IBPS SBI Clerk admit card 2020

SBI Clerk Exam 2020 Admit Card Download

SBI क्लर्क परीक्षा ८ मार्च रोजी, अॅडमिट कार्ड आले

State Bank of India Hall Ticket Download : The Admit Card has come up for the Junior Associate and Sales posts of State Bank of India. Candidates who have applied for the exam should download this Admit Card from the official website of the Bank. The exam will be held on March 8. This is a jumbo recruitment and for both the above posts, there are a total of 8000 vacancies in SBI Bank branches across the country. Maharashtra will be recruiting 865 of these seats.

SBI MahaBharti 2020 Hall Ticket Download

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्युनिअर असोसिएट आणि सेल्स पदांसाठी आयोजित केलेल्या परीक्षेचे अॅडमिट कार्ड आले आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे, त्यांनी हे अॅडमिट कार्ड बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करावेत. परीक्षा ८ मार्च २०२० रोजी होणार आहे. ही जम्बो भरती असून वरील दोन्ही पदांसाठी देशभरातील एसबीआय बँक शाखांमध्ये एकूण ८ हजार जागा रिक्त आहेत. महाराष्ट्रात यापैकी ८६५ जागांवर भरती होणार आहे.

उमेदवार आपले अॅडमिट कार्ड ८ मार्चपर्यंत डाऊनलोड करू शकतात. यावर परीक्षेची तारीख, परीक्षा केंद्राचा पत्ता, वेळ आदी माहिती असेल. ८ मार्च रोजी पूर्व परीक्षा होणार आहे. यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेकरिता बोलावले जाईल. मुख्य परीक्षा १९ एप्रिल रोजी होणार आहे. मुख्य परीक्षेचे अॅडमिट कार्ड परीक्षेपूर्वी दोन आठवडे आधी येतील.

उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की हे अॅडमिट कार्ड पोस्टाने वा अन्य कोणत्या प्रकारे तुमच्यापर्यंत येणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला ते संकेतस्थळावरूनच घ्यावे लागतील. sbi.co.in या बँकेच्या वेबसाइटवर त्यासाठी लॉगइन करावे लागेल.

पूर्व परीक्षा ऑनलाइन असेल. यात १०० प्रश्न विचारण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नासाठी १ गुण असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण कापला जाणार आहे. परीक्षेत तीन विभाग असतील. प्रत्येक विभागासाठी २० मिनिटे कालावधी असेल. इंग्रजी भाषा (३० गुण), न्युमरिकल अॅबिलिटी (३५ गुण) आणि रिझनिंग अॅबिलिटी (३५ गुण) अशा तीन प्रकारच्या प्रत्येकी २० मिनिटांच्या चाचण्या असतील.

सौर्स : मटा


IBPS SBI Clerk admit card 2020

SBI क्लार्क परीक्षेचे ‘प्रवेशपत्र’ जारी

SBI Clerk Examine Hall Ticket available now for downloading. Candidates download their Admit card from below given link till 8th March 2020. Candidates should note that the last date for obtaining admit card is 8th March 2020. Candidates can download their admit card before this date. This year, the exam will be held to fill a total of 8134 posts in banks across the country.

Important Dates

Commencement of Call letter Download11 – 02 – 2020
Closure of Call letter Download08 – 03 – 2020

SBI Cler Admit Card Download link

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शन (IBPS) एसबीआय लिपिक २०२० (ISBI Clerk 2020) चे प्रवेशपत्र उद्या ११ फेब्रुवारी रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, जे उमेदवार या परीक्षेस बसणार आहेत असे उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर भेट देऊन कार्ड डाउनलोड करू शकतात.
उमेदवारांनी लक्षात घ्यावे की प्रवेशपत्र मिळण्याची अंतिम तारीख 8th March 2020 आहे. या तारखेच्या आधी उमेदवार आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. यावर्षी ही परीक्षा देशभराच्या बँकांमधील एकूण ८१३४ पदे भरण्यासाठी घेण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २६ जानेवारी, २०२० रोजी संपली होती. मुख्य परीक्षा १९ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट तपासत राहावी, जेणेकरून कोणतीही माहिती आपल्यापासून सुटणार नाही.

SBI Clerk Hall Ticket download : असे करा डाउनलोड

  1. SBI ची अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जा
  2. मुख्यपृष्ठावरील करिअर लिंकवर क्लिक करा
  3. येथे दिलेल्या SBI Clerk परीक्षा लिंक वर जा
  4. आता येथे आयडी आणि पासवर्ड ची पूर्ण माहिती प्रविष्ट करा
  5. आता प्रवेशपत्र तुमच्या समोर उघडेल
  6. अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करा
  7. प्रिंटआउट काढून जवळ असू द्या

Clerk Admit Card Download Link given below

? Admit Card Download
Leave a Comment

MahaGov अधिकृत अँप डाऊन!