Fire Department Bharti 2021

Fire Department Bharti 2021

BEST नंतर अग्निशमन दलात खाजगीकरण? कंत्राटी पद्धतीने चालकांची भरती

new
महावितरण ७००० जागेच्या मेगा भरती – ऑनलाईन अर्जाला सुरुवात

पुणे पालिकेच्या अग्निशमन दलात ५५ टक्के पदे रिक्त – ३० मार्च चा अपडेट

Pune Mahanagarpalika Fire Department Bharti updates : पुणे पालिकेच्या अग्निशमन दलात ५५ टक्के पदे रिक्त आहेत. या पदांच्या भरतीसाठीची नियमावली मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले असून नगरविकास विभागाकडे हा प्रस्ताव वर्षा़पासून प्रलंबित आहे. पुणे आणि परिसरात आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दोन महिन्यांपूर्वी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली होती. या आगीत पाच जणांना प्राण गमवावे लागले होते. फॅशन स्ट्रीटवर भीषण आग लागून कोट्यावधी रुपयांची हानी झाली आहे. या घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे, फायर सेफ्टी ऑडीट करणे व आगीच्या घटना घडल्या तरी कमीतकमी हानी व्हावी यासाठी पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले जाते.

अग्निशामक विभागातील पदभरतीला शासनाची मंजुरी – १९ मार्च चा अपडेट

Nagpur Mahanagarpalika Fire Department Bharti updates : – Various 60% posts are vacant in Fire and Emergency Services Department of Nagpur Municipal Corporation. This has adversely affected the functioning of this department. The state government was pursuing the matter to get the recruitment sanctioned. Finally, the government has approved the filling and promotion of the posts of Chief Fire Liberator, Fire Liberator and Chief Mechanic cum Driver etc., posts. Read the more details given below and keep visit on our website for the further updates. 

नागपूर महापालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागात विविध ६० टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे या विभागाच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. पदभरतीला मंजुरी मिळावी, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर प्रमुख अग्निशामक विमोचक, अग्निशामक विमोचक व मुख्य मेकॅनिक कम ड्रायव्हर ही पदे भरण्याला व पदोन्नतीला शासनाने मंजुरी दिली आहे. पदभरतीसाठी अग्निशमन समितीने ठराव मंजूर करून मनपा सभागृहाला पाठविला होता. सभागृहाच्या मंजुरीनंतर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यावर आता शासनाच्या नगरविकास विभागाच्या १८ मार्च, २०२१ च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे. या संदर्भातील पुढील माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

Yavatmal Mahanagarpalika Fire Department : – यवतमाळ नगरपालिकेतील अग्निशमन विभाग हा सर्वांत महत्वाचा विभाग आहे. अशा महत्वपूर्ण विभागातीलच महत्वाचे जवळपास 22 पदे रिक्त आहेत. परिणामी, कंत्राटी कामगारांवरच विभागाचे कामकाज सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या विभागात भरती झालेली नाही. त्यामुळे विभागात लिडींग फायरमन, फायरमनच्या जागा भरलेल्या नाहीत. त्यामुळे या महत्वाच्या विभागातील पदे भरती केली जावीत, अशी मागणी नगरसेवकांकडून होत आहे.

Vacant seats in Yavatmal Fire Department अग्निशमन विभागातील रिक्त पदे –

  • लिडींग फायरमन-01
  • वाहनचालक कम ऑपरेटर-03
  • फायरमन-08
  • मदतनीस-10

Fire Department Recruitment 2021 : The recruitment will be done to run fire brigade jeeps and ambulances. 665 posts of drivers have been sanctioned in the fire brigade. Of these, 158 posts are vacant. He is a permanent driver trained and has five years of fire fighting experience. Read the details carefully given below:

आग लागणे, इमारत, घरे कोसळने, पाण्यात बुडणे आदी सर्वच येणाऱ्या आपत्तीच्या कामांसाठी मुंबई अग्निशमन दलाला बोलावले जाते. या अग्निशमन दलातील पदे रिक्त असल्याने अग्निशमन दलात जीप, कार आदी वाहने चालविण्यासाठी ५४ खासगी कंत्राटी ड्रायव्हर नेमले जाणार आहेत . यावरून आगामी स्थायी समितीत वाद रंगणार आहे. अग्निशमन दलात एकूण ६६५ यंत्रचालक संवर्गाची पदे आहेत. यापैकी १५८ पदे रिक्त आहेत. परंतु, अनुभवी चालक मिळत नसल्याने दोन वर्षासाठी ५४ कंत्राटी चालक घेतले जाणार आहेत. याकरिता ५ कोटी ९७ लाख ८७ हजार रुपये यावर खर्च केला जाणार आहे. मेसर्स. KHFM हॉस्पिलिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेसला अटी आणि शर्तीवर हे काम दिले जाणार आहे.अग्निशमन दलातले प्रशिक्षीत जवान हे आपत्कालीन परिस्थितीत जीवाची बाजी लावून आपलं कर्तव्य बजावतात, हीच समर्पणाची भावना खासगी संस्थेकडून नेमल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची असेल का? हा खरा प्रश्न आहे….

प्रक्षिशित यंत्रचालकांना जीप व कार चालवण्यास तैनात केल्यास आगीवर नियंत्रण मिळवणे कठिण होते .काळबादेवीत लागलेल्या आगीच्या घटनेनंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीनं केलेल्या शिफारसीनुसार अग्निशमन दलातील रुग्णवाहिका, जीप आणि कार चालवण्यासाठी पालिका रिक्त जागा भरण्याऐवजी खाजगी कंत्राटदाराकडून नोकर भरती करणार आहे. तर हा खासगीकरणाचा डाव असून आम्ही त्याचा निषेध करणार असल्याचे भाजपने म्हटलंय .

मुंबई : बेस्टच्या खासगीकरणावरुन वाद सुरु असताना मुंबई महानगर पालिका आता अग्निशमन दलातील लहान वाहाने आणि रुग्णवाहीका चालविण्यासाठी कंत्राटी चालक भरणार आहे. 54 कंत्राटी चालक भरण्यासाठी 3 कोटी 99 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून दोन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात येणार आहे.

पीएमपी चालक, वाहकांची सरळसेवेने बढती
अग्निशमन दलाच्या जिप, रुग्णवाहीका चालविण्यासाठी ही भरती करण्यात येणार आहे. अग्निशमन दलात चालकांची 665 पदं मंजूर आहेत. यातील 158 पदं रिक्त आहेत. हे कायमस्वरुपी चालक प्रशिक्षीत असून त्यांना पाच वर्षांचा अग्निशमन जवाना पदाचाही अनुभव असतो. अशा चालकांकडून हलकी वाहाने चालवून घेतल्यास बंब तसेच आपत्ती काळात वापरली जाणारी अवजड वहाने चालविण्यासाठी मनुष्यबळ कमी पडते. त्यामुळे अग्निशमन दलाने हलकी वाहने चालविण्यासाठी कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या नियुक्तींचा प्रस्ताव पुढील आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. ही नियुक्ती खासगी कंपनीमार्फत करण्यात येणार आहे.

अग्निशमन दलाच्या पुर्णवेळ चालकांना वेतन आयोगानुसार वेतन असते. त्यात त्यांचा ओव्हरटाईम आणि इतर भत्यांमुळे वेतन वाढते. तसेच, त्यांना वैद्यकिय, अपघात सुविधाही पुरवल्या जातात. या सर्व खर्चाला कात्री लावण्यासाठी अग्निशमन दल हे पाऊल उचलत असल्याची शक्यता आहे. मात्र, अग्निशमन दलाचे चालकही आपत्तीच्या ठिकाणी स्वत:चा जिव धोक्यात घालून काम करत असतात, त्यामुळे या कंत्राटी चालकांना कोणत्या सुविधा मिळणार असा प्रश्‍नही आहेच.

कंत्राटीकरणाकडे वाटचाल

बेस्टने कंत्राटी बसेस घेतल्याचा वाद सध्या सुरु आहे. यापुर्वी महानगर पालिकेने अनेक कार्यालयात ‘हाऊस किंपींग’च्या नावाखाली कंत्राटी भरती सुरु केली आहे. महापालिका मुख्यालयातही कंत्राटी ‘हाऊस किपींग’कामगार नियुक्त केले आहेत. त्याबरोबर उपनगरात सुरु होणाऱ्या नव्या वैद्यकिय अभ्यासक्रमासाठीही कंत्राटी वैद्यकिय प्राध्यापक नियुक्त करण्यात येणार असल्याची घोेषणा अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली आहे. तसेच,रुग्णालयातील कारकुनांच्या जागा भरुन काढण्यासाठी कंत्राटी भरती करण्यासाठी निवीदा मागविण्यात आल्या आहेत. तर, गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेने कंत्राटी सफाई कामगार नियुक्त केले आहे.


Fire Department Bharti 2021: Municipal Commissioner Iqbal Singh Chahal has finally lifted the restrictions on recruitment of Mumbai Fire Brigade personnel. This has paved the way for recruitment in the force. But for now, the recruitment will be for essential service personnel. Preference will be given to firefighters. More than 600 posts of firefighters are vacant. After that, priority is likely to be given to fill the posts of mechanics. Read More details below:

मुंबई अग्निशमन दलातील कर्मचारी भरतीवरील निर्बंध अखेर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी उठवले आहेत. त्यामुळे दलातील भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र तूर्तास ही भरती अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची होणार आहे. त्यात अग्निशमन जवानांना प्राधान्य दिले जाणार आहे. अग्निशमन जवानांची सर्वाधिक म्हणजे ६०० हून अधिक पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ यंत्रचालकांची पदे भरण्यास प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी रिक्त पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाहीची माहिती दलाकडे माहितीच्या अधिकारात मागितली होती. त्यावर दलाने दिलेल्या उत्तरात अग्निशमन जवानाची ८२ पदे रिक्त असून कार्यरत ४७ व संभाव्य ३५ पदे पदोन्नतीने भरणार असल्याचे म्हटले आहे. यंत्रचालकांची ३२ पदे मार्च २०२० मध्ये भरण्यात आली आहेत. ५५ रिक्त पदे भरण्यासाठी संबंधितांकडून वाहन परवाना आणि प्रशिक्षण कार्यवाही केली जात आहे. याच दरम्यान त्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव प्रशासनाला सादर करण्यात येणार असल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे.

अग्निशमन दलात विविध प्रकारची एकूण ३,६९४ पदे आहेत. त्यापैकी सुमारे २,८०० पदे सध्या कार्यरत आहेत, तर ९००हून अधिक पदे रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक रिक्त पदे ही अग्निशमन जवानांची आहेत. जवानांच्या २,३४० पदांपैकी ६०४ पदे रिक्त आहेत. १५९ चालक-यंत्रचालक, ६९ प्रमुख अग्निशामक, ६६ दुय्यम अधिकारी, १७ वरिष्ठ केंद्र अधिकारी, १० केंद्र अधिकारी इतकी पदे रिक्त आहेत. एकूण पदांपैकी सुमारे २५ टक्के पदे रिक्त आहेत.

अग्निशमन जवान संवर्गातील पदे सरळसेवा भरतीने भरण्याचा प्रस्ताव दलाकडून प्रशासनाला सादर करण्यात आला होता. दरम्यान, करोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने आयुक्तांनी ३० सप्टेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात काटकसरीचे धोरण अवलंबण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ही पदे नजीकच्या काळात भरण्याची शक्यता नव्हती. अग्निशमन जवान अत्यावश्यक सेवेत येत असल्याने ही पदे भरण्यासाठी दलाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून ही पदे भरण्यास आयुक्तांनी परवानगी दिली आहे.

आरक्षित पदे रिक्तच

अग्निशमन दलाच्या कार्यशाळेत विविध संवर्गाची पदे असून त्यातील काही पदांसाठी आरक्षण असल्याने ८ जानेवारी २०१८ पासून फक्त खुल्या संवर्गातील पदे भरण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे आरक्षित पदे रिक्त आहेत. तर, काही पदांसाठी विहित अर्हता धारण करणारे कर्मचारी उपलब्ध नसल्याने रिक्त आहेत. कामगार संवर्गातील पदे प्रमुख कर्मचारी, अधिकारी विभागाकडून भरण्यात येतात. अर्हता धारण करणारे कर्मचारी उपलब्ध होतात तशी ही पदे पदोन्नतीने भरण्यात येत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.


दलासाठी ३०० पदे मंजूर होऊनही भरती नाहीच

Fire Department Recruitment 2020 : As per the latest news Last year, the state government approved the creation of 682 posts in Thane Municipal Corporation. They include about 300 new posts including fire station officer, assistant fire station officer, fire manager, fireman. The new positions of the fire brigade were urgently needed. It was learned that the proposal was signed by the Municipal Commissioner and there is only so much left to fill the posts with advertisement. All other important details regarding this posts are given below:

अग्निशमन दलात पाच नवी वाहने दाखल, मात्र चालकांचा पत्ताच नाही

प्रशिक्षणाअभावी रखडली फायरवूमनची भरती

अग्निशमनाचा भार प्रभारींवर!

पर्यायी व्यवस्था न केल्याने विभागीय अधिकाऱ्यांवर भार

कळवा-डायघरपासून घोडबंदरपर्यंत विस्तारत चाललेली ठाण्याची हद्द, टोलेजंग इमारतींची वाढती संख्या, मोठमोठे मॉल व ठिकठिकाणी सुरू असलेली नागरी कामे यामुळे अग्निशमन दलावरील ताण वाढत असताना ठाणे अग्निशमन दलाच्या बळात मात्र अजूनही वाढ झालेली नाही. आता भरीस भर म्हणून मुंबई अग्निशमन दलातून प्रतिनियुक्तीवर आलेले अग्निशमन प्रमुख शशिकांत काळे हे पुन्हा मुंबईच्या सेवेत रुजू झाल्याने हे पद पुन्हा एकदा प्रभारी अधिकाऱ्याच्या हाती आले आहे. शिवाय अग्निशमन दलासाठी सरकारने मान्यता दिलेल्या सुमारे ३०० नवीन पदांपैकी एकाही पदावर अजून भरती झाली नसल्याने अग्निशमन दल नवी आव्हाने कशी पेलणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सध्याच्या काळात अग्निशमन दलाच्या पथकांवर कायम ताण येत आहे. शिवाय कित्येकदा शेजारच्या पालिका व ग्रामीण हद्दींमध्ये औद्योगिक भागात आगी लागल्यावर ठाणे अग्निशमन दलासही सज्ज राहावे लागते. तेथेही अग्निशमन दलाच्या गाड्या व फौजफाटा पाठवावा लागतो. मेट्रोच्या कामांमुळे गॅसवाहिनी, जलवाहिनी यांच्यावर आघात होत असतो. तेथे तातडीच्या कामासाठी यंत्रणा कामावर लावावी लागते. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल बुधवारी दीर्घ रजेवर गेल्यानंतर पालिकेत विविध खात्यात वेगाने घडामोडी घडू लागल्या. ठाणे अग्निशमन दलातील बदलही त्याचाच भाग आहे का, अशी चर्चा सुरू झाली. मुख्य अग्निशम अधिकारी शशिकांत काळे यांना कार्यमुक्त केल्यानंतर त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार विभागीय अधिकारी गिरीश झळके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. झळके यांनी कार्यभार स्वीकारला असला, तरी त्यांच्याकडचे प्रमुखपद सध्या तरी प्रभारीच आहे. मुंबई महापालिकेच्या मागणीमुळे मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांना त्यांच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येत असून त्यांची सेवा मूळ विभागाकडे प्रत्यावर्तित करण्यात आली आहे, असे आदेश उप आयुक्त (मुख्यालय) ओमप्रकाश दिवटे यांनी काढले. मुख्य अग्निशमन पदावर अधिकारी उपलब्ध होईपर्यंत या पदाचा अतिरिक्त कार्यभार विभागीय अधिकारी गिरीश झळके यांच्याकडे मंगळवारी तात्पुरत्या स्वरूपात सोपवण्यात आला. झळके यांना त्यांचे कामकाज सांभाळून हा अतिरिक्त कार्यभार पाहावा लागणार आहे.

ठाणे अग्निशमन दलातील मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याचे पद रिक्त झाल्यानंतर या पदावर ६ जून २०१६ रोजी काळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. काळे यांच्या कार्यकाळात ठाणे अग्निशमन दलाचा चेहरामोहरा बराचसा बदलला आहे. २२ लाखांपर्यंत लोकसंख्या गेलेल्या ठाण्यात नवीन अग्निशमन केंद्राची गरज निर्माण झाली होती. त्यानुसार काही नवीन केंद्रे सुरू करण्यात आली. तसेच छोट्या रस्त्यांमधून वाट काढण्यासाठी लहान आकाराच्या गाड्याही दलात दाखल झाल्या. मात्र मुंबईतून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी पुन्हा कधीतरी तेथे परत जाणार, हे लक्षात घेऊन त्याजागी दलातील प्रमुख नेमण्याची गरज होती. त्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली नाही. तसेच अन्य भरतीही रखडल्या. मागील वर्षी राज्य सरकारने ठाणे महापालिकेमध्ये ६८२ पदे नव्याने निर्माण करण्यास मान्यता दिली होती. त्यामध्ये अग्निशमन केंद्र अधिकारी, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, अग्निशमन प्रणेता, फायरमन यासह सुमारे ३०० नव्या पदांचा समावेश आहे. अग्निशमन दलातील नवीन पदे तातडीने भरणे गरजेचे होते. या प्रस्तावावर पालिका आयुक्तांची स्वाक्षरी झाली होती व केवळ जाहिरात देऊन पदे भरणे, इतकेच बाकी आहे, अशी माहिती मिळाली. मात्र त्यापुढे या प्रक्रियेचे कागदी घोडे का हलले नाही, हे समजू शकले नाही. विधानसभा निवडणुकीमुळे ही भरती होऊ शकली नसल्याचे समजते.

ठाण्यात अलिकडेच लेक सिटी मॉलला भीषण आग लागली होती. अशा घटनांच्या बाबतीत अग्निशमन धोरणात काय सुधारणा करावी, याचा निर्णय अग्निशमन प्रमुखच घेऊ शकतात. त्यामुळे अग्निशमन दलाला बळकटी देण्याची तातडीची गरज व्यक्त होत आहे.

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

अग्निशमन विभाग सक्षम

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2019 – There was a shortage of manpower in the municipal corporation for more than ten years. Only four personnel had loads of four fire stations. There was a shortage of officers and staff to start new centers, but the recruitment process was implemented by the Municipal Corporation a year ago. Due to this, two new fire officers and staff have been recruited in the municipality. In addition, the drivers, operators have also been filled in this space. The fire department has been working to create a lot of excitement among the staff by giving many employees in charge.

नवी मुंबई अग्निशमन दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून वर्षानुवर्षांपासून रखडलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या मार्गी लावण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी पालिकेने सुरू केलेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेमुळे अग्निशमन दलातील मनुष्यबळाची कमतरता भरून निघाली. त्यामुळे अनेक वर्षे रखडलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या अग्निशमन विभागाला करणे सहज शक्य झाले आहे. अग्निशमन विभाग पूर्णपणे सक्षम झाला असून नव्याने करण्यात आलेल्या बदलानुसार १ डिसेंबरपासून सर्वांना आपल्या नवीन कामाच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शहरातील अग्निसुरक्षेसाठी, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथे मुख्य अग्निशमन केंद्र असून, सीबीडी, ऐरोली आणि नेरूळ येथे अग्निशमन केंद्र आतापर्यंत चालवली जात आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या पाहता शहरात आणखी अग्निशमन केंद्रांची गरज आहे. महापालिकेत दहा वर्षांहून अधिक काळ भरती प्रक्रिया न झाल्याने मनुष्यबळाची कमतरता होती. केवळ १३४ कर्मचाऱ्यांवर चार अग्निशमन केंद्रांचा भार होता. नवीन केंद्रे सुरू करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता होती, मात्र वर्षभरापूर्वी ही भरती प्रक्रिया पालिकेच्या वतीने राबवण्यात आली. यामुळे पालिकेत आता नव्याने २३० अग्निशमन अधिकारी, कर्मचारी यांची भरती करण्यात आली आहे. त्याचबरोबर चालक, ऑपरेटर या जागाही भरण्यात आल्या आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना प्रभारी पदे देऊन कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे काम अग्निशमन विभागात करण्यात आले आहे.

अग्निशमन विभागाने अधिक गतिशीलतेने काम करावे, यासाठी आत्ता त्यात आणखी बदल करणे अपेक्षित होते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे गेली अनेक वर्षे येथील कर्मचाऱ्यांच्या अग्निशमन जवानांच्या बदल्या करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे आठ-दहा वर्षांपासून अनेक जण एकाच अग्निशमन केंद्रात कार्यरत होते. आता सर्व अग्निशमन केंद्रांतील अधिकारी, सहाय्यक केंद्र अधिकारी, अग्निशमन प्रणेता, अग्निशमन जवान, वाहनचालक, ऑपरेटर यांच्या बदल्या करण्यात आल्या असून तसे आदेशही जारी करण्यात आले. अनेक वर्षे एकाच ठिकाणी काम करत राहिल्याने कर्मचाऱ्यांच्या कामाच्या क्षमतेत फरक पडतो आणि या इतर विषयांत स्वारस्य वाढत जाते. त्यामुळे दर तीन वर्षांनी बदली होणे अपेक्षित आहे. त्यानुसार आता कर्मचाऱ्यांची संख्या वाढली असल्याने अग्निशमन विभागात सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे हा विभाग अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे, असे पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

या बदलीच्या आदेशानुसार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांनी त्वरित सध्या असलेल्या ठिकाणावरून पदमुक्त करावे, शिवाय संबंधितांच्या रजेबाबतचे अहवाल, अंतिम वेतन प्रमाणपत्र आणि सेवाविषयी इतर बाबी संबंधित विभागाकडे पाठवण्याचे सूचित करण्यात आले आहे. या बदल्यांमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या कोपरखैरणे येथील अग्निशमन केंद्रातही केंद्र अधिकारी, सहाय्यक अधिकारी, कर्मचारी जवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे उद्घाटन होऊनही बंद असलेले कोपरखैरणे येथील अग्निशमन केंद्र १ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.

कोपरखैरणे केंद्र १ डिसेंबरपासून

लोकसभा निवडणुकीच्या आधी घाईत कोपरखैरणे अग्निशमन केंद्राचे उद्घाटन पालिकेच्या वतीने करण्यात आले होते, मात्र उद्घाटन झाल्यावर दुसऱ्याच दिवसापासून हे केंद्र बंद होते. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. आता हे केंद्र १ डिसेंबर रोजी प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर महिनाभराच्या आत वाशी येथील अग्निशमन केंद्रातून अग्निशमन दलाचा सर्व कारभार नव्याने सुरू केला जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त मिसाळ यांनी सांगितले.

म. टा.
1 thought on “Fire Department Bharti 2021”

Leave a Comment