ITI Admission 2021

ITI Admission 2021 process-www.dvet.gov.in

DVET ITI Admission 2021 दहावीतील गुणांआधारे होणार आयटीआय प्रवेश 2021

Final Merit list is available now by logging in to their admission account. Candidates included in the merit list have been informed of the Merit number via SMS. In order to provide opportunity to the candidates in the counseling round, from 07.09.2021 to 07.10.2021, opportunity is being provided to fill the admission form online, to edit the application and to pay the admission application fee. Read the more details below:

 1. अंतिम गुणवत्ता यादी दि.04.09.2021 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. दि.03.09.2021 पर्यंत प्रवेश अर्ज निश्चित केलेले उमेदवार त्यांच्या प्रवेश खात्यात प्रवेश करुन (Login) अंतिम गुणवत्ता क्रमांक तपासू शकतात. गुणवत्ता यादीत समाविष्ट उमेदवारांना SMS व्दारे गुणवत्ता क्रमांक कळविण्यात आला आहे.
 2. दि.06.09.2021 रोजी सायंकाळी 05.00 वाजता प्रथम फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवडयादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, निवड झालेल्या उमेदवारांना SMS व्दारे कळविण्यात येईल व निवडपत्र उमेदवारांच्या प्रवेश खात्यात उपलब्ध करुन देण्यात येईल.
 3. दि.07.09.2021 ते दि.11.09.2021 दरम्यान पहिल्या प्रवेशफेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहुन प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही पूर्ण करावी.
 4. दि.03.09.2021 पूर्वी प्रवेश अर्ज सादर करु न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करुन देण्यासाठी दि.07.09.2021 ते दि.07.10.2021 दरम्यान ऑन लाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरूस्ती (Edit) करणे व प्रवेश अर्ज शुल्क भरणे साठी संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
 5. Click Here to check Merit list

DVET ITI Admission 2021 Online Process is stared now. The detailed schedule of DVET ITI admission will be announced after receiving the original Marksheet of 10th Class. A total of 91 courses are available in DVET ITI in Maharashtra. Eligibility is required to pass 10th class for 80 courses and pass or fail 10th for 11 courses. Although there is a CET condition for 11th admission, admission in ITI courses in the state will be based on 10th marks only.  

 • राज्यात आयटीआय प्रवेशाच्या नोंदणीला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना दहावीची मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
 • शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने गुरुवार, 15 जुलैपासूनच प्रवेशाच्या नोंदणीला सुरुवात केली आहे. राज्यातील एकूण 967 आयटीआयमधील प्रवेशासाठी एकूण 1 लाख 49 हजार 296 जागा उपलब्ध आहेत.
 • विविध कोर्सेसच्या प्रवेशाच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे आवाहन संचालनालयाने केले आहे. आयटीआय संस्थांमध्ये एकूण 91 कोर्स उपलब्ध आहेत. त्यातील 80 कोर्सेससाठी दहावी उत्तीर्ण आणि 11 कोर्ससाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ही पात्रता आवश्यक आहे.
 • अकरावी प्रवेशासाठी सीईटीची अट असली तरी राज्यातील आयटीआय अभ्यासक्रमाचे प्रवेश हे दहावीतील गुणांआधारेच होणार आहेत. त्यामुळे यंदा आयटीआय प्रवेशासाठी मोठी स्पर्धा रंगणार असून विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढल्याने सरकारी तसेच खासगी आयटीआयमधील एकेका जागेसाठी ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे.
 • दहावीत 60 ते 35 टक्क्यांपर्यंत 2 लाख 90 हजार 608 विद्यार्थी आहेत. यातील बहुसंख्य विद्यार्थी दहावीत कमी गुण मिळाल्यामुळे डिप्लोमा किंवा आयटीआय अभ्यासक्रमांकडे वळतात. हे अभ्यासक्रम एक ते दोन वर्षांचेच असल्याने भविष्यात अल्पावधीतच विद्यार्थ्यांना नोकरीच्या अथवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

ITI Vacant seat Details आयटीआयच्या उपलब्ध जागा

 • विभाग शासकीय खासगी एकूण
 • अमरावती 15,596 3008 18,604
 • संभाजीनगर 15,076 6172 21,248
 • मुंबई 16,656 3992 20,648
 • नागपूर 14,288 13,372 27,660
 • नाशिक 14,888 15,052 29,940
 • पुणे 17,312 13,884 31,196

DVET ITI Admission Schedule shall be published shortly

 • जागतिक युवा कौशल्य दिन, दि.15.07.2021 रोजी शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट 2021 सत्रासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेव्दारे प्रवेश अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
 • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावर उपलब्ध “माहितीपुस्तिका – प्रवेश पध्दती, नियमावली व प्रमाणित कार्यपध्दती” सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक अभ्यासावी. प्रवेश प्रक्रीयेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थांमध्ये दि.16.07.2021 पासुन रोज सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. प्रवेश पध्दती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व तद्नुषंगिक शंका असल्यास नजिकच्या शासकीय औ.प्र. संस्थेस संपर्क साधावा अथवा संबंधीत प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दुरध्वनी क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा.
Centralized Online ITI Admission Process – 2021
केंद्रीय ऑनलाईन आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया – 2021

आयटीआय प्रवेश 7 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश अर्ज करता येणार आहेत.

 1. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती, प्रवेश अर्जाचे शुल्क भरणेः 7 फेब्रुवारी अंतिम तारीख
 2. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाचा कालावधीः 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी

ITI Admission 2021  : The last chance to get ITI admission has come. 1 lakh 3 thousand 291 students have been admitted in ITI this year. Although the Corona crisis has had little effect on admissions, many have had new opportunities. This is the last chance of admission for the candidates who have passed the 10th supplementary examination and the facility is available from the time of submission of admission to the time of amendment. All the vacancies will be filled through the central online system and students will be able to apply for admission till February 7. Online application, correction of application, payment of admission application fee: Last date 7th February and Admission period for admitted students: 9th February to 15th February 

आयटीआय प्रवेश मिळवण्यासाठी शेवटची संधी चालून आलीय. आयटीआयमध्ये यंदा 1 लाख 3 हजार 291 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे प्रवेशावर थोडासा परिणाम झालेला असला तरी अनेकांना पुन्हा नव्यानं संधी मिळालीय. दहावी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ही प्रवेशाची शेवटची संधी असून, प्रवेश सादर करण्यापासून दुरुस्तीपर्यंतची सुविधा मिळतेय. सर्व जागा केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनं भरल्या जाणार असून, विद्यार्थ्यांना 7 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश अर्ज करता येणार आहे%�0.

गुणवत्ता यादी उद्या ८ फेब्रुवार�A5ला प्रसिद्ध केली जाणार

तर गुणवत्ता यादी उद्या ८ फेब्रुवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय पद्धतीनं उपलब्ध जागा आणि संस्था स्तरावरील जागांसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. कोणत्याही स्थितीत ऑनलाईन प्रवेश प्रणालीशिवाय प्रवेश मिळवता येणार नाही, अशी माहिती शिक्षण प्रशिक्षण संचालनालयानं दिलीय. ज्या संस्थांमध्ये जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. अशा जागांवरच प्रवेश देण्यात येणार आहे.


औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून दुसरी प्रवेश यादी ४ डिसेंबर रोजी

The admission process of Industrial Training Institutes (ITIs) has started after the government order to process the admission without implementing the Maratha reservation and the second admission list will be announced on December 4. There will be four admission rounds and one counseling round in the near future and the entire process will be completed by December 31. Accordingly, the merit list of the second round will be announced on Thursday, December 3 and the second list will be announced on Friday, December 4. Students who get admission in this round have to confirm their admission from 5th to 8th December. After that, the third admission list will be announced on December 11 and the fourth admission list on December 18. The counseling round will start from December 19.

मराठा आरक्षणाची अंमलबजावणी न करता प्रवेश प्रक्रिया करण्याच्या शासन आदेशानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून दुसरी प्रवेश यादी ४ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. आयटीआयची प्रवेश प्रक्रियाही ९ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत दिलेल्या अंतरिम आदेशांपासून थांबली होती. या शैक्षणिक वर्षांतील प्रवेश प्रक्रिया सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण लागू न करता या प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमदेवारांचा अर्ज खुल्या प्रवर्गासाठी ग्राह्य़ धरण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर आता ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या काळात चार प्रवेश फेऱ्या आणि एक समुपदेशन फेरी होणार असून ३१ डिसेंबपर्यंत सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानुसार दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी, ३ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असून शुक्रवारी, ४ डिसेंबरला दुसरी प्रवेश यादी जाहीर होणार आहे. या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ५ ते ८ डिसेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर तिसरी प्रवेश यादी ११ डिसेंबर तर चौथी प्रवेश यादी १८ डिसेंबर रोजी जाहीर होईल. १९ डिसेंबरपासून समुपदेशन फेरीची प्रक्रिया सुरू होईल.

राज्यात खासगी आणि शासकीय संस्थांमध्ये मिळून १ लाख ४५ हजार ९६८ जागा उपलब्ध होत्या. पहिल्या फेरीत ८८ हजार ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. त्यापैकी २७ हजार ३२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते.

सोर्स: लोकसत्ता


‘आयटीआय’चे सुधारित वेळापत्रक जाहीर; ‘एसईबीसी’आरक्षण वगळून प्रवेश

ITI’s revised schedule announced; Admission excluding SEBC reservation: A revised schedule of admission process in Industrial Training Institutes (ITIs) has been announced. The timetable was announced by the Directorate of Vocational Education and Training on Wednesday following the state government’s order on SEBC reservation. Students will be able to apply online on the Directorate of Vocational Education and Training (DVET) website till 30 November. Read More details below…

ITI Admission 2020 – 2021 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ‘एसईबीसी’ आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या आदेशानंतर बुधवारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने वेळापत्रक जाहीर केले. यामध्ये विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (DVET) वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज, अर्जात दुरुस्ती करता येणार आहे. तीन डिसेंबर रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.’एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश दिले जाणार आहेत.

‘आयटीआय’ची प्रवेश प्रक्रियाही नऊ सप्टेंबरपासून थांबली होती. २०२१-२१ शैक्षणिक वर्षातील प्रवेशप्रक्रिया सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण न ठेवता सदर वर्गात अर्ज केलेल्या उमदेवारांचा अर्ज खुल्या प्रवर्गासाठी ग्राह्य धरण्यात यावा, असे सरकारने आदेश दिले. त्यानंतर प्रवेशाचे पुढचे सुधारित वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासह अर्जातील दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जात बदल करून आपला प्रवेश अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा, असे संचालनालयाने म्हटले आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत ‘आयटीआय’मध्ये दररोज १० ते ११ या दरम्यान मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहेत. प्रवेशाच्या चार फेऱ्यांसह एक समुपदेशन फेरी असणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. प्रवेशप्रक्रियेतील माहिती विद्यार्थ्यांना वेबसाइटसह एसएमएसद्वारेही कळविण्यात येणार असल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. सविस्तर वेळापत्रक आणि सूचना www.dvet.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

पहिल्या फेरीनंतर अशी होती स्थिती

आयटीआय माहिती — शासकीय — खासगी — एकूण

 • क्षमता –९२७५२ –५३२१६ — १४५९६८
 • पहिली फेरी अलॉट — ७२५२६ — १५५३४ — ८८०६०
 • पहिली फेरी प्रवेश निश्चित –२१३४८ — ५९७४ — २७३२२..

सोर्स : म टा.


आयटीआय वर्ग सुरू होण्याचा मार्ग मोकळा

The Directorate of Vocational Education and Training has approved to start in-service training classes in Industrial Training Institutes (ITIs) in the state. ITI classes starting now. First year training It should be completed between 15th October and 10th November. The training of trainees admitted for courses of one or two years duration should be started online as soon as the admission process is completed. Read the complete details given below :

पुणे – राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आयटीआय वर्ग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रथम वर्षातील प्रशिक्षण दि. 15 ऑक्‍टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत पूर्ण करण्यात यावे. एक किंवा दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण प्रवेश प्रक्रिया संपुष्टात येताच ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात यावेत.

प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझर या गोष्टीची दक्षता घेणे आवश्‍यक आहे. आयटीआयच्या अनुक्रमे दोन वर्षे आणि एक वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण त्वरित सुरू करण्यात यावे. या प्रशिक्षणार्थ्यांची पुढील महिन्यात दिल्ली येथील प्रशिक्षण संचालनालयामार्फत परीक्षा होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या प्रशिक्षणार्थींच्या प्रशिक्षणास प्रथम प्राधान्य देण्यात यावे, असे नमूद केले आहे.


 दुर्गम व ग्रामिण भागात जेथे इंटरनेट जोडणीत अडचणी आहेत तेथील विद्यार्थी स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अथवा अन्यत्र प्रवेश अर्ज भरण्यासाठी जात असतात. तथापि, काही भागात स्थानिक लॉकडाऊन असल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. तसेच एकुण उपलब्ध जागांच्या तुलनेत प्राप्त प्रवेश अर्ज अधिक असले तरी काही विशिष्ट व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी वा काही तालुक्यांत उपलब्ध जागांच्या तुलनेत कमी विकल्प प्राप्त झाल्याचे देखिल निदर्शनास आले आहे. नियमित प्रशिक्षण सुरू होण्यासाठी अवकाश असल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री श्री. यांनी दिली. ही मुदत उद्या २१ ऑगस्ट रोजी संपणार होती. त्यास आता मुदतवाढ देण्यात येत आहे.

 सन 2015 ते सन 2019 या प्रवेशसत्रात प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या सरासरी 2.25 पट अर्ज प्राप्त झाले होते. तथापि, चालू वर्षी कोव्हीड – 19 च्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत उपलब्ध जागांच्या फक्त 1.45 पट अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत इच्छा असतानाही कौशल्य प्रशिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले

आयटीआय प्रवेशप्रक्रीया १ ऑगस्टपासून सुरू आहे. राज्यातील ४१७ शासकीय व ५६९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ८४ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या एकूण ६ हजार ८६८ तुकड्यांमधून एकूण १ लाख ४५ हजार ६३२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यापैकी अमरावती विभागात 17 हजार 984, औरंगाबाद विभागात 19 हजार 244, विभागात 19 हजार 948, नागपूर विभागात 28 हजार 136, नाशिक विभागात 29 हजार 500, पुणे विभागात 30 हजार 820 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यासाठी 19 ऑगस्टपर्यंत 2 लाख 55 हजार 803 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 2 लाख 21 हजार 585 विद्यार्थ्यांनी शुल्क अदा कलेले असून त्यापैकी 2 लाख 07 हजार 285 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठीचे विकल्पही भरले आहेत. यावरून नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 48 हजार 518 विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण केली नसल्याचे निर्दशनास येते. प्रवेश अर्ज मोबाईल व्दारे देखिल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


ITI Admission 2021: Against the backdrop of Corona, this year ITI admission process will be done through Online Mode from 01st August 2020, the application form will be available online at https://admission.dvet.gov.in (Directorate of Vocational Education and Training Maharashtra State). Skills Development, Employment and Entrepreneurship Minister Nawab Malik said. However, information on when the ITI colleges will start will be released later as per the government rules regarding lockdown,as per now only admission process is starting online. More details regarding ITI Admission 2020 are as given below:

आयटीआय प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून, जाणून घ्या प्रक्रिया

राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) प्रवेश प्रक्रिया यंदा केंद्रीभूत ऑनलाईन पद्धतीने (सेंट्रलाइज्ड) करण्यात येणार आहे. त्यासाठी १ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी सविस्तर माहितीपुस्तिका ३१ जुलैपासून संकेतस्थळावर डाउनलोड सेक्शनमध्ये पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

राज्यातील खासगी आणि शासकीय आयटीआयमधील प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू होत आहे.. अधिक तपशील जाणून घ्या…

प्रवेशअर्ज शुल्क: Application Fees

 • राखीव प्रवर्ग उमेदवार (Unreserved Category): रु. १५०/-
 • महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार (Outside Maharashtra State): रु. ३००/-
 • राखीव प्रवर्ग उमेदवार (Reserved Category): रु. १००/-
 • अनिवासी भारतीय उमेदवार (Non Residential Indian): रु. ५००/-

अर्ज करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे –

 • ऑनलाईनप्रवेश अर्ज http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दि. १ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध होईल.
 • प्रवेश अर्जात “Primary Mobile Number (प्राथमिक मोबाईल नंबर)” नोंदविणे अनिवार्य आहे. एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकच प्रवेश अर्ज नोंदविता येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रीयेबाबत उमेदवारांना वेळोवेळी SMS व्दारे माहिती व OTP (One Time Password) कळविण्यात येईल. सबब, उमेदवारांनी आपला अद्ययावत मोबाईल क्रमांक ऑनलाइन प्रवेश अर्जात “Primary Mobile Number” म्हणून नोंदविणे आवश्यक आहे. तसेच सदर मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रिये दरम्यान बदलता येणार नाही.
 • तथापि, उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणत्याही प्रकारे बदल करावयाचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरी नंतर “हरकती नोंदविणे” या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन तसा बदल करता येईल. तद्नंतर प्रवेश अर्जातकोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.
 • प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावरच पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादरकरण्यासाठी प्रवेशसंकेतस्थळावर नोंदणीक्रमांक (Registration Number) वपासवर्ड (Password) व्दारे प्रवेश (Login) करुन “Submit/ Change Options/ Preferences” व्दारे सादर करावेत.
 • पहिल्याप्रवेशफेरीसाठी व्यवसायवसंस्थानिहायविकल्पवप्राधान्यपूर्ण भरल्यानंतर Option Form ची छापीलप्रत (Print Out) घ्यावी.
 • उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चूकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेशप्रक्रीयेतुन बाद होईल.
आयटीआयची प्रवेशक्षमता – https://bit.ly/2Xd340l

Leave a Comment