Investigation of the results of Vanrakshak, Talathi Exam 2020

Investigation of the results of Vanrakshak, Talathi Exam 2020

वनरक्षक, तलाठी परीक्षा निकालांची चौकशी

Talathi Recruitment 2020 Issues : Mahapariksha Portal taken the of Vanrakshak Bharti and Talathi Bharti examine last year. Mahapariksha Portal facing a lots of Trouble now for some social and technical issues due to this reason various government examination was postponed. Examination for the posts of Forest Guard (Vanrakshak), Talathi, Clerk through the Mahapariksha Portal; Minister of State for Information and Technology Satej Patil assured the delegation that the results would be investigated and appropriate decisions would be taken after the recruitment process. Meanwhile, the demands of the candidates that the recruitment process for the various posts which are currently underway are postponed. More Details are given below:

Maharashtra Talathi Bharti 2017-2018 Online Apply

व्हिडिओ चित्रीकरणामुळे ‘डमीं’चा भांडाफोड तलाठी भरती परीक्षा

Talathi Bharti Exam 2020 details

तलाठी आणि वाहन चालकपदांच्या परीक्षेत टॉपर आलेले युवक सरकारी नोकरीचे स्वप्न पाहात असतानाच, त्यांचे बिंग फुटले. परीक्षेला डमी उमेदवार बसवून, या पाच युवकांनी शासनाला फसविण्याचा प्रयत्न केला. परंतु परीक्षा कक्षात घेण्यात आलेल्या व्हिडिओ चित्रीकरणामुळे हे युवक उघडे पडले आहेत. व्हिडिओ चित्रीकरण आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे पाच टॉपर आणि त्यांच्यासाठी परिक्षेला बसलेले डमी यांच्यावर आता तुरुंगवास भोगण्याची वेळ आली आहे.
अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नसल्यामुळे महसूल विभागातील तीन तलाठी, एक शिपाई व एक वाहनचालक अशा पाच कर्मचार्‍यांना शासनाच्या आदेशानुसार अधिसंख्य कर्मचारी ठरविण्यात आले होते. या कर्मचार्‍यांच्या रिक्‍त जागेवर तत्काळ नवीन भरती करण्याचे निर्देश शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तीन तलाठी व एक वाहनचालक अशा चार जागांसाठी 12 जानेवारी 2020 परीक्षा घेतली. तलाठी पदासाठी न्यू आर्टस महाविद्यालयात तर वाहनचालकपदासाठी न्यू लॉ कॉलेज येथे परीक्षा घेण्यात आली होती. या दोन्ही पदांसाठी एकूण 488 उमेदवारांनी परीक्षा दिली.
यामध्ये 442 तलाठी परीक्षार्थीचा समावेश आहे. परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांची व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल 14 जानेवारी रोजी जाहीर झाला. लेखी परीक्षेमधील गुणांक आणि व रिक्‍त पदे यानुसार एकूण 13 उमेदवारांची प्रारुप यादी 18 जाानेवारी 2020 रोजी संकेतस्थळावर जाहीर केली. कागदपत्र तपासणीसाठी या युवकांना 20 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रियदर्शनी हॉलमध्ये पाचारण करण्यात आले. कागदपपत्रांची तपासणी करताना काही उमेदवारांच्या स्वाक्षरीत तफावत असल्याचे प्रथमदर्शनीत दिसून आले.
जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी परीक्षा उपकेंद्रावरील वर्ग खोलीतील व्हिडिओ चित्रीकरण तपासले असता कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित असलेले उमेदवार आणि वर्ग खोलीत त्याच बैठक क्रमांकावर परीक्षा दिलेले उमेदवार वेगवेगळले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी 23 जानेवारी रोजी जिल्हा निवड समितीची बैठक बोलविली. या बैठकीस या पात्र 13 उमेदवारांना देखील बोलविण्यात आले. त्यापैकी 10 उमेदवार उपस्थित होते. या बैठकीचे देखील व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. यावेळी प्रत्येक उमेदवारांना एक एक करीत बैठकीस बोलाविण्यात आले. प्रत्येक उमेदवारास परीक्षा कुठे दिली. बैठक क्रमांक किती होता. वर्ग खोलीची रचना कशी होती. आदी प्रश्‍नांची उमेदवारांवर सरबती करण्यात आली.
त्यानंतर याच उमेदवारांना त्यांच्या बैठकीच्या वर्ग खोल्याचे छायाचित्रीकरण दाखविण्यात आले. आपल्या जागेवर डमी उमेदवार बसविले आहे. हे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे पाच उमेदवारांचे धाबे दणाणले. आपण डमी उमेदवार बसविले होते. याची कबुली या उमेदवारांनी दिली.
या परीक्षेला डमी उमेदवार बसवून, विशाल इंगळे, अंजली म्हस्के, मंगेश दांडगे, पंढरीनाथ साबळे, व रवी जंगम या पाच उमेदवार व त्यांच्या जागेवर डमी म्हणून बसलेले पाच अशा दहा उमेदवारांनी शासनाची फसवणूक केली अशी धाारणा जिल्हा निवड समितीची झाली आहे. त्याानुसार जिल्हा प्रशासनाने या दहा उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

…त्यामुळेच व्हिडिओ चित्रीकरणाचा निर्णय
गेल्या वर्षी राज्यभरात तलाठीपदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील 86 जागांचा समावेश होता. ही परीक्षा महापोर्टलचया वतीने घेण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी डमी उमेदवारांचा वापर केला गेला अशा तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. परंतु याा परीक्षेसाठी सीसीटीव्ही वा व्हिडिओ चित्रीकरण यांचा वापर केला नसल्याचे पुढे आले आहे. त्याामुळे जिल्हा प्रशासनाने 12 जानेवारी रोजी परीक्षा कक्षांत व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला.

पर्यवेक्षकांना बजावल्या नोटिसा
परीक्षेला बसलेल्या युवकांना छायाचित्रासह हॉल तिकीट देण्यात आले होते. परीक्षेसाठी 32 वर्गखोल्यात व्यवस्था करण्यात आली होती. या वर्ग खोल्यांवर शासनाचेच कर्मचारी पर्यवेक्षक म्हणून नियुक्‍त केले होते. त्यांनी हॉलतिकीट पाहिले की नाही हा प्रश्‍न आता समोर आला आहे. डमी िउमेदवार ज्या वर्ग खोल्यांत आढळले. त्या पर्यवेक्षकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून गुलासे मागविण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी सांगितले.

‘त्या’ तिघांना पोलिस कोठडी; दहा जणांविरुद्ध गुन्हा
तलाठी पदाच्या भरतीत डमी परीक्षार्थी बसविलेल्या 3 जणांना अटक करण्यात आली आहे. पाच जणांनी डमी परीक्षार्थी बसविलेले होते. एकूण 10 जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या तिघांना शुक्रवारी (दि. 24) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

विशाल सखाराम इंगळे, अंजली गोपाळ म्हस्के, मंगेश कुंडलिक दांडगे ही अटक केलेल्यांची नावे आहेत. या तिघांसह पंढरीनाथ पुंजाजी साबळे, रवी जंगल पवार व इतर पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलाठी पदाच्या परीक्षेत केंद्रांवर पाच जणांना डमी म्हणून बसविले होते. ते पाच परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. गुरूवारी (दि. 23) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर अव्वल कारकून जीवन भानुदास सुतार यांनी फिर्याद दिली. त्यावरून दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर दोन उमेदवार व त्यांच्या जागेवर डमी बसलेले उमेदवार फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे हे तपास करीत आहेत.

सौर्स : पुढारी

तलाठ्यांची ५ हजार पदे रिक्त

Vanrakshak Bharti Examine Results

‘महापरीक्षा पोर्टलद्वारे वनरक्षक, तलाठी, लिपिक पदांसाठी झालेल्या परीक्षांची; तसेच निकालांची चौकशी करण्यात येणार असून, त्यानंतर भरती प्रक्रियेबाबात योग्य निर्णय घेण्यात येईल,’ असे आश्वासन माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, सध्या सुरू असणाऱ्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेला स्थगिती मिळावी, अशी परीक्षार्थ्यांची मागणी कायम आहे.

‘महापरीक्षा पोर्टल’द्वारे विविध सरकारी विभागांमधील पदभरतीसाठी झालेल्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे ‘महाराष्ट्र टाइम्स’ने अनेकवेळा समोर आणले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वनरक्षक, तलाठी पदभरतीच्या परीक्षा; तसेच निकालांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले. काही दिवसांपूवीच राज्य मंडळाच्या कनिष्ठ लिपिक पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात उत्तीर्ण झालेल्या गुणवतांच्या चुका एकसारख्या असल्याचेही ‘महाराष्ट्र टाइम्स’ने उघडकीस आणले होते. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या समन्वयातून मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सतेज पाटील यांनी एमपीएससी समन्वय समिती, एमपीएससी स्टुडंट्स राइट्स, स्पर्धा परीक्षा संघर्ष समिती या स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी लढणाऱ्या संघटनांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. या वेळी ‘महापरीक्षा पोर्टल’चे अधिकारी उपस्थित होते.

Talathi Bharti Examine Results

‘बैठकीत पोर्टलच्या अधिकाऱ्यांनी चुका मान्य करून, त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत होते; तसेच परीक्षा एकाच दिवशी घेण्याबाबत सांगत होते. मात्र, पोर्टल बंद करण्याची मागणी आम्ही लावून धरली. त्यानंतर सतेज पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पोर्टल बंद करण्याचा पुराव्यानिशी प्रस्ताव तयार करून, तो अभ्यास करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याससोर मांडण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश दिला’स असे शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले. महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षा आणि निकालांची चौकशी करण्यासोबतच, येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पोर्टल बंद करण्याबाबत बैठकीचे आयोजन करू, असे आश्वासन पाटील यांनी दिल्याचे शिष्टमंडळातर्फे सांगण्यात आले. शिष्टमंडळामध्ये राहुल कवठेकर, विशाल पाटील, बळवंत शिंदे, किरण निंभोरे आदींचा समावेश होता.

सौर्स : म. टा.
Leave a Comment