HCL Recruitment 2021

HCL Recruitment 2021

HCL टेक्नोलॉजीमध्ये होणार १० हजार पदांची भरती

HCL Bharti 2021: HCL currently has five AWS companies with tens of thousands of trained workers. The company plans to increase this capacity to 20,000 professionals. HCL Technology will be recruiting 10,000 more posts to grow its business. This will launch the new Amazon Web Services (AWS) Business Unit (AWS BU).

HCL Technologies Recruitment: एचसीएल टेक्नोलॉजी आपला व्यवसाय वाढविण्याच्या हेतूने १० हजार अधिक पदांची भरती करणार आहे. याद्वारे नव्या अमेझॉन वेब सर्व्हिस (Amazon Web Services, AWS) बिझनेस युनिट (AWS BU) ला चालना दिली जाणार आहे. यामुळे जगभरातील उद्योगांना त्यांच्या क्लाउड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये गती मिळण्यास मदत होणार आहे.

यामाध्यमातून एचसीएल इंजिनीअरिंग, सोल्यूशन्स आणि बिझनेस टीम यांना सहकार्य करणार आहे. HCL कडे सध्या पाच AWS कंपन्या असून यामध्ये दहा हजार प्रशिक्षित कामगार आहेत. ही क्षमता २० हजार प्रोफेशनल्सपर्यंत वाढविण्याचा कंपनीचा विचार आहे.

याद्वारे नवीन बिझनेस युनिट व्यवसायांना त्यांच्या लीगेसी सिस्टीम आणि मेनफ्रेम ऍप्लिकेशन्सचे आधुनिकीकरण करण्यास मदत केली जाणार आहे. तसेच क्लाउड तंत्रज्ञानाच्या मदतीने AWS वर SAP वर्कलोड्सचे व्यवस्थापन करुन कार्यक्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट्य साध्य केले जाणार आहे.

 • HCL एक AWS प्रीमियर कन्सल्टींग पार्टनर आहे. जो ग्राहकांना पायाभूत सुविधा, ऍप्लिकेशन्स आणि डेटाच्या आधुनिकीकरणात मदत करतो. ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी पूर्ण सहकार्य करते’ असे WW चॅनेल आणि अलायन्स AWSचे प्रमुख डग य्यूम म्हणाले.
 • ‘HCL AWS बिझनेस युनिट लाँच केल्यामुळे एचसीएल ही एफएसआय, टेल्को आणि ऊर्जा आणि युटिलिटीजवर आपले लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच SAP, कॉन्टॅक्ट सेंटर्स, हायब्रिड क्लाउड आणि मेनफ्रेम मॉर्डनायजेश यांवरील सखोल तांत्रिक कौशल्य वापरून व्यवसाय आणि ग्राहक वर्तनात बदल करता येणार असल्याचे ते म्हणाले.
 • AWS BU हा आमच्या मोठ्या #HCLCloudSmart धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. याद्वारे क्लाउड डिलिव्हरीच्या प्रत्येक पैलूची सेवा देऊन आमच्या ग्राहकांना प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे राहण्यास मदत करणारी प्रभावी इकोसिस्टिम तयार केली जाईल’ असे एचसीएल टेक्नॉलॉजीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आणि प्रमुख कल्याण कुमार यावेळी म्हणाले. ‘
 • एड्ब्ल्यूएस सोबतच्या आमच्या व्यापक संबंधांचा फायदा घेऊन, AWS BU डिजिटल, सांस्कृतिक आणि ग्राहक-केंद्रित परिवर्तने चालवून, दोन्ही कंपन्यांनी ऑफर केलेल्या सर्वोत्तम गोष्टींचा समन्वय साधेल असेही ते म्हणाले.
 • AWS सेवा आणि गुंतवणुकीसह तयार केलेले कस्टमाइज इंडस्ट्री सॉल्युशन विकसित करून महसूल वाढ आणि ग्राहक अनुभव वाढण्याची अपेक्षा युनिटला आहे. नुकतेच HCL सोल्यूशनने 1PLM उत्पादक कंपनीच्या कॉम्प्युटर एडेड डिझाइन (CAD) आणि प्रोडक्ट लाइफ सायकल मॅनेजनमेंट(PLM)च्या पायाभूत सुविधा या मागणीनुसार, स्केलेबल आणि वेगाने बदलण्यास मदत केली ज्यामुळे व्यवसायात मदत झाली.


HCL Technology Company is planned to recruit 20,000 to 22,000 candidates this year. The pressure can be as high as 6,000, he added. It is a company that is making rapid progress in the field of information technology. This year, the company will offer opportunities to new candidates

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती 2021

 कोरोना काळात अनेक व्यवसाय बंद होते. पण आयटी कंपन्यांचे काम मात्र सुरूच आहे. आयटी फर्म एचसीएल टेक्नॉलॉजीसकडून येणाऱया काळात 20 हजार जणांची भरती केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

 माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने प्रगती साधणारी ही कंपनी आहे. यावषी कंपनी नव्याने उमेदवारांना संधी देऊ करणार आहे. याअंतर्गत 20 ते 22 हजार जणांना भरतीत सामील करून घेतले जाणार आहे. 1 जुलैपासून ठरावीक हुशार कर्मचाऱयांच्या वेतनात वाढही करत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. जून 2021 च्या तिमाहीअखेर नोयडात मुख्य कार्यालय असणाऱया या कंपनीत एकूण कर्मचाऱयांची संख्या 1 लाख 76 हजार 499 वर पोहोचली आहे. याच दरम्यान नव्याने दाखल झालेल्या कर्मचाऱयांची संख्या 7 हजार 522 वर पोहोचली आहे.

 एचसीएल टेक्नॉलॉजीसचे मनुष्यबळ विकास अधिकारी (सीएचआरओ) आप्पाराव व्ही. व्ही. यांनी सांगितले, की 2020 मध्ये कंपनीने 14 हजार 600 जणांना जागतिक स्तरावर सामावून घेतले आहे. यावषी 20 ते 22 हजार उमेदवारांना भरती करून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात प्रेशर्सची संख्या 6 हजार इतकी असू शकते, असेही ते म्हणाले. जून 2021 ला कंपनीने 9 टक्के वाढीसह 3214 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता.


गुडन्यूज! एचसीएल टेकमध्ये होणार एक हजार कर्मचाऱ्यांची भरती

HCL Technologies plans to hire 1,000 new employees at its Mihan project in Nagpur. This recruitment will be completed within a month. Both inexperienced and experienced professionals will be taken in this. The company says the opportunity will also be available for those who have just graduated from colleges for the 1,000 posts. Candidates read the complete details carefully and keep visit on our website for further updates. 

एचसीएल टेक्नॉलॉजीजने तिच्या नागपूरमधील मिहान येथील प्रकल्पात एक हजार नवे कर्मचारी घेण्याचे ठरवले आहे. ही नोकरभरती महिन्याभरात पूर्ण होईल. यामध्ये अननुभवी व अनुभवी असे दोन्ही व्यावसायिक घेतले जाणार आहेत. या एक हजार पदांसाठी कॉलेजांतून नुकतेच शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेल्यांनाही संधी उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

मिहानमध्ये एचसीएलचा ५० एकर जागेतील प्रकल्प एप्रिल २०१८ पासून दोन हजार कर्मचाऱ्यांसह कार्यान्वित आहे. हे केंद्र आता अमेरिकेच्या ग्रीन बिल्डिंग कौन्सिलद्वारे जगभरातील प्लॅटिनम प्रमाणित प्रकल्पाच्या ‘एलिट लीग’चा भाग आहे. या प्रकल्पात अभियांत्रिकी, अनुसंधान व विकास सेवा (ईआरएस) आणि पायाभूत सुविधा वयवस्थापन सेवा व्यवसाय विकसित केले जातात. याखेरीज एचसीएल नागपूरतर्फे ‘कम बॅक होम’ ही मोहीम राबवली जात असून या अंतर्गत नागपुरातील आयटी तज्ज्ञांना त्यांच्या घरी परत बोलवून ईआरएस, अॅप्लिकेशन आणि पायाभूत सुविधा व्यवस्थापन सेवेमध्ये करियर घडवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. तसेच ‘स्टे रूटेड’ ही मोहीम कंपनी पदवीधरांसाठी राबवत असून त्यांच्या स्वतःच्या शहरात जागतिक पातळीवर संधी निर्माण करण्यावर याअंतर्गत भर दिला जात आहे. दोन वर्षांपासून २० वर्षांपर्यंतच्या अनुभवी व इच्छुक आयटी व्यावसायिकांनी [email protected] वर अर्ज करावा, असे आवाहन एचसीएल टेक्नॉलॉजीजने केले आहे.
HCL Virtual Recruitment Drive: HCL Technologies conduct virtual recruitment drive for all students who have completed secondary education, and IT professionals. In this, the company will provide jobs for 1000 candidates. Candidates who have passed the secondary examinations with 65% marks can apply for one year training.

आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी असलेली कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीने (HCL Technologies) येणाऱ्या १२ आणि १३ फेब्रुवारीमध्ये व्हर्च्युअल रिक्रुटमेंट ड्राइव्हचं (virtual recruitment drive) आयोजन केलं आहे. माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी, आणि IT प्रोफेशनल् अशा सर्वाना यामध्ये संधी आहे. यामध्ये कंपनीने १००० उमेदवारांसाठी नोकरी देणार असल्याचं सांगितलं आहे

पदवीचं शिक्षण पूर्ण केलेले फ्रेशर, २ ते ८ वर्षांचा अनुभव असलेले, तसेच Java, चीप डिझायनिंग, डॉटनेट, अझूर, सॅप, पायथॉन आणि इतर कौशल्यांमध्ये कुशल असलेले आणि अनुभवीही या ड्राइव्हमध्ये संधी मिळणार आहे. गन्नावरम सेंटरमध्ये आणखी ५००० जणांची भरती होणार आहे. सध्या याठिकाणी १५०० कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे आताच्या कर्मचाऱ्यांपैकी ९० टक्के विजयवाडा आणि आजूबाजूच्या परिसरातील आहेत. ‘सरकारशी करार करूनही आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देतो आम्ही अशा पद्धतीने १००० जणांना प्रशिक्षण देऊ शकतो. आपल्या घराजवळच इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ॲप्लिकेशन आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट (Engineering Services, Applications and Product Development) विषयांतील करिअर करता येते अशी माहिती कंपनीच्या कॉर्पोरेट उपाध्यक्षा आणि न्यू व्हिस्टास प्रकल्पाच्या संचालिका श्रीमती शिवशंकर यांनी दिली आहे.

तर HCL ने आधी सुरू केलेल्या टेकबी उपक्रमाअंतर्गत माध्यमिक परीक्षांमध्ये ६५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला उमेदवार एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतो. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एंट्री लेव्हलचा जॉब त्याला कंपनीकडून मिळू शकतो. या प्रशिक्षणादरम्यान आपलं स्किल दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधीही कंपनी देते. बिट्स पिलानी किंवा सास्रा विद्यापीठातून हे विध्यार्थी पुढचं शिक्षण घेऊ शकतात. तर आतापर्यंत सुमारे ७५० विद्यार्थ्यांनी टेकबी उपक्रमासाठी नाव नोंदणी केली आहे. असे शिवशंकर यांनी सांगितले आहे. तसेच HCL कंपनीने दिलेल्या संधीचा फ्रेशर्स आणि इतर प्रोफेशनल्सनी उपयोग करून घावा असे आवाहन त्यांनी केले आहे. तर अधिक माहितीसाठी कंपनीची वेबसाईट hcltech.com हि दिली आहे.

सोर्स: पोलिसनामा


HCL Recruitment Drive 2021: Many jobs were lost during the Corona, and some companies reduced a number of  staff. But despite the Corona crisis, HTL Technologies, an IT services company, will hire 15,000 freshers this year. Demand for the company’s service is good and good orders for the future have also been received. The company’s HR chief said college campuses across the country have been closed due to the Corona epidemic, which has slowed down the recruitment process a bit. In the three months from April to June, HCL Technologies has recruited around 1000 freshers. As a result, the company has decided to recruit. For more details o through the below information

HCL करणार १५००० फ्रेशर्सची महाभरती लवकरच – कोरोना विषाणू्च्या फैलावामुळे सध्या गंभीर संकट उभे राहिलेले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगसारखे निर्बंध वारंवार लागू करावे लागत असल्याने त्याचा विपरित परिणाम उद्योगधंदे आणि अर्थविश्वावर होत आहे. व्यवहार मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्याने अनेक व्यवस्थापनांमध्ये पगारकपात, कर्मचारी कपात केली जात आहे. अशा परिस्थितीत नव्या रोजगार निर्मितीची शक्यता कमी झालेली असताना नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे.

एचसीएल टेक्नॉलॉजीने नव्या कर्मचाऱ्यांच्या मेगा भरतीची घोषणा केली आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीमध्ये नव्या १५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. कॉलेज कॅम्पस मुलाखतींच्या माध्यमातून २०२०-२१ या आर्थिक वर्षात ही भरती करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी कंपनीने कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून ९ हजार पदांची भरती केली होती.

याबाबत कंपनीचे एचआर हे अप्पाराव व्हीव्ही यांनी सांगितले की, ही भरती दोन प्रमुख पातळ्यांवर होणार आहे. यामध्ये ग्रोथ आणि रिक्त पदे भरली जातील. गेल्या आणि चालू तिमाहीमध्ये कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे एट्र्रिशन रेट खूप कमी झालाआहे. या तिमाहीमध्ये एट्रिशन रेट हा सिंगल डिजिटच्या आत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅक फिल हायरिंग कमी राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोविड-१९ मुळे कॅम्पस हायरिंगमध्ये काही अडथळे येऊ शकतात. कारण कॅम्पस अद्याप सुरू झालेले नाहीत. तसेच विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षाही झालेल्या नाहीत. दरम्यान, कंपनी पूर्णपणे व्हर्च्युअल माध्यमातून भरती करणार आहे. जूनमध्ये कंपनीने १ हजार कॅम्पस रिक्रुटमेंट केल्या आहेत. तसेच कंपनीमध्ये फ्रेशर्ससाठीचा सरासरी पगार ३.५ लाखांपर्यंत आहे.

दरम्यान, कोरोना आणि लॉकडाऊनच्या नियमांमुळे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत असले तरी जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीच्या उत्पादनक्षमतेत वाढ झाली आहे. कंपनीचे सुमारे ९६ टक्के कर्मचारी घरून काम करत आहेत. तर २ टक्के कर्मचारी त्यांची केंद्रे आणि उर्वरित २ टक्के कर्मचारी ग्राहकांकडे जाऊन काम करत आहेत, असेही अप्पाराव यांनी सांगितले.

8 thoughts on “HCL Recruitment 2021”

 1. I self kajal atar ..I education is engineering 3 rd appear in exct branch ..plzz sir I need job .my fanacial cation is very .. someone not sopurted me …I need job sir give me a one chance in this company …

  Reply
 2. I have completed MBA in HR AND MARKETING DUAL SPECIALISATION. As well as 3 years experienced in private sector and Pune Metro. Can i applied for HR post.

  Reply
 3. Dear sir,i am Avinash Prabhakar Aglave ,i studied agriculture biotechnology with pgdm course ( bioprocessing and fermentation technology ,having experience of research lab work

  Reply

Leave a Comment