Gram Sevak Bharti 2023

Gram Sevak Bharti 2023

Gram Sevak Bharti 2023- Under the Zilla Parishad under the jurisdiction of the Rural Development Department, all the cadres in Group-C (excluding the posts in Group-D cadre) will be filled up to the limit of 80% of the vacancies in the direct service quota. The Zilla Parishad will be recruiting for around 10 thousand posts under the Rural Development Department.

गेली अनेक महिने ग्रामसेवक भरतीची वाट पाहणाऱ्या (Gramsevak Recruitment) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल 10 हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक गावात ग्रामसेवक हा महत्वाची जबाबदारी संभाळत असतो. सरकारी नोकरीसोबतच गावाची सेवा करण्याची संधी या पदावरील व्यक्तीला मिळते.

Gram Sevak Recruitment 2023 – Vacancy Details

ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट- ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यात येणार आहे. सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार दि. १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत लागू राहील. त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाचा शासन निर्णय दि. ३० सप्टेंबर, २०२२ नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येणार आहे.

जिल्हा परिषदांतील गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक देण्यात आले आहे.

  • महत्वाच्या तारखा-Maharashtra Gramsevak Bharti 2023
  • १ ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
  • २२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील.
  • २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ दरम्यान अर्जाची छाननी करण्यात येणार आहे.
  • तर २ ते ५ मार्च २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
  • ६ ते १३ एप्रिल २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  • १४ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.
  • १ मे ते ३१ मे या कालावधीत अंतिम निकाल आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले जाणार आहेत.

या वेळापत्रकाचे सर्व जिल्हा परिषदांना पालन करावे लागणार आहे. त्याकरिता रिक्त पदे (एकूण रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत), त्यांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी हीजिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची असेल.
अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

3 thoughts on “Gram Sevak Bharti 2023”

Leave a Comment