Aurangabad Govt Hospital Bharti 2021

Aurangabad Govt Hospital Bharti 2021

Aurangabad Govt Hospital Bharti 2021: In the wake of Corona (covid 19 in aurangabad), the process of filling up fifty per cent of the vacancies in government hospitals in Aurangabad district should be started within a week. The Aurangabad bench of the Bombay High Court ordered the process to be completed in six to eight weeks. Sanjay Gangapurwala and Justice. S. D. Kulkarni handed over to the state government. The next hearing on the petition will be held on June 14

शासकीय रुग्णालयांत २०४८ रिक्त जागा दोन महिन्यात भरणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांमधील रिक्त असलेल्या पदांच्या ५० टक्के पदे भरण्याची प्रक्रिया एका आठवड्यात सुरू करून ६ ते ८ आठवड्यांत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या  न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी शुक्रवारी (दि. ७) राज्य शासनाला दिले. याचिकेवर पुढील सुनावणी १४ जून रोजी होणार आहे .

गट क संवर्गातील रिक्त पदे खासगी कंपनीमार्फत भरणार

जिल्ह्यात रिक्त असलेल्या २०४८ पैकी ५० टक्के पदे तीन महिन्यात भरण्यात येतील, असे शासनातर्फे निवेदन करण्यात आले. यावर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

राज्यातील आरोग्य विभागात 16 हजार पदांची भरती होणार..

 सरकारी दवाखान्यात २०४८ पदे रिक्त खा. जलील यांनी याचिकेत उल्लेख केल्यानुसार घाटीत ८६८, घाटी दवाखान्याच्या सुपर स्पेशालिटी वॉर्डात २१९, महापालिकेच्या दवाखान्यात ८३, जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात ३३०, शासकीय कर्करोग रुग्णालयात १२२, शासकीय कर्क रुग्णालयाच्या एक्स्टेंशन बिल्डिंगमध्ये ३६४, चिकलठाणा येथील सिविल हॉस्पिटलमध्ये ६० पदे, अशी सरकारी दवाखान्यांत एकूण २०४८ पदे रिक्त आहेत.

1 thought on “Aurangabad Govt Hospital Bharti 2021”

  1. sir maza lab techichan zale aahi sir b.sc mlt 3 varsh experience aahi sir plz job. contact no. 9067939423.plz sir

    Reply

Leave a Comment