Colleges will be started from 1st November

Colleges will be started from 1st November

राज्यात १ नोव्हेंबरपासून महाविद्यालये सुरु, ऑनलाइन वर्ग घेण्यास परवानगी

Important News for Student in Maharashtra State. Colleges in the state will start from 1st November. However, offline classes are not allowed yet and the education of college students will continue from online classes, said Higher Education Minister Uday Samant.  More details are given below :

राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यातील महाविद्यालये १ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत. पण अद्याप ऑफलाइन वर्गास परवानगी नसून ऑनलाइन वर्गातूनच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहणार असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. त्यामुळे कॉलेज सुरु होणार असली तरी प्रत्यक्ष वर्ग उघडण्यासाठी आणि आपल्या मित्र परिवाराला भेटण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढील सुचनेची वाट पाहावी लागणार आहे.

  • कॉलेजमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्याबाबत करोनाची स्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीशी चर्चा करुन कॉलेज प्रत्यक्ष उघडण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे उदय सामंत म्हणाले. पण सध्याच्या परिस्थितीत ऑफलाइन वर्ग सुरु करणे ही रिस्क असल्याचेही ते म्हणाले.
  • सर्वांनाच अद्याप COVID19 चा पहिला डोस मिळाला नाही. केवळ १७ ते १८ टक्के जणांनाच दुसरा डोस मिळाला आहे. जेव्हा संपूर्ण विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण होतील त्यावेळी ऑफलाइन वर्ग सुरु केले जातील असे शिक्षणमंत्री यावेळी म्हणाले.
  • कोविड सेंटर म्हणून अनेक वसतिगृह घेण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाकडून त्याचा आढावा घेतला. अनेक वसतिगृह अद्यापही कोविड सेंटर म्हणून आहेत. त्यात करोना रुग्ण संख्या वाढते आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये आढावा घेऊनच कॉलेजचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.
  • दरम्यान, देशात अनेक राज्यांमध्ये महाविद्यालये सुरू झाली आहेत किंवा सुरू होण्याच्या तयारीत आहेत. दिल्ली विद्यापीठात ५० टक्के क्षमतेसह १५ सप्टेंबरपासून वर्ग सुरू होणार आहेत.
  • १५ सप्टेंबरपासून पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के क्षमतेसह ग्रंथालय, प्रयोगशाळा, वर्ग खोली उघडण्याचे आदेश विद्यापीठाने दिले आहेत. केरळमध्येही तांत्रिक, पॉलिटेक्निक आणि मेडिकलसह सर्व उच्च शिक्षण संस्थांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ४ ऑक्टोबरपासून संस्था सुरू होणार आहेत.

College Filling in shifts

महाविद्यालय शिफ्टमध्ये भरणार : संजय धोत्रे

College Open now : The importance of online education is going to increase in the coming period. For this, the central government and educational institutions will have to take initiatives for digital infrastructure. Colleges will have to be shifted in shifts for social distance, said Union Minister of State for Manpower Development Sanjay Dhotre.

College Open now

पुणे – येत्या काळात ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व वाढणार आहे. त्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकार आणि शिक्षण संस्थांना पुढाकार घ्यावा लागेल. सोशल डिस्टन्सिंगसाठी महाविद्यालये शिफ्टमध्ये भरवावी लागतील, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मांडले.
असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूलच्या पुणे शाखेने (एआयएमएस) “शिक्षण पद्धती’ या विषयावर वेबिनार आयोजित केला होता. त्यामध्ये तिरुचिरापल्ली आयआयएमचे संचालक भीमराया मेत्री, वेलींगकर इन्स्टिट्यूटचे संचालक उदय साळुंके, पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, इनक्‍युबेशन सेंटरच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक संजय चोरडिया, डी. वाय. पाटील, डॉ. गणेश राव, श्रीराम नेर्लेकर, भरत अग्रवालसह आदी सहभागी झाले.
संजय धोत्रे म्हणाले, “करोना’चे संकट कधी संपेल हे माहिती नाही. त्यामुळे अंदाज बांधत आपल्याला नियोजन करावे लागेल. काहीवेळा नियोजनात बदलही करावा लागेल. त्यामुळे वर्षभराचे शैक्षणिक वेळापत्रकही बदललेले असेल. अशा परिस्थितीत 40 टक्‍क्‍यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण करावे लागेल.

संस्थाचालकांची भूमिका

  • – ऑनलाइन प्रवेशपद्धत राबवावी.
  • – डिजिटलसाठी पायाभूत सुविधेचे आव्हान.
  • – शैक्षणिक कर्ज मिळण्यात सुलभता यावी.
  • – अभ्यासक्रमांच्या मान्यतेस दोन वर्षांची वाढ करा.

सौर्स : सकाळ

Leave a Comment