Goa Medical College Recruitment 2019

Goa Medical College Recruitment 2019

गोमेकॉतील नोकर भरती आवश्यकच

Gomeco Recruitment 2019 : The hospitals will be opened soon in Madgaon, Chikhali and Tuye. Employees will be needed in these new hospitals. Therefore, the government will have to fill the job vacancies for Goa Medical College (Gomeco). As per the latest news 1000 posts of the 2,300 jobs announced for GoMeCo will be filled by Goa Staff Selection Commission. Read the complete details given below on this page and keep visit our webist for the latest updates of Mega Recruitment 2019.

Goa Medical College Bharti 2019

राज्यात मडगाव, चिखली, तुये या ठिकाणी लवकरच इस्पितळे सुरू येणार आहेत. या नवीन इस्पितळांमध्ये कर्मचार्‍यांची गरज भासणार आहे. त्यामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालयासाठी (गोमेकॉ) जाहीर केलेली नोकर्‍यांची पदे सरकारला भरावी लागणार. गोमेकॉतील नोकरभरती गरजेची असून आपण या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पणजीत गुरुवारी आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मंत्री राणे म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमेकॉतील नोकरभरती स्थगित केल्याचे अद्याप सांगितलेले नाही. गोमेकॉसाठी जाहीर करण्यात आलेल्या 2 हजार 300 नोकर्‍यांच्या पदांपैकी एक हजार पदे गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत भरली जाणार आहेत. तर जाहिरात केलेल्या 1 हजार 300 पदांपैकी 600 पदे परिचारिकांसाठी आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे परिचारिकांची पदे टप्प्याटप्प्याने भरता येतील. मात्र, अन्य पदे तत्काळ भरणे गरजेचे आहेे.
मडगाव, चिखली व तुये येथील इस्पितळे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे या इस्पितळांमध्ये डॉक्टर व कर्मचार्‍यांची नेमणूक आवश्यक आहे. त्यासाठी सरकारला तात्काळ नोकरभरती करावी लागणार आहे. मुख्यमंत्री दिल्लीतून परतल्यावर आपण यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नोकर्‍यांची पदे जाहीर झाल्यानंतर संबंधित खात्यांनी तत्संदर्भात जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री सावंत यांनी सर्व खात्यांना जाहिराती मागे घेण्याचे आदेश दिले होते. तसेच ‘क’ श्रेणीतील नोकरभरती गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फतच करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यामुळे विविध खात्यांमध्ये नोकरीची पदे भरण्यासाठी इच्छुक मंत्र्यांची निराशा झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या सदर आदेशानंतरही गोमेकॉतील नोकरभरती अर्ज भरण्याची प्रक्रिया मात्र सुरूच होती.

राज्यात तीन जलद गती न्यायालये

राज्यात महिला व बाल कल्याण खात्यासंदर्भात तीन जलद गती न्यायालये आणण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत या विषयावर चर्चा झाली आहे. मंत्री इराणी यांनी देशभरात मंजूर करण्यात आलेल्या 1 हजार जलद न्यायालयांमधील तीन न्यायालये गोव्यात आणण्यासाठी परवानगी दिली आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील नोकरभरतीसाठी मागविलेल्या अर्जांच्या छाननीत कोणताही गैरप्रकार होऊ देणार नाही. सर्वांना न्याय देण्यात येईल. मंत्री या नात्याने आपण नोकरभरतीत पारदर्शकता असेल याची पूर्ण काळजी घेणार आहे. खात्यात कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा होऊ देणार नाही. उमेदवारांनी नोकर भरतीबाबत चिंता करू नये, असेही राणे यांनी सांगितले.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *