Capgemini IT company Recruitment 2021

Capgemini IT company Recruitment 2021

opportunity will be given to the candidates who will complete graduation in 2021.  The recruitment will be done through Capgemini’s Pooled Campus Drive. Candidates must be ME / MTech students in IT, Information Science or Computer Science streams only. Applicants apply before 15th October 2021.

Pooled Campus Drive 2021 batch Engineering / MCA freshers

कोरोनाकाळात अनेक कंपन्या डबघाईस आल्या, अनेक कंपन्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे. मात्र IT कंपन्यां  जोमात आहेत. यामुळे IT  कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात जॉब्स देण्यास सुरुवात केली आहे. Capgemini च्या Pooled Campus Drive द्वारे ही भरती घेण्यात येणार आहे. यासाठी 2021 ला ग्रॅज्युएशन पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.

या उमेदवारांना मिळणार संधी

 • 2021 मध्ये कोणत्याही शाखेतून BE/BTech मध्ये 50% पेक्षा जास्त गुण घेतलेल्या उमेदवारांना या पदभरतीसाठी संधी मिळणार आहे.
 • उमेदवार हे ME/MTech विद्यार्थी केवळ आयटी, माहिती विज्ञान किंवा संगणक विज्ञान प्रवाहातील असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी पूर्णवेळ ग्रॅज्युएशन करणं आवश्यक आहे.

अशी होणार निवड- Selection Process For Capgemini Pooled Campus Drive

या पदभरतीसाठी उमेदवारांची निवड करताना पाच राउंड्सम्डझे निवड केली जाणार आहे.

 • सुरुवातीला उमेदवारांची Technical Assessment घेतली जाणार आहे.
 • यानंतर Communication skills’ test घेतली जाणार आहे. यामध्ये MCQ फॉरमॅटमध्ये इंग्रजीविषयी प्रश्न विचारले जाणार आहेत.
 • यानंतर Game-based aptitude test घेण्यात येणार आहे.
 • यानंतर Behavioural profiling ही टेस्ट घेतली जाणार आहे.
 • या सर्व टेस्ट पास करून जे उमेदवार निवडले जातील अशा उमेदवारांची HR आणि टेक्निकल मुलाखत होणार आहे. पहिल्या तीन टेस्ट पास करणाऱ्या उमेदवारांना थेट मुलाखतीची संधी मिळणार आहे.

असं होणार ट्रेनिंग- Training Process For Capgemini Jobs 2021

 • भरती प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला केंद्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं 8-10 आठवड्यांचं ट्रेनिंग दिलं जाईल. यामध्ये उमेदवारांना विविध टेक्नॉलॉजीवर ट्रेनिंग दिलं जाणार आहे.
 • इनसाईट आणि डेटा
 • डिजिटल तंत्रज्ञान
 • एंटरप्राइझ Applicationप्लिकेशन सोल्यूशन्स
 • क्लाउड इन्फ्रा सेवा
 • वेब टेक्नॉलॉजी
 • टेस्टिंग
 • सिस्टम टेक्नॉलॉजी  या काही विषयांवर सुरुवातीला ट्रेनिंग दिलं जाणार आहे.

या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.


कॅपजेमिनी आयटी कंपनीत होणार मेगाभरती!

Capgemini IT company Recruitment 2020 : This IT Company will be recruiting around 15 thousand campus interviews. Currently Capgemini has offices in India with 1.2 million employees. This is more than half of the company’s worldwide workforce. The company is currently working on 5G technology and has started two centers in Paris and Mumbai, said Ashwin Yardi, chief executive officer of the company. Cognizant has also announced that it will recruit about 20,000 employees this year.

Capgemini Mega Bharti 2020

बेरोजगारी हे सध्या भारतातील सगळ्यांत मोठी समस्या आहे. अनेकांना पदव्या घेऊनही नोकरीच्या संधी नाहीत. आयटी क्षेत्रातही नोकरीच्या संधी हव्या तशा नसल्यामुळं सध्या चिंतेचं वातावरण आहे. त्यातच एका कंपनीनं मेगाभरती करण्याची घोषणा केली आहे.

माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील आघाडीची कॅपजेमिनी चालू वर्षात तब्बल 12 ते 15 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे. गेल्यावर्षी देखील कंपनीने कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून अनेक पदवीधरांची निवड केली होती. पदवीधरांची निवड करताना निवड झालेल्या विद्यार्थ्यांना किमान 3.8 लाख रुपयांचे वेतन देणार आहे. मात्र आयआयटी आणि एनआयटीच्या विद्यार्थ्यांना 6.5 लाख रुपयांपर्यत वार्षिक वेतन दिले जाते.
सध्या कॅपजेमिनीच्या भारतातील कार्यालयांमध्ये 1.2 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. ही संख्या कंपनीच्या जगभरातील एकूण कर्मचाऱ्यांच्या निम्म्याहून अधिक आहे. कंपनी सध्या 5 जी तंत्रज्ञानावर काम करत असून कंपनीने त्यासाठी पॅरीस आणि मुंबईत दोन केंद्र सुरू केली आहेत, अशी माहिती कंपनीचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन यार्दी यांनी दिली. कॉग्निझंटने देखील चालू वर्षात तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे.

सौर्स : सकाळ
2 thoughts on “Capgemini IT company Recruitment 2021”

Leave a Comment

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!