Capgemini IT company Recruitment 2020

Capgemini IT company Recruitment 2020

कॅपजेमिनी आयटी कंपनीत होणार मेगाभरती!

Capgemini IT company Recruitment 2020 : This IT Company will be recruiting around 15 thousand campus interviews. Currently Capgemini has offices in India with 1.2 million employees. This is more than half of the company’s worldwide workforce. The company is currently working on 5G technology and has started two centers in Paris and Mumbai, said Ashwin Yardi, chief executive officer of the company. Cognizant has also announced that it will recruit about 20,000 employees this year.

Capgemini Mega Bharti 2020

बेरोजगारी हे सध्या भारतातील सगळ्यांत मोठी समस्या आहे. अनेकांना पदव्या घेऊनही नोकरीच्या संधी नाहीत. आयटी क्षेत्रातही नोकरीच्या संधी हव्या तशा नसल्यामुळं सध्या चिंतेचं वातावरण आहे. त्यातच एका कंपनीनं मेगाभरती करण्याची घोषणा केली आहे.

माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील आघाडीची कॅपजेमिनी चालू वर्षात तब्बल 12 ते 15 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे. गेल्यावर्षी देखील कंपनीने कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून अनेक पदवीधरांची निवड केली होती. पदवीधरांची निवड करताना निवड झालेल्या विद्यार्थ्यांना किमान 3.8 लाख रुपयांचे वेतन देणार आहे. मात्र आयआयटी आणि एनआयटीच्या विद्यार्थ्यांना 6.5 लाख रुपयांपर्यत वार्षिक वेतन दिले जाते.
सध्या कॅपजेमिनीच्या भारतातील कार्यालयांमध्ये 1.2 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. ही संख्या कंपनीच्या जगभरातील एकूण कर्मचाऱ्यांच्या निम्म्याहून अधिक आहे. कंपनी सध्या 5 जी तंत्रज्ञानावर काम करत असून कंपनीने त्यासाठी पॅरीस आणि मुंबईत दोन केंद्र सुरू केली आहेत, अशी माहिती कंपनीचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन यार्दी यांनी दिली. कॉग्निझंटने देखील चालू वर्षात तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे.

सौर्स : सकाळ
2 thoughts on “Capgemini IT company Recruitment 2020”

Leave a Comment