CBSE १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर

CBSE 10th Result 2020 – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या यंदाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षेचा निकाल आज बुधवार १५ जुलै रोजी जाहीर केला जाणार आहे. केंद्रीय मनुष्यभळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ यांनी ट्विटरवर ही घोषणा केली. या निकालाची लिंक आम्ही थोड्याच वेळात येथे प्रकाशित करू.

दंगलीमुळे दिल्लीच्या काही भागांत पूर्ण न झालेली ही परीक्षा पुन्हा घेतली जायची होती. पण नंतर ती रद्द केली गेली. सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयाला सांगितल्याप्रमाणे १५ जुलै किंवा त्यापूर्वी सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर केला जाणार होता.
निकाल पाहण्यासाठी वेबसाईट – www.cbseresults.nic.in, www.results.nic.in.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) चा दहावीचा निकाल दि. १५ जुलैला २०२० रोजी जाहीर होणार आहे. अशी माहिती आज सीबीएसई बोर्डाने दिली आहे. हा निकाल बोर्डच्या मुख्य cbse.nic.in ही वेबसाईट तसेच cbseresults.nic.in या दोन्ही वेबसाईटवर पाहता येणार आहे.

Leave a Comment