Krushi Vibhag Bharti 2022

Krushi Vibhag Bharti 2022

Krushi Vibhag Bharti 2022– The state government had to some extent restricted the recruitment of government servants in the Corona background. As a result, all government recruitment processes were halted. But now these restrictions imposed by the government have been relaxed to some extent. Therefore, the way is now open to fill some vacancies in the government department and the agriculture department is no exception. Now some vacancies in the agriculture department will also be filled.

कोरोना महामारी आल्यानंतर लॉकडाऊन लावण्यात आले होते. या कोरोना पार्श्वभूमीवर शासकीय नोकर भरतीवर राज्य शासनाने काही प्रमाणामध्ये निर्बंध लावलेले होते. त्यामुळे सर्वच प्रकारच्या शासकीय भरती प्रक्रिया थांबविण्यात आलेल्या होत्या. परंतु आता शासनाने लावलेले हे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. त्यामुळे आता शासकीय विभागातील काही रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्याला कृषी विभाग देखील अपवाद नाही. आता कृषी विभागातील देखील काही रिक्त पदे भरली जाणार आहेत.

  • कोविड संकटामुळे राज्य शासनाचे महसूल उत्पादनात प्रचंड घट आलेली होती व त्यामुळे शासनाने तिजोरीवर आलेला ताण बघता 4 मे 2020 पासून काही आर्थिक उपाय योजना लागू केले होते.
  • तेव्हा हे निर्बंध लागू करण्यात आले होते त्यावेळी उच्चस्तरीय सचिव समितीने तसेच उपसमितीने मान्यता दिलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षातील रिक्त पदे आता पूर्णतः भरता येतील असे राज्याच्या अर्थखात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कृषी विभागात आता काही रिक्त पदे भरण्याबाबत हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे.
  • 2016 मध्ये अर्थ खात्याने दिलेल्या सूचनांप्रमाणे सुधारित आकृतिबंध मंजूर केलेल्या प्रशासकीय विभागाने राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे 100% भरावीत असे शासनाने म्हटले आहे.
  • त्यामुळे आता कृषी विभाग आता कोणत्या प्रकारचे रिक्त पदे भरणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पदभरती करण्यास शासनाने मान्यता दिली असली तरी सुधारित आकृतीबंध अंतिम रित्या मंजूर असल्यास त्यातील राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षातील पद वगळताअन्य पदे भरण्यास केवळ 50 टक्के भरता येणार आहे.
  • मात्र या नियमामुळे भरतीसाठी अजिबात संधी नसल्यास किमान एक  पद भरता येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

How to apply for Krushi Sevak अर्ज कसा करायचा ?

Krushi Vibhag Bharti Sample Papers

Krushi Vibhag Sample Paper

Krushi Vibhag Bharti Previous Year Papers

Krushi Vibhag Old Paper

कृषी विभागातील गट-अ ते गट-ड संवर्गातील रिक्त पदे लवकर भरणार

कृषी विद्यापीठातील १२९९ पदे रिक्त

राज्यात कृषी विभागासाठी गट-अ ते गट-ड संवर्गातील एकूण 27 हजार 502 पदांचा आकृतीबंध मंजूर असून त्यापैकी 18 हजार 622 पदे भरलेली आहेत तर 8 हजार 880 पदे रिक्त आहेत. यामधील तांत्रिक संवर्गाची 20 हजार 181 पदे मंजूर असून त्यापैकी 14 हजार 809 पदे भरलेली आहेत तर 5 हजार 372 पदे रिक्त आहेत.

16 मे 2018 शासन निर्णयानुसार तांत्रिक संवर्गातील 100 टक्के पद भरतीस मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय संवर्गातील पदे भरण्यावर वित्त विभागाच्या 4 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्बंध असल्याने तूर्तास ही पदे भरता आली नाहीत, अशीही माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे व राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली.

राज्यात कृषी खात्याची आठ हजारांहून अधिक पदे रिक्त

Agriculture Department Bharti 2021: कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा दावा प्रत्येक राज्य सरकार करीत असले तरी त्यासाठी लागणारे मनुष्यबळ देण्याबाबत मात्र त्यांचे कायम दुर्लक्ष होत असल्याचे वेळोवेळी दिसून येते. सध्या राज्यात कृषी खात्यात सर्व प्रकारची एकूण ८,७९० पदे रिक्त आहेत.

ही स्थिती मागील अनेक वर्षांपासून आहे. वर्ग -२ तांत्रिक अधिकाऱ्यांची  सुमारे ४० अधिकाऱ्यांची पदे नामनिर्देशाने भरण्यात आलेली नाहीत. दरवर्षी मोठय़ा प्रमाणात कृषीपदवीधर बाहेर पडतात. मात्र त्यांना नोक ऱ्यांची संधी उपलब्ध नाही. पदोन्नतीच्या बाबतीतही हीच स्थिती आहे.

रिक्तपदांमुळे कृषी खात्यात तांत्रिक कर्मचाऱ्यांवर कामाचा  भार वाढला आहे. लिपिक वर्गाची ४० टक्के पदे रिक्त असल्याने त्याचा फटका प्रशासकीय कामांना बसला आहे. रिक्तपदे तातडीने भरण्यासंदर्भात वेळोवेळी सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्याची दखल घेतली जात नाही, असे राज्य कृषी विभाग समन्वय महासंघ, पुणेचे अध्यक्ष मुकुंद पालटकर यांनी सांगितले.

विभाग- रिक्तपदे

  • आयुक्तालय- ४२७
  • अमरावती विभाग- ९,२६२
  • नागपूर विभाग-१,४४७
  • पुणे विभाग –११८
  • कोल्हापूर- ८६३
  • ठाणे विभाग-  १,१२२
  • नाशिक विभाग- ५९७
  • औरंगाबाद विभाग- ६३७
  • लातूर विभाग- ८०६

रिक्तपदे भरली नाही तर येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कर्मचारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील. सरकारने याची दखल घ्यावी.


कृषी विभाग भरती 2022 – ९ हजार पदे रिक्त

Krushi Vibhag Bharti Advertisement : As per the news published in Lokmat Newspaper there were 9000 vacancies still not filled in Agriculture department in Maharashtra. Various posts will be filled in this year in Krushi Vibhag. Candidates read the complete details given below regarding the Krushi Vibhag Department recruitment. Candidates keep visit on our website regularly for the further updates of Krushi Vibhag Bharti 2022.

Krushi Vibhag Bharti Advertisement 2022




2 thoughts on “Krushi Vibhag Bharti 2022”

Leave a Comment