Fire Department Bharti 2022

Fire Department Bharti 2022

Fire Department Bharti 2022: As per the latest news is that Government has cleared the way for the recruitment of 774 firemen in the Mumbai fire department. The pending fireman recruitment process in Mumbai Fire Brigade will be conducted soon by Mumbai Fire Brigade and Mumbai Municipal Corporation. Read More details are given below.

मुंबई अग्निशमन दलातील प्रलंबित असलेली फायरमन भरती प्रक्रिया लवकरच मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई महापालिकेतर्फे राबविण्यात येणार आहे. यासाठी २०१६ सालच्या प्रक्रियेनुसार कार्यवाही केली जाणार असल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. अग्निशमन दलात मुंबई अग्निशामक या संवर्गातील अर्हता २०१५ साली नव्याने तयार करण्यात आली. या अर्हतेनुसार २०१६ मध्ये अग्निशामक पदाकरिता ७७४ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली.

या भरती प्रक्रियेस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून, आवश्यक तेवढे उमेदवार प्राप्त झाले होते. आता २०१६ च्या भरती प्रक्रियेनुसारच सद्य:स्थितीमध्ये भरती प्रक्रिया राबवायची असून, त्यास मुंबई महापालिका आयुक्तांची मंजुरी प्राप्त झाली आहे. भरती प्रक्रियेचे आयोजन सुरू असून, लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अग्निशमन दलाकडून मुंबई स्वाभिमानी भारतीय पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष कुराडे यांना पत्राद्वारे देण्यात आली आहे.

 


पालिकेच्या अग्निशमन दलात 900 अग्निशामकांची भरती; नोव्हेंबरपासून मेगा भरती प्रक्रिया

Mumbai Fire Vibhag 2022 Started in next for 900 posts of fireman. This recruitment process is on Permanent Basis. The Candidates who are selection for this post will bet 30,000/-Rupees Salary per month. Candidates keep visit on our website for the further updates of Mumbai Fire Brigade Bharti 2022 and read the below given information regarding the recruitment process.

Mumbai Fire Brigade Bharti 2022 : मुंबई पालिकेच्या अग्निशमन दलात तब्बल 900 अग्निशामकांची भरती केली जाणार आहे. ही भरती ‘कायमस्वरूपी’ तत्त्वावर केली जणार असून अग्निशामकांना 30 हजारांपर्यंत पगार मिळणार आहे. नोव्हेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या भरतीमुळे बेरोजगारांना नोकरीची आणि अग्निशमन दलात नोकरी करून शौर्य गाजवण्याची संधीही उमेवारांना मिळणार आहे.

मुंबईत आगीसह कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनेप्रसंगी अग्निशमन दलाचे जवान बचावकार्यासाठी हजर असतात. स्वतःचा जीव धोक्यात घालून ते बचावकार्य करीत असतात. मात्र संपूर्ण अग्निशमन दलातील 3500 पदांपैकी तब्बल 30 टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचारी वर्गावर मोठा ताण येतो. त्यामुळे अग्निशामकांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लेखी परीक्षा, मैदानी परीक्षेतील गुणांच्या आधारावर ही भरती होणार असून हेवी ड्रायव्हिंग लायसन्सचे गुणही मिळणार आहेत.

Selection Process of Mumbai Fire Brigade Bharti 2022

अशी राबवणार भरती प्रक्रिया

 1. सध्या वाढलेल्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर या भरतीसाठी हजारो अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, शारीरिक क्षमता वैद्यकीय चाचणी केल्यानंतर मेरिटनुसार अग्निशामकांची भरती केली जाणार आहे. भरतीसाठी 800 मीटर धावणे, डमी बॉडी घेऊन पळणे, रोपवर चढणे आदी चाचण्या होणार आहेत.
 2. भरतीमध्ये 30 टक्के महिलांना आरक्षण असेल. यामध्ये महिला उमेदवार पात्र ठरले नाहीत तर पुरुष गटातून पात्र उमेदवारांची ही भरती केली जाईल. यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. अग्निशमन दलाच्या मरोळ, वडाळा, बोरिवली प्रशिक्षण केंद्रांवर हे ट्रेनिंग होईल.

Fire Department Bharti 2022: As per the latest news is that Government has cleared the way for the recruitment of 208 firemen in the fire department. The recruitment of 208 Fireman posts in Nashik Municipal Corporation has been recruit and this recruitment process will be conducted through third party. Read More details are given below.

महापालिकेच्या रखडलेल्या नोकरभरतीस शिंदे-फडणवीस सरकारने हिरवा कंदील दाखविला असून, पहिल्या टप्प्यात अतितातडीचे म्हणून अग्निशमन विभागातील २०८ फायरमनच्या भरतीचा शासनाने मार्ग मोकळा केला आहे. या पदासाठी आवश्यक असलेल्या सेवा प्रवेश नियमावली तसेच आरक्षण बिंदू नामावलीस नगरविकास विभागाने मंजूरी दिली असून, ही भरती थर्ड पार्टीमार्फत करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यानुसार भरतीकरता मनपाने टीसीएस, एमकेसीएल आणि आयबीपीएस या संस्थांना पत्र पाठवून भरती करण्याबाबत विचारणा केल्याची माहिती आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली. त्यामुळे महापालिकेतील बहुप्रतिक्षित नोकरभरतीचा बिगूल वाजला आहे.

 •  नाशिक शहराचा विस्तार वाढत असल्याने तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अग्निशमन दल सुसज्ज करण्यासाठी नोकरभरती करणे आवश्यक आहे.
 • महापालिकेत गेल्याने पंधरा ते वीस वर्षांपासून कुठल्याही प्रकारची सरळ सेवेने कायमस्वरूपी नोकरभरती झालेली नाही. महापालिकेत ‘क’ वर्ग संवगार्तील मंजूर पदांची संख्या ७,०८२ इतकी असताना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील रिक्तपदांची संख्या अडीच हजारांहून अधिक आहे.
 • सद्यस्थितीत जेमतेम ४,५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. परिणामी, नागरी सुविधा पुरविताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. शासनाच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकरभरतीला अडचणीची ठरत आहे.
 • कोरोनाकाळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतीबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन या महत्वाच्या विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजूरी दिली होती. परंतु, मनपाची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याने भरतीप्रक्रिया रखडली होती.

Pune Fire Brigade Recruitment 2022 – There are more than 1700 vacancies in Pune Fire Brigade. Compared to the population in Pune city, there is a need of more than 1700 firemen and more than 70 fire stations are needed. But the current situation of Pune fire brigade in the city, only 380 firemen are working and 14 fire stations are functioning at present. While 7 have been newly constructed. It will start next month. In total, only 21 stations, 380 firemen are working in the fire brigade in the city. Overall, 49 centers are still needed in the city. While 1 thousand 320 posts are vacant in the city and not a single post has been filled in the fire station since last 10 years. Read more details given below and keep visit us:

पुणे अग्निशामक दलात भरती प्रकिया सुरू-1 हजार 700 हून अधिक जवानांची गरज

 1. राज्यासह पुणे शहरात मागच्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस आहे. पुणे शहरात पंधरा दिवसात 200 हून अधिक झाड पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर, 5 हून अधिक ठीकाणी भिंत कोसळल्या आहेत. तसेच 4 ते 5 ठीकाणी आगीच्या घटना घडल्या आहे. अशा या घटनांमध्ये रात्री अपरात्री कुठेही काहीही घटना घडली की, दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी संकटमोचक बनून धाव घेणाऱ्या पुणे अग्निशमन दलामध्ये सध्या फक्त 380 कर्मचारी हे काम करत आहे. गेल्या दहा वर्षापासून पुणे शहरातील अग्निशमन दलात भरती प्रक्रिया राबविली गेली नसून फक्त आश्वासनावर आश्वासन दिले जात आहे.
 2. पुणे शहरातील अग्निशमन दलाची परिस्थिती –  पुणे शहराची आताची लोकसंख्या ही तब्बल 60 लाखांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत शहरात अग्निशमन दलात तब्बल 1 हजार 700 हून अधिक जवानांची गरज आहे. तर, 70 हून अधिक अग्निशमन केंद्राची गरज आहे. असे असताना शहरातील पुणे अग्निशमन दलाची परिस्थिती पाहिली तर, शहरात फक्त 380 जवान हे कार्यरत आहे. तर 14 अग्निशमन केंद्र सध्या कार्यरत आहे. तर 7 नव्याने बांधण्यात आले आहेत. ते पुढील महिन्यात सुरू होणार आहे. एकूणच शहरात केवळ 21 केंद्र, 380 कर्मचारी हे अग्निशमन दलात काम करत आहे. एकूणच शहरात अजूनही 49 केंद्रांची गरज आहे. तर शहरात 1 हजार 320 पदे रिक्त असून गेल्या 10 वर्षापासून अग्निशमन केंद्रात एकही पद भरलेले नाही.
 3. जवानांना ताण घेऊन करावं लागतं काम – शहरात कुठेही काहीही घटना घडली की, अग्निशमन दलातील जवान स्वत:चा जीव धोक्यात घालून अडकलेल्यांची नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. अग्निशमन दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे अधिकाऱ्यांसह अग्निशामकांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे दलामधील रिक्त पदे भरावी अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र, गेली दहा वर्ष झाली फक्त आश्वासनांवर आश्वासन दिले जाते आहे. पण प्रत्यक्षात आहे त्याच कर्मचाऱ्यांवर या जवानांना काम करावं लागतं आहे.
 4. रिक्त पदे भरली जाणार – 2014 साली सेवाप्रवेश नियम मान्य करण्यात आला होता. त्यावेळेस 900 हून अधिक जागा वाढवून मिळाल्या होत्या. पण त्यानंतर सेवा प्रवेश नियम मान्य न झाल्याने तो विषय प्रलंबित राहिला होता. पण, आता हे नियम 2 महिन्यांपूर्वी मान्य झाल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी भरती बाबत प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती यावेळी अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील गिलबिले यांनी यावेळी दिली.
 5. खरंचं रिक्त पदे भरली जाणार का? – जरी 2014 नुसार अग्निशमन दलात जी 900 पदे रिक्त होती, ती जरी भरली गेली तरी शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत पाहिजे तेवढी पदे भरली जाणार नाहीये. म्हणूनच आता तरी 2014 सालापासून 900 पदे जी रिक्त पदे आहे ती तरी भरली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई अग्निशमन दलामध्ये मेगाभरती – ९०२ जागा रिक्त

The Latest news regarding the Firemen Bharti in Mumbai Fire Department is that their are 902 firemen posts will be vacant and it will be filled soon. The Mumbai Fire Brigade will have the largest recruitment ever and the proposal has been approved by the Municipal Commissioner. The mega recruitment of 902 firemen will be done through direct interview and the actual recruitment process will start within the next month. Therefore, the strength of Mumbai Fire Brigade will be further increased. 902 fireman posts to be filled in Mumbai Fire Brigade. Read the complete details given below and keep visit us for the further updates.

मुंबई अग्निशमन दलामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी पदभरती होणार असून त्याबाबतच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे. थेट मुलाखतीने ९०२ जणांची मेगाभरती होणार असून पुढील महिन्याभरात प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
त्यामुळे मुंबई अग्निशमन दलाचे बळ आणखी वाढणार आहे. मुंबई अग्निशमन दलामध्ये ९०२ फायरमनच्या जागा भरण्यात येणार आहेत. सहा महिन्यांपूर्वी अग्निशमन दलाने पाठवलेल्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यात ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मागील ५ वर्षांपासून अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया रखडल्याने कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत होती.
मुंबई अग्निशमन दलात २०१७ मध्ये ७५० कर्मचाऱ्यांची शेवटची भरती झाली होती. त्यानंतर गेल्या पाच वर्षात एकाही कर्मचाऱ्याची नव्याने भरती झाली नाही. अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा बढतीने भरण्यात येत असल्या, तरी कर्मचाऱ्यांच्या शेकडो जागा रिक्त होत्या. त्यामुळे मुंबईतील वाढत्या आगीच्या किंवा इतर आपत्कालीन समस्यांचा सामना करण्यात अनेक अडचणी येत होत्या.
कर्मचाऱ्यांचा तुटवडा लक्षात घेता महापालिका आयुक्तांकडे पदभरतीचा प्रस्ताव पाठवला होता. आयुक्तांनी या प्रस्तावास मान्यता दिल्याने मेगाभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा अग्निशमन दलामध्ये होणारी भरती ही थेट मुलाखतीने होणार आहे. यापूर्वी अग्निशमन दलात भरती प्रक्रियेसाठी टाटा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केली जात होती. या वेळी मात्र भरती प्रक्रिया लवकर संपवायची असल्याने इतर बाबींना फाटा देऊन अग्निशमन दलाकडूनच शारीरिक चाचणी आणि थेट मुलाखत घेऊन पुढील महिन्यात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
२७० जागा महिलांसाठी राखीव – अग्निशमन दलाच्या मेगाभरती मध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे. त्यानुसार एकूण ९०२ जागांपैकी २७० जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यामुळे महिलांना ही मोठी संधी प्राप्त होणार आहे. सध्या दलात केवळ १०८ महिला कर्मचारी आहेत. त्यात आता २७० महिलांची भर पडणार असल्याने त्यांची संख्या पावणेचारशेच्या पुढे जाणार आहे.
केंद्र वाढले; कर्मचारी नाही – सध्या मुंबईत ३५ अग्निशमन दल केंद्रे आहेत. यापैकी ४ केंद्रे ही मागील पाच वर्षांत उभारण्यात आली आहेत. मुंबई अग्निशमन दलामध्ये नवी केंद्र सुरू करण्यात आली, तरी त्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती न केल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांनावरच नव्या केंद्राची देण्यात आली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आला होता.
२० टक्के कर्मचाऱ्यांचा तुटवडा – मुंबईत ३५ अग्निशमन केंद्रांमध्ये साधारणतः २८०० अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आहे. मुंबई शहराचा आवाका पाहता साधारणतः २५ टक्के कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. दर महिन्याला ३० ते ४० अधिकारी-कर्मचारी निवृत्त होतात. त्यातील अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा बढती प्रक्रियेने भरल्या गेल्या; मात्र फायरमनसारख्या महत्त्वाच्या जागा रिक्त राहिल्याने प्रत्येक केंद्रावर साधारणता २० टक्के कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे.

पुणे विभागातील अग्निशामक दलामध्ये ५१० जागा रिक्त

As per the latest updates regarding the Fire Department Bharti 2022 is that there are 510 vacant seats under the the Pune Mahanagarpalika. As per the news this vacant posts will be filled soon in PMC. About 75% of the posts of Divisional Fire Officer, Assistant Divisional Fire Officer, Deputy Fire Officer and Machine Driver will be filled through promotion. Read the complete details given below and keep visit us for the further updates.

 1. पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाचा आकृतिबंध निश्‍चीत झालेला असला तरी सेवा प्रवेश नियमावलीला राज्य शासनाकडून मान्यता मिळत नव्हती. अखेर सुमारे चार वर्षानंतर ही नियमावली मंजूर केल्याने या अत्यावश्यक विभागात पदभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याबाबत नगरविकास विभागाने आदेश काढला आहे. सध्या या विभागातील तब्बल ५५ टक्के म्हणजे ९०३ पैकी ५१० जागा रिक्त आहेत. शहरात लागणाऱ्या आगीमुळे पुणेकरांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे, लाखो रुपयांचे नुकसान होऊन व्यावसायिक देशोधडीला लागत आहेत. शहराची हद्द, लोकसंख्या, इमारती, बाजारपेठ वाढत असताना नागरिकांच्या सुरक्षेच्या उपाय योजना करणे गरजेचे आहे.
 2. आगीच्या घटना घडल्यानंतर अग्निशामक दलावरील जाण कमी व्हावा यासाठी पुरेसे व प्रशिक्षित मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. पण पुणे महापालिकेकडील पदे रिक्त असल्याने सध्याच्या मनुष्यबळावर ताण येत आहे. अग्निशामक दलातील अधिकारी व कर्मचारी यांची भरतीसाठी ‘आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली’ अग्निशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८ मध्ये तयार केली. पण गेल्या तीन वर्षापासून नगरविकास खात्याने त्यास मान्यता दिली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलातील भरती रखडली आहे. सध्या अग्निशामक दलामध्ये विविध प्रकारची २८ पदे आहेत. त्यापैकी कार्यदेशक (वाहन), सिनिअर रेडिओ टेक्निशियन, अधिक्षक, उप अधिक्षक आणि शिपाई ही सहा पदे पूर्ण क्षमतेने भरलेले असून, तेथे केवळ सात जणच कार्यरत आहेत. उर्वरित २२ पदांसाठी ९०३ जागा उपलब्ध असल्या तरी तेथे सध्या ३९३ जण काम करत असून, ५१० जागा रिक्त आहेत.
 3. पदोन्नतीलाही गती येणार – सेवा प्रवेश नियमावलीत मुख्य अग्निशामक अधिकारी १०० टक्के पदोन्नतीने पद भरता येणार आहे. तर उप मुख्य अग्निशामक अधिकारी हे पद ५० टक्के पदोन्नतीने, तर विभागीय अग्निशमन अधिकारी , सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी, उप अग्निशमन अधिकारी, यंत्र चालक या पदांपैकी ७५ टक्के पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. तर काही पदे १०० टक्के पदोन्नतीने भरता येणार आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेले कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून पदोन्नतीसाठी प्रतिक्षेत होते, त्यांनाही न्याय मिळणार आहे.
 4. Vacancy Details / रिक्त असलेली प्रमुख पद
  • तांडेल – ४७
  • फायरमन – १९८
  • यंत्रचालक – १५२
  • रुग्णवाहिका चालक – ३७
  • उप अग्निशमन अधिकारी – १७
  • सहाय्यक अग्निशमन अधिकारी – १८

Fire Department Bharti 2022- The fire brigade of the corporation will soon have a permanent recruitment of 900 firemen. The fire brigade of the municipality has 2600 officers and employees. The process of filling up the vacancies in the fire brigade as soon as possible is underway at the fire brigade level. The actual recruitment process will start in May or June.  For this recruitment, it is necessary to have passed 12th from any branch and after written examination, field test, medical test, this fireman will be selected on merit. Read More details as given below.

मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात लवकरच 900 फायरमनची कायमस्वरूपी भरती होणार आहे. या भरतीसाठी कुठल्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, मेडिकल टेस्टनंतर मेरिटवर या फायरमनची निवड होणार आहे. या भरतीसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन दल हेमंत परब यांनी दिली.

मुंबई पालिकेच्या अग्निशमन दलात 2600 अधिकारी-कर्मचारी आहेत. आगीसह कोणत्याही दुर्घटनेत मुंबईकरांचा जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात. त्यामुळे अग्निशमन दलातील जवानांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची कार्यवाही अग्निशमन दलाच्या पातळीवर सुरू आहे. मे किंवा जून महिन्यात या भरतीबाबत प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होणार आहे. लेखी परीक्षा, मैदानी परीक्षेतील गुणांच्या आधारावर ही भरती होणार असून हेवी ड्रायव्हिंग लायसन्सचे गुणही मिळणार आहेत. ऑगस्ट 2016 नंतर ही भरती होत असल्यामुळे रोजगाराची संधी आणि अग्निशमन दलात नोकरी करून शौर्य गाजवण्याची संधीही उमेदवारांना मिळणार आहे.

सहा महिन्यांचे प्रशिक्षण :
900 पदांच्या या भरतीसाठी हजारो अर्ज येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जाहिरातीनंतर ऑनलाइन करणाऱया उमेदवारांची टाटा कन्सलटन्सीकडून ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये पात्र ठरणारया उमेदवारांमधून मैदानी चाचणीसाठी उमेदवार निवड केले जातील. यानंतर मेडिकल चाचणीत पात्र ठरणाऱया उमेदवारांमधून मेरिटवर अंतिम निवड केली जाईल. भरतीमध्ये 30 टक्के महिलांना आरक्षण असेल. यामध्ये महिला उमेदवार पात्र ठरले नाहीत तर पुरुष गटातून पात्र उमेदवारांची ही भरती केली जाईल. यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. अग्निशमन दलाच्या मरोळ, वडाळा, बोरिवली प्रशिक्षण केंद्रांवर हे ट्रेनिंग होईल.

 


Fire Department Bharti 2022

Fire Department Bharti 2022: While the population of the city is close to 50 lakhs, 57% of the posts in the fire brigade are vacant, but for the last three and a half years, the proposal for recruitment rules for the fire brigade has been pending with the state government. Therefore, it is now a disgrace for the corporation to hire a contract fireman. The Standing Committee approved the proposal today. In March 2018, the Directorate of Fire Services prepared the Adarsh ​​Common Service Admission Rules for the recruitment of officers and staff of the Fire Brigade. These regulations were submitted to the Ministry of Urban Development for approval. But after three and a half years, the rules have not been approved. There are 910 posts in Pune Fire Brigade, out of which 527 posts are vacant. Over the past year, there have been major fires at the Serum Institute, Fashion Street in the city. The city is expanding and the population has reached close to 50 lakhs.

शहराची लोकसंख्या ५० लाखाच्या जवळ गेलेली असताना अग्नीशामक दलातील ५७ टक्के पदे रिक्त आहेत, पण गेल्या साडे तीन वर्षापासून अग्निशामक दलाच्या पद भरतीच्या नियमावलीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे साडे प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिकेवर आता कंत्राटी फायरमन घेण्याची नामुष्की आली आहे. स्थायी समितीने आज या प्रस्तावाला मान्यता दिली

अग्नीशामक दलातील अधिकारी व कर्मचारी यांची भरती करण्यासाठी आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली अग्नीशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८ मध्ये तयार केली. ही नियमावली नगरविकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर केली होती. पण साडे तीन वर्षे उलटून गेली तरी या नियमावलीला मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या अग्नीशामक दलातील भरती रखडली आहे.

पुण्यातील अग्नीशमन दलात ९१० पदे आहेत, त्यापैकी ५२७ पदे रिक्त आहेत. गेल्या वर्षभरात शहरात सिरम इन्स्टिट्यूट , फॅशन स्ट्रीट येथे मोठ्या आगीच्या घटना घडून गेल्या आहेत. शहराचा विस्तार होत असताना लोकसंख्याही वाढत आहे. महापालिकेने मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला तरी त्यास अद्याप मंजूरी दिलेली नाही. निमावलीची मंजूरी प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.

Sr. No. Name Address Contact No.
1 Disnyr Fire Enterprises Pvt. Ltd. 1070, Sadashiv Peth, Ramdoot Society, Pune – 411 030. 9822026705, 24477553
2 Success Fire Systems. Shop No.3, Omkar Park, Rajmudra Society, Dhankawadi, Pune – 411 043. 9822018150
3 Crown Fire Solutions LLP Flat No. 101, Gopalkrushna Hsg.Society, 205, Shukrawar Peth, Pune 411 002. 9822068627
4 R.D.Fire Engineers. S.No. 43/1/1/2, Flat No. 204, D Bldg., Shri Vitthal Heritage, Dattanagar, Ambegaon Bk, Pune 411 046. 9881394071
5 Keshavraj Fire Engineers Pvt.Ltd. Sadshiv Peth, Nr. Tulshibag, Pune. 8888835414
6 Ebinizer Fire Office No. 17, Lower Ground floor, Patil Plaza, Nr. Mintramandal Chowk, Sarasbaug, Pune 9673988877
7 Samruddhi Enterprises S.No. 54, Kuber Properties, Near Sunbright School, Ambegaon Bk, Pune 411 046 9075401101
8 MD Firenorms & Solutions 16/1, Anandnagar Park Society, Paud Road, Kothrud, Pune 9923302233

FIRE STATIONS OF PUNE FIRE BRIGADE 2022

S.No Fire Station Name Address Telephone No

1

Central Fire Station

Mahatma Phule Peth, Nr. New Timber Market, Pune – 411042.

101, 020 – 26451707

020 – 26450601

2

Hadapsar Fire Station

Hadapsar Industrial Estate, Pune.

020 – 26870207

3

Late. Dayaram Rajguru Fire Station

Near Pune Railway Station, Pune – 411 001.

020 – 06059230

4

Yerwada Fire Station

 Near P.M.C. Hot mix plant, Yerwada, Pune – 411 006.

020 – 26696400

5

Kasba Fire Station

S.No. 1309, Kasba Peth, Pune – 411 011.

020 – 24578950

6

Erandawana Fire Station

S.NO. 9/A, Erandawana, Nr. Nal Stop Chowk,  Pune – 411 004

020 – 25468373

7

Aundh Fire Station

Bremen Chowk, Near Body Gate, Aundh, Pune – 411 007

020 – 25851788

8

Katraj Fire Station

S.No.132, Near Katraj Dairy, Katraj, Pune – 411 046.

020 – 24368887

9

Sinhagad Road Fire Station

S.No – 10, Sun City Road, Anand Nagar, Sinhagad Road, Pune

020 – 24345152

10

Kothrud Fire Station

Sr.No – 2/1, Nr. Kothrud Bus Stand, Kothrud. Pune

020 – 25390002

11

Pashan Fire Station

S.No. 233, Sanjay Gandhi Vasahat, MID Colony, Pashan, Pune.

020 – 20250985

12

Kondhwa Khurd Fire Station

S.No – 4 (Part), Kondhwa Khrud, Nr. NIBM Road, Pune

020 – 26832030

FIRE OFFICERS OF PUNE FIRE BRIGADE

S.No Fire Officers Name Designation Fire Station Name Mobile No

1.

Mr. Prashant D. Ranpise

Chief Fire Officer

Central fire Station

9689931991

2.

Mr. Sunil T. Gilbile

Div. Fire Officer

Central fire Station

9689930068

3.

Mr. Dattatrya N. Naglkar

Assi.Div. Officer

Central fire Station

9689930028

4.

Mr. Ramesh B. Gangad

Assi.Div. Officer

Central fire Station

9689930070

5.

Mr. Vijay T. Bhilare

Fire Station Officer

Late. Dayaram Rajguru Fire Station

9689930074

6.

Mr. Saibaba B. Jilhevar

Fire Station Officer

Aundh Fire Station

9689930075

7.

Mr. Shivaji P. Chavan

Fire Station Officer

Hadapsar fire Station

9689930076

8.

Mr. Gajanan S. Pathrudkar

Fire Station Officer

Kothrud Fire Station

9689930090

9.

Mr. Rajesh D. Jagtap

Fire Station Officer

Erandawana Fire Station

9689930078

10.

Mr. Prabhakar S. Umratkar

Fire Station Officer

Sinhagad Road Fire Station

9689930082

11

Mr. Sameer B. Shaikh

Fire Station Officer

Central Fire Station

9689930119

12

Mr. Shivaji B. Memane

Fire Station Officer

Pashan Fire Station

9689930108

13

Mr. Sanjay B. Ramteke

Fire Station Officer

Katraj Fire Station

9689930116

14

Mr. Prakash J. Gore

Fire Station Officer

Central Fire Station

9689931392

15

Mr. Pramod R. Sonawane

Fire Station Officer

Yerwada Fire Station

9689930121

16

Mr. Subhash A. Bhilare

Sub Fire Officer

Central Fire Station

9730305848

17

Mr. Ravindra B. Adhav

Sub Fire Officer

Kasba Fire Station

9822743043

Fire Department Bharti 2021-2022

It has been three and a half years since the Directorate of Fire Services sent a proposal to the Urban Development Department to get the recruitment regulations approved to fill these vacancies. However, it has not yet been approved. As a result, recruitment in Pune Municipal Corporation is stalled and demand has been made to Chief Minister Uddhav Thackeray to approve these rules immediately.

पुणे पालिकेच्या अग्निशमन दलात ५५ टक्के पदे रिक्त

Updated on 09.11.2021: महापालिकेच्या अग्निशमन दलात तब्बल ५५ टक्के जागा रिक्त असून, ही पदे भरण्यासाठी अग्नीशमन सेवा संचालनालयाने भरती नियमावलीला मंजूरी मिळावी यासाठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवून साडे तीन वर्ष झाली आहेत. मात्र, अद्यापही त्यास मंजूरी मिळालेली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेतील पदभरती रखडली असून, ही नियमावली त्वरीत मंजूर करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

नगर जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडानंतर अग्निसुरक्षा हा विषय ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत व घडल्या तरी त्यात जिवतनाही होऊ नये यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचे अग्निशमन दल मनुष्यबळासह सुसज्ज असणे आवश्‍यक आहे याकडे लक्ष वेधत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पदभरतीची मागणी केली आहे.

अग्नीशामक दलातील अधिकारी व कर्मचारी यांची भरती करण्यासाठी आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली अग्नीशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८ मध्ये तयार केली. ही नियमावली नगरविकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर केली होती. पण साडे तीन वर्षे उलटून गेली तरी या नियमावलीला मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या अग्नीशामक दलातील भरती रखडली आहे.


BEST नंतर अग्निशमन दलात खाजगीकरण? कंत्राटी पद्धतीने चालकांची भरती

newमहावितरण ७००० जागेच्या मेगा भरती – ऑनलाईन अर्जाला सुरुवात

पुणे पालिकेच्या अग्निशमन दलात ५५ टक्के पदे रिक्त – ३० मार्च चा अपडेट

Pune Mahanagarpalika Fire Department Bharti updates : पुणे पालिकेच्या अग्निशमन दलात ५५ टक्के पदे रिक्त आहेत. या पदांच्या भरतीसाठीची नियमावली मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले असून नगरविकास विभागाकडे हा प्रस्ताव वर्षा़पासून प्रलंबित आहे. पुणे आणि परिसरात आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दोन महिन्यांपूर्वी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली होती. या आगीत पाच जणांना प्राण गमवावे लागले होते. फॅशन स्ट्रीटवर भीषण आग लागून कोट्यावधी रुपयांची हानी झाली आहे. या घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे, फायर सेफ्टी ऑडीट करणे व आगीच्या घटना घडल्या तरी कमीतकमी हानी व्हावी यासाठी पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले जाते.

अग्निशामक विभागातील पदभरतीला शासनाची मंजुरी – १९ मार्च चा अपडेट

Nagpur Mahanagarpalika Fire Department Bharti updates : – Various 60% posts are vacant in Fire and Emergency Services Department of Nagpur Municipal Corporation. This has adversely affected the functioning of this department. The state government was pursuing the matter to get the recruitment sanctioned. Finally, the government has approved the filling and promotion of the posts of Chief Fire Liberator, Fire Liberator and Chief Mechanic cum Driver etc., posts. Read the more details given below and keep visit on our website for the further updates. 

नागपूर महापालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागात विविध ६० टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे या विभागाच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. पदभरतीला मंजुरी मिळावी, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर प्रमुख अग्निशामक विमोचक, अग्निशामक विमोचक व मुख्य मेकॅनिक कम ड्रायव्हर ही पदे भरण्याला व पदोन्नतीला शासनाने मंजुरी दिली आहे. पदभरतीसाठी अग्निशमन समितीने ठराव मंजूर करून मनपा सभागृहाला पाठविला होता. सभागृहाच्या मंजुरीनंतर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यावर आता शासनाच्या नगरविकास विभागाच्या १८ मार्च, २०२१ च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे. या संदर्भातील पुढील माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

Yavatmal Mahanagarpalika Fire Department : – यवतमाळ नगरपालिकेतील अग्निशमन विभाग हा सर्वांत महत्वाचा विभाग आहे. अशा महत्वपूर्ण विभागातीलच महत्वाचे जवळपास 22 पदे रिक्त आहेत. परिणामी, कंत्राटी कामगारांवरच विभागाचे कामकाज सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या विभागात भरती झालेली नाही. त्यामुळे विभागात लिडींग फायरमन, फायरमनच्या जागा भरलेल्या नाहीत. त्यामुळे या महत्वाच्या विभागातील पदे भरती केली जावीत, अशी मागणी नगरसेवकांकडून होत आहे.

Vacant seats in Yavatmal Fire Department अग्निशमन विभागातील रिक्त पदे –

 • लिडींग फायरमन-01
 • वाहनचालक कम ऑपरेटर-03
 • फायरमन-08
 • मदतनीस-10

Fire Department Recruitment 2021 : The recruitment will be done to run fire brigade jeeps and ambulances. 665 posts of drivers have been sanctioned in the fire brigade. Of these, 158 posts are vacant. He is a permanent driver trained and has five years of fire fighting experience. Read the details carefully given below:

आग लागणे, इमारत, घरे कोसळने, पाण्यात बुडणे आदी सर्वच येणाऱ्या आपत्तीच्या कामांसाठी मुंबई अग्निशमन दलाला बोलावले जाते. या अग्निशमन दलातील पदे रिक्त असल्याने अग्निशमन दलात जीप, कार आदी वाहने चालविण्यासाठी ५४ खासगी कंत्राटी ड्रायव्हर नेमले जाणार आहेत . यावरून आगामी स्थायी समितीत वाद रंगणार आहे. अग्निशमन दलात एकूण ६६५ यंत्रचालक संवर्गाची पदे आहेत. यापैकी १५८ पदे रिक्त आहेत. परंतु, अनुभवी चालक मिळत नसल्याने दोन वर्षासाठी ५४ कंत्राटी चालक घेतले जाणार आहेत. याकरिता ५ कोटी ९७ लाख ८७ हजार रुपये यावर खर्च केला जाणार आहे. मेसर्स. KHFM हॉस्पिलिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेसला अटी आणि शर्तीवर हे काम दिले जाणार आहे.अग्निशमन दलातले प्रशिक्षीत जवान हे आपत्कालीन परिस्थितीत जीवाची बाजी लावून आपलं कर्तव्य बजावतात, हीच समर्पणाची भावना खासगी संस्थेकडून नेमल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची असेल का? हा खरा प्रश्न आहे….

प्रक्षिशित यंत्रचालकांना जीप व कार चालवण्यास तैनात केल्यास आगीवर नियंत्रण मिळवणे कठिण होते .काळबादेवीत लागलेल्या आगीच्या घटनेनंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीनं केलेल्या शिफारसीनुसार अग्निशमन दलातील रुग्णवाहिका, जीप आणि कार चालवण्यासाठी पालिका रिक्त जागा भरण्याऐवजी खाजगी कंत्राटदाराकडून नोकर भरती करणार आहे. तर हा खासगीकरणाचा डाव असून आम्ही त्याचा निषेध करणार असल्याचे भाजपने म्हटलंय .

मुंबई : बेस्टच्या खासगीकरणावरुन वाद सुरु असताना मुंबई महानगर पालिका आता अग्निशमन दलातील लहान वाहाने आणि रुग्णवाहीका चालविण्यासाठी कंत्राटी चालक भरणार आहे. 54 कंत्राटी चालक भरण्यासाठी 3 कोटी 99 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून दोन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात येणार आहे.

पीएमपी चालक, वाहकांची सरळसेवेने बढती
अग्निशमन दलाच्या जिप, रुग्णवाहीका चालविण्यासाठी ही भरती करण्यात येणार आहे. अग्निशमन दलात चालकांची 665 पदं मंजूर आहेत. यातील 158 पदं रिक्त आहेत. हे कायमस्वरुपी चालक प्रशिक्षीत असून त्यांना पाच वर्षांचा अग्निशमन जवाना पदाचाही अनुभव असतो. अशा चालकांकडून हलकी वाहाने चालवून घेतल्यास बंब तसेच आपत्ती काळात वापरली जाणारी अवजड वहाने चालविण्यासाठी मनुष्यबळ कमी पडते. त्यामुळे अग्निशमन दलाने हलकी वाहने चालविण्यासाठी कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या नियुक्तींचा प्रस्ताव पुढील आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. ही नियुक्ती खासगी कंपनीमार्फत करण्यात येणार आहे.

अग्निशमन दलाच्या पुर्णवेळ चालकांना वेतन आयोगानुसार वेतन असते. त्यात त्यांचा ओव्हरटाईम आणि इतर भत्यांमुळे वेतन वाढते. तसेच, त्यांना वैद्यकिय, अपघात सुविधाही पुरवल्या जातात. या सर्व खर्चाला कात्री लावण्यासाठी अग्निशमन दल हे पाऊल उचलत असल्याची शक्यता आहे. मात्र, अग्निशमन दलाचे चालकही आपत्तीच्या ठिकाणी स्वत:चा जिव धोक्यात घालून काम करत असतात, त्यामुळे या कंत्राटी चालकांना कोणत्या सुविधा मिळणार असा प्रश्‍नही आहेच.

कंत्राटीकरणाकडे वाटचाल

बेस्टने कंत्राटी बसेस घेतल्याचा वाद सध्या सुरु आहे. यापुर्वी महानगर पालिकेने अनेक कार्यालयात ‘हाऊस किंपींग’च्या नावाखाली कंत्राटी भरती सुरु केली आहे. महापालिका मुख्यालयातही कंत्राटी ‘हाऊस किपींग’कामगार नियुक्त केले आहेत. त्याबरोबर उपनगरात सुरु होणाऱ्या नव्या वैद्यकिय अभ्यासक्रमासाठीही कंत्राटी वैद्यकिय प्राध्यापक नियुक्त करण्यात येणार असल्याची घोेषणा अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली आहे. तसेच,रुग्णालयातील कारकुनांच्या जागा भरुन काढण्यासाठी कंत्राटी भरती करण्यासाठी निवीदा मागविण्यात आल्या आहेत. तर, गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेने कंत्राटी सफाई कामगार नियुक्त केले आहे.


Fire Department Bharti 2021-2022: Municipal Commissioner Iqbal Singh Chahal has finally lifted the restrictions on recruitment of Mumbai Fire Brigade personnel. This has paved the way for recruitment in the force. But for now, the recruitment will be for essential service personnel. Preference will be given to firefighters. More than 600 posts of firefighters are vacant. After that, priority is likely to be given to fill the posts of mechanics. Read More details below:

मुंबई अग्निशमन दलातील कर्मचारी भरतीवरील निर्बंध अखेर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी उठवले आहेत. त्यामुळे दलातील भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र तूर्तास ही भरती अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची होणार आहे. त्यात अग्निशमन जवानांना प्राधान्य दिले जाणार आहे. अग्निशमन जवानांची सर्वाधिक म्हणजे ६०० हून अधिक पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ यंत्रचालकांची पदे भरण्यास प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी रिक्त पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाहीची माहिती दलाकडे माहितीच्या अधिकारात मागितली होती. त्यावर दलाने दिलेल्या उत्तरात अग्निशमन जवानाची ८२ पदे रिक्त असून कार्यरत ४७ व संभाव्य ३५ पदे पदोन्नतीने भरणार असल्याचे म्हटले आहे. यंत्रचालकांची ३२ पदे मार्च २०२० मध्ये भरण्यात आली आहेत. ५५ रिक्त पदे भरण्यासाठी संबंधितांकडून वाहन परवाना आणि प्रशिक्षण कार्यवाही केली जात आहे. याच दरम्यान त्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव प्रशासनाला सादर करण्यात येणार असल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे.

अग्निशमन दलात विविध प्रकारची एकूण ३,६९४ पदे आहेत. त्यापैकी सुमारे २,८०० पदे सध्या कार्यरत आहेत, तर ९००हून अधिक पदे रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक रिक्त पदे ही अग्निशमन जवानांची आहेत. जवानांच्या २,३४० पदांपैकी ६०४ पदे रिक्त आहेत. १५९ चालक-यंत्रचालक, ६९ प्रमुख अग्निशामक, ६६ दुय्यम अधिकारी, १७ वरिष्ठ केंद्र अधिकारी, १० केंद्र अधिकारी इतकी पदे रिक्त आहेत. एकूण पदांपैकी सुमारे २५ टक्के पदे रिक्त आहेत.

अग्निशमन जवान संवर्गातील पदे सरळसेवा भरतीने भरण्याचा प्रस्ताव दलाकडून प्रशासनाला सादर करण्यात आला होता. दरम्यान, करोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने आयुक्तांनी ३० सप्टेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात काटकसरीचे धोरण अवलंबण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ही पदे नजीकच्या काळात भरण्याची शक्यता नव्हती. अग्निशमन जवान अत्यावश्यक सेवेत येत असल्याने ही पदे भरण्यासाठी दलाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून ही पदे भरण्यास आयुक्तांनी परवानगी दिली आहे.

आरक्षित पदे रिक्तच

अग्निशमन दलाच्या कार्यशाळेत विविध संवर्गाची पदे असून त्यातील काही पदांसाठी आरक्षण असल्याने ८ जानेवारी २०१८ पासून फक्त खुल्या संवर्गातील पदे भरण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे आरक्षित पदे रिक्त आहेत. तर, काही पदांसाठी विहित अर्हता धारण करणारे कर्मचारी उपलब्ध नसल्याने रिक्त आहेत. कामगार संवर्गातील पदे प्रमुख कर्मचारी, अधिकारी विभागाकडून भरण्यात येतात. अर्हता धारण करणारे कर्मचारी उपलब्ध होतात तशी ही पदे पदोन्नतीने भरण्यात येत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.


दलासाठी ३०० पदे मंजूर होऊनही भरती नाहीच

Fire Department Recruitment 2020 : As per the latest news Last year, the state government approved the creation of 682 posts in Thane Municipal Corporation. They include about 300 new posts including fire station officer, assistant fire station officer, fire manager, fireman. The new positions of the fire brigade were urgently needed. It was learned that the proposal was signed by the Municipal Commissioner and there is only so much left to fill the posts with advertisement. All other important details regarding this posts are given below:

अग्निशमन दलात पाच नवी वाहने दाखल, मात्र चालकांचा पत्ताच नाही

प्रशिक्षणाअभावी रखडली फायरवूमनची भरती

अग्निशमनाचा भार प्रभारींवर!

पर्यायी व्यवस्था न केल्याने विभागीय अधिकाऱ्यांवर भार

कळवा-डायघरपासून घोडबंदरपर्यंत विस्तारत चाललेली ठाण्याची हद्द, टोलेजंग इमारतींची वाढती संख्या, मोठमोठे मॉल व ठिकठिकाणी सुरू असलेली नागरी कामे यामुळे अग्निशमन दलावरील ताण वाढत असताना ठाणे अग्निशमन दलाच्या बळात मात्र अजूनही वाढ झालेली नाही. आता भरीस भर म्हणून मुंबई अग्निशमन दलातून प्रतिनियुक्तीवर आलेले अग्निशमन प्रमुख शशिकांत काळे हे पुन्हा मुंबईच्या सेवेत रुजू झाल्याने हे पद पुन्हा एकदा प्रभारी अधिकाऱ्याच्या हाती आले आहे. शिवाय अग्निशमन दलासाठी सरकारने मान्यता दिलेल्या सुमारे ३०० नवीन पदांपैकी एकाही पदावर अजून भरती झाली नसल्याने अग्निशमन दल नवी आव्हाने कशी पेलणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सध्याच्या काळात अग्निशमन दलाच्या पथकांवर कायम ताण येत आहे. शिवाय कित्येकदा शेजारच्या पालिका व ग्रामीण हद्दींमध्ये औद्योगिक भागात आगी लागल्यावर ठाणे अग्निशमन दलासही सज्ज राहावे लागते. तेथेही अग्निशमन दलाच्या गाड्या व फौजफाटा पाठवावा लागतो. मेट्रोच्या कामांमुळे गॅसवाहिनी, जलवाहिनी यांच्यावर आघात होत असतो. तेथे तातडीच्या कामासाठी यंत्रणा कामावर लावावी लागते. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल बुधवारी दीर्घ रजेवर गेल्यानंतर पालिकेत विविध खात्यात वेगाने घडामोडी घडू लागल्या. ठाणे अग्निशमन दलातील बदलही त्याचाच भाग आहे का, अशी चर्चा सुरू झाली. मुख्य अग्निशम अधिकारी शशिकांत काळे यांना कार्यमुक्त केल्यानंतर त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार विभागीय अधिकारी गिरीश झळके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. झळके यांनी कार्यभार स्वीकारला असला, तरी त्यांच्याकडचे प्रमुखपद सध्या तरी प्रभारीच आहे. मुंबई महापालिकेच्या मागणीमुळे मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांना त्यांच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येत असून त्यांची सेवा मूळ विभागाकडे प्रत्यावर्तित करण्यात आली आहे, असे आदेश उप आयुक्त (मुख्यालय) ओमप्रकाश दिवटे यांनी काढले. मुख्य अग्निशमन पदावर अधिकारी उपलब्ध होईपर्यंत या पदाचा अतिरिक्त कार्यभार विभागीय अधिकारी गिरीश झळके यांच्याकडे मंगळवारी तात्पुरत्या स्वरूपात सोपवण्यात आला. झळके यांना त्यांचे कामकाज सांभाळून हा अतिरिक्त कार्यभार पाहावा लागणार आहे.

ठाणे अग्निशमन दलातील मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याचे पद रिक्त झाल्यानंतर या पदावर ६ जून २०१६ रोजी काळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. काळे यांच्या कार्यकाळात ठाणे अग्निशमन दलाचा चेहरामोहरा बराचसा बदलला आहे. २२ लाखांपर्यंत लोकसंख्या गेलेल्या ठाण्यात नवीन अग्निशमन केंद्राची गरज निर्माण झाली होती. त्यानुसार काही नवीन केंद्रे सुरू करण्यात आली. तसेच छोट्या रस्त्यांमधून वाट काढण्यासाठी लहान आकाराच्या गाड्याही दलात दाखल झाल्या. मात्र मुंबईतून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी पुन्हा कधीतरी तेथे परत जाणार, हे लक्षात घेऊन त्याजागी दलातील प्रमुख नेमण्याची गरज होती. त्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली नाही. तसेच अन्य भरतीही रखडल्या. मागील वर्षी राज्य सरकारने ठाणे महापालिकेमध्ये ६८२ पदे नव्याने निर्माण करण्यास मान्यता दिली होती. त्यामध्ये अग्निशमन केंद्र अधिकारी, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, अग्निशमन प्रणेता, फायरमन यासह सुमारे ३०० नव्या पदांचा समावेश आहे. अग्निशमन दलातील नवीन पदे तातडीने भरणे गरजेचे होते. या प्रस्तावावर पालिका आयुक्तांची स्वाक्षरी झाली होती व केवळ जाहिरात देऊन पदे भरणे, इतकेच बाकी आहे, अशी माहिती मिळाली. मात्र त्यापुढे या प्रक्रियेचे कागदी घोडे का हलले नाही, हे समजू शकले नाही. विधानसभा निवडणुकीमुळे ही भरती होऊ शकली नसल्याचे समजते.

ठाण्यात अलिकडेच लेक सिटी मॉलला भीषण आग लागली होती. अशा घटनांच्या बाबतीत अग्निशमन धोरणात काय सुधारणा करावी, याचा निर्णय अग्निशमन प्रमुखच घेऊ शकतात. त्यामुळे अग्निशमन दलाला बळकटी देण्याची तातडीची गरज व्यक्त होत आहे.

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

अग्निशमन विभाग सक्षम

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2019 – There was a shortage of manpower in the municipal corporation for more than ten years. Only four personnel had loads of four fire stations. There was a shortage of officers and staff to start new centers, but the recruitment process was implemented by the Municipal Corporation a year ago. Due to this, two new fire officers and staff have been recruited in the municipality. In addition, the drivers, operators have also been filled in this space. The fire department has been working to create a lot of excitement among the staff by giving many employees in charge.

नवी मुंबई अग्निशमन दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून वर्षानुवर्षांपासून रखडलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या मार्गी लावण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी पालिकेने सुरू केलेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेमुळे अग्निशमन दलातील मनुष्यबळाची कमतरता भरून निघाली. त्यामुळे अनेक वर्षे रखडलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या अग्निशमन विभागाला करणे सहज शक्य झाले आहे. अग्निशमन विभाग पूर्णपणे सक्षम झाला असून नव्याने करण्यात आलेल्या बदलानुसार १ डिसेंबरपासून सर्वांना आपल्या नवीन कामाच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शहरातील अग्निसुरक्षेसाठी, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथे मुख्य अग्निशमन केंद्र असून, सीबीडी, ऐरोली आणि नेरूळ येथे अग्निशमन केंद्र आतापर्यंत चालवली जात आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या पाहता शहरात आणखी अग्निशमन केंद्रांची गरज आहे. महापालिकेत दहा वर्षांहून अधिक काळ भरती प्रक्रिया न झाल्याने मनुष्यबळाची कमतरता होती. केवळ १३४ कर्मचाऱ्यांवर चार अग्निशमन केंद्रांचा भार होता. नवीन केंद्रे सुरू करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता होती, मात्र वर्षभरापूर्वी ही भरती प्रक्रिया पालिकेच्या वतीने राबवण्यात आली. यामुळे पालिकेत आता नव्याने २३० अग्निशमन अधिकारी, कर्मचारी यांची भरती करण्यात आली आहे. त्याचबरोबर चालक, ऑपरेटर या जागाही भरण्यात आल्या आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना प्रभारी पदे देऊन कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे काम अग्निशमन विभागात करण्यात आले आहे.

अग्निशमन विभागाने अधिक गतिशीलतेने काम करावे, यासाठी आत्ता त्यात आणखी बदल करणे अपेक्षित होते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे गेली अनेक वर्षे येथील कर्मचाऱ्यांच्या अग्निशमन जवानांच्या बदल्या करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे आठ-दहा वर्षांपासून अनेक जण एकाच अग्निशमन केंद्रात कार्यरत होते. आता सर्व अग्निशमन केंद्रांतील अधिकारी, सहाय्यक केंद्र अधिकारी, अग्निशमन प्रणेता, अग्निशमन जवान, वाहनचालक, ऑपरेटर यांच्या बदल्या करण्यात आल्या असून तसे आदेशही जारी करण्यात आले. अनेक वर्षे एकाच ठिकाणी काम करत राहिल्याने कर्मचाऱ्यांच्या कामाच्या क्षमतेत फरक पडतो आणि या इतर विषयांत स्वारस्य वाढत जाते. त्यामुळे दर तीन वर्षांनी बदली होणे अपेक्षित आहे. त्यानुसार आता कर्मचाऱ्यांची संख्या वाढली असल्याने अग्निशमन विभागात सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे हा विभाग अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे, असे पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

या बदलीच्या आदेशानुसार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांनी त्वरित सध्या असलेल्या ठिकाणावरून पदमुक्त करावे, शिवाय संबंधितांच्या रजेबाबतचे अहवाल, अंतिम वेतन प्रमाणपत्र आणि सेवाविषयी इतर बाबी संबंधित विभागाकडे पाठवण्याचे सूचित करण्यात आले आहे. या बदल्यांमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या कोपरखैरणे येथील अग्निशमन केंद्रातही केंद्र अधिकारी, सहाय्यक अधिकारी, कर्मचारी जवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे उद्घाटन होऊनही बंद असलेले कोपरखैरणे येथील अग्निशमन केंद्र १ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.

कोपरखैरणे केंद्र १ डिसेंबरपासून

लोकसभा निवडणुकीच्या आधी घाईत कोपरखैरणे अग्निशमन केंद्राचे उद्घाटन पालिकेच्या वतीने करण्यात आले होते, मात्र उद्घाटन झाल्यावर दुसऱ्याच दिवसापासून हे केंद्र बंद होते. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. आता हे केंद्र १ डिसेंबर रोजी प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर महिनाभराच्या आत वाशी येथील अग्निशमन केंद्रातून अग्निशमन दलाचा सर्व कारभार नव्याने सुरू केला जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त मिसाळ यांनी सांगितले.

म. टा.
10 thoughts on “Fire Department Bharti 2022”

 1. Rakesh S, Natekar 10 pass 12 pass बि, एस, सी, शिक्षण टायपिंग ऐमेसियाटी पास जात मनेवार आय. टि आय गोरमेट पास,

  Reply

Leave a Comment