JEE Mains Exam 2021

JEE Main Exam 2021 Date Extended

It has been decided to postpone the JEE Main exam 2021 against the backdrop of increasing number of patients with corona infection. Union Education Minister Dr. Ramesh Pokhriyal shared the information on Twitter. The next date of the exam will be announced soon. The NTA also said that the new date will be announced soon and students will have at least 15 days before the exam. Read the details carefully give below:

करोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर JEE Main परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली. परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.  JEE Main परीक्षा २७ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत ही परीक्षा घेण्यात येते. रमेश पोखरियाल यांनी ट्विट केले आहे की, ‘करोना विषाणू संसर्गाची सद्यस्थिती पाहता मी एनटीएला सल्ला दिला होता की एप्रिलमध्ये होणारी जेईई मेन्स परीक्षा स्थगित केली जावी. आपल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांचे करिअर महत्त्वाचे आहे.’ पोखरियाल यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला पाठवलेले पत्रही या ट्विटमार्फत शेअर केले आहे. एनटीएने असंही सांगितलं आहे की नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना परीक्षेआधी किमान १५ दिवसांचा अवधी मिळेल.


JEE Main Exam 2021- Admit Card

JEE Main Exam Admit Card: If you have applied for the JEE Main Examination in February 2021, you can download your Admit Card. The NTA has provided three links to download the admit card. All three links are given below. You can download your admit card by clicking on those links.

JEE Main 2021 या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे. यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे तीन लिंक सक्रिय करण्यात आल्या आहेत.

JEE Main 2021 admit card: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन फेब्रुवारी 2021 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड (JEE Main february admit card) जारी केले आहेत. अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर अॅडमिट कार्डाची लिंक अॅक्टिव्ह केली आहे. nta.ac.in या संकेतस्थळावर देखील यासंबंधीची सूचना देण्यात आली आहे.

जर तुम्ही फेब्रुवारी २०२१ जेईई मेन परीक्षेसाठी अर्ज केला आहे, तर तु्म्हाला आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी एनटीएने तीन लिंक दिल्या आहेत. तिन्ही लिंक पुढे देण्यात आल्या आहेत. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकता.

ही परीक्षा २३ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू होणार आहे. विविध शिफ्ट्स मध्ये जेईई मेनच्या पहिल्या सत्राची परीक्षा २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत घेण्यात येईल.

जेईई मेन २०२१ अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी –

  • – नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जावे.
  • – होमपेजवरील अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याच्या लिंकवर क्लिक करावे.
  • – विचारलेली माहिती भरावी.
  • – सबमिट करावे.
  • – आता अॅडमिट कार्ड तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • – अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे, प्रिंटआऊट घ्यावे आणि त्यावरील संपूर्ण माहिती, सूचना नीट वाचाव

JEE Main admit card 2021 डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करा.
लिंक – १
लिंक – २
लिंक – ३


JEE Mains Exam 2021 Details

JEE Mains Exam 2021: Union Education Minister Ramesh Pokhriyal Nishank has announced the JEE Main 2021 exam. The Education Minister has said that the first session of the JEE Main Examination 2021 will be held from February 23 to February 26, 2021. This year, the JEE May exam will be held four times a year. Read More about JEE Mains Exam 2021 Full Details  at below:

JEE Main Exam 2021: कोरोनाच्या काळात बारावी बोर्डाच्या परिक्षबाबत संभ्रम असताना जेईई मेन्स 2021 परीक्षेचा वेळापत्रक आज शिक्षा मंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केले. याआधी विद्यार्थ्यांशी संवाद साधून नॅशनल टेस्टिंग एजन्सीने संपूर्ण विचार करून यावर्षी विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी मिळावी यासाठी चार सत्रात जेईई मेन्स 2021 परीक्षा घेतली जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे 2021 या चार सत्रामध्ये जेईई मेन्स परीक्षा घेतल्या जाणार आहे. 16 डिसेंबर 2020 ते 16 जानेवारी 2021 दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज या परीक्षेसाठी करता येणार आहे. जेईई मेन्स 2021 परीक्षा पहिल्यांदाच इंग्रजीसोबत मराठीसह 13 मातृभाषेत ही परीक्षा देता येईल

या परीक्षेचा आयोजन करताना पहिला सत्र – फेब्रुवारी महिण्याच्या 23 ते 26 फेब्रुवारी 2021 असणार आहे.त्यानंतर विद्यार्थी मार्च, एप्रिल, मे महिन्यात सुद्धा परीक्षा देऊ शकेल. यामध्ये या परीक्षा 15 ते 18 मार्च, 2021 दरम्यान तर एप्रिल महिन्यात 27 ते 30 एप्रिल 2021 दरम्यान आणि शेवटची संधी मे महिन्यात 24 ते 28 मे 2021 दरम्यान मिळणार आहे. विद्यार्थ्याला एक किंवा जास्तीत जास्त 4 वेळेस जेईई मेन्स परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना चुका सुधारून अधिकाधिक गुण प्राप्त करता येतील. विद्यार्थ्याला चारही वेळेस परीक्षा देणे अनिवार्य नाही. विद्यार्थी सोयीनुसार परीक्षा चारपैकी किती वेळेस व कधी द्याव्यात हे ठरवू शकेल. चार सत्रांपैकी ज्या जेईई मेन्स परीक्षेत अधिक गुण मिळाले आहेत ते गुण ग्राह्य धरले जातील

ज्या विद्यार्थ्यांच्या बारावी बोर्डाच्या परिक्षा या चार पैकी एका महिन्यात येत असतील तर ते विद्यार्थी सोयीनुसार इतर महिन्यामध्ये जेईई परीक्षा देऊ शकतील. ऑनलाइन शिक्षण सुरू असताना सीबीएसई व इतर राज्यातील बोर्डानी बारावी बोर्डाचा अभ्यासक्रम कमी केला आहे. त्यामुळे पेपर नेमका कोणत्या अभ्यासक्रमवर असेल? पूर्ण अभ्यासक्रम परिक्षेसाठी येणार का? असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारले जात होते. त्यावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विचार करून निर्णय घेतले आहेत. प्रश्नांची काठिण्य पातळी ठेवून परीक्षेत 90 प्रश्न असणार आहेत. त्यातील 75 प्रश्न सोडवावे लागतील. यामध्ये 15 प्रश्न वैकल्पिक असतील या प्रश्नांना निगेटीव्ह मार्किंग नसेल.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या सर्वधिक गुणांच्या आधारे त्याची रँक व मेरिट लिस्टमधील स्थान जाहीर केलं जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी इच्छा व्यक्त केली की, मातृभाषामध्ये सुद्धा इंजिनियरिंगची प्रवेश परीक्षा घेतली जावी. जेणेकरून तळागाळातील विद्यार्थी भाषेचं बंधन न ठेवता परीक्षा देऊ शकेल, त्यानुसार पहिल्यांदाच जेईई मेन्स परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाणार आहे. हिंदी, इंग्रजी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू,उर्दू या भाषेत देता येणार आहे.

परीक्षेच्या पॅटर्न विषयी महत्वाचे मुद्दे :

  • जेईई मेन 2021 ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू आणि उर्दू या 13 भाषांमध्ये आयोजित केली जाणार आहे. हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेच्या परीक्षा देशभरात घेण्यात येतील, तर इतर प्रादेशिक भाषेचे प्रश्न संबंधित राज्यांमध्ये घेण्यात येतील.
  • जेईई मेन 2021 परीक्षा प्रयत्नांची (attempts) संख्या एनटीएने वाढविली आहे. जेईई मेन फेब्रुवारी 2021 मध्ये घेण्यात येईल, त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे 2021 मध्ये तीन सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. राज्य परीक्षा/केंद्रशासित प्रदेशात वेगवेगळ्या वेळी होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये यामुळे व्यत्यय येणार नसल्याचे एनटीएने सांगितले.
  • लॉकडाऊनमुळे अभ्यासक्रम बदलणाऱ्या शाळा, बोर्डांमार्फत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी जेईई मेनची पद्धत यावेळी बदलली आहे. प्रश्नपत्रिकांना पर्याय असणार आहेत. आता दोन विषयांमध्ये विभागलेल्या प्रत्येक विषयात उमेदवारांचे 30 प्रश्न असतील. विभाग अ मध्ये 20 प्रश्न असतील तर विभाग ब मध्ये 10 प्रश्न असतील. विभाग ब मधील 10 प्रश्नांपैकी कोणत्याही पाच प्रश्नांचे उमेदवारांना उत्तर देता येणार आहे.

Leave a Comment