Government Bharti 2020

Government Bharti 2020

लॉकडाऊन: मंदीतही ‘या’ कंपन्यांमध्ये नोकऱ्यांची चांदी!

Good job opportunity in Lockdown situation provided by various online companies. Like, Amazon, Filpkart, Byjus, Grofers etc., The picture is that companies in India are looking for good employees despite the recession. Amazon, Flipkart, Byjus and Grofers are increasing the skilled manpower required for backend and digital operations in verticals across the country. According to staffing firm Xpheno, nine out of ten jobs are full-time while others are part-time and contract. Most of these jobs are entry level. That means at least 80,000 fresher jobs have been created. Read the details carefully and keep on this page for the further updates.

Jobs in Lockdown in India

भारतातल्या कंपन्या मंदी असूनही चांगल्या कर्मचाऱ्यांच्या शोधात आहेत, असं चित्र यावरून दिसतं. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, बायजू आणि ग्रोफर्सने देशभरातील व्हर्टिकल्समध्ये बॅकएंड आणि डिजीटल ऑपरेशन्ससाठी लागणारे कुशल मनुष्यबळ वाढवत आहे. स्टाफिंग फर्म Xpheno नुसार, दहापैकी नऊ नोकऱ्या पूर्णवेळ तर अन्य पार्ट टाइम आणि कंत्राटी आहेत. यापैकी बहुतांश नोकऱ्या एन्ट्री लेव्हलच्या आहेत. म्हणजेच किमान ८० हजार फ्रेशर जॉब्स तयार झाले आहेत. करोना व्हायरसच्या संसर्गामुळे एकीकडे लोकांची आरोग्यस्थिती ढासळली आहे तर दुसरीकडे जगाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. जगापुढच्या या संकटामुळे पगारवाढ, पगार, नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. पण दुसरीकडे एक दिलासादायक बाब म्हणजे मार्केटमध्ये अजूनही लोकांना नोकऱ्या दिल्या जात आहे. ET च्या एका अहवालानुसार, गेल्या एक महिन्यात लिंक्डइनसारख्या जॉब प्लॅटफॉर्मवर दोन लाखांहून अधिक नोकऱ्यांसाठी जाहिराती आल्या आहेत. विशेष म्हणजे यापैकी प्रत्येक चारपैकी एक भरतीची जाहिरात गेल्या आठवड्यात पोस्ट झाली आहे.

देशातले लाखो लोक सध्या वर्क फ्रॉम होम करत असल्याने आयटी सेक्टरमधील नोकऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. एकूण नोकरींच्या संधींपैकी ७९ टक्के नोकऱ्या आयटी आणि संबंधित डोमेनमध्ये तयार होत आहेत. सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, प्रोग्रामर्स, फूल स्टॅक डेव्हलपर्स आणि सेल्स-मार्केटिंगमध्ये नोकरीच्या भरपूर संधी निर्माण होत आहेत.
उत्पादनक्षमतेवर नकारात्मक परिणाम होत नसल्याने हे आशादायी चित्र दिसत आहे. उद्योगपती रॉनी स्क्रूवाला म्हणाले. ‘बहुतांश कपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करायला सांगितले आहे. यामुळे उत्पादनक्षमतेवर परिणार होणार नाही असे त्यांना वाटते. यामुळे भविष्यातही अशा प्रकारची कामाची पद्धत रुढ होण्याकडे कंपन्यांची वाटचाल सुरू होऊ शकते.’

ई कॉमर्स कंपन्या, BSFI (Banking, financial services and insurance) या क्षेत्रात १५ टक्के जागा आहेत. बिग बास्केट आणि ग्रोफर्स या कंपन्या ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे सुमारे १५ हजारांवर कर्मचारी भरती करत आहेत. म्हणजेच लोकांपर्यंत वस्तू आणि सेवा पोहोचवणाऱ्या या कंपन्यांकडे या आर्थिक मंदीतही सकारात्मक चित्र दिसत आहे. येत्या काळात ऑनलाइन खरेदीकडे लोकांचा ओघ अधिक असणार आहे. लॉकडाऊन संपल्यावरही लोक खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळतील आणि ऑनलाइन खरेदी करतील. परिणामी या क्षेत्रात मंदी नव्हे तर नोकऱ्यांची चांदी असेल, असे म्हणता येईल.

सौर्स : मटा





विविध सरकारी विभागांमध्ये नोकर भरती करा अर्ज

Government Bhartti 2020 : Lockdown has been increased now due to this reason the various government recruitment online application dates will be extended. Candidates click on the below given link to see the exact dates and how to apply details of this government jobs. IOCL, Railway, ISRO and NALCO are recruiting government companies. Applications for various positions have been requested in these companies. Candidates from 10th Pass can apply for these posts. Different positions require different qualifications. Except for these trains, all other places have applied for online applications. There will be no examination for the posts for which the train will be recruited, only the interview will be selected. The following is the information regarding recruitment.

विविध कंपन्यांची दोन लाख नोकरभरती New updates

Government Jobs 2020 Apply Here

IOCL, Railway, इस्रो आणि NALCO आदी सरकारी कंपन्यांमध्ये भरती आहे. या कंपन्यांमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. या पदांवर दहावी उत्तीर्णांपासून पदवीपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. विविध पदांसाठी विविध प्रकारची पात्रता आवश्यक आहे. यापैकी रेल्वे वगळता उर्वरित सर्व ठिकाणी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. रेल्वेत ज्या पदांसाठी भरती होणार आहे, त्या पदांसाठी परीक्षा होणार नाही, केवळ मुलाखतीवरून निवड होणार आहे. भरतीसंदर्भातली माहिती पुढीलप्रमाणे आहे.

IOCL Recruitment 2020 इंडियन ऑइलमध्ये भरती

इंडियन ऑइलमध्ये फायनान्स विभागात असिस्टंट ऑफिसर पदासाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवार ६ मेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. ज्या उमेदवारांची असिस्टंट ऑफिसर पदासाठी निवड केली जाईल, त्यांना रिफायनरीज, मार्केटिंग, पाइपलाइन, बिझनेस डेव्हलपमेंट आणि आर अँड डी क्षेत्रातील कुठल्याही एका कंपनीत नियुक्त केले जाईल.

NALCO Recruitment 2020 – NALCO ने वाढवली अर्जांची तारीख

नॅशनल अॅल्युमिनिअम कंपनी लिमिटेड (NALCO) मध्ये इंजिनीअर पदांवर भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. आता इच्छुक उमेदवार या पदांसाठी २ मे पर्यंत अर्ज दाखल करू शकतात. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता इंजिनीअरिंग किंवा टेक्नॉलॉजीत पदवी, किमान ६५ टक्क्यांनी उत्तीर्णता आवश्यक अशी आहे. वयोमर्यादा ३० वर्षे वयापर्यंत आहे.

ISRO Recruitment 2020 – ISRO त अनेक पदांवर भरती

भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोमध्ये स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (SAC) मध्ये विविध पदांवर भरती आहे. भरतीसाठी अर्जप्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता इच्छुक उमेदवार १ मे पर्यंत अर्ज करू शकतात. सायंटिस्ट/इंजिनीअर, टेक्निकल असिस्टंट, टेक्निशिअन अशा विविध पदांवर भरती सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती दहावीपासून इंजिनिअरींगपर्यंत विविध शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी आहे. कोणत्याही पदासाठी कुठलेही शुल्क नाही.

Railway Mega Bharti 2020 रेल्वेत बंपर भरती

दक्षिण रेल्वे आपल्या विभागीय रुग्णालयात तीन महिन्यांच्या कंत्राटावर मेडिकल स्टाफची भरती करत आहे. या भरतीद्वारे हाऊसकिपिंग असिस्टंटपासून डॉक्टरपर्यंत विविध पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. डॉक्टरच्या पदांसाठी १५ एप्रिल रोजी, नर्सिंग पदांसाठी १६ एप्रिलपर्यंत आणि लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर, हॉस्पिटल अटेंडंट आणि हाउसकिपिंग असिस्टंट पदांसाठी १७ एप्रिल रोजी वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहेत.

सौर्स : मटा




2 thoughts on “Government Bharti 2020”

Leave a Comment

MahaGov अधिकृत अँप डाऊन!