CBSE Exam 2020 Time Table Declared

CBSE Exam 2020 Time Table Declared

CBSE 12th Exam 2021: सीबीएसई बारावीचा पेपर पॅटर्न बदलला

CBSE board exam 2021 question paper pattern: The CBSE has already decided to reduce the syllabus by 30 per cent for the 10th and 12th board exams to be held in 2021. The decision was taken due to Kovid-19 and delay in the academic session. Now the board has also changed the pattern of question papers for next year’s exams. Read the complete details carefully given below:

सीबीएसईने २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी ३० टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. कोविड -१९ आणि शैक्षणिक सत्राला विलंब या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. आता बोर्डाने पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नमध्येही बदल केला आहे. २०२१ च्या परीक्षेसाठी बोर्डाने नमुना प्रश्नपत्रिका पाठविल्यानंतर शाळांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

  • शाळांनी असे म्हटले आहे की बारावीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये यावेळी बहुपर्यायी प्रश्नांना (एमसीक्यू) गुणात्मक दृष्ट्या जास्त महत्त्व दिले गेले आहे. त्याचबरोबर केस स्टडी आधारित प्रश्नांचे वेटेजही वाढले आहे.
  • दहावी व बारावीच्या नमुना प्रश्नपत्रिका जारी झाल्यानंतर शाळांनी माहिती दिली की बहुपर्यायी प्रश्नांचे वेटेज १० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. पूर्वी जिथे ज्ञान आधारित प्रश्न विचारले जात असत, त्याऐवजी बोर्ड आता अंडरस्टँडिंग आणि अॅप्लिकेशन बेस्ड प्रश्नांकडे वळत आहे.
  • भौतिकशास्त्रासारख्या विषयात विचार कौशल्य (thinking skills) आणि तर्क आधारित (reasoning) प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच वेळी, जीवशास्त्रातील एमसीक्यूची जागा लघुत्तरी प्रश्नांनी घेतलीली आहे. गणितांमध्ये प्रश्नांची संख्या ३६ वरून ३८ करण्यात आली आहे.

Few Main Changes in CBSE Exam Pattern हे आहेत मुख्य बदल –

  • MCQ प्रश्नांना अधिक महत्त्व.
  • इंग्रजीत सुमारे ५० टक्के प्रश्न एमसीक्यू प्रकारचे.
  • गणित आणि फिजिक्स मध्ये केस स्टडी बेस्ड प्रश्न.
  • फिजिक्समध्ये अॅसर्शन, रिजनिंग बेस्ड प्रश्न.
  • बायोलॉजीमध्ये एमसीक्यूऐवजी एकेका गुणांचे लघुत्तरी प्रश्न. या प्रश्नांची संख्या ५ वरून वाढवून १४ करण्यात आली आहे.
  • इकॉनॉमिक्समध्ये एमसीक्यू प्रश्नांची संख्या ८ वरून २० करण्यात आली आहे.

सीबीएसईच्या 12 वी च्या प्रॅक्टिकल परीक्षांच्या तारखा जाहीर

CBSE Exam Practical Dates Declared : According to the information released by CBSE, the practical exams of 12th 2021 will be held from January 1 to February 8. Meanwhile, the CBSE has said that these dates are possible. It was also clarified that instructions regarding fixed dates will be issued on the official website soon on behalf of the board. Examination rules have also been issued along with the dates.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्यूकेशनने 12वीच्या प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईने जारी केलेल्या माहितीनुसार, 12 वी 2021 च्या प्रॅक्टिकल परीक्षा 1 जानेवारी ते 8 फेब्रुवारीदरम्यान घेण्यात येणार आहेत. दरम्यान, या तारखा संभाव्य असल्याचे ही सीबीएसईच्या वतीने सांगण्यात आलं आहे. तसेच बोर्डाच्या वतीने निश्चित तारखांसंदर्भातील सूचना लवकरच अधिकृत वेबसाइटवर जारी केल्या जातील, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तारखांसोबतच परीक्षांची नियमावलीही जारी केली आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात याव्यात यासाठी सीबीएसई बोर्डाने नियमावली जारी केली आहे. ज्यामध्ये प्रॅक्टिकल परीक्षांसाठी एक ऑब्जर्वर देखील नेमण्यात येणार आहे. हा ऑब्जर्वर प्रॅक्टिकल परीक्षा आणि प्रोजेक्ट्सच्या मूल्यांकनावर लक्ष्य ठेवणार आहे.

माहितीनुसार, गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीही प्रॅक्टिकल परीक्षांमध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन्हीही परीक्षक असणार आहेत. तसेच सीबीएसई बोर्डाने नियुक्त केलेल्या या एक्सटर्नल एग्झामिनर्सकडूनच प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याची जबाबदारी संबंधित शाळांचीच असेल. यंदा सर्व शाळांना एक लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या लिंकवर शाळांना प्रत्येक विद्यार्थ्यांचे गूण अपलोड करावे लागणार आहेत. प्रॅक्टिकल परीक्षा आणि प्रोजेक्ट मूल्यांकनाचे काम संबंधित शाळांमध्येच पार पडणार आहे.

सीबीएसई 10वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा लवकरचं जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती बोर्ड सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मार्च महिन्यात सुरु झाले. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही परिणाम झाला. त्यामुळे सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाचे पेपर नेमके कधी होणार? याबाबत विद्यार्थ्याना प्रश्न पडला होता. मात्र यावर बोर्ड सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांनी याबाबतच वेळापत्रक लवकरच जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे.


CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

The Central Board of Secondary Education (CBSE) on Friday announced that from 22 to 29 September there will be supplementary examinations for 10th and 12th classes along with optional exams for students seeking to improve marks in class 12th examinations.

 फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर…

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने दहावी आणि बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षा म्हणजेच फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बोर्डाने आपले अधिकृत संकेतस्थळ cbse.nic.in वर दोन्ही इयत्तांच्या परीक्षांचे स्वतंत्र वेळापत्रक जारी केले आहे

यावर्षी दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा २२ सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. इयत्ता दहावीची परीक्षा २२ सप्टेंबर २०२० ते २८ सप्टेंबर २०२० या कालावधीत घेतली जाणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २२ सप्टेंबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत होईल.

संपूर्ण वेळापत्रक या वृत्ताच्या अखेरीस देण्यात येत आहे. दहावी आणि बारावीच्या स्वतंत्र लिंक्स आहेत. या लिंकवर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाऊनलोड करू शकतात.

दरम्यान, या परीक्षांना विद्यार्थी-पालकांकडून जोरदार विरोध होत आहे. या परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कोविड-१९ महामारी काळात विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालून परीक्षा घेतल्या जाऊ नयेत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात शुक्रवारी ४ सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणीदेखील झाली. न्यायालयाने सीबीएसईला ७ सप्टेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होणार आहे.

CBSE Exam 2020 Time Table : CBSE declared the 10th & 12th Exam 2020 Time Table declared now. Union Manpower Development Minister Ramesh Pokhriyal Nishank has announced the schedule of CBSE board exams on Twitter. With the announcement of the schedule for the remaining subjects, the students are now breathing a sigh of relief. Due to the Corona crisis, some Central and Board of Secondary Education (CBSE) 10th and 12th standard examinations could not be held. However, now the remaining subjects will be examined. On Monday, May 18, the CBSE Board has announced the schedule of examinations for the remaining subjects of Class X and XII.

CBSE Exam 2020 Time Table

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी ट्विटरवरुन सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. उर्वरित विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने आता विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. कोरोना संकटामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी आणि बारावीच्या काही विषयांच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. मात्र, आता या उर्वरित विषयांच्या परीक्षा होणार आहेत. सोमवारी, 18 मे रोजी सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

CBSE 10th Exam 2020 Time Table

CBSE 12th Exam 2020 Time Table

सौर्स : डेलिहंट
Leave a Comment