Aurangabad Mahanagarpalika Bharti – 3000 Posts

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2020

औरंगाबाद महापालिकेत बेरोजगारांना संधी… लाॅकडाऊननंतर होणार मेगाभरती…

औरंगाबादमेट्रॉन कोविड हॉस्पिटलसाठी १४० पदांची भरती

3000 Posts in Aurangabad Municipal Corporation will be filled soon. Aurangabad NMC administrator Astik Kumar Pandey said that the structure of NMC, which has been stalled for many years, is likely to be approved and new posts will be filled in the next six months. Due to the small number of officers and employees, the corporation is currently working on outsourcing employees only. Pandey said that he had requested Urban Development Minister Eknath Shinde to approve the scheme as soon as possible. The records takes into account the need for manpower for the next 25 years. In the old format, 2,117 new posts were created in addition to the earlier sanctioned 4,344 posts. Meanwhile, the General Assembly suggested increasing the number of new posts to 2,924 instead of 2,117. Therefore, new posts can be filled in the Municipal Corporation along with vacancies.

Aurangabad Municipal Corporation Bharti 2020

अनेक वर्षांपासून रखडलेला महापालिकेचा आकृतिबंध मंजूर होण्याची शक्यता असून, आगामी सहा महिन्यांत रिक्तपदांसह नवी नोकरभरती केली जाईल, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सध्या आऊटसोर्सिंगच्या कर्मचाऱ्यांवरच महापालिकेचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर आकृतिबंध मंजूर करण्याची विनंती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे पांडेय यांनी सांगितले.

महापालिकेतील कर्मचारी भरती आकृतिबंधाचा प्रस्ताव तत्कालीन महापौर भगवान घडामोडे यांनी १८ जुलै २०१७ च्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. यावेळी सर्वसाधारण सभेने ३६ दुरुस्त्या करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार दुरुस्ती करून हा प्रस्ताव शासनाला पाठविणे गरजेचे होते. मात्र, दोन वर्षांत महापालिकेच्या आस्थापना विभागाने या प्रस्तावावर कुठलाही निर्णय घेतला नाही. विशेष म्हणजे, शासनाने वारंवार महापालिकेला स्मरणपत्र दिले. दरम्यान, तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक व उपायुक्त मंजूषा मुथा यांनी नवीन प्रस्ताव तयार करून तो १८ जुलै २०१९ च्या सभेत आणला.
त्यानंतर आकृतिबंध व सेवाभरती नियमांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. यासंदर्भात पांडेय म्हणाले की, महापालिकेचे कामकाज सुधारण्यासाठी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी कर्मचारी-अधिकाऱ्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे. आजघडीला शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामकाज आऊटसोर्सच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरू आहे. आगामी सहा महिन्यांत आकृतिबंधानुसार नोकरभरती करण्याचे आपले उद्दिष्ट आहे.

त्यावर माजी नगरसेवक समीर राजूरकर यांच्यासह अधिकारी संघटनेने आक्षेप घेत जुना प्रस्तावच शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. नव्या प्रस्तावात अनेक विभागातील पदे उडविण्यात आली होती. तसेच विभागप्रमुखांचे अधिकार कमी होतील, अशी रचना केली होती. त्यामुळे नगरसेवकांनी देखील नव्या प्रस्तावाला विरोध केला. दोन्ही प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर तत्कालीन महापौर नंदकुमार घोडेले यांनी जुनाच प्रस्ताव दुरुस्तीसह शासनाला पाठविण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
काय आहे आकृतिबंधात?

आकृतिबंधात आगामी २५ वर्षांची मनुष्यबळाची आवश्‍यकता गृहीत धरलेली आहे. जुन्या आकृतिबंधात आधीच्या मंजूर ४,३४४ पदांव्यतिरिक्त २,११७ नवीन पदे निर्माण करण्यात आली होती. दरम्यान, नवीन पदांची संख्या २,११७ ऐवजी २,९२४ पर्यंत वाढविण्याचे सर्वसाधारण सभेने सूचित केले. त्यामुळे रिक्त पदांसह नवीन पदांची महापालिकेत मेगाभरती होऊ शकते.

सौर्स : सकाळ


औरंगाबाद महापालिकेत खेळाडूंना थेट नोकरी द्या

 

Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2020 : NCP MLA Satish Chavan on Monday demanded that Shivchhatrapati Rajya Krida Award winning players from Aurangabad district should be given direct jobs in Aurangabad Municipal Corporation according to their educational qualifications. MLA Satish Chavan conveyed this demand to the Commissioner. The structure of Aurangabad Municipal Corporation, which has been stalled for many years, is in the final stage of approval and after getting the approval from the state government, recruitment for nearly three thousand posts will be done in the corporation. More details regarding this bharti are given below:

औरंगाबाद जिल्ह्यातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना औरंगाबाद महानगरपालिकेत त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार थेट नोकरी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी सोमवारी आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे केली आहे.

आमदार सतीश चव्हाण यांनी आयुक्तांना या मागणीचे निवेदन दिले. ‘अनेक वर्षांपासून रखडलेला औरंगाबाद महानगरपालिकेचा आकृतिबंध मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून राज्य शासनाकडून मंजुरी मिळाल्यावर महानगरपालिकेत जवळपास तीन हजार पदांसाठी भरती होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना औरंगाबाद महानगरपालिकेत थेट नोकरी द्यावी अशी मागणी मी २२ जानेवारी २०१९ रोजी औरंगाबाद महानगरपालिकेचे तत्कालिन महापौर व तत्कालिन आयुक्तांकडे केली होती. महानगरपालिकेने ११ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक ७६३ नुसार औरंगाबाद जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विशेष बाब म्हणून महापालिकेत थेट नोकरी देण्याबाबतचा ठराव देखिल मंजुर केला असल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.

उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा

क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्यावतीने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त नामांकित खेळाडूंची दखल घेऊन सांगली, पुणे महानगरपालिकेने त्यांच्या जिल्ह्यातील सदरील पुरस्कार प्राप्त खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वर्ग ब, क व ड मध्ये थेट नोकरी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शासनाकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या पुरस्कारानंतर या खेळाडूंना मान-सन्मान मिळाला मात्र अनेक खेळाडूंचा उदरनिर्वाहाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. अनेक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू आपल्या उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करताना दिसून येत असल्याचे आमदार चव्हाण यांनी म्हटले आहे. सांगली, पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर औरंगाबाद महानगरपालिकेने देखिल औरंगाबाद जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विजेत्या खेळाडूंना थेट नोकरी देऊन खेळाडूंचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी, आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे.

सौर्स : मटा


औरंगाबाद महापालिकेत तब्बल १५६ पदे रिक्त

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2020 : As per the latest news received the Water supply department in Aurangabad Mahanagarpalika. The department is not even offered a full-time executive engineer. Considering the city’s sprawl and water supply system, this department needs two executive engineers. One Executive Engineer is required for Jaikwadi division and another for controlling the distribution of water in the city. Currently, the Deputy Engineer has been appointed as the Executive Engineer. They have to monitor the water distribution work in the city along with Jaikwadi. This puts them at work stress. There are no recruits in the municipality, so there are 156 vacancies in the water supply department. Water supply works are being done by hiring contract staff in these positions.

जिल्हा सामान्य रुग्णालया औरंगाबाद मध्ये लवकरच भरती

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2020

महापालिकेच्या रचनेत पाणीपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. महापालिकेच्या स्थापनेच्या वेळीच या विभागासाठी नोकरभरती झाली होती. त्यानंतर नोकरभरती झालीच नाही. त्यामुळे कालांतराने वयोमानानुसार या विभागातील अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होऊ लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; २२६ कर्मचारी कायमस्वरुपी नोकरीत आहेत. त्यात लाइनमन, ऑपरेटर, पंप ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, कामगार यांचा समावेश आहे. या विभागाला पूर्णवेळ कार्यकारी अभियंता देखील देण्यात आलेला नाही. शहराचा विस्ताव आणि पाणीपुरवठ्याची यंत्रणा लक्षात घेता, या विभागासाठी दोन कार्यकारी अभियंत्यांची गरज आहे. एक कार्यकारी अभियंता जायकवाडी विभागासाठी आणि दुसरा शहरातील पाणी वितरणाच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी गरजेचा आहे. सध्या उप अभियंत्याकडेच कार्यकारी अभियंता म्हणून पदभार देण्यात आला आहे. त्यांनाच जायकवाडीसह शहरातील पाणी वितरणाच्या कामावर लक्ष ठेवावे लागते. त्यामुळ‌े त्यांच्यावर कामाचा ताण पडतो. महापालिकेत नोकर भरती झालेली नाही, त्यामुळे पाणीपुरवठा विभागातील तब्बल १५६ पदे रिक्त आहेत. या पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करून पाणीपुरवठ्याचे काम करण्यात येत आहे.

WATER SUPPLY DEPARTMENT – पाण्याला ‘कंत्राटीभरोसे’

अत्यावश्यक सेवा म्हणून समजला जाणारा औरंगाबाद महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच चालवला जात आहे. १६ लाख लोकसंख्येच्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या विभागाला पूर्णवेळ कार्यकारी अभियंता देखील नाही. उपअभियंत्यांची संख्याही अपुरी आहे. या विभागातील तब्बल १५६ पदे रिक्त आहेत.

रिक्त असलेल्या या पदांवर महापालिकेने कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यात कनिष्ठ अभियंता, लाइनमन, फिल्टर ऑपरेटर, केमिस्ट, फिल्टर इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर यांचा समावेश आहे. पाणी वितरणासारखे महत्त्वाचे काम या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे याच कर्मचाऱ्यांवर पाणीपुरवठा विभागाची भिस्त आहे, असे मानले जात आहे. महापालिकेने शासनाकडे नोकरभरतीसाठी आकृतीबंध पाठवला आहे. शासनाने आकृतीबंधाला मंजुरी दिल्यास टप्प्याटप्प्यांने नोकरभरतीचे काम होऊ शकेल. त्यानंतरच पाणीपुरवठा विभागात कायम स्वरुपी कर्मचारी येतील, असे मानले जात आहे.

महापौरांचा शासनाकडे पाठपुरावा

पाणीपुरवठा विभागासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून दोन कार्यकारी अभियंते प्रतिनियुक्तीवर देण्याची मागणी महापौर नंदकुमार घोडेले वारंवार करीत आहेत. बबनराव लोणीकर पाणीपुरवठा मंत्री असताना त्यांच्याकडे महापौरांनी पत्रव्यवहार केला होता. आता गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना देखील यासंदर्भात नुकतेच पत्र पाठवण्यात आले आहे. करोना विषाणू संसर्गाच्या दहशतीखाली काम करणाऱ्या शासनाने महापौरांच्या पत्राची दखल घेतल्यास पाणीपुरवठा विभागासाठी पूर्णवेळ कार्यकारी अभियंता मिळण्याची शक्यता आहे.

सौर्स : मटा
2 thoughts on “Aurangabad Mahanagarpalika Bharti – 3000 Posts”

Leave a Comment