CBSE Exam 2020 Results Date

CBSE Exam 2020 Results Date

सीबीएसईचा निकाल तारीख, पेपरतपासणीला सुरूवात

CBSE Exam Results – The CBSE has announced to conduct the remaining examinations for Class X and XII from July 1 to July 15. The 12th exam will be held across the country, while the 10th exam will be held only in Northeast Delhi. The board will soon release a detailed schedule of these examinations. The paper examination and the rest of the examinations were postponed on March 18 due to the lockdown situation caused by the corona virus across the country.

सीबीएसई बोर्डाने सुरू केले नवे हेल्पलाइन क्रमांक

केंद्रीय मनुष्यबळ मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल निशंक यांनीही बोर्डाच्या प्रतींच्या तपासणीसंदर्भात माहिती दिली. सीबीएसईच्या दहावी-बारावी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन मंगळवार, १२ मे २०२० पासून सुरू झाले आहे. सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या लॉकडाऊनच्या आधी झालेल्या परीक्षांची मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली आहे. करोना व्हायरसमुळे १८ मार्च रोजी या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम सुरू झाले आहे. ज्या विषयांच्या परीक्षा लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधी झाल्या होत्या, त्या विषयांच्या उत्तरपत्रिका तपासल्या जात आहेत.

दीड कोटी उत्तरपत्रिकांसाठी ३,००० केंद्रे

मंडळाच्या सुमारे दीड कोटी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन शिल्लक आहे. यासाठी देशभरातील तीन हजार सीबीएसई शाळांना परीक्षा केंद्र करण्यात आले आहे. ९ मे रोजी गृह मंत्रालयाने या तीन हजार शाळांमध्ये मूल्यांकन सुरू करण्यास विशेष परवानगी दिली. कंटेनमेंट क्षेत्रे वगळता इतरत्र शिक्षकांना या मूल्यांकन कामाशी जोडण्यात आले आहे.

CBSE Results 2020 निकाल कधीपर्यंत?

सीबीएसईने १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. १२ वीची परीक्षा संपूर्ण देशात घेण्यात येणार आहे, तर दहावीची परीक्षा फक्त ईशान्य दिल्लीत होईल. लवकरच बोर्ड या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रकही प्रसिद्ध करणार आहे. अशी शक्यता वर्तवण्यात ये आहे की बोर्ड जुलैच्या अखेरीस दहावी-बारावीचा निकाल जाहीर करेल. करोना विषाणूमुळे देशभरात निर्माण झालेल्या लॉकडाऊन स्थितीमुळे पेपर तपासणी आणि उर्वरित परीक्षा १८ मार्च रोजी स्थगित करण्यात आल्या होत्या.

सौर्स : मटाLeave a Comment