जाणवत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्यामुळे यंत्रणेसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. यात आरोग्य विभागातील पाच संवर्गातील दहा हजार 127 पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे.

या पदांची होणार भरती : त्यात तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती होणार आहे.


MPSC कडूनच आरोग्य विभागात भरती व्हावी – अपडेट्स ५ एप्रिल २०२१

MPSC is the constitutional body conducting the recruitment process for Group 1 and Group 2 posts in the Maharashtra state. However, it is unconstitutional for the recruitment process for Group 1 posts in the Arogya Vibhag which has essential services, to be done by an independent selection board. Group 1 posts should not be filled by an independent selection board. It was decided a few days ago that Group 1 of the Medical Education Department would also be recruited. That is why both these posts should be filled by MPSC, said MLA Davkhare in the letter.

MPSC ही राज्यातील Group 1 व Group 2 या पदांची भरती प्रक्रिया राबविणारी घटनात्मक संस्था आहे. मात्र, अत्यावश्‍यक सेवा असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागातील Group 1 च्या पदाची भरती प्रक्रिया स्वतंत्र निवड मंडळाकडून करणे हे असंवैधानिक आहे. स्वतंत्र निवड मंडळाकडून Group 1 च्या पदांची भरती करण्यात येऊ नये. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या Group 1 या पदाचीही भरती होणार असल्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला. त्यामुळेच या दोन्ही पदांची भरती “एमपीएससी’कडून करावी, असे आमदार डावखरे यांनी पत्रात म्हटले आहे.

आरोग्य विभागातील ‘क’ व ‘ड’ संवर्गातील पदे येत्या दोन महिन्यात भरणार

Arogya Vibhag Bharti 2021 Details – There are 18 thousand 397 vacancies in A, B, C and D sections of Arogya Vibhag . Stating that there will be no compromise on public health, Health Minister Rajesh Tope promised to fill the C and D posts in the state’s public health department in the next two months during Question Hour in the Legislative Council. All the posts in the ‘D’ category of the health department will be filled through direct recruitment and 50 per cent of the posts in the ‘C’ category will be filled. The remaining posts will be filled after the decision on Maratha reservation is taken, informed Health Minister Rajesh Tope.

नुकतीच प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक आरोग्य विभागात १८ हजार ३९७ पदे रिक्त आहेत. हि पदे अ, ब, क आणि ड विभागातील आहेत. जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत तडजोड करून चालणार नाही, असे सांगताना राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पदे येत्या २ महिन्यात भरण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिले. आरोग्य विभागातील ‘ड’ संवर्गातील सर्वच्या सर्व पदे थेट भरतीच्या माध्यमातून भरली जाणार असून ‘क’ संवर्गातील ५० टक्के पदे भरली जाणार आहेत. तर मराठा आरक्षणाचा निर्णय आल्यानंतर उर्वरित पदे भरली जाणार असल्याचीही माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. या संदर्भातील पुढील अपडेट लवकरच प्रकाशित करू.
आरोग्य विभागातील पहिल्या टप्प्यातील भरती मार्चमध्ये

Arogya vibhag bharti 2021The first phase of recruitment in the health department is expected to take place in March. The recruitment examination for the staff of the health department and the rural health department related to the village health will be held on 28th February. Public Health Minister Rajesh Tope said in Aurangabad that there are 17,000 vacancies in the health department in the state and 50 per cent of the posts, i.e. 8,500 posts, will be cleared this month.

आरोग्य विभागातील आणि गावातील आरोग्याशी निगडित ग्रामविकास विभागातील कर्मचाऱ्यांच्या भरतीची परीक्षा २८ फेब्रुवारीला घेतली जाणार आहे. राज्यात आरोग्य विभागाची १७ हजार पदे रिक्त असून त्यातील ५० टक्के पदे म्हणजे साडेआठ हजार पदांच्या बढतीस मुभा देण्यात आल्यानंतर पदभरतीच्या परीक्षा याच महिन्यात पूर्ण होतील आणि मार्च महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवडय़ात पदस्थापनेचे आदेश दिले जातील, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबाद येथे सांगितले.

जिल्हा वार्षिक आढाव्याच्या बैठकीसाठी ते औरंगाबाद येथे आले होते.

आरोग्य विभागातील ही परीक्षा ओएमआर पद्धतीने घेतली जाणार असून त्याच्या प्रश्नपत्रिका काढण्याचे काम माहिती व तंत्रज्ञान विभागाने नेमलेल्या कंपनीकडून केले जात आहे. आरोग्यसेवक आणि सेविका या पदांचाही यात समावेश आहे. साधारणत: पाच हजार पदांची भरती पहिल्या टप्प्यात केली जाणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले. पोलीस, ग्रामविकास मंत्रालय तसेच आरोग्य विभागातील पदांची भरती होणार आहे.

We are giving detailed details of vacancies in Primary Health Centers of various districts of Maharashtra on this page. Candidates should look at the information of their respective districts below. We will keep giving details of new districts and their vacancies on this page every day. So visit our page every day.

DISTRICT VACANT SEATS
KOLHAPUR 609 POSTS
SATARA 700 POSTS
PARBHANI 250 POSTS
OSMANABAD 277 POSTS
PUNE 777 POSTS
JALNA 317 POSTS
SANGLI 502 POSTS
NANDURBAR 404 POSTS
NANDURBAR-PANGALI 394 POSTS
DHULE 299 POSTS
BEED 433 POSTS
WASHIM 203 POSTS

कोल्हापूर : प्राथमिक आरोग्य केंद्रातील ६०९ पदे रिक्त

कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकारी मंजूर असताना प्रत्यक्षात २० ठिकाणी केवळ एकच डॉक्टर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. विविध संवर्गातील ६०९ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने इतरांवर कामाचा भार वाढला आहे. यासाठी शासनाने तातडीने भरती करण्याची गरज व्यक्त होत आहे. जिल्ह्यात ७६ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून त्यासाठी एकूण १२८९ आरोग्य कर्मचारी मंजूर आहेत. परंतु प्रत्यक्षात ७०१ कर्मचारी कार्यरत असून ६०९ जागा रिक्त आहेत. एकूण वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या १७३ जागा मंजूर असून त्यापैकी १२६ जागा भरल्या असून अजूनही ४७ जागा रिक्त आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राचा कार्यभार दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे असतो. परंतु तेवढे अधिकारीच उपलब्ध नसल्याने २० केंद्रांवर एकच वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आला आहे.

केवळ येणाऱ्या रुग्णांची तपासणी करणे आणि त्यांना औषधे देणे एवढेच काम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी करत नाहीत, तर केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या विविध योजना, सर्वेक्षणे यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारीही या अधिकाऱ्यांवर असते. त्यामुळे साहजिकच आहे, त्या वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो.

 1. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे ७६
 2. एकूण मंजूर कर्मचारी १२८९
 3. कार्यरत कर्मचारी ७०१
 4. रिक्त जागा ६०९
 5. तालुकावर रिक्त पदे
 6. आजरा २३
 7. भुदरगड ३६
 8. चंदगड ४६
 9. गडहिंग्लज ४०
 10. गगनबावडा १०
 11. कागल ३६
 12. करवीर ४६
 13. पन्हाळा ५३
 14. राधानगरी ३०
 15. शाहुवाडी ४७
 16. हातकणंगले ७१
 17. शिरोळ ५५
 18. मुख्यालय १६२
 19. एकूण ६५५

  जिल्ह्यामध्ये ४१४ उपकेंद्रे कार्यरत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या ठिकाणी आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचा मोठा दिलासा ग्रामीण भागाला मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे मोठया संख्येने जागा रिक्त आहेत. मात्र महिन्याच्या १ आणि १५ तारखेला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती डॉक्टरांच्या मुलाखती घेत असते. ११ महिन्यांसाठी डॉक्टरांच्या नियुक्त्या केल्या जातात. उर्वरित जागा भरतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. – डॉ. योगेश साळी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर

सातारा – जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रेच आजारी : ७०० पदे रिक्त

केंद्र शासनाने अर्थसंकल्पात आरोग्यावर मोठा भर दिला असला तरी आरोग्य विभागात आजही अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांना सेवा देताना अडचणी येतात. सातारा जिल्ह्यात तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वर्ग ३ व ४ ची ७०० हून अधिक पदे रिक्त आहेत. कोरोनासारखी संकटे लक्षात घेऊन आरोग्य विभाग सज्ज असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी शासनस्तरावरुनच हालचाली होण्याची खरी गरज आहे. डॉक्टर आहेत, कर्मचारी नाहीत… सातारा जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांची तपासणी होत आहे. पण, इतर कर्मचारी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण वाढतोय. त्यासाठी काही कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात दुसरीकडे जावे लागते. त्यामुळे तारेवरची कसरत सुरू असते.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे चालविण्यात येतात. या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा दिली जाते. पण, वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांची पदे सतत रिक्त असतात. सध्यस्थितीत आरोग्य अधिकाऱ्यांची पदे भरली असली तरी इतर काही पदे रिक्त आहेत. वर्ग ३ आणि ४ ची अनेक पदे मंजूर असूनही रिक्त आहेत. यामध्ये औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, सेविका, पर्यवेक्षक यांची १ हजार ५७१ पदे मंजूर आहेत. पण, यामधील सध्या ८१३ कार्यरत असून, ७५८ रिक्त आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून, यावरच प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्राचा डोलारा उभा आहे.

आरोग्य केंद्राची संख्या – आकडेवारी अशी

 • आरोग्य केंद्रे ७२,
 • उपकेंद्रे ४००
 • ऐकूण कर्मचारी संख्या
 • गट अ पदे १६७
 • वर्ग ३ व ४ पदे १५७१
 • एकूण रिक्त कर्मचाऱ्यांची संख्या
 • गट अ रिक्त पदे ५
 • वर्ग ३ व ४ रिक्त पदे ७५८

राज्य शासनाने परवानगी दिल्याने आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली आहेत. त्यामुळे फारशी अडचण येत नाही. मात्र, वर्ग तीन आणि चारची अनेक पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी परवानगी मिळाली इतर कर्मचाऱ्यांवर ताण येणार नाही. – डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकार.

परभणी – जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी : अडीचशे पदे रिक्त

ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यासाठी उभारलेल्या ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांची तब्बल अडीचशे पदे रिक्त असल्याने आरोग्य केंद्रांनाच रिक्त पदांचा आजार जडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांचीच पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा द्यायची कशी? असा खरा प्रश्न निर्माण होतो. वैद्यकीय अधिकारी गट अ ची ७८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १३ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी गट ब ची ८ पदे मंजूर असून, त्यातील एक पद रिक्त आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. रुग्णांना जिल्ह्याचे ठिकाण गाठावे लागते.वैद्यकीय अधिकाऱ्यांचीच पदे रिक्त, जिल्ह्यातील आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांचीच पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा द्यायची कशी? असा खरा प्रश्न निर्माण होतो. वैद्यकीय अधिकारी गट अ ची ७८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १३ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी गट ब ची ८ पदे मंजूर असून, त्यातील एक पद रिक्त आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. रुग्णांना जिल्ह्याचे ठिकाण गाठावे लागते.

मागील वर्षी कोरोनाच्या संसर्ग काळात आरोग्य विभागातील क्षमता उघड्या पडल्या. मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवा पुरविताना अधिकारी-कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. जिल्ह्यात ३१ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, २५१ उपकेंद्र कार्यत आहेत. या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची १४ पदे रिक्त आहेत. तर औषध निर्माण अधिकारी, आरोगञय सेवक, आरोग्य सहायक, पर्यवेक्षक, कुष्ठरोग तंत्रज्ञ, अवैद्यकीय पर्यवेक्षक अशी २२८ पदे रिक्त आहेत. शासन दरबारी आरोग्य विभागाकडे फारसे गांभिर्याने पाहिले जात नाही. आरोग्य सभापती अंजलीताई आणेराव यांनी सहा महिन्यांपूर्वी या संदर्भात पाठपुरावा केला मात्र कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत.

आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांसंदर्भात आरोग्य उपसंचालकांकडे पत्रव्यवहार झाला आहे. त्याचप्रमाणे इतर रिक्त पदे भरण्यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरूच असतो. रिक्त पदांच्या ५० टक्के पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही पदे लवकरच भरली जातील. डॉ.एस.पी. देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी.

 1. आरोग्य केंद्र : ३१, उपकेंद्र : २५१
 2. कर्मचारी संख्या आरोग्य केंद्र : १५५, उपकेंद्र : ५८८
 3. एकूण कर्मचारी रिक्त संख्या आरोग्य केंद्र :१०६, उपकेंद्र : २१७

उस्मानाबाद – आरोग्य केंद्रेच आजारी, २७७ रिक्त पदे रिक्त

यंदाच्या बजेटमध्ये सरकारने आरोग्यावर फोकस केल्याने जिल्ह्यातील ४४ प्राथमिक आरोग्य केंद्र व २११ उपकेंद्रातील आजारी असलेली स्थिती सुधारण्याची आशा पल्लवित झाली आहे. आरोग्य संस्थांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये अनेक सुविधांचा अभाव दिसून येतो. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात येणा्या रुग्णांवर सेवा देण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती असली तरी रुग्ण सेवा देताना डॉक्टरांची दमछाक उडत आहे. अनेक ठिकाणी डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने दोन केंद्राचा भार सांभाळावा लागतो. प्रत्येक आरोग्य केंद्रास प्रत्येकी ५ शिपायाची पदे मंजूर आहेत. मात्र, मागील सहा वर्षापासून शिपाई पदाची भरतीच झाली नसल्याने बहुतांश आरोग्य केंद्रावर १ ते २ शिपाईची कार्यरत आहेत. रिक्त पदांची संख्या दीडशेच्या जवळपास असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

उस्मानाबाद जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या ४४ प्राथमिक आरोग्य केंद्र व २११ उपकेंद्रासाठी ६०४ वर्ग ३ चे पदे मंजूर आहेत. यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आरोग्य केंद्रातील यातील केव ३२७ पदे भरलेली आहेत. तर अद्यापही २७७ पदे रिक्तच आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची १०३ पदे मंजूर असून, स्थायी ५९ पदे भरली आहेत. बंधपत्रीत ३ व तदर्थ २८ पदे भरण्यात आली आहे. तर १३ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. शिराढोण, बेंबळी सारख्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील पदे भरण्याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून शासनाकडे वारंवार केला जात आहे. त्यामुळे

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. रिक्त पदांबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरु आहे. डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी

 1. प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या ४४ – २११
 2. कर्मचाऱ्यांची पदे मंजूर ६०४ – रिक्त २७७

पुणे – जिल्ह्यातील प्राथमिक केंद्रच आजारी; ७७७ पदे रिक्त

ग्रामीण आरोग्यावर भर देत यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील अनेक पदे रिक्त असल्याने मोजक्याच लोकांवर आरोग्य यंत्रणेचा भार आहे. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात ७७७ तर उपकेंद्रात १०७ पदे रिक्त आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याने ती सलाईनवर असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे राज्य शासनामार्फत महापोर्टलवरून भरली जातात. ही रिक्त पदे भरण्यात यावी यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. लवकरच ही पदे भरली जातील. – भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

जिल्ह्यात ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर ५३९ उपकेंद्रे आहेत. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात आरोग्यसेवा पुरवली जाते. ग्रामीण भागातील अनेक रुग्ण या आरोग्य केंद्रातील उपचारांवरच अवलंबून आहेत. यंदा कोरोनाकाळात आरोग्य विभागाने चांगली कामगिरी केली. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्यास मदत झाली. असे असले तरी गेल्या अनेक दिवसांपासून या केंद्रातील रिक्त पदे भरली न गेल्याने त्याचा ताण मोजक्याच आरोग्य कर्मचाऱ्यांवर आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात १८४५ मंजूर आहेत. यात वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, परिचारिका आदी पदे आहेत. मात्र, यातील केवळ ८५३ पदेच भरली गेली आहेत, तर उपकेंद्रात ११३८ पदे मंजूर आहेत. यातील १०७ पदे ही रिक्त आहेत. राज्य शासनाच्या महापोर्टलवरून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र, अद्याप याला सुरुवात झालेली नाही. यामुळे ही पदे कधी भरली जाणार या प्रतीक्षेत आरोग्य यंत्रणा आहे.
चार आरोग्य केंद्रांत डॉक्टरच नाहीत – जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकारी नाही. यामुळे येथील नागरिकांना खाजगी आरोग्यसेवेवर अवलंबून राहावे लागते. परिणामी त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. एखादा गंभीर रुग्ण केंद्रावर आल्यास त्याला तातडीची आरोग्यसेवा मिळत नाही. पर्यायाने त्यांना दुसऱ्या केंद्रात तर काही घटनांमध्ये थेट पुण्यातील दवाखाने गाठावे लागते.

 • जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ९६
 • एकूण कर्मचारी – ८५२
 • रिक्त पदे – ७७७
 • उपकेंद्र – ५३९
 • एकूण कर्मचारी – ११३८
 • रिक्त – १०७

जालना – जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रेच आजारी; ३१७ पदे रिक्त

ग्रामीण भागाच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील तब्बल ३१७ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आजारी पडली असून, कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढला आहे. कोरोना काळात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे महत्त्व आणि त्यांनी केलेल्या कामाची सर्वस्तरातून दखल घेतली गेली. या कोरोना योद्ध्यांचा ठिकठिकाणी गौरवही केला जात आहे. परंतु, ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याची सेवा देणाऱ्या आरोग्य केंद्रातील रिक्तपदांचा प्रश्न वर्षानुवर्षापासून कायम आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे काही महिन्यांपूर्वी भरण्यात आली आहेत. परंतु, वर्ग तीन- चारची ३१७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामकाजावर परिणाम होत आहे.

कर्मचाऱ्यांचा मोठा अभाव – जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमधील आरोग्य सेवक पुरूष, आरोग्य सेविका महिला, औषध निर्माण अधिकारी यांच्यासह वर्ग तीन व वर्ग चारची इतर पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे रूग्ण सेवेसह शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमधील रिक्तपदांचा अहवाल वेळोवेळी वरिष्ठांमार्फत शासनाकडे सुपूर्द केला जातो. वरिष्ठांच्या सूचनेनुसारच रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया केली जाते. सध्या जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या मार्फत रूग्णांना सेवा दिली जात असून, आरोग्याबाबत असलेल्या शासकीय योजनांचीही प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. – विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

 1. आरोग्य केंद्रांची संख्या ४३ – २१८
 2. एकूण कर्मचारी संख्या ३४४ – ४३६
 3. एकूण रिक्त कर्मचारी संख्या ९३ – २२४

सांगली : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ५०२ पदे रिक्त

कोरोनामध्ये ग्रामीण जनतेला सर्वाधिक उत्तम दर्जाची आरोग्य सेवा प्राथमिक, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवक, सेविका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच दिली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक खासगी मोठ्या रुग्णालयांनी आरोग्य सेवा थांबविली होती. अनेक रुग्णांना वेळेत उपचार झाले नसल्यामुळे त्यांचा बळी गेला आहे. कोरोनामध्ये शासकीय आरोग्य यंत्रणा कशी सक्षम असली पाहिजे, हे सिद्ध झाले आहे. तरीही केंद्र आणि राज्य सरकार शासकीय आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरत नाही. मूलभूत सुविधांचा तेथे अभाव असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा देऊ शकत नाहीत. आटपाडी, जत तालुक्यात आरोग्य केंद्रामध्ये शिपायांचीही पदे रिक्त आहेत. यामुळे तेथील स्वच्छतेसह रुग्णांना सेवा देताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कंत्राटीपदावर आरोग्य सेवा सक्षम होणे खूप कठीण आहे, असे आरोग्य कर्मचारी संघटना आणि डॉक्टरांचे मत आहे. आरोग्य यंत%0रणा सक्षम करायची असेल तर रिक्त पदे शंभर टक्के भरण्याची गरज आहे.

आरोग्य विभागाकडील रिक्त पदे – विभाग मंजूर – रिक्त पदे

 1. औषधनिर्माता ६४ – १६
 2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ २ – १
 3. कृष्ठरोग तंत्रज्ञ ४ – ४
 4. आरोग्य पर्यवेक्षक ८ – ३
 5. आरोग्य सेवक १२० – २०
 6. औषध फवारणीस १९० – १६२
 7. आरोग्य सेविका ५७९ – २९३
 8. वैद्यकीय अधिकारी १२८ – ३
 9. एकूण ११२७ – ५०२
 • जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे : ६२
 • उपकेंद्रे : ३२०
नंदुरबार – वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरल्याने आरोग्य केंद्रांतील रुग्णसेवेला आली गती

 • नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागात एकूण १ हजार ५६१ पदांची भरती करण्यात आली आहे. यांतर्गत एकूण १ हजार १५७ पदांवर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी काम करत आहेत. एकूण ४०४ पदे सध्या रिक्त असली तरी याचा आरोग्य सेवेवर कोणताही ताण पडत नसल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे जिल्हा आरोग्य विभागात मात्र सहायक १५, आरोग्य सहायिका १७, औषध निर्माता अधिकारी ११, आरोग्य सेवक ८२ तर आरोग्य सेविकांची २५६ पदे रिक्त आहेत. गतिमान होणार आहे.
 • जिल्हा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी वर्ग एक आणि वर्ग दोन, मानसेवी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका, औषध निर्माता, आरोग्य सेवक आणि सेविका आदी पदे मंजूर आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची १६४ पदे मंजूर असून ही सर्व भरण्यात आली आहेत. जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून पात्र असलेल्या डाॅक्टरांना वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची २४९ पदे मंजूर करण्यात आली. यातील १८५ पदे भरली गेली आहेत. उर्वरित पदेही येत्या काळात भरली जातील, अशी माहिती देण्यात आली.
 • जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून ही वैद्यकीय अधिकारी व मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांची पदे भरली जात आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी व उपकेंद्रांवर मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांच्याकडून सध्या सेवा देणे सुरू असून यातून जिल्ह्यातील आरोग्यसेवेची पाळमुळे मजबूत होत आहेत. दुर्गम भागापर्यंत आरोग्यसेवा पोहोचत आहे.

नंदुरबार- रिक्त पदांमुळे जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची सेवा पांगळी ३९४ पदे रिक्त

 • जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा रिक्त पदांमुळे पांगळी झाली आहे. अनेक आरोग्य केंद्रांना वैद्यकीय अधिकारी नाहीत. कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे दुर्गम भागात आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. आता होऊ घातलेल्या आरोग्य कर्मचारींच्या भरतीत ही समस्या सुटेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
 • जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांबाबत नेहमीच ओरड असते. वैद्यकीय अधिकारी मिळत नाहीत, मिळाले तर ते तेथे राहत नाहीत ही तक्रार कायमची झाली आहे. आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना इमारतींचाही प्रश्न आहे तो आता काही प्रमाणात सुटण्याचा मार्गावर आहे. परंतु कर्मचारी राहत नाही व आरोग्य सेवा मिळत नाही ही समस्या व प्रश्न सुटत नसल्याची स्थिती आहे. दोन तरंगते दवाखाने नर्मदा काठावरील गावांसाठी सुरू आहेत. आता बाईक ॲब्यूलन्स सुरू होणार आहेत. नव्याने १४ रुग्णवाहिका जिल्ह्याला मिळालेल्या आहेत. या उपाययोजना लक्ष वेधून घेत असल्या तरी रिक्त पदांची समस्या सुटणे आवश्यक आहे. तरच आरोग्याची स्थिती सुधारेल.
 • आकडेवारी – आरोग्य केंद्र – ५८, आरोग्य उपकेंद्र- २९०, एकुण कर्मचारी- ९४८, रिक्त संख्या – ३९४
 • वर्ग एक ते चार ची रिक्त संख्या – जिल्ह्यात आरोग्य विभागात वर्ग एक ते चार श्रेणीच्या अधिकारी, कर्मचारी यांची रिक्तपदे संख्या मोठी आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, युनानी मिश्रक, आरोग्य सेवक व इतर अशी ३९४ पदे रिक्त आहेत.
 • नव्या भरतीत मिळतील कर्मचारी – आरोग्य विभागाअंतर्गत नव्याने कर्मचारी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या भरतीतून जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या रिक्त पदांची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने तसा प्रस्ताव देखील दिला आहे.
धुळे  – जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आजारी : २९९ पदे रिक्त

कोरोना काळातही अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसमवेतच आरोग्य यंत्रणा काम करत होती. आरोग्य केंद्र, उपकेंद्रासोबतच ग्रामीण रुग्णालयातील पदे रिक्त आहेत. कोरोना काळात आरोग्य यंत्रणेने चांगले कार्य केले. बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करणे तसेच सर्वेक्षण मोहीम राबवण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी केले. रिक्त जागांमुळे सर्वेक्षण मोहीम व कोरोनासंबंधी इतर कामे करताना अतिरिक्त ताण सोसावा लागला होता. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील गट क चे एकूण ७८९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४९० पदे भरली गेली आहेत. तर २९९ पदे अद्याप रिक्त आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये रिक्त पदे भरण्याबाबत राज्य शासनाने सूचना केली होती. रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक असलेली बिंदुनामावली मात्र अजूनही प्राप्त झालेली नाही. बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

 • डॉक्टरच नाहीत – जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्य यंत्रणेत डॉक्टरांची पदेही रिक्त आहेत. ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील डॉक्टरांची ८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. शासनाच्या विविध मोहीम, सर्वेक्षण नेहमी सुरू असतात. रिक्त पदे भरले तर आरोग्य क्षेत्रातील विविध मोहिमा प्रभावीपणे पार पडतील.
 • बिंदुनामावलीनंतर होईल भरती – ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील क गटातील २९९ पदे रिक्त आहेत. त्यात सरळसेवा व पदोन्नतीच्या पदांचा समावेश आहे. बिंदुनामावलीची यादी अद्याप शासनाकडून प्राप्त झालेली नाही. बिंदुनामावलीची यादी प्राप्त झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरुवात होईल. येत्या आठवड्यात बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.
 • आकडेवारी अशी –  प्राथमिक आरोग्य केंद्र – ४१, आरोग्य उपकेंद्र – २३२
 • एकूण कर्मचारी – आरोग्य केंद्रे – ३००, आरोग्य उपकेंद्रे – ४८९
 • रिक्त कर्मचारी – आरोग्य केंद्रे – १८६, उपकेंद्र – ११३

बीड : ग्रामीण आरोग्य विभाग ‘आजारी’; ४३३ पदे रिक्त

 • जिल्ह्यात विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासह प्रथमोपचार करण्यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणा महत्वाची असते. परंतु रिक्त पदांमुळे हीच ग्रामीण आरोग्य यंत्रणा आजारी पडल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात अधिकाऱ्यांची २९ तर कर्मचाऱ्यांची ४०४ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. यामुळे आहे त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे.
 • जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र तर २९७ आरोग्य उपकेंद्र आहेत. आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी असणे बंधनकारक आहे. परंतु अनेक ठिकाणी केवळ एकच अधिकारी आहे. तर काही ठिकाणी एकही अधिकारी नसल्याने शेजारच्या डॉक्टरवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. असाच प्रकार उपकेंद्रांतील आहे. सध्या समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त केले असले तरी एएनएमच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे सामान्यांना उपचार व सुविधा देण्यात यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसत आहे.
 • दरम्यान, जिल्हा स्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील केवळ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांचेच एकमेव पद भरलेले आहे. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, माता व बाल संगोपन अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, सहायक संचालक कुष्ठरोग अशी महत्वाची पदे रिक्त आहेत. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यांना मूळ पदभार सांभाळून हा अतिरिक्त पदभार सांभाळताना कामाचा ताण येत असल्याचे सांगण्यात आले. असाच प्रकार ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
 • मुख्यमंत्र्यांना आढावा, तर आरोग्य मंत्र्यांचे आश्वासन – कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्ह्यातील रिक्त पदांचा आढावा देण्यात आला होता. त्यांनी रिक्त पदे भरण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानंतर आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिलेले आहे. याबाबत जाहिरातही काढली. परंतु याची कारवाई अतिशय संथ गतीने सुरू आहे.
 • ग्रामीण आरोग्य विभागात रिक्त पदांचा आकडा मोठा आहे, हे खरे आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर काम करताना अडचणी येत आहेत. तसेच आहे त्यांच्यावरही कामाचा ताण वाढत आहे. असे असले तरी कोरोना काळात आहे त्याच मनुष्यबळावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी राबविल्या होत्या. रिक्त पदांबाबत वरिष्ठांना कळविलेले आहे. डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

वाशिम – जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रेच आजारी; २०३ पदे रिक्त

 • जिल्ह्यातील ग्रामीण भागात २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १५३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे कार्यान्वित आहेत. लोकसंख्येच्या तुलनेने ही आरोग्य सुविधा आधीच कमी असण्यासह या शासकीय रुग्णालयांमध्ये वर्ग- १ चे २, वर्ग-२ चे, ८० एएनएम, ७० एम.पी.डब्ल्यू., २२ आरोग्य पर्यवेक्षक, ११ आरोग्य सहायक, १० वाहन चालक, २ एडीएचओ आणि स्टॅटीस्टिकल ऑफिसर, डीआरसीएचओ, डीटीओचे प्रत्येकी १ पद रिक्त आहे. वैद्यकीय अधिकारीही कायमस्वरूपी नसून, कंत्राटी तत्त्वावर ३० पदे भरण्यात आली आहेत. यामुळे रुग्णसेवा वारंवार प्रभावित होत असून, गंभीर आजारातील तसेच गर्भवती महिलांना उपचार न करता शहरी भागातील रुग्णालयांकडे ‘रेफर’ करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
 • आकडेवारी अशी- राथमिक आरोग्य केंद्र – २५, उपकेंद्र – १५३, एकूण कर्मचारी संख्या- २५०/६१२, एकूण रिक्त कर्मचारी संख्या- ५६/१४७
 • कायमस्वरूपी डॉक्टरच नाहीत – जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये विविध स्वरूपातील महत्त्वाची पदे रिक्त असण्यासोबतच कायमस्वरूपी डॉक्टरही कार्यान्वित नाहीत. आरोग्य विभागाकडून कंत्राटी तत्त्वावर काही महिन्यांपूर्वी १० वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली आहेत; मात्र यामुळे प्रश्न सुटलेला नाही.
 • प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमधील रिक्त पदे भरण्यासंबंधी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. हा प्रश्न लवकरच निकाली निघणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याचे सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. – डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

मेगा भरती; आता विविध पदांसाठी एकाच दिवशी होणार परीक्षा

There will be mega recruitment of various posts in the Arogya Vibhag in the Maharashtra State. For this, examinations for various posts will be held on the same day on 28th February 2021. Hall tickets will be available eight days before the exam. The details of place and time will be on the hall ticket only. Read the complete details given below:

राज्यातील आरोग्य सेवा विभागात विविध पदांची मेगा भरती होणार आहे. त्यासाठी २८ फेब्रुवारीला विविध पदांच्या परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत. त्यामुळे ज्यांनी एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज केले आहेत, अशा उमेदवारांना उर्वरित पदांची परीक्षा द्यावी कधी, असा पेच निर्माण झाला आहे. राज्यभरात अशा हजारो उमेदवारांची कोंडी झाली आहे. आरोग्य सेवा विभागाने यावर तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागात ४० पदांवर भरती होणार आहे. यात आरोग्य कर्मचारी, वस्त्र पाल, नळकारागीर, दूरध्वनी चालक, सहाय्यक परिचारिका, प्रयोगशाळा सहाय्यक, वीजतंत्री, अनुजीव सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, नेत्रचिकित्सा अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञ, मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका, समुपदेश, रासायनिक सहायक, रक्तपेढी तंत्रज्ञ आदी चाळीस पदांवर भरती होणार आहे. त्यासाठी सेवा विभागाने २०१९ मध्ये अर्ज मागवले होते.
राज्यभरातून जवळपास दोन लाखाहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात बहुतेक उमेदवारांनी शैक्षणिक अहर्ता व अनुभवानुसार दोनपेक्षा अधिक पदांवर अर्ज भरले आहेत. एका पदाच्या अर्जासाठी कमीत कमी पाचशे रुपये शुल्क याप्रमाणे जितक्‍या पदांसाठी अर्ज केला तितक्‍या पदांची शुल्क उमेदवारांनी भरले आहे. त्यानुसार वरील पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार असून त्याचे आदेश आरोग्य सेवा विभागाने नुकतेच पाठवले आहेत. त्यात २८ फेब्रुवारीला सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे. या सर्व पदांसाठीच्या परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत.

उमेदवारांतून नाराजी – हॉल तिकीट परीक्षेच्या अगोदर आठ दिवस मिळेल, असे सांगण्यात आले आहे. हॉल तिकीटवरच ठिकाण व वेळ याचे तपशील असणार आहेत. त्यामुळे परीक्षा कोठे होणार, याची माहिती नाही. एकाच पदाची परीक्षा दिल्यास उर्वरित पदांच्या परीक्षेसाठी भरलेले शुल्क परत मिळणार की नाही, याविषयीही माहिती नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.


आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी आरोग्य सेविका पदे भरणार!

Due to the backlog of vacancies in Mahur and Kinwat Primary Health Centers and Health Sub-Centers, it has become difficult to provide health facilities to the general patients in remote tribal areas. In it, MLA Keram had asked Chief Minister Uddhav Thackeray to give priority to health workers serving in the Corona period. Read the complete details carefully…

नांदेड जिल्ह्यातील आदिवासीबहुल, अतिदुर्गम, डोंगराळ किनवट, माहूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष बाब म्हणून जीएनएम, एएनएम आरोग्य सेविकांची भरती करण्याची व त्यात कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेविकांना प्राधान्यक्रम देण्याची मागणी आमदार केराम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना अवगत केले आहे. लवकरच या भरती प्रक्रियेची अधिसूचना निघणार असल्याची माहिती आमदार भीमराव केराम यांनी दिले आहे.
माहूर आणि किनवट प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका कर्मचारी यांच्या रिक्त पदांचा अनुशेष कायम असल्या कारणाने आदिवासी दुर्गम डोंगराळ भागात सर्वसाान्य रुग्णांना आरोग्य सुविधा मिळणे दुरापास्त झाले असून यावर आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी विशेष बाब म्हणून जीएनएम,एएनएम या आरोग्य सेवकांची कंत्राटी पद्धतीने पद भरती प्रक्रिया राबऊन त्यात कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेविकांना प्राधान्यक्रम देण्याची मागणी आमदार केराम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना आमदार केराम यांच्या मागणी वजा पत्राचा संदर्भ घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे सुचित केले आहे.
तशा स्वरुपाचे पत्र आमदार भीमराव केराम यांना प्राप्त झाले आहे. आमदार केराम यांच्या पत्राची दखल घेऊन आरोग्य विभाग कंत्राटी पद भरती करणार असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून लवकरच ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे संकेत आमदार भीमराव केराम यांनी दिली आहे. यावरुन जीएनएम, एएनएमचे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणींना आमदार भीमराव केराम यांनी रोजगाराची संधी निर्माण करुन दिली असून कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेविकांना देखील प्राधान्यक्रम देण्याची मागणी असल्याने त्यांनी कोरोना काळात बजावलेल्या सेवेचा लाभ त्यांना मिळणार आहे.

As per the decision taken by the Cabinet, the General Administration Department has approved the recruitment of 50 per cent of the vacancies to the Health Department. As the examination is urgently required, the eligible candidates will be eligible to appear for the post as per the application form which was called through the advertisement process on the portal in February, 2019. The examination will be held on the same day on 28th February 2021 in the entire state.

दरम्यान कोविड-19 साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेवरील वाढता ताण आणि रिक्त पदे लक्षात घेता, मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने आरोग्य विभागास रिक्त पदांपैकी 50 टक्के भरतीस मान्यता दिली आहे. सदर परीक्षा तातडीने घेणे आवश्यक असल्याने फेब्रुवारी, 2019 मध्ये महापोर्टलवर जाहिरात प्रक्रियेद्वारे जे अर्ज मागविण्यात आले होते त्या अर्ज्नुसार पात्र असलेले उमेदवार या पदभरतीची परीक्षा देण्यास पात्र ठरतील. सदर परीक्षा संपूर्ण राज्यात दिनांक 28 फेब्रुवारी 2021 ला एकाच दिवशी घेण्यात येईल.


आरोग्य भरतीमध्ये कोरोनाकालीन सेवेला हवे प्राधान्य

मोठा गाजावाजा करीत राज्याचे आरोग्यमंत्री आरोग्य नोकरभरती करण्याचे सांगत आहेत; पण होणारी पदभरती आणि ज्या खासगी कंपनीमार्फत ही भारत होत आहे, हे पाहता ही शुद्ध धूळफेक असल्याचे आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून बोलले जात आहे. शासनाने खरेतर ही भरती यापूर्वीच करायला हवी होती. गेली १६ वर्षे आरोग्य भरती नाही. परिणामी कोरोना काळात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले. समविचारीने सतत शासनाला जाग आणली, तरीही संभाव्य होणाऱ्या भरतीत कोरोना काळात काम केलेल्यांचा आग्रक्रमाने विचार झाला नाही. शिवाय ही भरती प्रक्रिया एका खासगी कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ती पारदर्शक होईल का? याविषयीही शंका या कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.


आरोग्यमंत्र्यांनी या भरतीत कोरोना काळात काम केलेल्या कंत्राटी तसेच तात्पुरते नेमलेल्यांना नियमित नोकरीवर घेण्याचे शक्य नसल्याचे सांगताना सुर्पीम कोर्टाच्या निर्णयांचा हवाला दिला आहे. हे चूक असून मागील महिन्यात सुप्रीम कोर्टाने कोरोना काळात रात्रंदिवस काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे म्हटले आहे. मुळात ही भरती शासकीय आहे की खासगी याचा उलगडा शासनाने करावा अन्यथा आम्हाला संविधानाला अनुसरून या भरतीविरोधात दाद मागावी लागेल, असेही या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 • ही भरती नावापुरती आहे – राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये राज्यात अनेक उमेदवार सेवेची शाश्वती नसताना खंडत आहेत. २००५ पासून कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्यांच्या आयुष्याचे काय. वयोमर्यादा उल्लंघन झालेले उमेदवार आशेने सेवा बजावत आहेत. त्यांच्या विषयी शासन धोरण काय, ही भरती नावापुरती आहे. मुळात भरतीच करायची असेल तर कुणाचे टेकू न घेता शासनाकडून व्हावी. पूर्वापार कंत्राटी कर्मचाऱ्यांसह कोरोना काळात काम केलेल्यांना प्राधान्य द्यावे. या भरतीत उमेदवारांकडून कसलेही शुल्क आकारण्यात येऊ नये आणि भरती थेट व्हावी. उमेदवारांची परीक्षा हे थोतांड आहे. संभाव्य भरतीत त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांची भरती व्हावी, अशीही मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
 • शंभर टक्के भरती शासनामार्फत व्हावी  – परीक्षा पद्धतीचा अवलंब कोरोना काळात सरसकट कर्मचारी नेमताना का झाला नाही. केवळ आठ हजार कर्मचारी नेमून नाही, तर सत्य आकडेवारी पाहून शंभर टक्के भरती थेट शासनामार्फत व्हावी, अशी अपेक्षा आहे. सर्व आरोग्य विभागात भरती निर्दोष आणि थेट शासनाकडून व्हावी. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, ही वेळ शासनाने आणू देऊ नये असे काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले आहे.

आरोग्य विभागातील ८५०० जागेच्या मेगा भरती  सुरु -जाहिरात उपलब्ध

Arogya Vibhag Bharti 2021 for 8500 posts: The Recruitment Advertisement is not available. Candidates check the below given pdf files for all district no. of vacancy details. Complete Advertisement and Vacancy Details are available below:

Arogya Vibhag Bharti 2021 Exam fees :

Arogya Vibhag Bharti 2021 Exam fees


Updated 17.01.2021: As the latest news 8,500 posts will be recruited in the Arogya Vibhag – Health Department. The recruitment advertisement will be released tomorrow (January 18). The recruitment will be completed by February 15, said Health Minister Rajesh Tope. Its a good news for All Students who are preparing for the Maharashtra Arogya Vibhag Bharti Exam 2021 more than 8,500 vacancies for class C and D posts will be filled in this recruitment. This includes C and D class positions including nurses, ward boys, clerks and technicians etc., Candidates read the below given details carefully and keep a visit on our website for further updates..

कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत होता. आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी 8 हजार 500 पदांची भरती निघणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आरोग्य विभागातील 8 हजार 500 पदांची भरती निघणार आहे. उद्या (18 जानेवारी) नोकर भरतीची जाहिरात निघेल. 15 फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं काम पूर्ण होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. 17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत. त्यामुळे 2 टप्प्यात ही नोकर भरती होणार आहे. 56 संवर्गात ही नोकर भरती होणार असून या सर्व पदासाठी परीक्षा प्रक्रिया होणार आहे. साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत परिक्षा आणि त्यांनतर 2 ते 3 दिवसात निकाल लागणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.कोरोना संकट काळात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नोकरीचे कंत्राट संपले असले तरी त्यांना आगामी काळात आणि इतर नोकर भरती वेळी सामावून घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी नोकर भरती प्रक्रियेत बदल करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना काळात कंत्राटी पद्धतीने काम केलेल्या आरोग्य कर्मचारी यांना कोरोना संकट कमी झाल्याने नोकारीतून काढून टाकले होते. त्यामुळे या लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. मात्र या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याने त्यांना दिलासा मिळला आहे.

झिंझर नावाच्या आयटी कंपनीला नोकर भरती प्रक्रिया राबविण्याचे काम देण्यात आले आहे. या भरतीत क आणि ड वर्गातील पदे भरली जातील. यात नर्सेस, वॉर्ड बॉय, कलर्क आणि टेक्निशियनसह क आणि ड वर्गातील पदांचा समावेश आहे. या नोकर भरतीवेळी कोरोना काळात कंत्राटी काम केलेल्यांना प्राधान्य दिले जाणार नाही. मात्र कोरोना संकट काळात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने काम केले. त्यांना नियमित नोकरीवर घेणे शक्य नसल्याने आणि सुप्रीम कोर्टाच्या अनेक निर्णयाप्रमाणे तसे करणे नियमबाह्य ठरणार आहे. तरीही त्यांना वेगवेगळ्या भरती तसेच राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM) मधील पदांची भरती करताना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी निवड प्रक्रियेतील नियमात आवश्यक ते बदल केले जातील, असे टोपे यांनी सांगितले.

सोर्स: टीव्ही 9 मराठीपशुसंवर्धन विभागात ३ हजार जागांची भरती लवकरच होणार ! – २ जानेवारी २०२१ अपडेट्स..

पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षेची सविस्तर माहिती…

पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षे २०२१ चा अभ्यासक्रम ..


Arogya Vibhag Bharti 2021: Good News for All Students who are preparing for the Maharashtra Arogya Vibhag Bharti Examination. Over the next few months, more than 8,000 employees will be recruited in the this Department. Rajesh Tope said that the recruitment process will start in the next two months in Arogya Vibhag. Candidates read the below given details carefully and keep visit on our website for the further updates..

खुशखबर! आरोग्य आणि ग्रामविकास विभागात मेगा भरती; पुढील दोन महिन्यांत प्रक्रिया सुरू

राज्यात लवकरच मेगा भरती सुरू करण्यात येणार आहे. या मेगा भरती अंतर्गत आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजार पदापेक्षा जास्त भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाला प्राधान्य देण्यात आले असून आरोग्य क्षेत्रातील आवश्‍यक भरती तातडीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आता आगामी नव्या वर्षात आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्थेची सुविधा कशा प्रकारे असेल, याबाबत विचारले असता राजेश टोपे म्हणाले, आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य निगडीत पदं लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनाने भरतीला मान्यता दिली आहे. पुढील दोन महिन्यांत भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. राज्यात करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे. सेवेचा दर्जा उंचावतानाच सौजन्यपूर्ण वागणूक सामान्यांना द्यावी. आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असे त्यांनी सांगितले.
या वर्षात नागरिकांसह आरोग्य यंत्रणा करोनाशी यशस्वी लढा देत आहे. करोना नियंत्रणात असला तरी त्यासाठीचे नियम पाळणे आवश्‍यक आहे. नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी आणि कोरोनामुक्त जावो, अशा शुभेच्छा आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.

 1. मोबाइल सर्जिकल युनिट सुरू करावे  – नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आरोग्यमंत्र्यांनी ही बैठक घेत यंत्रणेला अधिक सक्षमपणे आणि सेवेचा दर्जा उंचावण्याचे आवाहन केले. करोना काळात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे काम चांगले झाले असून, आता राज्यात करोना स्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णसेवेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.
 2. अनेक दिवसांपासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत, त्या तातडीने कराव्यात. मोबाइल सर्जिकल युनिट सुरू करावे. तसेच आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असून, राज्य आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांसाठी संनियंत्रणाची प्रणाली विकसित करावी. जेणेकरून प्रत्येक अधिकाऱ्याचे कार्यमूल्यमापन करता येईल, यासाठी संगणक प्रणाली तयार करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.

आरोग्य विभाग भरती 2021 – 8000 posts Vacant : आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीला चालना मिळण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. पुढील काही महिन्यात साधारण आठ हजार पेक्षा जास्त नोकर भरती आरोग्य आणि ग्रामविकास विभागात केली जाणार आहे. कोविड संकटामुळे आरोग्य क्षेत्रात आवश्यक भरती केली जाणार आहे. पुढील दोन महिन्यात नोकरभरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचंही  राजेश टोपेंनी सांगितलं. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामस्वामी, संचालक , उपसंचालक आदी उपस्थित होते.

राजेशे टोपेंनी राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात चर्चा केल्यानंतर संबंधितांना महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. यावेळी सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची स्वतंत्र बैठक घेऊन राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचे आवाहन केले. आरोग्य यंत्रणेचे संनियंत्रण महत्वाचे असून महत्वाच्या राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. सार्वजनिक आरोग्य सेवेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या.

आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य निगडीत पदं लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनानं भरतीला मान्यता दिली आहे, अशी माहिती राजेश टोपेंनी टीव्ही 9 शी बोलताना दिली. सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे. सेवेचा दर्जा उंचावतानाच सौजन्यपूर्ण वागणूक सामान्यांना द्यावी. आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असेही टोपेंनी सांगितले.

सोर्स: लोकमत


Arogya Vibhag Bharti 2021 – Good News for All Students who are preparing for Maharashtra Health Department Recruitment. As there will be No Interviews for this Recruitment, Candidates will get selected through Written Examination Only for Arogya Vibhag Bharti 2021… Read the Below details..

बुलढाणा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांसाठी भरती 

आरोग्य विभाग अकोला अंतर्गत स्टाफ नर्स पदाकरिता भरती 

आरोग्य पदभरती आता परीक्षेद्वारेच – जाणून घ्या…

Arogya Vibhag Recruitment 2021 – राज्याच्या आरोग्य विभागातील पदभरती महिन्याच्या आत परीक्षा घेऊन होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी पदभरती ही दहावी, बारावीच्या गुणांवर होणार होती. त्याविरोधात शेकडो विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

राज्य सरकारने आरोग्य विभागातील १७ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया गुणवत्तेनुसार (दहावी, बारावी, पदवीच्या गुणांवर); तसेच मुलाखतीद्वारे राबविल्यास राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या असंख्य उमेदवारांना संधीच मिळणार नसल्याचे समोर आले होते. दहावीच्या ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ निकालामुळे आणि बारावीच्या वाढलेल्या गुणांमुळे अनेक स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी मागे पडणार आहेत. त्यामुळे या भरतीला स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोध झाला होता. ही भरती परीक्षा घेऊनच पार पडली पाहिजे, या पदांसाठी विद्यार्थी तीन ते पाच वर्षांपासून तयारी करीत आहे, भरती प्रक्रियेत दहावी आणि बारावीच्या गुणांचा विचार केल्यास खूप कमी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. मात्र, ही भरती परीक्षा घेऊनच पार पडली पाहिजे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली.

पदभरतीच्या पन्नास टक्के जागा एका महिन्याच्या आत भरणार

अखेर विधिमंडळ अधिवेशनात टोपे यांनी या भरतीबाबत सभागृहाला माहिती दिली. ‘करोनामुळे लॉकडाउनची परिस्थिती असल्याने पदभरती मेरिटनुसार घेण्याचा विचार होता. मात्र, आता राज्यात सर्व क्षेत्र खुले होत असल्याने, एकूण पदभरतीच्या पन्नास टक्के जागा एका महिन्याच्या आत परीक्षा घेऊन भरणार आहे. रोस्टर तयार करण्यासाठी आठ ते पंधरा दिवसांचा कालावधी जाईल. त्यानंतर पदभरती प्रक्रियेला त्वरित सुरुवात होईल,’ अशी माहिती टोपे यांनी दिली.

मेरिटनुसार पदभरती का नको ? 

राज्यात दहावीची परीक्षा मार्च २०१०पूर्वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेतील पूर्ण सहा विषयांचे गुण ग्राह्य धरण्यात येतात. त्यानंतरच्या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’नुसार म्हणजेच एकूण विषयांपैकी पाच विषयांमध्ये मिळालेल्या चांगल्या गुणांच्या आधारे एकूण गुण जाहीर होतात. त्यामुळे नोकरीसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणांमध्ये तफावत निर्माण होते. या तफावतीत सर्वाधिक नुकसान २०१०पूर्वी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे होणार आहे. त्याचप्रमाणे बारावीच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल केल्याने अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे सरळसेवा पदभरतीत किंवा आरोग्य विभागाच्या पदभरतीत दहावीच्या गुणांचा विचार केल्यावर, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे जुने विद्यार्थी मागे पडून त्यांचा दहावी व बारावीच्या गुणांचा टिकाव लागणार नाही. त्यांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता नाही.


Arogya Vibhag to start 50% of recruitment soon!

Updated on 16.12.2020: There are a large number of vacancies in the health department in the state. Out of this, 50 percent recruitment process will be started immediately, announced Health Minister Rajesh Tope in the Assembly.

१६ डिसेंबर २०२० अपडेट – राज्यात आरोग्य विभागाची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत केली.  

 

राज्यात कोरोनाची साथ नियंत्रणात आली आहे. देशपातळीवर ज्या १४ राज्यांची चर्चा होत आहे, त्यात महाराष्ट्र नाही, असे सांगून टोपे म्हणाले, डेथ ऑडिट कमिटी जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. कोरोनामुळे झालेला मृत्यू आणि त्या मृत्यूच्या कारणांची सखोल चौकशी करण्यासाठी ही कमिटी गेले काही महिने काम करीत आहे. केंद्र सरकारने कोरोना तपासणीचे दर ४५०० रुपये ठेवले होते, ते उद्यापासून ७८० रुपये करण्यात येतील, अशी घोषणाही टोपे यांनी केली. बूथ तयार करून व्हॅक्सिनेशन केले जाईल. त्यासाठीचे ट्रेनिंग सुरू आहे. कोल्ड चेनची व्यवस्था पूर्ण झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

NHM Beed Bharti 2020 For 19 Posts

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरती 2020

Arogya vibhag bharti 2020 in Maharashtra Latest Updates & Details are given here. The latest vacancies & updates are given here. As per the latest updates Bharti process of the Arogya Vibhag. The Mega Bharti in Maharashtra is published here.

सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक भरती 2020-२४ डिसेंबर लास्ट डेट

NHM – महाराष्ट्र राज्यस्तरीय भरती 2020-२७ डिसेंबर लास्ट डेट


राज्यात आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञांसह २९ हजारांहून पदे रिकामी आहेत. यातील गंभीर बाब म्हणजे करोनाकाळासाठी ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’ अंतर्गत १९,७५२ पदे तात्काळ भरण्याचा निर्णय झाला मात्र करोनाला पाच महिने उलटल्यानंतरही यातील १२,५७४ पदे भरलेली नाहीत. याचा मोठा फटका रुग्ण सेवेला बसत आहे.

पालघर आरोग्य विभाग भरती निकाल

राज्यात दोन लाख ८० हजारांहून अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत. यातील मोठय़ा संख्येने रुग्णांना खाटा मिळणे कठीण झाले असून अतिदक्षता विभागात खाटा मिळणे हे आमच्यासाठीही एक आव्हान बनल्याचे विविध पक्षांच्या आमदारांचे म्हणणे आहे.

पुण्यातील सर्व रुग्णालयात मिळून ५५७३ करोना खाटा आहेत तर २८७८ खाटा अतिदक्षता विभागात आहेत. यामुळे पुण्यात करोना रुग्णांना त्रास होत असल्याचे तेथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. याशिवाय सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, सोलापूर येथे रुग्ण वाढत असल्याने रुग्ण आणि रुग्णालयातील खाटांची संख्या याचे प्रमाण व्यस्त बनत असतानाच डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची हजारो पदे भरलीच जात नाहीत.  विशेष प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञांची आवश्यकता असून त्याबाबत ओरड असल्याचे आरोग्य विभागाच्याच ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

याशिवाय करोनाकाळात विशेष बाब म्हणून आरोग्य विभागाअंतर्गत ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’ (एनएचएम) खाली १९,७५२ पदे तातडीने मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी १२,५७४ पदे करोनाला पाच महिने उलटूनही भरण्यात आलेली नाहीत. यात पुणे जिल्ह्यातील पुणे, सोलापूर व सातारासाठी २४७९ मंजूर पदे आहेत पैकी ९११ रिक्त आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी १७९३ मंजूर पदे असून ९२३ पदे भरलेली नाहीत. ठाणे जिल्ह्यासाठी १८८९ पदे मंजूर असून १४९४ पदे भरली नाहीत. औरंगाबाद २४३६ पदांपैकी १४६१ रिक्त पदे तर नाशिक जिल्ह्यासाठी २३३० मंजूर पदे असताना ११६५ पदे आजही रिकामी आहेत. याबाबत आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की अनेक ठिकाणी डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञ मिळत नाही हे खरे असले तरी संबंधित पालकमंत्र्यांनी त्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

आरोग्य विभागात २९ हजारांहून जास्त पदे रिक्त आहेत.

आरोग्य विभागाच्या अखत्यारीत ५६,५६० नियमित मंजूर पदे आहेत त्यापैकी १७,३३७ पदे गेल्या अनेक वर्षांत भरण्यात आलेली नाहीत. ’यात सहसंचालक, अतिरिक्त संचालक, उपसंचालक, साहाय्यक संचालक यांची ८५० पदे रिक्त आहेत. वर्ग ‘अ’ व ‘ब’चे डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ अशी हजारो पदे आहेत.

Maharashtra Arogya Vibhag Bharti is started and in this section, we are going to describe the Application Fees structure for Health Department Recruitment.

Application Fees Maha Arogya Bharti 2020 – 2021
General Category Rs. 500
Reserved Category Rs. 300

31st August 2020-There are 17,000 vacancies for Medical Officers, Specialists, Class One Officers, District Health Officers, District Surgeons, Deputy Directors, Joint Directors and other important categories like grade C and D. It is noteworthy that 70% of the important posts like District Health Officer, District Surgeon, Deputy Director, Joint Director are vacant. Read below information..

आरोग्य विभागात तब्बल १७ हजारांवर पदे रिक्त

वैद्यकीय अधिकारी, स्पेशालिस्ट, वर्ग एक अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, सहसंचालक अशा महत्त्वाच्या संवर्गासह इतर ग्रेड सी व डी अशी तब्बल १७ हजार पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, सहसंचालक अशी महत्त्वाची तब्बल ७० टक्के पदे रिक्त आहेत .

newNHM गोंदिया भरती 2020-57 जागा

newआरोग्य विभाग धुळे भरती 2020-169 पदे

newNHM भंडारा भरती 2020-50 पदे

newNHM बीड भरती 2020

newNHM गडचिरोली भरती 2020

newपनवेल महानगरपालिका भरती 2020-139 जागा

newसांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भरती 2020

newबृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती 2020-80 जागा

वेळेत भरती न केल्याने वैद्यकीय अधिकारी मिळत नाहीत. वर्षांनुवर्षे पदोन्नत्या न केल्यामुळे पुढील संवर्गातील रिक्त पदांचा आजार अधिक दुर्धर होत आहे. आता कोरोना काळात तरी सरकार काही पावले उचलून यातून मार्ग काढेल, अशी अपेक्षा आहे. वास्तविक वैद्यकीय अधिकारी (वर्ग दोन) या उपलब्ध सव्वासहा हजार पदांमधून पुढच्या संवर्गातील अधिकारी मिळणार आहेत; पण त्यासाठी पदोन्नतीची प्रक्रिया गरजेची आहे. मात्र, पदोन्नत्या झाल्यानंतर मूळ पदाचा अधिकारी येऊन आपली सोयीची खुर्ची जाईल या भीतीमुळे या प्रभारींकडूच पदोन्नतीस आडकाठी होत आहे.

 रिक्त पदांची कारणे

-वेळेवर भरती नसल्याने एमओ मिळत नाही
-भरती, पदोन्नतीचे टप्पे वेळेवर होत नाहीत
-एमओ टू स्पेशालिस्टची प्रमोशन प्रक्रिया वेळेवर नाही
-सीएस केडरची प्रमोशन प्रक्रियाही कायम रखडलेली
-अनेक अधिकाऱ्यांचे चार्ज घेऊन सोयीच्या जागांवर ठाण
-पदोन्नतीच्या पदांवरील अनेक अधिकारी प्रभारी
-पदोन्नत्यांत सरकारची उदासीनता, सोयीची जागा जाईल म्हणून प्रभारींचीही आडकाठी

 पर्याय काय आहे

वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया वेळेवर करणे
-उपलब्ध एमओंची ज्येष्ठता यादी काढून स्पेशालिस्टचे प्रमोशन
-याच सिनिॲरिटीतून वर्ग एक अधिकारी पदाचे वेळेत प्रमोशन

सहा वर्षांपासून पदोन्नत्या करण्याचे कार्यालयीन सांगितले जात आहे. वर्षांनुवर्षे पदोन्नत्या न केल्यामुळे पदे रिक्त आहेत.


Arogya Vibhag Vacancy 2020: There are half vacancies in the district for health workers(Male) and health workers(Female). As a result, the the health system in rural areas has weakened and many problems are being created in the health service.Citizens in rural and remote areas of Gadchiroli district do not have much awareness about health. Therefore, after the onset of an illness, they don’t go to the doctor or the health worker until the condition worsens. Therefore, he/she was admitted to the hospital in critical condition. Some patients even reach the final stage. It was difficult to save such patients. Therefore, the position of health worker is important and need to filled all vacant positions as soon as possible

आरोग्य सेवक व आरोग्य सेविकांच्या जिल्ह्यात अर्ध्या जागा रिक्त

आरोग्य सेवक व आरोग्य सेविका ग्रामीण भागातील रुग्णांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्याचे महत्त्वाचे काम करतात. प्रत्येक घरी भेट देऊन विचारणा करणे हे आरोग्य सेवकाचे ठरलेले काम आहे. त्यासाठीच घराच्या भिंतीवर आरोग्य सेवकाच्या सहीचा आराखडा तयार केला राहते. या आराखड्यामध्ये किती तारखेला त्या घरी भेट दिली, याची नोंद करण्यासाठी संबंधित आरोग्य सेवक तारखेसह सही करतात. आरोग्य सेविकेकडे प्रामुख्याने माता व बाल संगोपनाशी संबंधित काम राहतात. गडचिरोली जिल्ह्यात कुपोषणाची समस्या गंभीर आहे. त्यामुळे आरोग्य सेविकांचेही विशेष महत्त्व आहे. आरोग्य व्यवस्थेचा दूत मानल्या जाणाऱ्या या सेवक व सेविकांच्या जिल्ह्यात अर्ध्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा डोलारा कमजोर झाला असून आरोग्य सेवेत अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

जिल्ह्यात एकूण ४७ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३७६ उपकेंद्र आहेत. प्रत्येक उपकेंद्रात आरोग्य सेवक व आरोग्य सेविकेची नेमणूक राहते. पुरूष आरोग्य सेवकांच्या एकूण २९८ जागा मंजूर आहेत. त्यापैकी केवळ १९० जागा भरण्यात आल्या आहेत. १०८ रिक्त आहेत. महिला आरोग्य सेवकांच्या ५५३ जागा मंजूर आहेत. त्यापैकी ३४१ जागा भरल्या असून २१२ रिक्त आहेत.

जवळपास निम्मी पदे रिक्त असल्याने एका आरोग्य सेवकाकडे दोन ते तीन आरोग्य केंद्रांमध्ये येणाºया गावांचा प्रभार सोपविण्यात आला आहे. दोन आरोग्य केंद्रांतर्गत पाच ते सहा गावे येतात. एवढ्या गावांमधील प्रत्येक घराला भेट देणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक रोगांचे निदान होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ही पदे भरणे आवश्यक आहेत


Arogya Vibhag Bharti 2021

राज्यात १७ हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती

Arogya Vibhag 17000 Posts Vacant: Health Minister Rajesh Tope recently learned about the ‘Kerala pattern’ of corona control. Tope briefed Kerala Health Minister KK Singh on the measures taken by the Kerala government in the Corona crisis. Taken from Shailja. After that, 17,000 posts in the health department will be filled in the state, Tope said; However, he said it would take another two months to complete the recruitment process. 17,000 vacancies for doctors, specialists, nurses and staff in the health department will be filled in the next two months. A detailed meeting of the department was also held for this. These posts will be filled through interviews. In addition, a tariff law has been enacted to stop the looting of patients from private hospitals and authorities have been appointed for its efficient implementation.

Nashi Mahanagarpalika Maharashtra has published a A job notification for the recruitment of 817 Posts. The last date is 29th July 2020. You can Use following link to apply For other jobs:

Arogya Vibhag 17000 Posts Vacant

राज्यात कोरोना रुग्णांनाचा आकडा 40 हजारावर पोचल्याच्यानंतर अखेर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने 17 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केरळच्या आरोग्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागातील मुख्य जबाबदारी असणाऱ्या महत्वाच्या वर्ग एक आणि वर्ग दोन अधिकाऱ्यांच्या 600 पदांचाही यात समावेश आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकताच कोरोना नियंत्रणाचा ‘केरळ पॅटर्न’ जाणून घेतला. कोरोना संकटात केरळ सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती टोपे यांनी केरळच्या आरोग्य मंत्री के.के. शैलजा यांच्याकडून घेतली. त्यानंतर राज्यात आरोग्य विभागातील 17 हजार जागा भरण्यात येणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली; मात्र भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आणखी दोन महिने लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागातील डॉक्टर्स, विशेषज्ज्ञ, परिचारिका, कर्मचारी यांची 17 हजार रिक्तपदे येत्या दोन महिन्यात भरण्यात येईल. त्यासाठी विभागाची सविस्तर बैठकही घेण्यात आली. मुलाखती घेऊन ही पदे भरले जातील. शिवाय रुग्णांची खासगी रुग्णालयांकडून लूट थांबविण्यासाठी दरनियंत्रण कायदा केला आणि त्याच्या सक्षम अंमलबजावणीसाठी प्राधिकारीही नेमले आहेत.
– राजेश टोपे, आरोग्य मंत्री.

सौर्स : मटा


आरोग्य विभागात २१ हजार पदे रिक्त

विविध प्रशासकीय विभागांत सुमारे अडीच लाख पदे रिक्त असून, दरवर्षी हजारो कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. राज्याच्या वित्तीय उलाढालीत महत्त्वाच्या वित्त विभागात ६ हजार, कृषी पशुसंवर्धनमध्ये १४ हजार, सार्वजनिक बांधकाममध्ये ९ हजार, जलसंपदा २१ हजार, महसूल विभागात ८ हजार, पोलिस यंत्रणेत २० हजार, तर सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल २१ हजार पदे रिक्त आहेत.
महाराष्ट्रात करोना संकटाच्या काळात प्रशासकीय व्यवस्था बळकट करण्याबाबत राज्य सरकार गंभीर नाही, असा आरोप महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने शुक्रवारी केला. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात सरकार दिरंगाई करीत असून, त्याबद्दल नोकरशाहीत नाराजी आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील २१ हजार पदांसह विविध विभागांतील अडीच लाख रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, अशी आग्रही मागणी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई आणि मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी केली आहे.
राज्य सरकारचे प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ४ फेब्रुवारी २०२० रोजी सकारात्मक चर्चा झाली. पण निर्णयाचे गाडे पुढे सरकत नसल्याचे देसाई आणि कुलथे यांचे म्हणणे आहे. करोनाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. अशा निर्णायक स्थितीत विविध प्रशासकीय विभागांत सुमारे अडीच लाख पदे रिक्त असून, दरवर्षी हजारो कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. राज्याच्या वित्तीय उलाढालीत महत्त्वाच्या वित्त विभागात ६ हजार, कृषी पशुसंवर्धनमध्ये १४ हजार, सार्वजनिक बांधकाममध्ये ९ हजार, जलसंपदा २१ हजार, महसूल विभागात ८ हजार, पोलिस यंत्रणेत २० हजार, तर सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल २१ हजार पदे रिक्त आहेत.

गेल्या आठ वर्षांपासून नवीन भरतीचे प्रमाण अत्यल्प आहे. नवीन नोकर भरतीबाबत सरकारने कोणतेही नियोजनबद्ध प्रयत्न केलेले नाहीत. परिणामी सरकार राज्यातील तरुण बेरोजगारांना उपलब्ध अडीच लाख रिक्त पदांवर सोयीस्करपणे संधी नाकारत आहे. केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय वाढवून उपलब्ध जागा किमान दोन वर्षांसाठी राखण्याबाबत व्यवहार्य असा निर्णयदेखील घेण्याचे महाविकास आघाडी सरकार टाळत आहे. वाढीव आव्हानांस सामोरे जात असताना अपुऱ्या मनुष्यबळावर प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत राहू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. यामुळेच प्रशासकीय व्यवस्था बळकट करण्याबाबत मात्र शासन गंभीर नाही, ही बाब आम्ही खेदाने नमूद करीत आहोत, असे महासंघाचे सरचिटणीस विनायक लहाडे, देसाई आणि कुलथे यांनी स्पष्टपणे सांगितले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी

केंद्र शासनातील कर्मचारी, २२ घटक राज्यांमध्ये तसेच महाराष्ट्र शासनातील चतुर्थ श्रेणी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्या ६० वर्षे आहे. यामुळे सेवानिवृतीची वयोमर्यादा सरसकट ६० वर्षे करावी. तसेच शासनाने विद्यमान स्थितीतील अडीच लाख रिक्त जागांवर नवोदितांची भरती करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. या मागण्यांबाबत महासंघाबरोबर तातडीने ऑनलाइन अथवा प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळ द्यावी, अशी मागणी कुलथे आणि लहाडे यांनी केली आहे.

सौर्स : मटा


लवकरच २५ हजारांपेक्षा जास्त पदांची आरोग्य विभागात भरती

Arogya Vibhag MahaBharti 2020 : As per the news regarding the Arogya Vibhag there will be total 25000 vacancies recruiting shortly. There will be big recruitment in the health department of Maharashtra soon. More than 25,000 vacancies will be filled in upcoming months. The state government is going to take a big decision in the wake of the Corona virus crisis. The District Collectors have been given special powers for this recruitment process. Read the complete details carefully and keep visit on this page for further updates.


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागात पदभरती – update on 6th April 2020

जालना आरोग्य विभाग भरती अपडेट्स : भरती प्रक्रिया ता.३१ मार्च ते ता.४ एप्रिल दरम्यान पार पडली. आरेाग्य सेवक, डेटा एंट्री ऑपरेटर (लेखापाल), आरोग्य सेविका, औषध निर्माता या पदांची भरती प्रक्रिया जिल्हा परिषद स्‍तरावर पार पडली. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची व स्‍टाफ नर्सची पदे जिल्हा सामान्य रुग्णालय स्‍तरावर भरण्यात आली.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध मनुष्यबळाची कमतरता जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध संवर्गातील २८९ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरती करण्यात येत आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली पात्र उमेदवारांची गुणवत्तेच्या आधारावर निवड करण्यात आली आहे. दरम्यान जिल्हा परिषद स्‍तरावरील पदभरतीच्या १५३ जागांसाठी तब्बल ७७८ जणांचे अर्ज आल्याने आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ झाली.

आरोग्य सेवकांच्या १२२ जागांसाठी ९१ तर आरोग्य सेविकांच्या १६ जागांसाठी तब्बल ३४५ अर्ज प्राप्त झाले होते. औषध निर्माता पदाच्या १२ जागा रिक्त होत्या, त्यासाठी २६७ जणांचे अर्ज आले. तर डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या ३ जागेसाठी ७६ अर्ज प्राप्त झाले होते.

भरतीसाठी उमेदवारांच्या मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार होती. मात्र, गर्दी टाळण्यासाठी गुणवत्तेच्या आधारावर पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या उमेदवारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर रविवारी (ता.पाच)प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय स्तरावर ग्रामीण व शहरी भागासाठी एकूण ४७ पदे भरण्यात आली आहे. तसेच आरोग्य सहायिकांच्या १३ पदांपैकी तीन तर आरोग्य साहाय्यकांच्या ९ पैकी ३ जागा भरण्यात आल्या आहे.

निवड झालेल्यांनी तातडीने रुजू होण्याचे आदेश

दरम्यान सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय स्तरावर निवड झालेल्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदस्तरवर झालेल्या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांची यादीही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीतील नावाबरोबर रुजू होण्याचे पत्रही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून ते डाऊनलोड करून संबंधित रूग्णालयात जाऊन उमेदवारांनी कार्यरत व्हावे. निवड झालेल्यांना जिल्हा परिषदेत येण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे

Arogya Vibhag MahaBharti 2020

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात लवकरच मोठी भरती होणार आहे. जवळपास 25 हजारांपेक्षा अधिक रिक्त पदं भरली जाणार आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हा मोठा निर्णय घेणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत.

गेली अनेक वर्ष आरोग्य विभागाची पंद रिक्त आहेत. त्यातच आता राज्यावर कोरोना व्हायरसचं संकट ओढावलं आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक पाऊल टाकत, ही रिक्त पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती प्रक्रिया थेट वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने होणार आहे.

राज्यावर कोरोना व्हायरसचं संकट ओढावलं आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक पाऊल टाकत, ही रिक्त पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाने राज्यासह जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत आरोग्य विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस राबत आहे. कोरोनाचं संकट मोठं आहे आणि त्याचा सामना करणारी यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे ही पदं लवकरात लवकर भरुन कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकार तयारीला लागलं आहे.

दरम्यान, आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेच्या वृत्ताला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुजोरा दिला आहेत. “आरोग्य विभाग हा महत्त्वाचा विषय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी या विषयाचा पाठपुरावा करत होतो. विधानसभेतही मी याबाबत आश्वासन दिलं होतं. नर्सेस, मल्टिपर्पज वर्कर, टेक्निशियन, डॉक्टर यांचा या भरती प्रक्रियेत समावेश असतील,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. तसंच “या भरती प्रक्रियेदरम्यान गर्दी केली जाणार नाही. यासाठी रांगा नसतील. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या विशेषाधिकाराच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाईल,” असंही त्यांनी सांगतिलं.

सौर्स : एबीपी माझा


आरोग्य विभाग तब्बल १७००० पदे रिक्त

Arogya Vibhag Bharti 2020 : In Maharashtra there are total 17005 vacant seats are available in Health Department.  As per the latest news various posts are still vacant in Arogya Vibhag. Like Doctor, Director etc., Although the entire health department is struggling to cope with corona in the state, the manpower shortage with doctors is huge. The health department, additional directors, co-directors, sub-directors, along with doctors in the health department, are vacant at around 17005 posts. There are no more than 2522 posts filled from Health Directors to Medical Officers. In addition, there are 493 vacant posts of specialists. Read the complete details given below:

धक्कादायक ! ‘कोरोना’शी युध्द करणार्‍या आरोग्य विभागाची ‘हेल्थ’ बिघडली, डॉक्टरांसह तब्बल 17000 पदे रिक्त

देश सध्या कोरोनाव्हायरस सारख्या महाभयंकर रोगाशी सामना करीत आहे. अशा परिस्थितीत देशाची आरोग्यव्यवस्था अतिशय मजबूत असणे आवश्यक आहे. पण राज्यात तब्बल १७,००५ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. यात आरोग्य संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालकांसह आरोग्य विभागात डॉक्टरांचा समावेश आहे. याबाबतचा आढावा एका वृत्तसमूहाने घेतला आहे. जाणून घेऊया…
राज्यात करोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र झटत असली तरी या यंत्रणेत डॉक्टरांसह मनुष्यबळाचा तुटवडा मोठा आहे. आरोग्य संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालकांसह आरोग्य विभागात डॉक्टरांसह तब्बल १७,००५ पदे रिक्त आहेत. यात आरोग्य संचालकांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत तब्बल २,५२२ पदे भरण्यात आलेली नाहीत. याशिवाय विशेषज्ञांची तब्बल ४९३ पदे रिक्त आहेत. ही पदे लवकरच भरण्यात येतील अशी आश्वासने वर्षानुवर्षे अधिवेशन काळात आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात येत असली तरी प्रत्यक्षात त्यासाठी कोणतीही ठोस पावले आजपर्यंत उचलण्यात आलेली नाहीत.

आयोग्य विभागाचेच आरोग्य बिघडले
अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या आरोग्य विभागाचेच आरोग्य आज पूर्णपणे बिघडले असून आरोग्य संचालकांच्या दोन पदांपैकी एक पद रिक्त आहे. अतिरिक्त संचालकांच्या तीन पदांपैकी २ पदे रिक्त आहेत तर सहसंचालकांच्या १० पदांपैकी ८ पदे भरण्यात आलेली नाहीत. गंभीर बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी सहसंचालक साथरोग हे पद रद्द करून त्याऐवजी सहसंचालक खरेदी असे पद निर्माण करण्यात आल्याचा मोठा फटका आज करोनाच्या पार्श्वभूमीवर बसत आहे. पुणे येथील हंगामी आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील यांनाच आज संचालक, अतिरिक्त संचालक व सहसंचालकांची भूमिका बजवावी लागत असल्याचे एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.
राज्याच्या आरोग्य विभागाचा पसारा मोठा असून आरोग्य खात्याची तब्बल ५०८ रुग्णालये आहेत. याशिवाय ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्याची काळजी घेण्यासाठी १८२८ प्राथमिक आरोग्यकेंद्रे तेर १०,६६८ उपकेंद्रे आहेत. जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, सामान्य रुग्णालये तसेच मनोरुग्णालयांच्या माध्यमातून जवळपास सात कोटीहून अधिक रुग्णांवर बाह्य रुग्ण विभागात उपचार केले जातात तर सुमारे साडेचार लाख शस्त्रक्रिया आरोग्य विभागाच्या रुग्णालयात करण्यात येतात. राज्यात वर्षाकाठी सुमारे २० लाख बाळंतपणे होत असून यातील आठ लाख बाळंतपणे ही आरोग्य विभागाच्या रुग्णालयात करण्यात येतात.

वारंवार जाहिरात देऊनही डॉक्टर्स मिळत नाहीत

सार्स, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लूसह साथीचे आजार, मधुमेह, उच्चरक्तदाबासारखे असंसर्गजन्य आजार, अपघात, बालआरोग्यासह, मनोरुग्ण, तसेच अपघातापासून वेगवगेळ्या आजारावर उपचार करणाऱ्या आरोग्य विभागाला आज त्यांची पदे त्यांना भरता येत नाहीत. डॉक्टरांची तसेच विशेषज्ञांची हंगामी पदे भरण्यासाठी वेळोवेळी जाहिरात देऊनही डॉक्टर मिळत नाहीत. यामागे ग्रामीण वा दुर्गम भागात डॉक्टरांना पुरेसे मानधन मिळत नसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक ही अत्यंत महत्त्वाची पदे आहेत..

 1. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या २८१ मंजूर पदांपैकी १५७ पदे रिक्त
 2. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या ६४३ पदांपैकी ३६८ पदे भरण्यातच आलेली नाहीत.
 3. बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, अस्थीरोग आदी विशेषज्ञांची ६२७ पदे मंजूर असली तरी त्यातील ४९३ पदे आजघडीला रिक्त आहेत.
 4. परिचारिकांची ३० टक्के तसेच आरोग्य सेविका व सहाय्यकांची तब्बल ५० टक्के पदे रिक्त असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोग्य विभाग हा राज्य सरकारकडून कायमच उपेक्षित असून अर्थसंकल्पाचा विचार केला तरी राज्य सकल उत्पन्नाच्या केवळ एक टक्का रक्कम आरोग्य विभागाला दिली जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांचा विचार करता राष्ट्र सकल उत्पन्नाच्या किमान चार टक्के रक्कम आरोग्यावर खर्च करणे अवाश्यक असताना देशात तसेच महाराष्ट्रात अवघा एक टक्का रक्कम आरोग्यावर खर्च केली जाते. एकीकडे डॉक्टरांसह तब्बल १७ हजार पदे रिक्त तर दुसरीकडे आरोग्य विभागाला मिळणारा तुटपुंजा निधी यातून जेव्हा करोनासारखे संकट उभे राहाते तेव्हा आमचे डॉक्टर कोणतीही तक्रार न करता जीवाचे रान करतात, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

रिक्त पदे भरण्याचे आश्वासन
“आरोग्य विभागातील विशेषज्ञांची सर्व पदे येत्या तीन महिन्यांत कोणत्याही परिस्थितीत भरण्यात येतील. १७ हजार पदे ही बऱ्याच काळापासून रिक्त असून यापूर्वी पदे का भरण्यात आली नाही याची मला कल्पना नाही. तथापि आरोग्य विभाग हा अत्यावश्यक सेवेत येत असल्याने यातील सर्व पदे ही आरोग्य खात्यामधूनच भरण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू. आरोग्य खात्याला अधिक निधी मिळाला पाहिजे व सध्याची परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात आरोग्याला चांगला निधी मिळवून देईन,” असे राजेश टोपे यांनी सांगितले.

सौर्स : पोलिसनामा

50 thoughts on “Arogya Vibhag Bharti 2021”

 1. मी आरोग्य सेविका (ANM) प्रशिक्षण झालेले आहे, ६ वर्ष अनुभव, अतिदक्षता विभाग (ICU) .जागा कधी निघणार ?
  आम्ही उस्तुक आहोत कोरोनाच्या लढ्यात रुग्णांची सेवा करण्यासाठी

  Reply
 2. नाशिक जिल्ह्यात नाही आहे का नोकरी

  Reply
 3. Feb2021 madhe pariksha gheun senior security sahhayak he post proper rahata chek karun bharli geli ahe kay?
  28 फेब्रुवारी 2021ला घेणेत आलेल्या परीक्षेतून वरिष्ठ security सहायक या पदावर श्री परमेश्वर तावडे या उमेदवारांची नेमणूक उपसंचालक आरोग्य परिवहन पुणे यांनी त्याची अर्हता व अनुभव तपासून केली आहे काय? यावर जर नेमणूक चुकीची अर्हता तपासून केली असेल तर mat प्रकरण होईल तरी या बाबत आपले मत कळवावे

  Reply
 4. Sir,I have completed MSc organic chemistry ani Mala 2 year experience ahe in pharma company as quality control department.plz I need a job.

  Reply

Leave a Comment