Kolhapur Shivaji University Bharti 2020

Kolhapur Shivaji University Bharti 2020

172 महाविद्यालयांत हंगामी शारीरिक शिक्षण संचालक

Shivaji University Recruitment 2020 : Of the 283 colleges affiliated to Shivaji University, only 111 have permanent physical education directors. The Director of Seasonal Physical Education is working in the remaining 172 colleges. Since this post has not been filled for many years, the question is being raised on the sports selection committees why there are no sports related faces. The college wants to complete the recruitment process with the approval of the director of departmental education and higher education to fill the positions. Read the complete details carefully….

Shivaji University Direct Recruitment 2020

शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित 283 महाविद्यालयांपैकी केवळ 111 महाविद्यालयांत कायमस्वरूपी शारीरिक शिक्षण संचालक आहेत. उर्वरित 172 महाविद्यालयांत हंगामी शारीरिक शिक्षण संचालक काम करत आहेत. या पदाची भरती अनेक वर्षांपासून झाली नसल्याने खेळांच्या निवड समित्यांवर एखाद्या खेळाशी संबंधित नसणारे चेहरे का?, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागातील मनुष्य बळाच्या कमतरतेचे दुखणे आजही कायम आहे. महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक पदाची अवस्था अशीच आहे. कायमस्वरूपी शारीरिक शिक्षण संचालक पद न भरल्याने हंगामी शारीरिक शिक्षण संचालकांना मान मोडून काम करण्याविषयी पर्याय नसल्याचे दिसते. त्यांच्या हातावर मिळणारा मोबदला कायमस्वरूपी शारीरिक संचालकांच्या वेतनाच्या दहा-बारा पट क्‌मी असतो. विविध संघातील खेळांचा सराव घेणे, संघांची बांधणी करुन खेळाडूंची निवड करणे, संघांना स्पर्धांत प्रोत्साहित करणे, ठिकठिकाणी संघांना स्पर्धेसाठी घेऊन जाणे, अशी कामे करावी लागतात.
महाविद्यालयातील शारीरिक संचालकांना विद्यापीठ संघांच्या निवड समित्यांवर नियुक्त केले जाते. शारीरिक संचालकांचा आकडा कमी असल्याने संबंधित खेळाच्या निवड समितीवर अन्य खेळातील शारीरिक संचालकाला सामावून घ्यावे लागते. विद्यापीठाद्वारे एकूण 46 खेळ प्रकारात विद्यापीठाचे संघ सहभागी होतात. विद्यापीठ स्तरावर 2019-20 मध्ये मुला-मुलींच्या संघ निवडीसाठी तसा फॉर्म्युला वापरला. याआधीही हा फॉर्म्युला वापरला आहे. त्यातूनच विभागाच्या कारभारावर बोट ठेवले जात आहे. अधिसभेतही सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. विभागाची खरडपट्टी काढत कोंडीही केली.

भरतीसाठी क्रीडा विभागाने प्रस्ताव

पदे भरण्यासाठी महाविद्यालयाने विभागीय शिक्षण व उच्च शिक्षण संचालकांची मान्यता घेऊन भरतीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. चार-पाच वर्षांत शासनाने पद भरतीला मान्यता देणे थांबवले आहे. क्रीडा अधिविभागात क्रिकेटचे मार्गदर्शक म्हणून शशी घोरपडे कार्यरत होते. त्यांच्या सेवा निवृत्तीनंतर या पदाच्या भरतीसाठी क्रीडा विभागाने प्रस्ताव पाठवला होता. त्यावर मान्यतेची मोहोर मात्र उमटली नाही. परिणामी हंगामी मार्गदर्शक पदावर सुचय खोपडे यांची निवड झाली आहे.

कायस्वरुपी शारीरिक शिक्षण संचालक असलेल्या महाविद्यालयांची संख्या :

* कोल्हापूर – 50

* सांगली – 32

* सातारा – 29

एम.पीएड्‌. झालेल्या शिक्षकाला सर्व खेळांतील माहिती असते. त्याचा अन्य खेळाशी संबंधित निवड समितीवर समावेश झाला तरी काही हरकत नसते. टेक्‍निकल मुद्दा उपस्थित केला तर निवड प्रक्रिया कशी पूर्ण होणार?

– डॉ. पी. टी. गायकवाड, प्रभारी क्रीडा संचालक, शिवाजी विद्यापीठ.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापकांसह विविध पदांवर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

Kolhapur Shivaji University Bharti 2020 : University published an advertisement for the various 15 posts. Professor Posts Recruitment will be held on Shivaji University. Interested candidates walk in interview on 5th and 6th March 2020. All other important details are given below:

Shivaji University Kolhapur Bharti 2020

Kolhapur Shivaji University Bharti 2020

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरमध्ये विविध पदांसाठी 15 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. याद्वारे प्राध्यापक पदी काम करण्याची इच्छा असलेले उमेदवार देखील अर्ज करु शकतात. या पदांवरील भरतीसाठी थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. या पदांसाठी 5 आणि 6 मार्चला मुलाखती घेण्यात येतील.

पद आणि पदसंख्या –

1. कोर्स समन्वयक – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – भारतातील कोणत्याही विद्यापीठातून 55 टक्क्यांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य पदवी पास होणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातील कामाला अनुभव हवा.
मुलाखत – 6 मार्च 2020 सकाळी 11 वाजता.

2. सहाय्यक प्राध्यापक – 3 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त भारतीय किंवा परदेशी विद्यापीठातून किमान 55 टक्के गुणांसह सबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
मुलाखत – 5 मार्च 2020 सकाळी 11 वाजता.

3. सहयोगी प्राध्यापक – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – संबंधित शाखेतील पीएच. डी पदवी, किंमान 55 टक्के गुणांसह अकाऊंटसीमध्ये एमकॉम पदवी आणि नेट – सेट पात्र, संबंधित क्षेत्रातील कामाचा 08 वर्षांचा अनुभव.
मुलाखत – 6 मार्च 2020 सकाळी 11 वाजता.

पोलीसनामा
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *