Jalsampda Vibhag Bharti 2021 Updates

Jalsampda Vibhag Bharti 2021 Updates

जलसंपदा विभाग भरती २०२१ अपडेट्स

In Raigad district, there are 104 vacancies in the technical cadre from Deputy Chief Executive Officer to Assistant Applicant.  Raigad Dist. 75 posts have been sanctioned in the rural supply department of the state. Of these, only 35 posts have been filled. 40 posts are vacant. These include Deputy Chief Executive Officer 1, Executive Engineer 1, Deputy Engineer Civil Engineering 4, Deputy Engineer Mechanics 1, Assistant Geologist 1, Junior Geologist 2, Junior Engineer Civil Engineering Headquarters 3, Junior Engineer Civil Engineering Zilla Parishad Sub Division 15, Junior Engineer Mechanics 3, Drawer 1, Computer 1 , Air Sampling Driver 2, Ringman 1, Jack Hammer Driller 2 and Assistant Applicant 2. Read the details carefully given below:

जलसंपदा विभागात विविध पदे रिक्त

अलिबाग : एकीकडे पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे पाणी टंचाईवर उपाययोजना करणाऱ्या विभागांमध्येच रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी ते सहायक आवेदक अशी तांत्रिक संवर्गातील तब्बल १०४ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळेच रायगड जिल्ह्यातील पाणी टंचाईवर कायमची मात्रा मिळविण्यात आणि पाणी योजना राबविण्यात रायगड जिल्हा परिषद प्रशासनाला जंग पछाडावे लागत आहे.
जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाची अवस्था बिकट आहे. या विभागासाठी ६४ पदे मंजूर आहेत. या पदांपैकी एकही पद भरलेले नाही. या रिक्त पदांमध्ये कार्यकारी अभियंता१, उपकार्यकारी अभियंता १, उप अभियंता स्थापत्य ८, कनिष्ठ अभियंता स्थापत्य मुख्यालय ४, कनिष्ठ अभियंता स्थापत्य जिल्हा परिषद उपविभाग ४०, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक उपविभाग ८, आरेखक १ आणि कनिष्ठ आरेखक १ यांचा समावेश आहे.

रा. जि. प.च्या ग्रामीण पुरवठा विभागामध्ये ७५ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी केवळ ३५ पदे भरण्यात आली आहेत. ४० पदे रिक्त आहेत. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी १, कार्यकारी अभियंता १, उपअभियंता स्थापत्य ४, उपअभियंता यांत्रिकी १, सहायक भूवैज्ञानिक १, कनिष्ठ भूवैज्ञानिक २, कनिष्ठ अभियंता स्थापत्य मुख्यालय ३, कनिष्ठ अभियंता स्थापत्य जिल्हा परिषद उपविभाग १५, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ३, आरेखक १, संगणक १, वायू सांपडिक चालक २, रिंगमन १, जॅक हॅमर ड्रिलर २ आणि सहाय्यक आवेदक २ यांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार करून जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे आणि विज्ञानावरील जनतेची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सोर्स:लोकमत


Jalsampda Vibhag Recruitment 2021 : Although the irrigation facilities in the district are inadequate, the government is committed to increase them. In such a situation, if the manpower working in Yavatmal district for irrigation in the water resources department is shifted to the dam safety cell, it will affect the irrigation system of the district. Considering this matter, the Forest Minister and the District Guardian. It was decided to set up a ‘Dam Safety Cell’ under the Dam Safety Association Nashik and close two divisional offices in the Water Resources Department in Yavatmal district and a total of five sub-divisional offices under it. Also, out of the total 158 posts sanctioned in this office, 18 posts were to be classified for the dam safety cell. The offices to be closed included two divisional offices, the Lower Panganga Rehabilitation Department at Arni and the Minor Irrigation Department at Pusad, which come under the Yavatmal Project Board.

जलसंपदा विभागातील मंजूर पदे वर्ग करण्याबाबतच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती

यवतमाळ : जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा अपुऱ्या असल्या तरी त्या वाढविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. अशा परिस्थितीत जलसंपदा विभागात सिंचनासाठी यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत असलेले मनुष्यबळ धरण सुरक्षितता कक्षात स्थलांतरित केले तर त्याचा परिणाम जिल्ह्याच्या सिंचन व्यवस्थेवर होईल. ही बाब लक्षात घेता वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जलसंपदा विभागातील मंजूर पदे वर्ग करण्याबाबतच्या आदेशाला स्थगिती द्यावी, असे निर्देशित केले होते.

त्यांच्या या मागणीची तात्काळ दखल घेऊन सदर आदेशाला जलसंपदा विभागाने स्थगिती दिली आहे. जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर आधारित आहे. मान्सूनच्या पावसावरच येथील बहुतांश शेती अवलंबून आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा विभागाकडे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. तसेच जलसंपदा विभागामध्ये अधिकारी व कर्मचारी यांची पदेसुध्दा रिक्त आहेत. असे असताना येथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे इतरत्र वर्ग केल्यास त्याचा विपरीत परिणाम येथील सिंचन व्यवस्थेवर होईल. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री संजय राठोड यांनी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्याशी संपर्क करून त्या आदेशाला तात्काळ स्थगिती देण्याचे निर्देशित केले होते. वनमंत्री यांच्या प्रयत्नाने आता सदर आदेश स्थगित झाला असून येथील जलसंपदा विभागातील मंजूर पदे पूर्ववत राहणार आहेत.

वनमंत्र्यांच्या प्रयत्नाने कार्यवाही थांबली

धरण सुरक्षितता संघटना नाशिक अंतर्गत ‘धरण सुरक्षितता कक्ष’ निर्माण करून त्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील कार्यरत असलेली दोन विभागीय कार्यालये व त्या अंतर्गतची एकूण पाच उपविभागीय कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच या कार्यालयातील एकूण मंजूर 158 पदांपैकी 18 पदे धरण सुरक्षितता कक्षाकरिता वर्ग करण्यात येणार होते. बंद करण्यात येणाऱ्या कार्यालयामध्ये यवतमाळ प्रकल्प मंडळाअंतर्गत येणारे आर्णी येथील निम्न पैनगंगा पुनर्वसन विभाग आणि पुसद येथील लघु पाटबंधारे विभाग या दोन विभागीय कार्यालयांचा समावेश होता. तसेच याअंतर्गत येणारे आर्णी येथील निम्न पैनगंगा पुनर्वसन उपविभाग क्रमांक 1, पुसद येथील निम्न पैनगंगा पुनर्वसन उपविभाग क्रमांक 2, आर्णी येथील निम्न पैनगंगा पुनर्वसन उपविभाग क्रमांक 3 तसेच पुसद येथील लघु पाटबंधारे उपविभाग क्रमांक 2 आणि आर्णी येथील लघु पाटबंधारे उपविभाग क्रमांक 3 या कार्यालयांचा समावेश होता.

सौर्स : डेलीहंट

1 thought on “Jalsampda Vibhag Bharti 2021 Updates”

Leave a Comment