CBSE Board Exam 2021-Latest Update

CBSE Board Exams 2021

The Central Government has taken an important decision regarding the Central Board of Secondary Education CBSE Board Examinations. CBSE Board Class X examinations have been canceled for this academic year, while Class XII examinations have been postponed immediately.

CBSE बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा स्थगित

CBSE 10th 12th Exams 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी रद्द करण्यात आल्या आहेत, तर बारावीच्या परीक्षा तूर्त स्थगित करण्यात आल्या आहेत.

वाढत्या कोविड-१९ संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून होत होती आज बुधवारी दुपारी एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. यानंतर या निर्णयाची घोषणा करण्यात आली.


CBSE Board Exam 2021 – दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा मंगळवार, ४ मे २०२१ पासून

CBSE – दहावी, बारावी बोर्डाचे वेळापत्रक जाहीर; करा डाउनलोड

CBSE Board Exam Date Sheet 2021 : CBSE Class 10th and 12th examination schedule has been announced. The 10th and 12th board exams will be held from May 4 to June 10. Papers will be checked in time after the end of the board exams. Union Education Minister Ramesh Pokhriyal Nishank has released the date sheet. He had also said that he would try to announce the results by July 15.  Read the more details below:

CBSE 10th Class Time Table

CBSE 12th Class Time Table
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी डेटशीट प्रसिद्ध केली आहे. रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं की, महत्त्वाच्या विषयांच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळेल याचा प्रयत्न केला आहे.  सीबीएसईच्या बोर्ड परीक्षेची डेटशीट पाहण्यासाठी बोर्डाच्या अधिकृत cbse.gov.in या संकतेस्थळाला भेट द्या. त्यावरून डेटशीट डाउनलोड करता येते. वेबसाइटवर गेल्यानंतर अपडेट सेक्शनमध्ये डेटशीटवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा क्लास सिलेक्ट करा. त्यानंत तुमची डेटशीटची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

शिक्षण मंत्र्यांनी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांची तारीख आधीच जाहीर केली आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 4 मे ते 10 जून या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. परीक्षेच्या तारखांची घोषणा जाहीर केल्यानंतर आता वेळापत्रकही प्रसिद्ध केलं आहे. सीबीएसईने गणित, सामाजिक विज्ञान, विज्ञान यांसह इतर विषयांसाठी दहावीचे नमुन्याचे पेपर वेबसाइटवर जाहीर केले आहेत. यंदा बोर्ड परीक्षेसाठी मंडळाने दहावीचा अभ्यासक्रम तब्बल 30 टक्के कमी केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिघडलेलं शेड्युल आणि त्यात अभ्यासक्रम पूर्ण करणं शक्य नसल्यानं हा निर्णय घेतला गेला. ऑनलाइन वर्ग सुरु असले तर कठीण संकल्पना समजण्यासाठी अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही याची काळजी अभ्यासक्रम वगळताना घेण्यात आली आहे. परीक्षा होण्याआधीच निकालाबाबतही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. पोखरियाल म्हणाले होते की, बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर वेळेत पेपर तपासले जातील. तसंच निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं होतं.


CBSE बोर्डाने जारी केले महत्त्वाचे परिपत्रक

CBSE 10th 12th Datesheet: As per the notice published by CBSE Board written exam of 10th and 12th class will be start from 4th May 2021 to all over country. Read the details given below:

बोर्ड परीक्षा २०२१ चे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात मंडळाने एक परिपत्रक जारी केले आहे. सीबीएसईने बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक, तारीखपत्रक व त्यातील काही इतर सावधगिरीबाबतची माहिती दिली आहे. त्याचा तपशील आणि बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकाची लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे.

  1. परिपत्रकात असे म्हटले आहे की सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा मंगळवार, ४ मे २०२१ पासून देशभर सुरू होतील. तर सर्व सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा १ मार्च २०२१ पासून दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा (सीबीएसई प्रॅक्टिकल परीक्षा) घेऊ शकतात. परंतु बोर्डाने लेखी परीक्षा सुरू करण्यापूर्वी शाळांना त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा, प्रोजेक्ट आणि अंतर्गत मूल्यांकन पूर्ण करावे लागेल.
  2. सीबीएसईने म्हटले आहे की दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा २०२१ चे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होईल. २८ जानेवारी रोजी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मुख्याध्यापकांना सांगितले होते की बोर्ड ०२ फेब्रुवारी २०२१ रोजी वेळापत्रक जारी करेल.
  3. या परिपत्रकामध्ये सीबीएसईने सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि इतर संबंधितांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंडळाने म्हटले आहे की परीक्षेसंदर्भात कोणतीही माहिती सीबीएसई वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध केली जाईल. कोणत्याही सोशल मीडिया पोस्टवर किंवा कोणत्याही प्रकारच्या फॉरवर्डेड मेसेजवर विश्वास ठेवू नका.

सीबीएसई परीक्षा सूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

CBSE Board Exam 2021

CBSE Board Exams 2021:: The date of the Central Board of Secondary Education’s 10th and 12th examinations will be announced on December 31. Education Minister Ramesh Pokhriyal has clarified that CBSE Board’s 10th and 12th board examinations will be held only after February 2021. This information was given by Union Education Minister Ramesh Pokhriyal Nishank. Pokhriyal tweeted this information. He himself will announce the dates of the CBSE 10th and 12th examinations at 6 pm.

CBSE Board Exams 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखेची घोषणा ३१ डिसेंबर रोजी केली जाणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली.

पोखरियाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ते स्वत: सायंकाळी ६ वाजता सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांच्या तारखांची घोषणा करणार आहेत. ही माहिती मिळताच काही विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्र्यांना आग्रह केला की परीक्षेसाठी त्यांना अजून काही कालावधीची गरज आहे. काही विद्यार्थ्यांनी परीक्षा एप्रिल-मेपर्यंत घेऊ नयेत अशीही मागणी केली आहे. काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की अद्याप त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही.

यापूर्वी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी हे स्पष्ट केलं आहे की सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी २०२१ नंतरच आयोजित केल्या जाणार आहेत. दरम्यान, बोर्ड परीक्षांच्या तारखा अद्याप स्पष्ट झालेल्या नसल्याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी प्रिलिम परीक्षा आयोजित केल्या आहेत.


 जानेवारीत होणाऱ्या CBSE बोर्डाच्या परीक्षेबाबत केंद्राचा मोठा निर्णय

CBSE Board Exam 2021-Latest Update: The central government has taken a big decision against the backdrop of coronavirus infection. It has been decided to postpone the CBSE board exams to be held in January-February. This information was given by Union Education Minister Dr. Ramesh Pokhriyal Nishank. He also said that the new dates of the exam will be announced soon.

कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय गेतला आहे. जानेवारी – फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉक्टर रमेशन पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली. परीक्षेच्या नव्या तारखांची माहिती लवकरच देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.

केंद्रीय मंत्री डॉक्टर रमेश पोखरियाल निशंक यांनी शिक्षकांसोबत संवाद साधला. यामध्ये ऑनलाइन शिक्षण, बोर्ड परीक्षा, प्रवेश परीक्षा, मूल्यांकनाचे स्वरुप, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि शिक्षणासंबंधी इतर मुद्यांवर सविस्तर चर्चा केली. या शिक्षण संवादात देशातील हजारो शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. शिक्षणाच्या विविध मुद्द्यांवर अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांची उत्तरे केंद्रीय मंत्र्यांनी दिली.कोरोनाच्या संकटकाळातही केंद्रीय मंत्र्यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि इतरांसोबत वेळोवेळी संवाद साधला आहे. या कठीण काळात सर्वांनाच प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं.

 कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षण सुरु करण्यात आलं. तेव्हा आता परीक्षासुद्धा ऑनलाइन होणार का ? असे विचारले असता केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी परीक्षा ऑफलाइनच होतील असं सांगितलं. कारण अजुनही शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचलेलं नाही. अनेक मुलं अशी आहेत ज्यांच्याकडे इंटरनेट, स्मार्टफोन, लॅपटॉप, कॉम्प्युटरची सुविधा नाही. अशा परिस्थितीत बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन घेणं शक्य नाही.

 बोर्डाच्या परीक्षेआधी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षांबाबतही यावेळी विचारलं गेलं. एका शिक्षकाने प्रश्न उपस्थित करताना म्हटलं की, मुलांची नवीन पॅटर्नशी ओळख होण्यासाठी काही काळ शाळांमध्ये पूर्व परीक्षेचं आयोजन करता येईल का? यावर केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर देताना सांगितलं की, परीक्षा फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. दोन महिन्यांचा अतिरिक्त वेळ आधीच मिळाला आहे. यावेळेचा उपयोग करून मुलांना नव्या पॅटर्नची ओळख करून देता येईल. यासाठी पुर्व परीक्षेची गरज नाही.


CBSE बोर्डाची १०वीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच होणार

CBSE Board Exam 2021 : A few days back, it was clarified by the CBSE board that the Class X examination will be conducted offline. The board is currently preparing for this. The CBSE board had successfully passed the supplementary examination during the Corona period. This year, due to the Corona crisis, the schedule of educational courses across the country has collapsed. In most states, schools and colleges have not yet started. Therefore, the question of how to pass the 10th and 12th exams, which are an important stage in the academic life of students, has come up to many. Against the backdrop of Corona, the state government is likely to postpone the 10th and 12th exams. State Education Minister Varsha Gaikwad has informed about this. Varsha Gaikwad had said that the government was considering holding the 12th exam in February in April and the 10th exam in March in May.

कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडल्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार CBSE बोर्डाची दहावीची परीक्षा नेहमीप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच होणार आहे. सीबीएसई बोर्डाचे परीक्षा नियंत्रक सनम भारद्वाज यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यासाठी बोर्डाकडून सध्या तयारी सुरु आहे. कोरोना काळात सीबीएसई बोर्डाने पुरवणी परीक्षा यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. यंदा कोरोना संकटामुळे देशभरातील शैक्षणिक अभ्यासक्रमाचे वेळापत्रक कोलमडले आहे. बहुतांश राज्यांमध्ये अजूनही शाळा आणि महाविद्यालये सुरु झालेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा पार पडणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दहावीच्या प्रॅक्टिकल परीक्षांसाठी शाळा लवकर उघडण्याचे संकेत सीबीएसई बोर्डाने दिले आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी पूर्ण वेळ दिला जाईल. एरवी सीबीएसई बोर्डाच्या प्रॅक्टिकल परीक्षा या साधारण दीड महिना चालतात. मात्र, यंदा या परीक्षांसाठी दोन महिन्यांपेक्षा अधिक वेळ लागू शकतो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता आहे. याबाबत स्वतः राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. सरकार कोरोनाचा विचार करता फेब्रुवारीत होणाऱ्या १२वीच्या परीक्षा एप्रिलमध्ये आणि मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्यावर विचार करत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते.

यापूर्वी राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑक्टोबरमध्ये होणारी एटीकेटी परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. वर्षा गायकवाड यांनी स्वतः याबाबत माहिती दिली होती. दरवर्षी दहावी, बारावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेतली जाते.

सौर्स : मटा


CBSE Board Exams 2021: The Central Board of Secondary Education (CBSE) has clarified that the 10th and 12th examinations will be held in offline mode. So this exam is not likely to be done online. The Board has also made it clear that options will be made available to students who are unable to take the practical test. Read More details below..

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच (Offline mode) होणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या परीक्षा ऑनलाइन होण्याची शक्यता नाही. बोर्डाने हेही स्पष्ट केल ेआहे की जे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध केला जाईल.

सीबीएसई बोर्डाने एक निवेदन जारी केलं आहे. यात म्हटलंय की, ‘बोर्डाच्या परीक्षा जेव्हा होतील तेव्हा त्या लेखी आणि ऑफलाइन पद्धतीनेच होतील. ऑनलाइन पद्धतीने होणार नाहीत. कोविड प्रोटोकॉल पाळून परीक्षांचे आयोजन केले जाईल.’ मात्र परीक्षा नेमक्या कधी घेतल्या जातील, याबाबत बोर्डाने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. संबंधितांशी विचारविनिमयाची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचे बोर्डाने सांगितले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालय शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांशी १० डिसेंबर रोजी परीक्षांसंदर्भात संवाद साधणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

सीबीएसईच्या दहावी, बारावी परीक्षा सर्वसामान्य परिस्थितीत दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात घेतल्या जातात. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. आतापर्यंत विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. विविध विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा कशा होणार याबाबत शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषत: बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी अधिक चिंतेत आहेत, कारण त्यांना प्रात्यक्षिक परीक्षेसाठी ३० गुण असतात.

दरम्यान, बोर्डाने यापूर्वीच परिस्थिती लक्षात घेऊन ३० टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. मात्र, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी कोणताही बदल नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. दिल्ली सरकारने आणखी अभ्यासक्रम कमी करण्याचीही मागणी केली होती. दुसरीकडे, बोर्डाने पेपर पॅटर्न बदलत विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. एमसीक्यू प्रश्नांवर यंदा अधिक भर दिला जाणार आहे.

सोर्स: म. टा.

Leave a Comment