CA Exam 2020

CA Exam 2020 Admit Card – icaiexam.icai.org

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या CA परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी

ICAI CA exam 2020 will be conducted in November 2020. The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has issued an admit card for the November exam. The admit card has been issued on the official website of ICAI. The official website of ICAI is icaiexam.icai.org. Candidates can download the admit card by logging on to this website. You have to login first. Source: Mata

ICAI CA November exam: द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने नोव्हेंबर परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी केले आहे. आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर हे अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे. आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळाचा पत्ता icaiexam.icai.org असा आहे. या संकेतस्थळावर लॉगइन करून उमेदवार अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात. त्यासाठी आधी लॉगइन करावे लागेल.

आयसीएआयच्या संकेतस्थळावर या अॅडमिट कार्डसंबंधीचे परिपत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात असे म्हटले आहे की, ‘सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट (IPC), इंटरमिडिएट, फायनल आणि नव्या अभ्यासक्रमासह फायनल परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. उमेदवारांचे छायाचित्र आणि स्वाक्षरी या अॅडमिट कार्डवर असेल. उमेदवारांना प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारचे अॅडमिट कार्ड दिले जाणार नाही. उमेदवारांनी ऑनलाइन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून त्याची प्रिंट घेऊन ठेवावी.’ हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याची थेट लिंक या वृत्तासोबत देत आहोत.

How to download the admit Card / कसे कराल सीए परीक्षेचे अॅडमिट कार्ड डाऊनलोड?

 • – आयसीएआयच्या icaiexam.icai.org या अधिकृत संकेतस्थळावर जा.
 • – लॉग इन किंवा रजिस्टर कराल. https://icaiexam.icai.org/
 • – तुमचा आयडी आणि पासवर्ड एन्टर करा.
 • – अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा.
 • – आता तुमचं अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.
 • – अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊट काढून ठेवा.

सौर्स : मटा


CA Exam 2020 eservices.icai.org

दहावी पास विद्यार्थीही आता सीए फाऊंडेशनसाठी करु शकणार नोंदणी

CA Exam Details : Students who have been preparing for CA Exam will now be relieved by this new decision. According to the new decision, even 10th pass students can now register for the first entry level exam of CA. This entry level exam is required for CA’s foundation course. The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has now announced a new decision. This decision will benefit students preparing for CA. The CA exam is considered difficult. This exam is done in three stages. Many students dream of becoming a CA by crossing it.

इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ट्ड आकाऊंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) आता एक नवीन निर्णया जाहीर केला आहे. या निर्णयामुळे सीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. सीएची परिक्षा ही अवघड मानली जाते. ही परिक्षा तीन टप्प्यात होत असते. ती पार करुन सीए बनण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी पाहत असतात. वर्षानुवर्षे यासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता या नव्या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. नव्या निर्णयानुसार आता दहावी पास विद्यार्थी देखील सीएच्या पहिल्या एंट्री लेव्हलच्या परिक्षेसाठी नोंदणी करु शकतात. सीएच्या फाऊंडेशन कोर्ससाठी ही एट्री लेव्हलची परिक्षा द्यावी लागते.

याआधी बारावीची परिक्षा पास झालेलेच विद्यार्थी या कोर्ससाठी नोंदणी करण्यास पात्र होते. मात्र, आता आयसीएआयच्या या निर्णयानंतर सीएच्या कोर्ससाठी जाण्याची तयारी करणाऱ्या दहावी पास विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या संस्थेला अलिकडेच चार्टर्ड अकाऊंट विनियम, 1988 च्या अधिनियमानुसार 25 E, 25 F आणि 28F मध्ये संशोधनासाठी भारत सरकारची मंजूरी मिळाली आहे. सरकारच्या या मंजूरीनंतर, 10 वी पास विद्यार्थ्यांना आता ICAI च्या फाऊंडेशन कोर्समध्ये प्रोव्हीजनल रजिस्ट्रेशन करण्यासाठी संमती मिळाली आहे. मात्र, विद्यार्थ्याला बारावीची परिक्षा पास केल्यानंतरच फाऊंडेशन कोर्समधील प्रोव्हीजीनल ऍडमिशनला नियमित केले जाईल.

विद्यार्थी eservices.icai.org या वेबसाईटवर जाऊन लॉगईन करुन रजिस्ट्रेशन करु शकतात. फाऊंडेशन कोर्ससाठी मे/जून किंवा नोव्हेंबर/ डिसेंबरमध्ये आयोजित होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्याला जानेवारीच्या आधी संस्थेच्या बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल. याचा अर्थ फाऊंडेशन परीक्षेमध्ये बसण्यासाठी आधी चार महिने अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी हा केंद्र सरकार अथवा राज्य सरकारद्वारे मान्यता प्राप्त अशा सिनीयर सेंकडरी अर्थात बारावी परिक्षेमध्ये असणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, रजिस्ट्रेशनच्या फिमध्ये कसलाही बदल करण्यात आलेला नाहीये. अधिक माहीतीसाठी ऑफिशियल वेबसाईट जाऊन नवा निर्णय पाहता येईल.

सौर्स : सकाळ


CA Exam Revised Timetable : सीए परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.; सुधारित वेळापत्रक जाणून घ्या….

CA Exam 2020 Revised Timetable: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्सी ऑफ इंडिया (ICAI) ने नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या चार्टर्ड अकाउंटन्सी अर्थात सीए परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा १ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणार होत्या. आता या परीक्षा २१ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत होतील.

‘चार्टर्ड अकाउन्टन्सी अर्थात सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार एक ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या परीक्षा आता २१ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या काळात होतील, त्याचे सविस्तर वेळापत्रक ‘आयसीएआय’च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे,’ अशी माहिती ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे यांनी दिली.

अशा होतील परीक्षा –

फाउंडेशन कोर्स परीक्षा

८, १०, १२ आणि १४ डिसेंबर २०२०

इंटरमेडिएट (Ipc) कोर्स परीक्षा – जुन्या स्कीमनुसार

 • ग्रुप १ – २२, २४, २६ आणि २८ नोव्हेंबर २०२०
 • ग्रुप २ – १, ३ आणि ५ डिसेंबर

इंटरमेडिएट कोर्स परीक्षा – नव्या स्कीमनुसार

 • ग्रुप १ – २२, २४, २६ आणि २८ नोव्हेंबर २०२०
 • ग्रुप २ – १, ३, ५ आणि ७ डिसेंबर

फायनल कोर्स परीक्षा – नव्या स्कीमनुसार

 • ग्रुप १ – २१, २३, २५ आणि २७ नोव्हेंबर २०२०
 • ग्रुप २ – २९ नोव्हेंबर, २, ४ आणि ६ डिसेंबर २०२०

इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट टेक्निकल परीक्षा (IRM)

मॉड्युल्स १ ते ४ – २१, २३, २५ आणि २७ नोव्हेंबर २०२०

इंटरनॅशनल ट्रेड लॉज अँड वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (ITL & WTO) पार्ट – १ परीक्षा

 • ग्रुप ए – २१ आणि २३ नोव्हेंबर २०२०
 • ग्रुप बी – २५ आणि २७ नोव्हेंबर २०२०

इंटरनॅशनल टॅक्सेशन – असेसमेंट टेस्ट

२१ आणि २३ नोव्हेंबर २०२०

आयसीएआयने हेही स्पष्ट केले आहे की केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक सुट्ट्या असल्या तरी सीए परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही, हे उमेदवारांनी ध्यानात घ्यावे.

वेळापत्रक येथे डाउनलोड करा 


CA Exam 2019

CA परीक्षा 2019

The Institute of Chartered Accountant of India (ICAI) has been postponed the examination of various subjects of the Chartered Accountant (CA) course across the country.

रामजन्मभूमी निकालाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक भागांतील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्याने आयसीएआयने जा निर्णय संकेतस्थळावर जाहीर केला. आयसीएआयकडून सीए फाउंडेशन, पेपर वन, फायनल पेपर फाईव्ह, आयआरएम पेपर वन, आयएनटीटी आणि डीआयएसए ईटी यांच्या परीक्षा घेतल्या जाणार होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून रामजन्मभूमी खटल्याचा निकाल देण्यात येणार असल्याने सुरक्षिततेचा भाग म्हणून देशभरातील विविध भागांमध्य शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेणात आला.
Leave a Comment