BMC Recruitment 2020 updated news

BMC Recruitment 2020 updated news

मुंबई महानगरपालिकेत अनेक पद रिक्त

BMC Recruitment 2020 Details – As per the new source there are large number of vacancies are in BMC Hospitals. Due to Corona Patient Capacity of Hospitals is increased, but the Staff Count is till not enough. So Following News gives update about this. 

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात वॉर्ड बॉयची भरती

करोनाच्या संसर्गाशी लढताना मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणामध्ये खाटांची उपलब्धता केली आहे. मात्र, रुग्णालयांमध्ये असलेल्या रिक्त पदांची पूर्तता करण्यात आलेली नसल्याने करोनाविरुद्धच्या लढाईत मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे. पालिकेच्या लो. टिळक, नायर आणि केईएम रुग्णालयांमध्ये एक तृतियांश पदे रिक्त असल्याचे माहितीच्या अधिकारांतर्गत स्पष्ट झाले आहे.

छत्तीसगढ येथे रुग्णसेवा देणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. विठ्ठल साळवे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती मागवली होती. त्यामध्ये या प्रमुख रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याचे दिसून आले. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक गटातील पदे रिक्त असल्यामुळे कनिष्ठ वैद्यकीय वर्गातील पदांच्या उपलब्धतेवरही परिणाम होतो. अध्यापनासाठी प्राध्यापक नसल्यामुळे अन्य जागा पुरेशा प्रमाणात भरल्या जात नाहीत. तसेच रुग्णांना वैद्यकीय सेवाही मिळत नाही. रिक्त पदांच्या समस्येसंदर्भात रुग्णमित्र संघटनांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र, तरीही त्याला प्रतिसाद मिळत नाही.

पालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार करोनाशी मुकाबला करण्यासाठी पालिकेने जाहिराती देऊन पदांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी अधिक पैसेही देऊ केले आहेत. असे असताना मिळणारा प्रतिसाद अत्यल्प आहे. ही पदे योग्यवेळी भरली असती तर रुग्णसेवेवर निश्चितपणे परिणाम झाला नसता.

रुग्णालयांवर वाढता भार येत असल्यामुळे रुग्णांचीही फरफट होते, उपलब्ध डॉक्टरांवर ताण येतो, त्यामुळे ही संख्या नेमकी किती आहे हे तपासण्यासाठी डॉ. साळवे यांनी माहितीच्या अधिकारातंर्गत माहिती मागवली होती. त्यात या रुग्णालयांतील एक तृतीयांश जागा रिकाम्या असल्याचे दिसते. जे कायमस्वरूपी सेवांमध्ये आहेत त्यांची वैद्यकीय सेवा उपलब्ध होते, मात्र कंत्राटी पद्धतीमुळेही वैद्यकीय सेवा देण्याच्या प्रक्रियेमध्ये अडसर निर्माण झाल्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

खासगी प्रॅक्टिसची मुभा

पालिकेने या पदांवरील डॉक्टरांना भत्ता न घेतल्यास बाहेर प्रॅक्टिस करण्यासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे काहीवेळा हे डॉक्टर खासगी ठिकाणी रुग्णसेवा देतात. अडलेला रुग्ण वैद्यकीय सेवा घेतो पण यामध्ये रुग्णांना भुर्दंड पडतो. त्यामुळे या मुद्द्यांवर पालिकेने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. सहाय्यक प्राध्यापकाच्या जागा, भूलतज्ज्ञ आणि मेडिसीन यातील पदे सर्वाधिक रिक्त आहेत.

कस्तुरबामध्ये २७ पदे रिक्त

कस्तुरबा रुग्णालयामध्येही २७ पदे रिक्त असल्याचे या माहितीमध्ये समोर आले आहे. बंधपात्रसेवेमध्ये असलेले डॉक्टर, वैद्यकीय अधीक्षक, उपवैद्यकीय अधीक्षक, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, बालरोग चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी अशा पदांचा यात समावेश आहे.

केईएम रुग्णालय

पदे – संमत जागा – भरलेल्या – रिक्त

  • प्राध्यापक – ७६- ५१ – २५
  • सहाय्यक प्राध्यापक -१०२ – ६५ – ३७
  • सहयोगी प्राध्यापक – १८० – ७०- ११०

लो. टिळक रुग्णालय

  • प्राध्यापक- ९८ -५१ – ४७
  • सहाय्यक प्राध्यापक -१३७ -८७ – ५०
  • सहयोगी प्राध्यापक -१५८ – १४३ – १५

नायर रुग्णालय

  • प्राध्यापक – ७६ -४७ – २९
  • सहाय्यक प्राध्यापक – ११५- ८९ – २६
  • सहयोगी प्राध्यापक -१८३-१००- ८३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *