Asha Swayamsevika Bharti 2023

Asha Swayamsevika Bharti 2023

Asha Swayamsevika Bharti 2023: Five thousand Ashasevaks will be recruited through Mumbai Municipal Corporation. Ashasevaks are needed in the state for Measles Health Survey, so five thousand Ashasevaks will be recruited in the state soon

गोवर प्रसारामध्ये आढळलेल्या आरोग्य सर्वेक्षणाच्या विविध पातळ्यांवरील त्रुटी दूर करण्यासाठी पाच हजार आशासेविकांना सेवेमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय व्यवस्थेमध्ये आशासेविकांचे काम महत्त्वाचे असून करोना प्रादुर्भावात त्यांनी केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. संसर्गजन्यच नव्हे तर विविध स्वरूपाच्या आजारांचे लवकर निदान होण्यासाठी सर्वेक्षण करणे, लसीकरण कार्यक्रम, कुपोषण, लहान मुलांचे, गर्भवती मातांचे आरोग्य अशा उपक्रमांमध्ये आशासेविकांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला असून पालिकेच्या अंतर्गत स्तरावरही ही प्रक्रिया सुरू आहे.

Asha Swayam Sevika Bharti 2023

  • गोवर संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या एकूण आरोग्यव्यवस्थेचा लेखाजोखा घेतला जात आहे.
  • उपनगरीय रुग्णालयांमधील आरोग्यव्यवस्था, रचना, आरोग्यकेंद्रांची उपलब्धता, तेथील रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा दर्जा या आरोग्यसेवांशी निगडित विविध वैद्यकीय सेवांची गुणवत्ता तपासली जात आहे.
  • रिक्तपदांची पूर्तता करण्याचेही आव्हान आहे.
  • करोना संकटानंतर आरोग्य सुविधांसाठी गुणात्मक, संख्यात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर काम करण्याची गरज वाढली आहे.
  • त्यात सर्वेक्षणाचा भाग महत्त्वाचा असून पालिका क्षेत्रामध्ये सध्या १,५५० आशासेविका आहेत.
  • त्यांच्या कामाचे निश्चित उद्दिष्ट साध्य केल्यानंतर त्यानुसार मानधन दिले जाते.
  • एक हजार लोकसंख्येमागे एक या प्रमाणानुसार आशासेविकांची नियुक्ती केली जाईल.
  • मुंबईत या नियोजनानुसार पाच हजार आशासेविकांची नियुक्ती केली जाईल, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्यअधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

मानधनही समाधानकारक हवे-Asha Sevika Bharti 2023

पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये गोवर संसर्गाच्या प्रसाराचा प्रभागनिहाय आढावा घेतला जात असताना आशासेविकांच्या उपलब्धतेचाही मुद्दा पुढे आला. मानधनाच्या मुद्द्यांवरही आशासेविकांच्या नियुक्तीवेळी समाधानकारक पर्याय देण्याची पालिका प्रशासनाची तयारी असल्याचे समजते. संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आर. एस. काळे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

‘प्रशिक्षणानंतरच जबाबदारी द्यावी’- Mumbai Asha Sevika Bharti 2023

  • अचानक आलेल्या आजारांच्या साथींसाठी अनेकदा जास्तीचे काम करावे लागते.
  • गोवर संसर्गामध्ये काम करूनही त्यांना योग्य मोबदला मिळत नाही आणि अधिकच्या कामामुळे नेहमीची मोबदला मिळणारी कामे मागे पडतात.
  • त्यामुळे त्यांच्या मानधनाची रक्कम कमी होते.
  • तरी सर्वेक्षण, साथरोग नियंत्रणासाठी महिन्याला किमान ३,००० रुपये अतिरिक्त मानधन मंजूर करावे.
  • दर महिन्याच्या सात तारखेच्या आत मासिक मानधन देतानाच ज्या ७८ कामांसाठी मोबदला मिळतो, त्यातील काही कामांचा तपशील भरून घेतला जात नाही.
  • भरती झाल्यावर ताबडतोब प्रशिक्षण दिल्यानंतरच कामांची जबाबदारी आणि मोबदला देण्यात यावा’, अशी मागणी आहे.
  • मुंबई जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन यांनी मुंबईत काम करणाऱ्या आशासेविकांचे प्रलंबित प्रश्न अद्याप सोडवण्यात आलेले नाही याकडे लक्ष वेधले.

Leave a Comment