CRPF Bharti 2021

CRPF Bharti 2021 Updates

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CRPF) १ लाख पदे रिक्त

CRPF Bharti 2021 : सीमा सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) एक लाखापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. या जागा रिक्त राहण्याचे मुख्य कारण म्हणजे सेवानिवृत्ती, राजीनामे आणि मृत्यू. ही माहिती सोमवारी राज्यसभेत देण्यात आली.

Police Bharti Exam Tricks

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, बीएसएफमध्ये सर्वात जास्त २८,९२६, सीआरपीएफमध्ये २६,५०६, सीआयएसएफमध्ये २३,९०६, सशस्त्र सीमा बलात १८,६४३, आयटीबीपीमध्ये ५,७८४ आणि आसाम रायफल्समध्ये ७,३२८ जागा रिक्त आहेत. सीएपीएफ आणि आसाम रायफल्समधील रिक्त जागा या सेवानिवृत्ती, राजीनामे, मृत्यू, नव्या जागांची निर्मिती, केडर रिव्ह्यूज आदी कारणांमुळे आहेत. यातील बहुतांश जागा या कॉन्स्टेबल ग्रेडच्या आहेत, असे त्यांनी उत्तरात म्हटले.

मेगा पोलीस भरती होणारच ! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा

राय म्हणाले, सीएपीएफमधील रिक्त जागा भरण्याची एक प्रक्रिया थेट भरती, बढती आणि प्रतिनियुक्ती अशी आहे. रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने वेगाने पावले उचलली आहेत व ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. सध्या कॉन्स्टेबल्सच्या ६०,२१०, उपनिरीक्षकांच्या २,५३४ जागा भरण्याचे काम कर्मचारी निवड आयोगामार्फत आणि ३३० सहायक कमांडंटस्च्या जागा भरण्याचे काम केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सुरू आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2020


CRPF Bharti 2021 – 1412 Posts

CRPF १,४१२ हेड कॉन्स्टेबलपदांची मेगाभरती

CRPF Recruitment 2020 : CRPF published an advertisement for the recruitment of Head Constable posts. There are total 1412 posts available for Head Constable. Online Application Last date is 6th March 2020. Complete details regarding this recruitment are given below.

CRPF Recruitment 2020

केंद्रीय राखीव पोलीस बलात हेड कॉन्स्टेबल पदासाठी मोठी भरती होणार आहे. तब्बल १,४१२ पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची अखेरची मुदत ६ मार्च २०२० आहे.

पुरुषांसाठी अशी आहेत पदे –

  • सर्वसामान्य गट – १,०३१
  • एससी गट – २००
  • एसटी गट – १००

महिलांसाठी अशी आहेत पदे –

  • सर्वसामान्य गट – ६३
  • एससी गट – १२

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून १२ वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – कमाल वय ३२ वर्षे.

पगार – २५,५०० ते ८१,१०० रुपये.

अर्ज कसा करावा? How to Apply to CRPF

  • हेड कॉन्स्टेबर पदांसाठी अर्ज करण्यासाठी crpf.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे आणि ऑनलाइन अर्ज भरावा.
  • कशी होणार निवड?
  • लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी, मेरिट लिस्ट अशा विविध निकषांवर निवड केली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना LDCE कोर्स करावा लागेल आणि त्यांना दोन वर्षांचं प्रोबेशन मिळेल.
  • अधिकृत अधिसूचना येथे पाहा – https://crpf.gov.in/writereaddata/Portal/Recruitment_Advertise/ADVERTISE/1_189_1_Notification_of_HCGD-LDCE_EXAMINATION_2019.pdf

सौर्स: मटा

1 thought on “CRPF Bharti 2021”

Leave a Comment