BMC MahaBharti 810 Lipik Vacancies

BMC MahaBharti 810 Lipik Vacancies

मुंबई महापालिकेत ८१० लिपिकांची भरती

BMC Recruitment 2020 : Mumbai Mahanagarpalika Bharti for Lipik 810 posts will be process soon. Two months ago, the municipal administration had decided to recruit 810 clerks in Mumbai Municipal Corporation. While submitting the budget, however, it was taken that the recruitment process had to be postponed as the financial position of the municipality was not strong. Due to this, many of the unemployed who had their eyes on the recruitment had lost their lives. Considering the economic situation, the decision was made to postpone the recruitment process only after the financial situation has been rectified. The statement was rejected by the members.

Then on Friday, when the proposal was again approved, all party members protested the administration’s non-hiring role and demanded that the recruitment be made.

BMC Recruitment 2020

० नोकरभरती मार्ग मोकळा
० आयुक्तांच्या निर्णयाला स्थायी समितीचा शह

० सल्लागार, ओएसडी यांच्या नियुक्त्यांवर सदस्यांचे प्रश्नचिन्ह

० प्रक्रिया कधी सुरू करायची, याचा अधिकार प्रशासनाला

आर्थिक संकटामुळे नोकरभरती न करण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय स्थायी समितीने बदलल्याने नोकरभरतीचा मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे. भरती प्रक्रिया कधी सुरू करायची याचा अधिकार प्रशासनाला असल्याने तात्काळ भरती प्रक्रिया सुरू होईल, असे नाही. मात्र भरतीच रद्द करण्याचे प्रशासनाचे निवेदन फेटाळल्याने भरतीची दारे उघडी राहिली आहेत, ही जमेची बाजू आहे.

मुंबई महापालिकेत ८१० लिपिकांची भरती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी घेतला होता. अर्थसंकल्प मांडताना मात्र पालिकेची आर्थिक स्थिती सुदृढ नसल्याने भरती प्रक्रिया स्थगित करावी लागत आहे, अशी घूमजाव करणारी भूमिका घेतली होती. त्यामुळे भरतीकडे डोळे लागलेल्या अनेक बेरोजगारांचा हिरमोड झाला होता. आर्थिक परिस्थितीचा विचार करता भरती तूर्तास स्थगित करून आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच भरतीचा विचार केला जाईल, असे निवेदन स्थायी समितीच्या मागील बैठकीत प्रशासनाच्या वतीने मांडण्यात आले होते. हे निवेदन सदस्यांनी फेटाळून लावले.

त्यानंतर शुक्रवारी पुन्हा प्रस्ताव मंजुरीला आला असता, सर्वपक्षीय सदस्यांनी नोकरभरती न करण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करत भरती व्हायलाच हवी, अशी आग्रही मागणी केली.

नोकरभरती करताना आर्थिक स्थितीचे कारण दिले जाते. मग सल्लागार, फेलाशिपचे उमेदवार तसेच ओएसडी यांच्या सरसकट नियुक्त्या कशा केल्या जातात, त्यांच्यावर लाखो रुपये कसे खर्च केले जातात, हा खर्च करताना पालिकेच्या आर्थिक स्थितीची काळजी वाटत नाही का, नोकरभरती करतानाच आर्थिक स्थिती कशी काय आठवते, असा सवाल सदस्यांनी केला. लिपिकांची भरती करणार नसाल तर सल्लागार, फेलोशिपचे उमेदवार तसेच ओसडी पदावरील नियुक्त्या रद्द करा, असा आक्रमक पवित्राही सदस्यांनी घेतला. भरती स्थगित करण्याचे प्रशासनाचे निवेदन फेटाळून प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्यात आला. एकप्रकारे आयुक्तांच्या निर्णयाला समितीने शह दिल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

नोकरभरतीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून प्रशासनाने भरती प्रक्रिया लवकर सुरू करावी, असे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले.

० असे आहेत आक्षेप

विविध पदांवरील सल्लागार तसेच विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करताना पालिका प्रशासन स्थायी समितीची परवानगी घेत नाही. अनेक नियुक्त्या प्रशासकीय अधिकारात केल्या जातात. बेस्टला दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देताना स्थायी समितीला विश्वासात घेतले गेले नव्हते. तेव्हा पालिकेच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव नव्हती का, असा सूर प्रशासनाच्या विरोधात दिसला. त्यामुळे स्थायी समिती सर्वोच्च आहे हे दाखवून देण्यासाठीच भरती स्थगितीचे निवेदन फेटाळून लावत भरती प्रक्रिया राबवण्याचा आदेश दिला गेला, असे समजते.

सौर्स : मटा

BMC MahaBharti 874 Vacancies

खूशखबर! मुंबई महापालिकेत ८७४ जागांसाठी भरती

BMC Recruitment Process update : The Mumbai municipality has decided to stop hiring till the financial condition of the Mumbai municipality improves. Against this backdrop, the administration’s order to withdraw the proposal for the post of Executive Assistant (Clerk) was strongly opposed by the Standing Committee on Friday. The all-party councilors took the administration by stating that they should reduce unnecessary expenditure on consultants, special officers and other jobs rather than shutting down employees. Chairman Yashwant Jadhav decided to postpone the proposal until detailed information about it was received.

मुंबई महानगरपालिका कामगार भरती होणे गरजेचे

कोणत्याही शहराचा विकास होण्यासाठी मनुष्यबळ महत्वाचे आहे. कितीही तंत्रज्ञान आले मनुष्यबळ तितकेच गरजेचे आहे. परंतु मुंबई महानगरपालिका आर्थिक तोट्यात आहे म्हणून मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना ती रिक्त पदे भरण्याची जबाबदारी टाळत आहे. आणि एकीकडे नको त्या गोष्ठीसाठी अनावश्यक खर्च करत आहे त्या पेक्षा मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे त्या कडे लक्ष देवून स्वच्छता पँटर्न यशस्वी होण्यासाठी हि भरती त्वरीत होणे गरजेचे आहे. अँड. गणेश शेळके

मुंबई महापालिकेतिल सफाई कामगारांची रिक्त पदे त्वरीत भरली पाहिजेत पण त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन खात्याचे योग्य आधुनिकीकरण , यांत्रिकीकरण ही झाले पाहिजे. त्या कर्मचाऱ्यांना चांगली साधने व किमान सोई दिल्या पाहिजेत.मुंबई शहर नाईटलाईफ साठी नाही तर स्वच्छतेसाठी ओळखले गेले पाहिजे. गणेश कुलकर्णी.

BMC Recruitment Process update नोकरभरती रोखण्यास ‘स्थायी’चा विरोध

मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत नोकरभरती थांबवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकारी सहाय्यक (लिपिक) या पदासाठींचा प्रस्ताव मागे घेण्याच्या प्रशासनाच्या मागणीला स्थायी समितीत शुक्रवारी तीव्र विरोध करण्यात आला. नोकरभरती बंद करण्यापेक्षा सल्लागार, विशेष अधिकारी व इतर कामांवरील अनावश्यक खर्च कमी करा, असे सांगत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला फैलावर घेतले. याबाबतची सविस्तर माहिती मिळेपर्यंत या प्रस्तावाला स्थगिती देण्याचा निर्णय अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिला.

पालिकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत नोकरभरती बंद करण्याच्या निर्णयाचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीत उमटले. ८१० पदांच्या भरतीचा प्रस्ताव मागे घेत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला. भरती बंद करण्यापेक्षा पालिकेतील सल्लागारांना बंद करा, त्यांच्यावर नको तिथे होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचवता येऊ शकेल असे विरोधी पक्ष रवी राजा यांनी सांगितले. पालिकेतील सर्व कामांसाठी सल्लागारांची नियुक्ती केली जाते. आतापर्यंत विशेष अधिकारी, सल्लागारांवर करण्यात आलेल्या खर्चाचा बोजा किती होतो? कोट्यवधी रुपये खर्च करूनही सल्लागारांचे सल्ले आतापर्यंत किती फायद्याचे ठरले आहेत असा सवाल विचारत भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यानी नोकर भरतीला विरोध केला.

नोकर भरती बंद करून खासगीकरण करण्याचे आयुक्तांचे हे संकेत आहेत, असा आरोप समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केला. नोकरभरती बंदचा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही शेख यांनी दिला. तर लिपिक पदासाठीची भरती थांबवू नये, या भरतीत ६० टक्के मुंबईकरांना व ४० टक्के मुंबईबाहेरील उमेदवारांना प्राधान्य द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली. पालिकेच्या रुग्णालयात अनुभवी डॉक्टर तसेच चतुर्थश्रेणी कामगारांच्या रिक्त जागा भरणे आवश्यक आहे. सल्लागारांच्या नेमणूकांपेक्षा पालिकेतील अधिका-यांना बढती देऊन वेतन वाढवा अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी केली. दरम्यान भरती प्रस्ताव मागे घेण्याची प्रशासनाची मागणी फेटाळून लावत प्रस्तावाला स्थगिती देण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला.

अशी होणार होती भरती

मुंबई महापालिकेत कार्यकारी सहाय्यक वर्गाची (लिपिक) एकूण ५२५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पध्दतीने ३२२१ पदे भरायची आहेत. त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली ८१० पदे भरण्यात येणार आहे. महापालिकेकडून याबाबतची ऑनलाईन परीक्षा घेवून भरती प्रक्रीया राबवली जाणार होती. ही पदे भरण्यासाठी पालिकेने कंपनीची निवड केली आहे. या पदांची भरती सरळसेवेत करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवणे, संगणक ज्ञानाची परीक्षा आणि बहुपर्यायी वस्तूनिष्ठ ऑनलाईन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ऑनलाईन व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ७ कोटी ८० लाख ८३ हजार ५५० रुपये एवढा खर्च येणार आहे.

सौर्स : मटा

MCGM Recruitment 2020 News : The hiring of the municipal corporation has also affected the recruitment. Until the income of the municipality increases, the recruitment of all vacant posts has been temporarily stopped. This decision by the municipality will no longer directly lead to recruitment. Also, vacancies due to retirement will not be filled. Work hours are scheduled to reduce employee overtime allowance. Read the complete details given below :

पालिकेत नोकरभरती बंद – BMC Recruitment 2020

महापालिकेच्या घसरलेल्या आर्थिक डोलाऱ्याचा फटका नोकरभरतीवरही झाला आहे. जोपर्यंत पालिकेचे उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत सर्व रिक्त पदांवरील भरती तात्पुरती थांबवण्यात आली आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे यापुढे थेट भरती होणार नाही. तसेच सेवानिवृत्तीमुळे होणारी रिक्त पदे भरण्यात येणार नाहीत. कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाइम भत्त्याचे प्रमाण कमी होईल, असे कामाच्या तासांचे नियोजन केले जाणार आहे.

पालिकेच्या महसुली उत्पन्नाच्या तुलनेत आस्थापना खर्च ५० टक्के इतका असून राज्य सरकारने शिफारस केलेल्या ३५ टक्के खर्चाच्या तुलनेत तो अधिक आहे. पालिकेच्या सध्याच्या नाजूक आर्थिक स्थितीमुळे थेट भरती थांबवण्यात आल्याने दरवर्षी २५० कोटींची बचत अपेक्षित आहे. काटकसरीच्या धोरणामुळे सन २०१९-२० मध्ये १९२०५ कोटी असलेला महसूली खर्च सन २०२०-२१मध्ये १८७९७ कोटीपर्यंत खाली आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सातव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वार्षिक १३०० कोटीचा अतिरिक्त बोजा पालिकेवर येणार आहे. वेतनावरील खर्च अटळ असल्याने आस्थापना खर्च कमी करणे आवश्यक आहे.

एक वर्षासाठी शिकाऊ उमेदवार

विविध विभागांमध्ये मुलभूत प्रशासकीय काम करणारे लिपिक आणि उद्याने, विधी आणि अभियंता खात्यातील तांत्रिक कर्मचारी यासारख्या कामासाठी सहा महिने किंवा एक वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार घेण्याचे प्रस्तावित आहे. या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या नोकरीवर अधिकार राहाणार नाही. राज्य सरकारने महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार कायद्यामध्ये केलेल्या सुधारणांमधील तरतुदीनुसार पालिका या उमेदवारांना विद्यार्थी वेतन देऊ शकेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

थेट भरती रोखली, कर्ज घेणार; मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प सादर
मुंबई: मुंबई महापालिकेचा २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सादर केला. ३३,४३४.५० कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात यंदा २७४१.९१कोटी रुपयांची वाढ झाली आहे. महापालिकेने यंदा मुंबईकरांवर कोणताही कर लादलेला नसला तरी पालिकेची आर्थिक स्थिती मात्र कमालीची खालवली आहे. आर्थिक स्थिती सावरण्यासाठी मुंबई महापालिका यंदा पालिकेच्या राखीव निधीतून ४३८० कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे. आर्थिक स्थिती खालावल्याने पालिकेने थेट नोकर भरतीही रोखली आहे.

महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे २०२०-२०२१ या आर्थिक वर्षांसाठीचा अर्थसंकल्प सादर केला. ३३,४३४.५० कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. गतवर्षी ३०,६९२.५९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता, त्या तुलनेत यंदा २७४१.९१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या अर्थसंकल्पात मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारचा बोझा टाकण्यात आला नसला तरी मुंबईकरांसाठी अपवाद वगळता नव्या घोषणाही केलेल्या नाहीत. महापालिकेची आर्थिक स्थिती खालावल्याने सर्व प्रकारच्या खर्चात कपात करण्यासाठी पालिकेने थेट नोकर भरतीही रोखली आहे. शिवाय पालिकेत निवृत्तीमुळे होणारी पदेही भरली जाणार नसल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलं आहे.

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई


बीएमसीकडं पैसाच नाही, लिपिक भरती लांबणीवर

BMC Recruitment 2020: BMC mahabharti advertisement for lipik 874 Post . The aspirants who are looking forward to the recruitment of the municipal employees will be shocked. For the post of Executive Assistant, there have been prolonged recruitment for the post of clerk for the post of clerk. With this recruitment, internal recruitment for the six posts from the municipal staff is also maintained. Read the complete details given below:

MCGM Recruitment 2020

पालिकेच्या नोकर भरतीकडे आशेने डोळे लावून बसलेल्या इच्छुकांचा तूर्तास तरी हिरमोड होणार आहे. कार्यकारी सहायक पदाच्या अर्थात, लिपिकपदासाठी सरळसेवा पदांमधून होणाऱ्या ८१० पदांची भरती लांबणीवर पडली आहे. या भरतीसह पालिका कर्मचाऱ्यांमधून होणाऱ्या ८७४ जागांसाठीची अंतर्गत भरतीही रखडली आहे. आस्थापना खर्चात होत असलेली वाढ आणि पालिकेच्या उत्पन्नात झालेली घट यांमुळे ही भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पालिकेत कार्यकारी सहायक वर्गातील पाच हजार २५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने ३,२२१ पदे भरायची आहेत. त्यातील ८१० पदे सरळसेवा भरतीतून भरण्यात येणार आहेत. तर, कर्मचाऱ्यांमधून अर्थात अंतर्गत भरतीतून ८७४ पदे भरण्यात येणार होती. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महारिक्रुटमेंट या वेबसाइटवर अपलोड केला जाऊन त्याची लिंक महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार होती. भरतीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मागील बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. पण, त्यावेळी निर्णय होऊ शकला नाही. गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळणे अपेक्षित होते. पण, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी एका निवेदनाद्वारे प्रस्ताव मागे घेण्याची मागणी केली. पालिकेच्या उत्पन्नात झालेली घट व आस्थापना खर्चात झालेली वाढ, यामुळे नोकर भरतीचा प्रस्ताव मागे घेत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यास विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आक्षेप घेतला. ‘सल्लागारांवर कोट्यवधी रुपये उडवणारी महापालिका प्रशासन नोकर भरतीला विरोध का करत आहे? लिपिकांची कमतरता लक्षात घेता भरती झालीच पाहिजे’, असा आग्रह त्यांनी धरला. अखेर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाचे निवेदन फेटाळत मूळ प्रस्तावावरील निर्णय पुढील बैठकीपर्यंत राखून ठेवला आहे.

भरती रद्दच होणार होती…

वास्तविक पाहता आस्थापना खर्चातील वाढ आणि उत्पन्नातील घट या कारणास्तव भरती रद्दच करण्याचा प्रशासनाचा मानस होता. परंतु, सदस्यांच्या सूचना आणि आक्षेप विचारात घेता स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भरती रद्द करण्याचे निवेदन रोखले. त्यामुळे भरतीचा प्रस्ताव प्रशासनाला राखून ठेवावा लागला असून, या घडामोडींमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

BMC Bharti 2020 : Mumbai Mahanagarpalika Published an advertisement for the recruitment of 874 posts for Executive Engineer. After the recruitment of Junior engineers, there will be Mahabharati Mumbai Municipal Corporation (MCGM Recruitment 2020). The vacant posts of clerk, executive assistant, will be filled by this recruitment very soon. Official Notification will be available on Mumbai Mahanagarpalika Website. The recruitment process will be implemented by taking an online test. We provide the complete details regarding this recruitment on our mahagov.info website so keep visit us.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत २२८ डॉक्टरांची भरती

MCGM Recruitment 2020

कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर मुंबई महापालिकेत आता महाभरती होणार आहे. लिपिक अर्थात कार्यकारी सहाय्यक पदाच्या ८७४ जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत. याबाबतची ऑनलाइन परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. परीक्षेच्या प्रक्रियेसाठी सुमारे १२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

सरळसेवा भरतीसाठी खुल्या आणि आरक्षित प्रवर्गात सुमारे एक लाख तर अंतर्गत भरतीसाठी तीन हजार अर्ज येणे अपेक्षित आहेत. सर्व उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महारिक्रुटमेंट या वेबसाइटवर अपलोड केला जाणार आहे. याची लिंक मुंबई महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

दोन्ही भरतीसाठी पालिकेने महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड केली असून, भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवणे, संगणकीय ज्ञानाची परीक्षा, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ऑनलाइन व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे.

सरळसेवा भरती

जागा : ८१०

परीक्षा शुल्क

खुला प्रवर्ग : ९०० रुपये

मागास व इतर मागास प्रवर्ग : ७०० रुपये

पालिकेतील अंतर्गत भरती

  1. जागा : ८७४
  2. परीक्षा शुल्क
  3. खुला प्रवर्ग : ५०० रुपये
  4. मागास व इतर मागास प्रवर्ग : ३०० रुपये

पालिकेत कार्यकारी सहाय्यक वर्गाची एकूण ५२५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने ३२२१ पदे भरायची आहेत. त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली ८७४ पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे खुल्या आणि आरक्षित प्रवर्गात एकूण तीन हजार अर्ज येणे अपेक्षित आहेत. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून प्रत्येकी ५०० रुपये शुल्क घेतले जाणार असून, मागास व इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकडून प्रत्येकी ३०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सर्व उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महारिक्रुटमेंट या वेबसाइटवर अपलोड केला जाणार आहे. याची लिंक मुंबई महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. भरतीसाठी पालिकेने महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड केली असून, पदांची भरती सरळसेवेत करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवणे, संगणकीय ज्ञानाची परीक्षा, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ऑनलाइन व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. उद्या, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
या भरतीसाठी उमेदवारांची इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची व्यावसायिक चाचणी परीक्षा होणार आहे. राज्य सरकारच्या महाआयटी आणि आयबीपीएस या नामांकित संस्थांनी ही परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. महाऑनलाइन ही सरकारी कंपनी भरती प्रक्रिया राबवणार असल्याने जाहिरातीद्वारे निविदा मागवण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.

सौर्स: मटा
4 thoughts on “BMC MahaBharti 810 Lipik Vacancies”

Leave a Comment