Bank MD Recruitment 2019

Bank MD Recruitment 2019

विलिनीकरण झालेल्या बँकांमध्ये एमडीपदाची भरती

Bank Recruitment 2019 : Banks Board Bureau Invites Applications For MD, CEO Posts In PNB, The appointment of the new Chief Executive Officer and Managing Director at Bank of India, Bank of Baroda, Canara Bank, Punjab National Bank is in process. Although the government has announced the merger of 10 public sector banks, the process of recruiting some of the banks’ CEOs and managing directors is still underway. Read the details carefully given below :

PNB बँकांमध्ये एमडीपदाची भरती

Esakal : सरकारने जरी 10 सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली असली तरी त्यातील काही बॅंकांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ बडोदा, कॅनरा बॅंक, पंजाब नॅशनल बॅंकेत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नव्या नियुक्त्या करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका इंग्रजी संकेतस्थळावर आलेल्या वृत्तानुसार, पंजाब नॅशनल बॅंकेतील वरिष्ठ पदे 30 सप्टेंबरपासून रिक्त होणार आहेत. तर बॅंक ऑफ बडोदातील पदे ऑक्टोबरच्या मध्यापर्यत आणि कॅनरा बॅंकेतील पदे जानेवारीपर्यंत रिक्त होणार आहेत. बॅंक ऑफ इंडियातील वरिष्ठ पदे सध्या रिक्त स्वरूपातच आहेत. बॅंक्स बोर्ड ब्युरो, सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या वरिष्ठ पदांसाठी अर्जांची छाननी करून निवड करते. या पदांसाठी 60 अर्ज आलेले आहेत. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बॅंकांमधून मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत. आलेल्या अर्जांमधून पात्र उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भातील मुलाखती ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील.
2 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *