Civil Hospital Aurangabad Bharti 2020

Civil Hospital Aurangabad Bharti 2020

जिल्हा सामान्य रुग्णालया औरंगाबाद मध्ये लवकरच भरती

Civil Hospital Aurangabad Recruitment 2020 : As per the news Jilha Samanya Rugnalay Aurangabad recruiting the doctors very soon. Doctors and Nurse various posts are still vacant in the hospital. The hospital new appointments will include 2 MD doctors, 22 MBBS doctors and 40 nurses. All the new doctors are going to be taken in private and most noteworthy is that most of the doctors in the district hospitals are MBBS less and specialists are more. As a result, there are more and more specialist doctors who serve corona patients. It is understood that the appointment of fourth grade employees will be done in a contractual manner.

औरंगाबाद महापालिकेत तब्बल १५६ पदे रिक्त

Civil Hospital Aurangabad Recruitment 2020

चिकलठाणा परिसरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाला मागेच स्वतंत्र ‘कोव्हिड १९ हॉस्पिटल’ म्हणून जाहीर करण्यात आले असून, करोना बाधित व संशयितांचे स्क्रिनिंग करणे, स्वॅब घेणे, संशयितांना आयसोलेशन वॉर्डात दाखल करून उपचार सुरू करणे; तसेच पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास संबंधित रुग्णांवर गरजेनुसार विविधांगी उपचार करण्यात येत आहेत. त्यासाठीच जिल्हा रुग्णालयातील दैनंदिन निदान-उपचार बंद करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत संपूर्ण हॉस्पिटल हे करोनाबाधित व करोना संशयितांसाठी कार्यरत झाले आहे. मात्र एकीकडे बाधित व संशयितांची रुग्णसंख्या वाढत असतानाच आहे दुसरीकडे मे व जून महिन्यात रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच सध्या संपूर्ण जिल्हा रुग्णालयाची टीम करोनाशी युद्ध करण्यासाठी दिवस-रात्र झटत आहे आणि तरीदेखील रुग्णसेवा देणाऱयांचे हात कमी पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच करोनाचे संकट आणखी गहिरे झाले तर रुग्णसेवा करणारे हात अपुरे पडू नयेत म्हणूनच तीन महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने डॉक्टर, परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांची नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. करोनाच्या वाढत्या संकटामध्ये प्रभावी रुग्णसेवा देण्यासाठी अधिकाधिक तज्ज्ञांचे हात सज्ज करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये लवकरच ६४ डॉक्टर; तसेच परिचारिकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती होणार आहे. या संबंधीचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे पाठवण्यात आला असून, येत्या काही दिवसांत नवीन डॉक्टर-परिचारिका रुग्णसेवेसाठी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा केली जात आहे.

जिल्हा रुग्णालयातील नवीन नियुक्तीमध्ये दोन एमडी डॉक्टर, २२ एमबीबीएस डॉक्टर तसेच ४० परिचारिकांचा समावेश असणार आहे. सर्व नवीन डॉक्टर खासगीतून घेण्यात येणार आहेत आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे जिल्हा रुग्णालयातील बहुतांश डॉक्टर हे प्लेन एमबीबीएस कमी व स्पेशालिस्ट जास्त आहेत. त्यामुळे करोनाच्या रुग्णांना सेवा देणारे अधिकाधिक तज्ज्ञ डॉक्टर आहेत, हेही समोर आले आहे. तसेच कंत्राटी पद्धतीनेच काही प्रमाणात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांचीही नियुक्ती होणार असल्याचे समजते.

जिल्हा हॉस्पिटलसाठी लवकरच नवीन डॉक्टर, परिचारिकांची नियुक्ती होणार आहे व तसा प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे पाठवण्यात आला आहे. सर्व नवीन ‘टीम’ रुग्णालयात लवकरच उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

– डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक व नोडल ऑफिसर

म. टा.
2 thoughts on “Civil Hospital Aurangabad Bharti 2020”

Leave a Comment