Aurangabad Metron Covid Hospital Recruitment of 140 posts
औरंगाबादमेट्रॉन कोविड हॉस्पिटलसाठी १४० पदांची भरती

औरंगाबादमेट्रॉन कंपनीच्या आवारात सुरू होत असलेल्या कोविड हॉस्पिटलसाठी महापालिका १४० पदांची भरती करणार आहे. हे कर्मचारी कंत्राटी राहणार असून त्यांची नियुक्ती तीन महिने किंवा कोविडची साथ संपेपर्यंत राहणार आहे. शहरातील कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेऊन शासनाने स्वतंत्र कोविड हॉस्पिटलची घोषणा केली होती. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केलेली मागणी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मान्य करून एमआयडीसीच्या माध्यमातून हॉस्पिटल उभारले जाईल व १० जून रोजी लोकार्पण करू, असे जाहीर केले होते. त्यानुसार शुक्रवारी (१२ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण केले जाणार आहे. हे २५० खाटांचे हॉस्पिटल असून ते महापालिकेच्या ताब्यात दिले जाणार आहे. या हॉस्पिटलसाठी महापालिकेने कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पूर्ण भरती होईपर्यंत हॉस्पिटल चालवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची मदत घेतली जाणार आहे.
Vacancy Details – या पदांसाठी भरती
वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन) १३, वैद्यकीय अधिकारी ३०, हॉस्पिटल व्यवस्थापक २, परिचारिका ६३, एक्स रे टेक्निशियन २, इसीजी टेक्निशियन २, लॅब टेक्निशियन ६, फार्मासिस्ट ८, भांडारपाल २, डीओई ४, वॉर्ड बॉय २०..
सौर्स : मटा
I am pharmacist
I have job
[email protected]