Krushi Vidyapeeth Bharti 2021

Krushi Vidyapeeth Bharti 2021

कृषी विद्यापीठातील १२९९ पदे रिक्त

कृषी विभागातील गट-अ ते गट-ड संवर्गातील रिक्त पदे लवकर भरणार

Krushi Vidyapeeth Bharti 2021 – Parbhani District Vasantrao Naik Maharathwada Krushi Vidyapeeth have been sanctioned various total of 2 thousand 884 posts. The following posts have not been filled by the state government for the last several years. Therefore, some prominent people have taken advantage of this opportunity and have held important positions for the last several years. What is special is that some people have been charged with irregularities. Therefore, it is being demanded that all these vacancies should be filled immediately.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध विभागात एकूण २ हजार ८८४ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये राज्य शासनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून खालील पदे भरण्यात आलेली नाही. त्यामुळे या संधीचा लाभ काही विशिष्ठ व्यक्तींनी घेतला असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडेच महत्त्वाच्या पदांचा पदभार आहे. विशेष म्हणजे काही जणांवर अनियमिततेचा आरोप असतानाही त्यांच्याकडेच पदभार ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ही सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.

रिक्त पदांचा तपशील पुढीलप्रमाणे

 • अ प्रवर्गातील ५९८,
 • ब प्रवर्गातील १६९,
 • क प्रवर्गातील ७२९,
 • ड प्रवर्गातील १ हजार ३८३ पदांचा समावेश आहे.

सद्यस्थितीत १ हजार ५८५ पदे भरण्यात आली आहेत. त्यात

 • अ प्रवर्गाच्या ३५०,
 • ब प्रवर्गाच्या ८१,
 • क प्रवर्गाच्या ४३४ आणि
 • ड प्रवर्गाच्या ७१८ पदांचा समावेश आहे.

सद्यस्थितीत

 • अ प्रवर्गाची २४८,
 • ब प्रवर्गाची ८८,
 • क प्रवर्गाची २९५ आणि
 • ड प्रवर्गाची ६६८ पदे रिक्त आहेत.

अ प्रवर्गातील रिक्त पदांमध्ये

 • संचालकांची २,
 • सहयोगी अधिष्ठाता १०,
 • प्राध्यापकांची २०,
 • सहायक प्राध्यापकांची १०९,
 • सहयोगी प्राध्यापक ८९,
 • कार्यक्रम समन्वयक १,
 • उप विद्यापीठ अभियंता ३,
 • विद्यार्थी कल्याण अधिकारी १,
 • कुलगुरू यांचे स्वीय सहायक १,
 • सहाय्यक कुलसचिवांच्या ७ पदांचा समावेश आहे.

याशिवाय ब प्रवर्गातील

 • वरिष्ठ संशोधन सहायक कृषीची तब्बल ४०,
 • तर सहायक कक्ष अधिकाऱ्याची १२,
 • वरिष्ठ संशोधन सहायक जैवतंत्रज्ञची ४,
 • अन्नतंत्रची ३,
 • लघुलेखकची ९,
 • तांत्रिक सहायक ४,
 • कार्यक्रम सहायक संगणक ३ आदी पदे रिक्त आहेत.

Leave a Comment