Indian Postal Recruitment Bharti 2023 : An advertisement has been published by Indian Postal for interested and eligible candidates for the post of “Gramin Dak Sevak”. Online applications are invited to fill 40889 vacancies available to be filled with the posts. Interested and eligible candidates can submit your application to the given link before the last date. The last date for submission of the application form is 16th Feb 2023. Further details of Indian Postal Recruitment Recruitment 2022 like vacancy details, the application process, and other details are as follows.
- भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदासाठी भरती होणार आहे. यामध्ये देशाभरात ४० हजार ८८९ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यापैकी महाराष्ट्रात २,४१४ जागा भरल्या जाणार आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाखा डाकपाल (ब्रांच पोस्टमास्तर) ४१ आणि सहायक शाखा डाकपाल (असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर) पदाची ४७ अशी एकूण ८८ पदे भरली जाणार आहेत. यासाठी कोणतीही परीक्षा नसून दहावीच्या गुणांच्या आधारे निवड केली जाणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर मयुरेश कोले यांनी केले आहे.
- या पदांसाठी कुठलीही परीक्षा घेतली जाणार नसून दहावीच्या मार्कांच्या टक्केवारीनुसार पदे भरली जाणार आहेत. सर्व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी आहे. फॉर्म भरण्यासाठी आवश्यक शुल्क, वय मर्यादा व या बाबत इतर सविस्तर माहीतीसाठी आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://indiapostgdsonline.gov.in/ या वेबसाईट ला भेट द्यावी.
- भारतीय डाक विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या या भरतीचा फायदा जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर कोले यांनी केले आहे.
Maharashtra Postal Circle Bharti 2023- 2508 vacancies