Kolhapur District Bharti 2020 Vacant Seats
कोल्हापूर जिल्हातील रिक्त पदांचा तपशील
Due to the lockdown various scheduled government recruitment will be postponed now. near about 5000 posts in various department will be filled soon. Below is the details of various department vacant seats. Due to the suspension given by the government, the recruitment of more than five thousand posts in the education sector has been cut short due to the Municipal Corporation providing facilities to the city dwellers, the police force maintaining law and order in the district, the Zilla Parishad working for providing facilities in rural areas. The problems has fallen on the employment of thousands of young people waiting for recruitment. There are 5,000 vacancies in the school and higher education department, 1,700 in the Zilla Parishad and 1,100 in the Municipal Corporation. This is likely to affect the work. Shikshak Bharti 3000 vacancies in education sector
5000 vacant seats in Kolhapur पाच हजार पदांच्या भरतीला कात्री
सरकारने नोकरभरतीला दिलेल्या स्थगितीमुळे शहरवासीयांना सुविधा देणारी महानगरपालिका, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलिस दल, ग्रामीण भागात सुविधा देण्यासाठी कार्यरत असलेली जिल्हा परिषद, शिक्षण क्षेत्रातील पाच हजारांहून अधिक पदांच्या भरतीला कात्री लागली आहे. भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या हजारो तरुणांच्या रोजगारावर ही कुऱ्हाड कोसळली आहे. शालेय व उच्च शिक्षण विभागात तीन हजार, जिल्हा परिषदेत १७०० तर महापालिकेत ११०० रिक्त पदे असून यामुळे कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Shikshak Bharti शिक्षण क्षेत्रात ३००० जागा रिक्त
शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासन विभागात सध्या २२४ जागा रिक्त असून विविध अधिविभागामध्ये १२१ प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. जिल्ह्यातील शालेय शिक्षकांच्या जवळपास १२०० जागा रिक्त आहेत. विद्यापीठाच्या अखत्यारितील कॉलेजांमध्ये १५०० प्राध्यापकांच्या रिक्त जागांवर नियुक्ती करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया स्थगित आहे. नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी शिक्षक, प्राध्यापकांच्या तसेच प्रशासनातील सर्व रिक्त जागा भरती करणे आवश्यक आहे
Mahanagarpalika Bharti महापालिकेत २० टक्के मनुष्यबळ कमी
कोल्हापूर : गेल्या चार वर्षांपासून महापालिकेच्या विविध विभागातील तब्बल १,१०० पदे रिक्त आहेत. पुढील काळात राज्य सरकारने नोकरभरती न करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. त्यामुळे आहे त्या पदांवरच महापालिकेचे कामकाज सुरू राहणार आहे. विविध विभागांमध्ये ५,५०० कर्मचाऱ्यांचे रोस्टर आहे. शहराचा विस्तार वाढल्यानंतरही रोस्टरमध्ये बदल झालेला नाही. त्याचवेळी वेळोवेळी निवृत्त झालेले तसेच अन्य सरकारी कार्यालयांत नियुक्ती झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांमुळे येथील पदे रिक्त राहिली. आस्थापना, पवडी, अग्निशमन, पाणीपुरवठा, आरोग्य, इस्टेट, परवाना, नगररचना, ऑडिट, अतिक्रमण अशा अनेक विभागातील प्रमुखांची पदे रिक्त आहेत. पदांचा कार्यभार अन्य विभागप्रमुख किंवा कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांवर सोपवला आहे.
ZP Bharti जिल्हा परिषदेत १७५० जागा कमी
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासह जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांमध्ये तब्बल १७५० जागा रिक्त आहेत. रिक्त जागांमुळे ग्रामीण विकासकामांवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. शिवाय प्रशासन गतिमान करण्यावरही मर्यादा येणार आहे. रिक्त जागेचा अतिरिक्त कार्यभार काही कर्मचाऱ्यांवर राहणार आहे. जि.प. आणि पंचायत समित्यांमध्ये क आणि ड वर्गाची एकूण १३ हजार ७७४ पदे मंजूर आहेत. यापैकी १२ हजार २४ जण कार्यरत आहेत. १७५० जागा रिक्त आहेत. नवे सरकार आल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू झाली. मात्र करोनाचा फैलाव वाढल्याने सरकार आर्थिकदृष्या संकटात सापडले. परिणामी नवीन भरतीला स्थगिती दिली. या रिक्त जागेच्या संख्येत सेवानिवृत्तीच्या संख्येची भर पडणार आहे.
Talathi, Lipik Bharti महसूलमध्ये लिपीक, शिपायांची कमतरता
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयास जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसील कार्यालयात लिपीक आणि शिपाई पदाच्या ९६ जागा रिक्त आहेत. जिल्हा, तालुका, गाव पातळीवरील महसूल विभागावर महत्वाच्या कामांची जबाबदारी असते. कोणतीही आपत्ती आली तरी हा विभाग आग्रभागी असतो. म्हणून या विभागात रिक्त जागा असल्यास त्यांचा फटका प्रशासकीय कामकाजावर होतो. सध्या जिल्ह्यातील महसूल प्रशासनात लिपिकांच्या २८८ जागा मंजूर आहेत. यापैकी २४१ जण कार्यरत आहेत. ४७ जागा रिक्त आहेत. शिपायाच्या १७४ जागा मंजूर आहेत. यापैकी १२५ जण कार्यरत आहेत. ४९ जागा रिक्त आहेत. अव्वल कारकूनच्या १४ जागा रिक्त आहेत. तलाठ्यांच्या रिक्त २१ जागेसंबंधीची भरती प्रक्रिया शेवटच्या टप्यात आहेत. बंदीआदेश येण्यापूर्वीच ही प्रक्रिया सुरू झाल्याने २१ ही तलाठ्यांच्या जागा भरण्यास कोणताही अडथळा येणार नाही.
Police bharti हवे आहेत आणखी २०० पोलिस
कोल्हापूर : जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाई पदाची २०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण वाढणार आहे. जिल्हा पोलिस दलात २९६२ कर्मचारी आहेत. यापैकी कोर्ट, सीपीआरसह अन्य सरकारी अधिकाऱ्यांच्या बंदोबस्तासाठी ३५० जणांचा बंदोबस्त आहे. जिल्ह्यात २६०० पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. दरवर्षी पोलिसांत निवृत्त होणाऱ्यांची संख्या २०० ते २५० इतकी आहे. नवीन भरतीही सुरू असते. २०१९ मध्ये ७८ जागांसाठी पोलिस भरती झाली. यावर्षी २५० पोलिस कर्मचारी निवृत्त झाले. त्यांच्या जागी अद्याप नवीन भरती झालेली नाही. काही पोलिसांचे आजापरण, अपघाती मृत्यू, काहीजणांना निलंबित केले आहे. त्याचा कामाचा जादा भार अन्य कर्मचाऱ्यांवर पडतो. या वर्षी भरती होणार नसल्याने बंदोबस्तावरील ताण आणखीन वाढणार आहे.
SPR सीपीआरला दिलासा
जिल्ह्यातील करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे उपलब्ध डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर अधिकचा भार येत असल्याने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात डॉक्टर, तंत्रज्ञ अशी ५८ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत. त्यासाठी राजर्षी शाहू सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर प्रशासनाने प्रक्रियाही सुरू केली आहे. आगामी तीन दिवसांत विविध पदावरील कर्मचारी रुजू होणार आहेत. करोनाची साथ असेपर्यंत भरती केलेल्या डॉक्टरांना ठोक मानधन दिले जाणार आहे. करोना तपासणीसाठी सीपीआरमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. मनुष्यबळाची उणीव भासत असल्याने तत्काळ नोकर भरतीची प्रक्रिया करण्यात आली. डॉक्टर आणि तंत्रज्ञांची निवड गुणानेक्रमाने केली गेली आहे. कान, नाक, घसा तज्ज्ञ, एमडी मेडिसिन, अॅनॅस्थेटिस्ट, एम. डी. चेस्ट, रेडिओलॉजिस्ट, मायक्रोबॉयोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), समोपदेष्ठा, समाजसेवा अधीक्षक, प्रयोगशाळा, ईसीसी, एक्स रे तंत्रज्ञ अशी ही पदे आहेत.
सौर्स : मटा