Gadchiroli Police Bharti 2022

Gadchiroli Police Bharti 2022

Gadchiroli Police Bharti 2022:  Gadchiroli Police has issued a notification for the recruitment of Principal, Vice-principal, Graduate Teacher, Post Graduate Teacher. There is a total of 03+ vacancies available of these posts. Those who want to do the job in Police Department can apply online before the last date mentioned given address. The last date for submission of the application form is 24th Jan 2022. More details about Police Gadchiroli Bharti 2022 like application and application address are given below:

राज्याच्या पोलीस दलात ५० हजार पदांची भरती लवकरच अपेक्षित

राज्य राखीव पोलीस बलात 7 वी पाससाठी मोठी भरती

गडचिरोली पोलीस नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार प्राचार्य, उपप्राचार्य, पदवीधर शिक्षक, पदव्युत्तर शिक्षक पदाचा विविध रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 24 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Notification Details For Gadchiroli Recruitment 2022

 • Name Of Bank: Gadchiroli Police
 • Name Posts: Principal, Vice-principal, Graduate Teacher, Post Graduate Teacher.
 • Application Mode: Offline
 • No. of Posts: 03+
 • Job Location: Gadchiroli
 • Official Website:  http://www.mahapolice.gov.in/
 • Last Date: 24th Jan 2022

Vacancy Details For  Gadchiroli District Police Department Bharti 2022

Sr. No Name Of Post Qualification  No of Posts 
1. Principal B.Sc/M.SC , D.Ed/B.Ed
2. Vice-principal B.Sc/M.SC , D.Ed/B.Ed
3. Graduate Teacher/Post Graduate Teacher B.Sc/B.A /M.SC , D.Ed/B.Ed 03

How to Apply For Gadchiroli Police Vacancy 2022

 • Eligible applicants to the posts can apply by submitting an application to the given address/Email address
 • Send applications duly filled with all required information
 • Mention education qualifications, experience, age, etc details in the applications
 • Also, need to send their all documents & certificates as necessary to the posts
 • Police Welfare Department, Police Superintendent Office, Gadchiroli.
 • Email: [email protected] / [email protected]

 

Important Link

अधिकृत वेबसाईट
जाहिरात

Other Important Recruitment 

महाराष्ट्र SRPF भरती 2022
म्हाडा भरती २०२१  -भरती संदर्भात नवीन अपडेट्स 
 मेगा भरती नवीन अपडेट्स -येथे पहा   
पोलीस भरती 2022- लवकरच ५० हजार जागांची पाेलीस भरती

 

 


गडचिरोली जिल्ह्यात १४० तरुणांना दिला रोजगार…

Unemployment is a major problem in Gadchiroli district, one of the most backward and Naxal-affected districts in the country. Therefore, while fighting Naxalism, the police department has decided to fight unemployment. Out of this, the police has provided employment to 140 unemployed youth in remote areas of the district in Hyderabad. Gadchiroli Police Force and AIIMS Protection Service Pvt. Ltd., Hyderabad, under the guidance and leadership of District Superintendent of Police, Ankit Goyal, felicitated the candidates on Saturday (28).

देशातील सर्वांत मागास व नक्षलग्रस्त जिल्ह्यांपैकी एक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाखालोखाल भेडसावणारी मोठी समस्या बेरोजगारी आहे. त्यामुळे आता नक्षलवादासोबत लढतानाच बेरोजगारीसोबतही दोन हात करण्याचा निर्धार पोलिस विभागाने केला आहे. त्यातूनच पोलिसांनी जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील १४० बेरोजगार तरुणांना हैदराबाद येथे रोजगार मिळवून दिला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात गडचिरोली पोलिस दल व एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद यांच्या वतीने नोकरीप्राप्त उमेदवारांना शनिवार (ता. 28) नियुक्ती प्रमाणपत्र देत त्यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात गडचिरोली पोलिस दल व एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद यांच्या वतीने नोकरीप्राप्त उमेदवारांना शनिवार (ता. 28) नियुक्ती प्रमाणपत्र देत त्यांचा सत्कार करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्याला नक्षलवादाचा कलंक लागला आहे. नक्षलवादी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला विरोध करून त्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा प्रयत्न करतात. तसेच शिक्षणाच्या प्रवाहात असलेल्या अनेक विद्यार्थ्यांची दिशाभूल करून त्यांना दलममध्ये भरती करून त्यांचे भविष्य उद्‌ध्वस्त करतात. तसेच तरुणांनी सरकारी नोकरीपासून दूर राहावे, यासाठी त्यांना ठार मारण्याच्या धमक्‍या देतात. त्यामुळे अतिदुर्गम भागातील अनेक तरुण गुणवत्ताधारक असूनही रोजगारापासून वंचित आहेत. अशा बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना स्वत:च्या पायावर उभे करून त्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी गडचिरोली पोलिस विभागाने हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाने रोजगार मेळावा ऍप तयार केले आहे. या ऍपच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांनी गडचिरोली पोलिस दलाकडे आपली नाव नोंदणी केली आहे.

गडचिरोली पोलिस दलाच्या पुढाकाराने उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय जिमलगट्टा, कुरखेडा, पेंढरी, अहेरी, गडचिरोलीअंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम भागांतील 140 बेरोजगार तरुणांना हैदराबाद येथे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गडचिरोली पोलिस दलाच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे अतिदुर्गम भागातील तरुणांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून रोजगार मिळालेल्या या सर्व 140 तरुणांनी व त्यांच्या कुटुंबांनी गडचिरोली पोलिस दलाचे आभार मानले आहेत. सर्व रोजगारप्राप्त उमेदवारांचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अपार पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, पर पोलिस अधीक्षक समीर शेख, समय्या मुंडे, एम्स प्रोटेक्‍शन सर्व्हिस प्रायव्हेट लिमीटेड, हैदराबादचे संचालक मल्लेश यादव प्रामुख्याने उपस्थित होते. या उपक्रमासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी जिमलगट्टा, कुरखेडा, पेंढरी, अहेरी, गडचिरोली व या उपविभागांतील पोलिस स्टेशनचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

गडचिरोली पोलिस दल तळहातावर प्राण घेऊन नक्षलवाद्यांशी निकराची झुंज देत असताना स्थानिकांच्या समस्या सोडविण्यासाठीही जिवाचे रान करत आहेत. यातील महत्त्वाच्या बेरोजगारीच्या समस्येला पोलिस दलाने आव्हान म्हणून स्वीकारले असून हे नवे आव्हान लीलया पेलण्यात येत आहे. ही समस्या सुटल्यास नक्षल्यांच्या बंदुका हातात धरण्याची शक्‍यता असलेल्या रिकाम्या तरुण हातांना हक्‍काचे काम मिळेल. कामाचे दाम मिळेल आणि त्यांचे जीवन सुखकर होईल, ही नवी आशा सर्वांच्या मनात निर्माण होत आहे.

सौर्स : सकाळ

Leave a Comment