Hire Teachers for Medical Surveys

Hire Teachers for Medical Surveys

वैद्यकीय सर्वेक्षणासाठी शिक्षकांची नेमणूक करा

Teachers Recruited now for Medical Survey, Anganwadi Sevika already work as a Medical Survey now new teacher staff will be appointed to complete this task. Due to the Corona Virus Spreading very fast in Maharashtra Desai said that a survey should be conducted to find people who have been stolen in the village as well as those who have symptoms, so that they can stop the spread of these people by keeping them in isolation room. Make sure all the planning is done properly by contacting everyone at your level daily. Only then can we stop Corona, he added. Read the complete details carefully…

साडेसहा हजार अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरणार

Teachers Recruited now for Medical Survey

 

अंगणवाडी सेविकांबरोबरच वैद्यकीय सर्वेक्षणाच्या कामासाठी शिक्षकांचीही मदत घ्या. तसे आदेश काढून त्यांची नेमणूक करा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला बुधवारी दिला. आजारपणाच्या कारणावरून काम टाळणार्‍या शिक्षकांची शासकीय रुग्णालयात तपासणी करा. रेशनवरील धान्य वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक करा, असेही आदेश त्यांनी दिले.

जिल्हाधिकार्‍यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून आढावा घेतला. धान्य दुकानांवर ग्राम समितीने लक्ष ठेवावे, असे सांगत देसाई म्हणाले, रेशन दुकानांबाबत येणार्‍या तक्रारींची पडताळणी करा. प्रभाग समिती, ग्राम समिती सदस्यांची तसेच शिक्षकांचीही नेमणूक या दुकानांवर लक्ष ठेवण्यासाठी करा. पोर्टिबिलिटीच्या माध्यमातून ऑनलाईन यादीची पडताळणी करून बाहेरून आलेल्या, पण सध्या येथे असणार्‍या लाभार्थ्याला लाभ द्या, असेही त्यांनी सांगितले.

देसाई म्हणाले, गावामध्ये चोरून आलेल्या लोकांना शोधण्यासाठी तसेच लक्षणे असणार्‍या लोकांचा शोध घेण्यासाठी काटेकारेपणे सर्वेक्षण करावे, असे सांगत देसाई म्हणाले, जेणेकरून अशा लोकांना अलगीकरण कक्षात ठेवून होणारा प्रसार थांबवता येईल. तुमच्या स्तरावर दररोज सर्वांशी संपर्क ठेवून सर्व नियोजन योग्य पद्धतीने होत असल्याची खात्री करा. तरच आपण कोरोनाला थांबू शकू, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील तसेच परराज्यातील मजुरांसाठी कम्युनिटी किचन सुरू करून त्यांना त्याचे वाटप करा, असे सांगून ते म्हणाले, संस्थात्मक अलगीकरण कक्षासाठी अतिरिक्‍त ठिकाणांची पाहणी करून ठेवा. शाळा-महाविद्यालयांना सध्या सुट्टी आहे. अशांची वसतिगृहे पाहावीत. निवारा शिबिरांसाठी संपर्क अधिकारी त्याचबरोबर अन्य सुविधांसाठी आवश्यक मनुष्यबळाचे आदेश निर्गमित करावेत. प्रत्येक संपर्क अधिकार्‍याने नोंदवही ठेवून त्याचा गोषवारा काढावा. काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावयाची आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, महसूलचे उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी तुषार ठोंबरे, भूसंपादन अधिकारी हेमंत निकम, प्रांताधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित होते.

अंगणवाडी सेविकांसाठी निधी देऊ

नगरपालिका क्षेत्रासाठी सर्वेक्षणाचे काम करणार्‍या अंगणवाडी सेविकांसाठी नगरविकास विभागाकडून मानधन देण्याबाबत आदेश आला नाही तर त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असा दिलासा जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिला.

सौर्स : पुढारी
1 thought on “Hire Teachers for Medical Surveys”

  1. गावपतळीवरील ग्रामसेवक,तलाठी,कृषी विभागाच्या कृषी सहायक यांना आपापल्या गावातील सर्व लोकांची पूर्ण माहिती असते यांची मदत घेण्यात यावी .खूप मदत होईल

    Reply

Leave a Comment