IT Sector Job 2021

IT Sector Job 2021

2021 मध्ये आयटी सेक्टरमध्ये नोकर्‍या

TCS करणार 40 हजारांपेक्षा जास्त तरुणांची भरती

Cognizant Job Career 2021 कॉग्निझंट २८ हजार फ्रेशर्सची भरती करणार

Cognizant decided to hire 28,000 Indian freshers employees this year. Cognizant CEO Brian Humphries said, “There are a lot of people around the world who are worried about corona right now. In the last few months, the employees of the company have resigned, we want to make up for this loss. In India, the notice period was two months. Therefore, recruitment has been increased this year. We have decided to recruit additional staff.

आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी कॉग्निझंटने Cognizant Jobs यावर्षी २८ हजार फ्रेशर्सची भरती करण्याची घोषणा केली आहे. कॉग्निझंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन हम्फ्रीज म्हणाले की, “सध्या जगभरात कोरोनाने अनेकजण चिंतेत आहेत. त्यामुळे सगळीकडे औदासिन्य पसरले आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने हे पाऊल उचलले असून आम्ही कर्मचाऱ्यांच्या पगाराचे योग्य व्यवस्थापन करण्याचे काम करीत आहोत.” ते पुढे म्हणाले की, गेल्या काही महिन्यात कंपनीतील कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत, ही झीज आम्हाला भरून काढायची आहे. भारतात नोटीस पीरियड दोन महिन्यांचा होता. त्यामुळे यंदा भरतीच्या जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करण्याबाबत आम्ही निर्णय घेतला आहे.

कंपनीपुढील आव्हानांबाबत ते म्हणाले, कंपनी मल्टी-पार्ट योजना राबवित आहे. ज्यामध्ये करियरच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. प्रशिक्षण आणि नोकरीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आपल्या करिअरचा आणखी विस्तार करण्याची संधी मिळेल. तसेच कर्मचाऱ्यांसाठी त्रैमासिक पदोन्नतीच्या पद्धतीत बदल करण्यात येणार आहे आणि महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ आणि पदोन्नती देण्याबाबतचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यामुळे फ्रेशर्ससाठी ही एक चांगली संधी आहे. गेल्या वर्षी २०२०मध्ये १७ हजार फ्रेशर्सची नियुक्ती केली होती. यंदा यात १८ टक्के वाढ करण्यात आली आहे. कॉग्निझंटच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख ९६ हजार ५०० एवढी आहे. त्यापैकी दोन लाखाहून अधिक कर्मचारी हे भारतात कार्यरत आहेत.


भारतातील TCS आणि Infosys या दोन कंपनी मध्ये मेगाभरती

As per the news received from resources big IT company like TCS and Infosys will be plan for Mega recruitment in this year. TCS will be recruiting 40000 employees and Infosys will be recruiting 26000 employees in the year 2021-2022. Read the below given details carefully and keep visit us for the further updates.

Jobs in TCS : भारतातील TCS आणि Infosys या दोन आघाडीच्या कंपन्यांनी लॉकडाऊनच्या काळातही मेगाभरतीचा प्लॅन आखला आहे. यापैकी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS मध्ये तब्बल 40 हजार पदांसाठी भरती सुरु होणार आहे. गेल्यावर्षीही कंपनीने एवढ्याच लोकांची भरती केली होती. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत TCS ला जबरदस्त नफा झाला होता. आगामी काळासाठीही कंपनीला अनेक प्रोजेक्टस मिळाली आहेत. त्यासाठी TCS कडून 40 हजार पदे भरली जाणार आहेत. टीसीएस बाजारपेठ आणि कॅम्पस इंटरव्ह्यू अशा दोन प्रकारांनी कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.

Jobs in Infosys : भारताची दुसर्‍या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिस 2021-22 या आर्थिक वर्षात कॅम्पसमधून 26000 फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांनी ही माहिती दिलीय. मागणी वाढत असताना एट्रिशन रेटमध्ये वाढ झाल्यामुळे नव्या पदांची भरती करण्यात येणार असल्याचे Infosys कडून सांगण्यात आले.


खुशखबर ! फ्रान्सची ‘ही’ मोठी कंपनी भारतात दरवर्षी करणार 30,000 कर्मचाऱ्यांची भरती

Capgemini, an information technology (IT) company, is all set to recruit in India. Capgemini has decided to hire as many as 30,000 employees in India this year. This year it will be 25 per cent higher than last year. The company said it wants to take full advantage of the company’s existence in India. “With new recruits, we expect a 7 to 9 per cent growth in the company’s revenue this year,” said Ashwin Yardi, CEO of Capgemini in India. It will employ 50 per cent fishers and 50 per cent laterals.

  • इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) कंपनी कॅपजेमिनी (Capgemini) भारतात मोठी भरती करण्याच्या तयारीत आहे. कॅपजेमिनीने यावर्षी भारतात तब्बल 30,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 25 टक्क्यांपेक्षा जास्त असेल. कंपनीने याबाबत सांगितले, की भारतातील कंपनीच्या अस्तित्वाचा मोठा फायदा घेऊ इच्छिते. भारतात कॅपजेमिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन यार्डी यांनी एका मुलाखतीत सांगितले, की नव्या भरतीसह यावर्षी आम्ही कंपनीच्या महसूलात 7 ते 9 टक्क्यांच्या वाढीची आशा करतो. यामध्ये 50 टक्के फेशर्स आणि 50 टक्के लेटरलची नियुक्ती केली जाणार आहे.
  • भारतात एक लाखापेक्षा जास्त कर्मचारी – पॅरिस येथील आयटी कंपनी कॅपजेमिनीसाठी भारत सर्वात कौशल्याचे केंद्र आहे. कंपनीचे एकूण 2,70,000 कर्मचारी काम करत आहेत. मात्र, यामध्ये भारतातील कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 1,25,000 आहे. कंपनीने गेल्या वर्षी भारतात 24,000 लोकांना नोकरी दिली.
  • डिजिटल स्कील गरजेचे – यावर्षी होणाऱ्या भरती प्रक्रियेत क्लाउड, इंजिनिअरिंग आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट, आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स, 5G, सायबरसिटी याचे ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे, असे अश्विन यार्डी यांनी सांगितले.

IT companies needed more manpower. Many companies in other sectors have also hired employees. The sector will employ 138,000 new employees in 2021. The industry is projected to create 4.47 million jobs by the end of the financial year. IT jobs will increase in 2021, requiring more than 4.4 million professions, according to a NASSCOM survey. Read the details given below:

2021 मध्ये आयटी क्षेत्रातील नोकर्‍या वाढणार असून यामध्ये सुमारे 44 लाखाहून अधिक प्रोफेशन्सची आवश्यकता भासणार आहे, असे नॅसकॉमच्या सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. या आयटी क्षेत्रातील 95 टक्के सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अंदाज आहे की मागील वर्षाच्या तुलनेत 2021 मध्ये भरती अधिक चांगल्या प्रकारे होईल. तर, 67% हून अधिक मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सीईओ यांना असा विश्वास आहे की, वित्तीय वर्ष 2021 हे 2020 पेक्षा अधिक प्रकारे कामगिरी बजावेल.

  1. नॅसकॉमने वित्तीय सेवा वर्ष 2020-21 (वित्तीय वर्ष 21) मध्ये माहिती सेवा क्षेत्राच्या 2.3% वाढीचा अंदाज लावला आहे. अंदाज असा आहे की, आयटी कंपन्यांचे उत्पन्न 2020 मधील 190 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत आर्थिक वर्षात 194 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढले आहे. आघाडीच्या भारतीय आयटी कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2020-21 च्या उत्तरार्धात विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा चांगली कामगिरी केली.
  2. ही वाढ डिजिटल वर्षात आणि साथीच्या वर्षात कंपन्यांद्वारे तंत्रज्ञानाच्या वेगाने स्वीकारल्यामुळे झाली आहे. आयटी उद्योग संस्थेने आपल्या सामरिक पुनरावलोकन 2021 मध्ये म्हटले आहे की ’न्यू वर्ल्ड: द फ्यूचर इज व्हर्च्युअल’ ने आयटी क्षेत्राच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि डिजिटल अभ्याासनुसार नोकर भरतीत मोठ्या प्रमाणात योगदान दिले. आयटी उद्योगाच्या उत्पन्नात डिजिटल खर्चाने 28-30% योगदान दिले.
  3. कोविड -19मुळे वर्षभर व्यत्यय आला असूनही, राष्ट्रीय जीडीपीमध्ये जवळजवळ 8% योगदान दिले. एप्रिल ते सप्टेंबर 2020 पर्यंतच्या सेवा निर्यातीत 52% सापेक्ष वाटा होता. आयटीमधील महसूल वाढ प्रामुख्याने ई-कॉमर्सने झाली आहे. 4.8 टक्क्यांनी वाढून 57 बिलियन डॉलर झाली आहे. त्यानंतर हार्डवेअर विभागात 4.1 टक्क्यांनी वाढ झाली, ज्यामुळे महसूल 16 अब्ज डॉलर्सने वाढला आहे.
  4. आयटी कंपन्यांना अधिक मनुष्यबळाची गरज होती. इतर क्षेत्रांतील बर्‍याच कंपन्याही कर्मचार्‍यांनाही यात घेतलं आहे. या क्षेत्राकडून आर्थिक वर्ष 21 मध्ये 138,000 नवीन कर्मचारी कामावर असतील. आर्थिक वर्षाच्या अखेरीस या उद्योगात 4.47 दशलक्ष रोजगार उपलब्ध होतील, असा अंदाज वर्तविला आहे.

Leave a Comment